राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

राज्य सरकारने दिवाळी पाडवा अर्थात सोमवारपासून मंदिर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असं असलं तरी मंदिर संस्थांनांना सरकारकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाच्या आतील लहान मुलं आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!
वणी येथील सप्तश्रृंगी देवी.
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 11:58 AM

नाशिक: ‘ही श्रींची इच्छा’ म्हणत राज्यातील मंदिरे उद्यापासून सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत भाविकभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. असं असलं तरी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान उद्यापासून होण्याबाबत संभ्रम कायम आहे. कारण, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना प्रशासनाकडून अद्याप आदेश मिळाले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. (Confusion persists about the start of temples in Nashik district)

मंदिरे सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत. आदेश मिळाल्यानंतर तात्काळ पुढील कारवाई सुरु करु, असं सप्तश्रृंगी मंदिर, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील हे तीन प्रमुख मंदिर सोमवारपासून सुरु होणार की नाही, याबाबत अद्याप काही सांगता येत नाही.

दुसरीकडे राज्य सरकारने दिवाळी पाडवा अर्थात सोमवारपासून मंदिर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असं असलं तरी मंदिर संस्थांनांना सरकारकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाच्या आतील लहान मुलं आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसंच मास्क घातल्याशिवाय कुणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर खुलं करण्यापूर्वी सॅनिटाईज, तीन टप्प्यात मंदिर उघडणार

दररोज 4 हजार भाविकांना मिळणार तुळजाभवानीचे दर्शन, ऑनलाईन पाससह ऑफलाईन पास व्यवस्था, 16 तास मंदिर खुले राहणार

Confusion persists about the start of temples in Nashik district

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.