BIG BREAKING | ‘राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु’, पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय बॉम्ब

शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेली असताना आता महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु. त्यामुळे राष्ट्रवादी आपल्यासोबत किती दिवस राहिल हे माहित नाही, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

BIG BREAKING | 'राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु', पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय बॉम्ब
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 5:36 PM

बेळगाव : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी आता कुठपर्यंत जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयांचं समर्थन केलंय. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेली असताना आता महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. खरंतर चव्हाण यांनी कालच याबाबतच सूचक वक्तव्य केलेलं.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरु आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहित नाही. कर्नाटकातही राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत”, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील कालच्या भाषणात केलं.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेसच्या मताची विभागणी करता येईल का? भाजपला विजय मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कुणाकुणाची तिकीटं कापली, काय काय चाललं, इथे मी ऐकलं की महाराष्ट्रातील आमच्याबरोबरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत आहे. काय झालंय? ते अजून आमच्यासोबत आहेत. पण किती दिवस असतील ते माहिती नाही. कारण त्यांची भाजपसोबत बोलणी चालली आहे. त्यांच्याबाबत रोज बातम्या येत आहेत की कोण जाणार आणि कोण थांबणार. कोणी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द झालेला आहे. त्यांना इतर राज्यात मतं मिळाली नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय दर्जा काढून टाकला आहे. त्यामुळे इतर राज्यात जावून मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवला जाऊ शकतो. भाजपची टक्केवारी वेगळी आहे आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका”, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझ्या संगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषनेनंतर राष्ट्रवादी पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेच्या विरोधात कार्यकर्त्यांनी भर सभागृहात ठिय्या मांडला. तुम्ही राजीनामाचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्ते करत होते.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित अस्वस्थ वाटेल. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतलेला आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.