काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

पाच राज्यातील पराभवामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पराभवाची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्तीही केली आहे.

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला
सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 3:29 PM

सोलापूर: पाच राज्यातील पराभवामुळे काँग्रेसमध्ये (congress) अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पराभवाची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्तीही केली आहे. तर दुसरीकडे जी-23 नेत्यांनीही पक्षाच्या पराभवावरून थेट गांधी कुटुंबालाच (gandhi family) नेतृत्व सोडण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या या पराभवावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाला आहे. नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे, अशी कबुली देतानाच पक्षाने आता त्यावर आत्मचिंतन करावं, असा सल्ला सुशील कुमार शिंदे यांनी दिला आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सुशीलकुमार शिंदे यांनी हा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातून पहिल्यांदाच काँग्रेस नेत्याने पक्षाच्या पराभवावर थेट भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शिंदे यांच्या या विधानाला महत्त्व आलं आहे.

5 राज्याच्या निवडणुकांमध्ये प्राधान्याने पंजाबमध्ये काँग्रे पक्षाचे काय चुकले याचा विचार करायला हवा. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती. पंजाबमधील निवडणुकांनंतर मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष सिध्दू यांनी आपले नेतृत्व कुचकामी असल्याचे सिध्द केले आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांची पोकळी निर्माण होतेय

नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारतेय. त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे क्षीण होणे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सोनिया गांधी परिस्थिती पलटवतील

पंजाबमध्ये 32 टक्के मागासवर्गीय जनता असताना आणि त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नेता मुख्यमंत्री असताना सरकार पुन्हा येऊ शकले नाही. याचा अर्थ असा की, संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कमकुवत झाला, असं सांगतानाच सोनिया गांधी या सर्वांवर मात करुन परिस्थिती पलटवण्यात यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोडून गेलेल्यांना परत आणा

देशात धार्मिक आणि जातीय शक्तींचा प्रभाव, विचार वाढतोय. ते घटविण्याचे काम काँग्रेसलाच करावे लागेल. तात्पुरत्या कारणाने जे काँग्रेस सोडून गेले त्यांना परत आणण्यावर पक्षाने प्राधान्य दिले पाहिजे. देशात सर्वधर्मसमभाव मानणारी नवी फळी उभारण्याची गरज आहे. त्यातूनच काँग्रेस विचाराचा तरुण उभा राहील. तरुणांना काँग्रेसने कार्यक्रम दिला पाहिजे. त्यासाठी शिबिरे, व्याख्याने, बैठकांचे नियमित आयोजन करणे आवश्यक आहे. 20-30 वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तसे काँग्रेसने पुढे येणे गरजेचे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Darekar On Raut: खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात, दरेकरांचं सूचक वक्तव्य

Maharashtra News Live Update : इम्तियाज जलील शरद पवार यांना भेटणार 

भंडाऱ्यात ओल्या पार्टीनंतर भांडण, मित्रांनीच तलवारीने केले सपासप वार, चार आरोपी गजाआड

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.