महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात थेट दोन गट? नाना पटोले यांच्या भूमिकेला आव्हान देणारी बड्या नेत्याची भूमिका

नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) पक्षामध्ये दोन गट पडल्याचं उघडपणे स्पष्ट झालंय. कारण काँग्रेसमधील दिग्गज नेते परस्परांविषयी वेगवेगळे मुद्दे मांडत आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात थेट दोन गट? नाना पटोले यांच्या भूमिकेला आव्हान देणारी बड्या नेत्याची भूमिका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 9:55 PM

बुलढाणा : नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) पक्षामध्ये दोन गट पडल्याचं उघडपणे स्पष्ट झालंय. कारण काँग्रेसमधील दिग्गज नेते परस्परांविषयी वेगवेगळे मुद्दे मांडत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडलीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीवर गंभीर आरोप केले आहेत. तांबे परिवार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. ही स्क्रिप्टेड स्टोरी होती. आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी उघडपणे केला. तसेच आपल्याला एबी फॉर्म योग्यवेळी मिळाला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. सत्यजीत तांबे यांच्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी सत्यजीत तांबे यांचं समर्थन केलं आहे.

“सत्यजीत तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाती दखल घ्यावीच लागणार. पक्षाला आता कुठे चांगले दिवस येत आहेत. त्यात कुठे हे असं…! प्रदेश कार्यकरिणीने याचा खुलासा केला पाहिजे”, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाबतीत हायकमांड निर्णय घेतील. उद्या मी आणि सुनील केदार, आम्ही दोघे सत्यजीत तांबे विषयावर नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

नाना पटोले यांची भूमिका काय?

सत्यजीत तांबे यांच्या आरोपांवर नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सुरुवातीला उत्तर देणं टाळलं. तांबेंच्या आरोपांवर पक्षाचे प्रवक्ते अधिकृतपणे भूमिका मांडलीत, असं नाना पटोले म्हणाले. त्यानंतर त्यांनी सत्यजीत तांबे यांना इशाराच देवून टाकला.

“भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे. पण जे कुणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात त्या लोकांचा आमच्याकडे सगळा मसाला आहे. मला आज त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रवक्त्याला त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. लोकांपर्यंत वस्तुस्थिती जायला पाहिजे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

अतुल लोंढे यांची पत्रकार परिषद

नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. “माझ्या वडिलांच्या जागेवर मी का लढू?, असं सत्यजीत तांबे बोलले. फॉर्म उशिरा मिळाला, असं त्यांनी सांगितलं नव्हतं. याशिवाय फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ओके उत्तर पाठवलं होतं”, असं अतुल लोंढे यांनी सांगितलं. तसेच “सहा महिन्यांपूर्वी सत्यजीत तांबे मला भेटल्यावर म्हणाले की, मी माझ्या वडिलांच्या जागेवर का लढू? मी विधानसभा लढवेन,” असं अतुल लोंढे म्हणाले.

“एबी फॉर्म मिळाल्यावर सत्यजीत तांबे यांचा ओके मेसेज आला. याचाच अर्थ त्यांना योग्य वेळेत योग्य फॉर्म मिळाला. फॉर्म मिळाला नसता तर फॉर्म मिळायला उशिर झाला म्हणून अपक्ष फॉर्म भरावा लागला, असा मेसेज आला असता”, असं लोंढे म्हणाले.

युवक काँग्रेसच्या सचिवांनी अतुल लोंढे यांचा दावा फेटाळला

अतुल लोंढे यांचा दावा युवक काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी फेटाळला. सत्यजीत तांबे कोरा एबी फॉर्म दिला नसल्याचं सचिन गुंजाळ म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.