‘दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे पुन्हा सिद्ध, शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा’, कुणी केली मोठी मागणी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली आहे. मोदींनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

'दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे पुन्हा सिद्ध, शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा', कुणी केली मोठी मागणी?
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 6:32 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच जाहीर माफी मागितली. मोदी यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्स (X) वर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी हा काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सततच्या निषेधाचा अन् आक्रमक भूमिकेचा परिणाम आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरंच महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

‘मोदी जी, महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर…’

“मोदी जी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईची ही फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि यांनी केलेला महाराष्ट्रद्रोह विसरणारही नाही. आम्ही महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जय भवानी जय शिवाजी”, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

मोदी नेमकं काय म्हणाले?

“सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर माफी मागितली.

आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...