बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी राहुल गांधी यांचं स्पेशल ट्विट, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट टाकत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. "माझे विचार उद्धवजी आणि आदित्यजी यांच्यासह संपूर्ण शिवसेनेसोबत आहेत", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटने भाजपला देखील उत्तर मिळाल्याची चर्चा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी राहुल गांधी यांचं स्पेशल ट्विट, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:43 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्राणज्योत मालवली होती. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण राज्यासह देशात होता. त्यामुळे त्यांच्या अत्यंविधीला कोट्यवधी नागरीक मुंबईत आले होते. तसेच घड्याळाच्या काट्यांवर चालणारी मुंबई तीन दिवस अक्षरश: स्तब्ध झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं जाण्याचं दु:ख आजही हजारो शिवसैनिकांना टोचत असतं. बाळासाहेब असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या कदाचित घडल्या नसत्या, अशा भावना अनेक शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतृीदिनी अनेक दिग्गज नेत्यांकडून त्यांना अभिवादन केलं जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. तसेच आपले विचार हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि नातू आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विट नेमकं काय?

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. “माझे विचार उद्धवजी आणि आदित्यजी यांच्यासह संपूर्ण शिवसेनेसोबत आहेत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटने भाजपला देखील उत्तर मिळाल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अनेक वर्ष राजकीय मतभेद होते. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात होते. तर भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलली आणि शिवसेना-काँग्रेसची मैत्री झाली. ही मैत्री आजही अबाधित आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर आरोप केला जातो की, काँग्रेसकडून कधीच बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती केली जात नाही. पण राहुल गांधी यांचं आजचं ट्विट हे नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर असल्याचं बोललं जात आहे. अर्थात राहुल गांधी यांच्या ट्विटवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.