सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. LIVE UPDATE […]
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
LIVE UPDATE :
- सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील
- काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – राधाकृष्ण विखे पाटील
- पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही प्रचंड द्वेष – राधाकृष्ण विखे पाटील
- नगरमध्ये शरद पवारांनी आधीच शंका उपस्थित केली, त्यामुळे प्रचाराला जाणार नाही, नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन – राधाकृष्ण विखे पाटील
- नगरमध्ये राष्ट्रवादीचा मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल जे विधान केलं, त्याने निश्चितच मला दु:ख झालं – राधाकृष्ण विखे पाटील
- लोकसभा निवडणुकीबाबत माझ्या मुलामुळे सर्व संघर्ष उभा राहिला हे म्हणणं चुकीचे आहे, काँग्रेस पक्ष म्हणून काही जागांची मागणी आम्ही केली. त्यात अहमदनगरची जागा होती – राधाकृष्ण विखे पाटील
- डॉ. सुजय विखेंनी जो निर्णय घेतला, तो त्याचा स्वत:चा निर्णय, विरोधी पक्षनेता म्हणून आघाडीला गालबोट लावण्याचा काम मी कधीही केलं नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं – राधाकृष्ण विखे पाटील
- मुलासाठी संघर्ष झालाय असं म्हणणं चूक : राधकृष्ण विखे पाटील
- माध्यमांमधून जे काही सांगितलं जात आहे, मी ठरवलं होतं की सर्व प्रतिक्रिया आल्यानंतर आपली भूमिका मांडेन – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मौन बाळगलेल्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अखेर माध्यमांसमोर येणार आहेत. दुपारी 12.30 वाजता राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. विखे पाटील राजीनामा देणार का, असा प्रश्नही दबक्या आवाजातील चर्चांमध्ये सातत्याने येत असल्याने विखे पाटील काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठीसमोर मांडलेल्या भूमिकेनंतर आज मुंबईत काँग्रेस कमिटी नेत्यांसमोर राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिकाही मांडणार आहेत. काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेवर टीका केली होती. त्यावरुन विखे पाटील नाराज आहेत. वाचा – विखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात
काँग्रेसने विखे पाटलांवर अविश्वास दाखवला तर आजच्या बैठकीत विखे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रस पक्षाने पुढील भूमिका घ्यावी, असा सूर विखे लावण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
सुजय विखे भाजपमध्ये!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने थेट विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनाच पक्षात घेऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं आणि काल (12 मार्च) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.