शरद पवार यांचे जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत, काँग्रेसची भूमिका काय?

शरद पवार यांनी जयंत पाटील यांना महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांचे जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत, काँग्रेसची भूमिका काय?
जयंत पाटील आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 3:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जयंत पाटील यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत. “महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे. पक्षाचा देशातील म्हणून प्रमुख्य सांगतो साखळ गावातून उद्या महाराष्ट्र घडवण्याची सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्र उभारण्याची, सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबजदारी टाकणार आहे”, असं स्पष्ट वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यामुळे शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवार यांनी काल सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत संबंधित वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची पात्रता आहे, असं शरद पवारांनी म्हणणं वावगं नाही”, असं नितीन राऊत यांनी म्हटंल आहे. “मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोट करण्याचा विषय येत नाही. निकालानंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होईल”, असंही नितीन राऊत म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणं किंवा मुख्यमंत्री ठरवणं हे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या हातात नसून दिल्लीतील हायकमांड याबाबत निर्णय घेतं, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री पदासाठी प्रमोशनचा विषय येत नाही. त्यांनी असंही म्हटलं की, त्यांची पात्रता आहे. त्यांची योग्यता आहे. असं म्हणणं त्यामध्ये काही वावगं नाही. सर्वच पक्ष आपापल्या पक्षाबाबत बोलत असतात. पण सरतेशेवटी काँग्रेस पक्षामध्ये जी भूमिका असते ती काँग्रेसची हायकमांड घेत असते. जेव्हा आम्ही आघाडीत असतो तेव्हा हायकमांड त्या आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन, जेव्हा विधानसभेचे सदस्य निवडून येतील त्यावेळी ते निर्णय घेतील, अशी आमच्याकडे प्रथा आहे. मला वाटतं त्या दृष्टीकोनातून तो निर्णय होईल. काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर असण्याचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमचे केंद्रीय नेते घेतील. तो प्रश्न आमच्याकडे नाही”, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.