लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसवाले कोर्टात, फडणवीस म्हणाले, सर्वात मोठा वकील लावू…

devendra fadnavis: मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. शुभमंगल विवाह योजना आणली आहे. लेक लाडकी योजना आहे. एक रुपयांत पीक विमा योजना आहे. या योजना बंद करायच्या का? कारण या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे नेते उच्च न्यायालयात गेले आहे.

लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसवाले कोर्टात, फडणवीस म्हणाले, सर्वात मोठा वकील लावू...
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 4:57 PM

ladki bahin yojana: राज्यातील महायुती सरकारने महिला केंद्रित योजना आणल्या आहेत. या योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून येत आहेत. एसटीत महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहेत. मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. शुभमंगल विवाह योजना आणली आहे. लेक लाडकी योजना आहे. एक रुपयांत पीक विमा योजना आहे. या योजना बंद करायच्या का? कारण या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे नेते उच्च न्यायालयात गेले आहे. या योजनांवर मोठा पैसा खर्च होत असल्याचा त्यांचा आरोप आहेत. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जवळचे मित्र अनिल वडपल्लीवार यांनी या योजनांच्या विरोधात याचिका दाखल केल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

योजना बंद होऊ देणार नाही…

नागपुरातून लाडकी बहीण योजनेचे दुसरा टप्पा शनिवारी सुरू केला. परंतु ही योजना होऊ शकत नाही, असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. त्यासाठी ते कोर्टात गेले आहेत. लाडकी बहीण योजना सुरू ठेवा, असे तुम्ही म्हणत आहेत. पण काँग्रेसवाले बंद करण्याच्या मागे आहे. आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. त्यासाठी कोर्टात मोठा वकील लावू आणि ही योजना चालूच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील एक कोटी महिला लखपती दीदी बनवणार आहोत. तोट्यात असलेली एसटी महिला सन्मान योजनेमुळे नफ्फ्यात आली आहे. अनेक महिला एसटीतून प्रवास करत आहे. बाहेरगावी कामे करण्यासाठी महिला जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

ही योजना कायम राहणार- मुख्यमंत्री

ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाही. ही योजना फक्त भाऊबीजेसाठी नाही. ती कायम राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. एकीकडे विकास सुरू आहे. दुसरीकडे कल्याणकारी योजना करत आहोत. आपण दोन वर्षात जे काम केलं, ते लक्षात ठेवा. महायुतीच्या पाठी आशीर्वाद ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.