Sangali : सक्तीने ‘रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद’, कारण…
वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली.
कोरोनाच्या काळात मुलं पुर्णपणे मोबाईलच्या (Mobile) आहारी गेली होती. कारण शासन दरबारी तसा आदेश काढला होता की, मुलांना डिजीटल शिक्षण (Digital Education) दिलं पाहिजे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिला होता. परंतु पालकांनी अभ्यासासाठी (Study) दिलेला मोबाईल मुलं इतर गोष्टीसाठी सुद्धा वापरु लागले. त्यामुळे शैक्षणिक दर्जा घसरला होता. मुलं घरी अभ्यास नीट करीत नसल्याची पालकांची सुद्धा ओरड होती.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावाने एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे. गावाने घेतलेल्या बैठकीत टीव्ही आणि इंटरनेट दीड तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलांनी पाठ्यपुस्तकांचा नीट अभ्यास करावा म्हणून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. सात वाजल्यापासून साडेआठवाजेपर्यंत मोबाईलचं इंटरनेट आणि टीव्ही बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय लोकांपर्यंत रोजच्यारोज पोहोचवण्यासाठी एका मंदीरावरती भोंगा सुद्धा लावण्यात आला आहे.
वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली. परंतु मुलं अभ्यास करीत नसल्याची पालक ओरड करीत आहेत. त्यामुळे संपुर्ण गावाने एक बैठक बोलावली त्यामध्ये सुप्त निर्णय घेतला. त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे.
मुलं अभ्यासाच्यावेळी एकतर मोबाईलवरती काहीतरी पाहत असतात, तर महिला त्यांच्या आवडीच्या मालिका पाहत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावाने बैठकीत निर्णय घेतला. झालेल्या बैठकीला गावातील महिला, पुरुष आणि तरुण पिढी सुद्धा उपस्थित होती अशी माहिती एका दैनिकाने छापली आहे.
त्यावेळेत मुलगा बाहेर दिसला नाही, तसेच त्याची सगळी जबाबदारी त्या पालकांची असेल. एखादा मुलगा बाहेर आढळून आल्यास त्याला अभ्यासाची आठवण करुन द्यायची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य आणि पालकांना दिली आहे.