Rahul Gandhi : अदानी, अंबानी कंपनीचे सिनिअर मॅनजर्स दलित आहेत का? – राहुल गांधी

Rahul Gandhi : "मीडियात ग्रोथ, सुपर पॉवरची चर्चा होते. पण दलित ओबीसी कुठेच नाही. ज्युडिशिअरी पाहा, इंटेलिजन्स एजन्सी पाहा, कुठेच दलित, ओबीसी नाहीत" असं राहुल गांधी म्हणाले. "मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही. आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात आहे"

Rahul Gandhi : अदानी, अंबानी कंपनीचे सिनिअर मॅनजर्स दलित आहेत का? - राहुल गांधी
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 1:17 PM

“शाळेत असताना मला दलित अस्पृश्यतेच्या बाबत काहीच मिळालं नाही. फक्त तीन चार लाईनच शाळेत शिकवल्या. मी मुर्तीकाराच्या हाताला हात मिळवला, तेव्हा कळलं की या हातात कला आहे. ज्याच्या हातात कला आहे, त्याला मागे बसवलं आहे. हे भारतात चोवीस तास होत आहे. ज्याच्या हातात स्कील आहे. ज्याच्या हातात अनुभव आहे. त्याला तुम्ही न्हावी म्हणा, चांभार म्हणा, वर्कर म्हणा, कारागिर म्हणा. त्याचा इतिहास आपल्या इतिहासात नाही. त्याच्याबाबत काही म्हटलं जात नाही. त्यांनी काय केलं, कसं केलं. त्यांच्याबाबत कसा भेदभाव झाला याची काहीच माहिती नाही” असं राहुल गांधी म्हणाले. ते कोल्हापुरमध्ये बोलत आहेत.

“मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही. आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात आहे. इतिहासाशिवाय तुमच्या लोकेशन शिवाय शिक्षण घेणं शक्य नाही. शिक्षणावर बोलतो तर प्रश्न उठले पाहिजे. शिक्षण संस्थेत कुणाचा कंट्रोल आहे. तुम्ही एज्यूकेशन शिक्षण बघा. सर्वांचं खासगीकरण केलं जात आहे. गरीब मुलाला डॉक्टर, वकील बनायचं असेल, ठिक आहे, तो स्वप्न पाहू शकतो” असं राहुल गांधी म्हणाले.

‘कसा सुपर पॉवर बनेल?’

“भारत जोडो यात्रेत मी सर्वांना भेटलो. मुलं डॉक्टर, इंजिनियर होणार असल्याचं सांगत होते. पण आपला देश त्यांच्याशी खोटं बोलत आहे. इंजिनियर, डॉक्टर वकील किती टक्के होती. 70 टक्के, 80 टक्के. आपल्या मुलांना स्वप्न दाखवत आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत आहेत. स्वप्न दाखवून शिक्षण संस्थेत प्रवेश दिले जात नाही. उलट देश सुपर पॉवर बनेल असं सांगितलं जात आहे. कसा सुपर पॉवर बनेल. अदानी आणि अंबानी कोणत्याही बिझनेसमध्ये जाऊ शकतो. पण आपला मूर्तीकार स्वप्न पाहायला लागला, दुसऱ्या पद्धतीने मूर्ती बनवायची आहे. फंडिंगची गरज आहे, तर 15 मिनिटात कळेल की रस्ता बंद आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

‘दलित ओबीसी कुठेच नाही’

“अदानी, अंबानी कंपनीचे मॅनजर्स पाहा. त्यात सीनिअर मॅनेजर्स दलित आहे का? त्यांचा पगार एक कोटी, 50 लाख असतो. त्यात एक दलित, आदिवासी आणि मागास व्यक्ती दाखवा. मीडियातील मालकांची नावे काढा. त्यात एकही दलित ओबीसी निघणार नाही. मीडियात ग्रोथ, सुपर पॉवरची चर्चा होते. पण दलित ओबीसी कुठेच नाही. ज्युडिशिअरी पाहा, इंटेलिजन्स एजन्सी पाहा, कुठेच दलित, ओबीसी नाहीत” असं राहुल गांधी म्हणाले.

‘अभिमन्यूला लोट्स फॉर्मेशनने मारलं होतं’

“मी संसदेत चक्रव्ह्यूची गोष्ट सांगितली होती. चक्रव्ह्यू को पद्म व्ह्यू आहे. अभिमन्यूला लोट्स फॉर्मेशनने मारलं होतं. त्याला सहा लोक चालवायचे. आजही तेच चक्रव्यूह आहे. पद्म व्यूह आहे. आजही सहा लोक चालवत आहे. इतिहास बदलला जात आहे. संघाच्या व्हाईस चॅन्सलरला विचारा देशात अस्पृश्यता होती, ते म्हणतील कधीच अस्पृश्यता नव्हती. रोहित वेमूला काही म्हणो, त्याच्यासोबत भेदभाव झालाच नाही असं हे लोक म्हणतील” असं राहुल गांधी म्हणाले.

'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.