AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्तेंवर भाजप गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार ? काँग्रेसचा सवाल, हेमा मालिनींबद्दल म्हणाले…

महिलांच्या बाबतीत भाजपाची भूमिका दुटप्पी असून भाजपामध्ये भाजपाच्याच महिला नेत्यांचा सन्मान ठेवला जात नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्तेंवर भाजप गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार ? काँग्रेसचा सवाल, हेमा मालिनींबद्दल म्हणाले...
भाजपची महिलांच्या बाबतीत भूमिका दुटप्पी-सचिन सावंत
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 4:05 PM

मुंबई : मोदी सरकारचे (Pm Modi) मंत्री फग्गन सिंह कुलस्ते (Fuggan singh kulaste) यांनी अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी रस्त्यांची केलेली तुलना निषेधार्ह आहे. महिलाबाबत अशा प्रकारची भाषा कोणीही वापरू नये. महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेच शब्द हेमामालिनींबद्दल वापरले तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी बोंब ठोकणारे भाजपा नेते गप्प का? महिलांच्या बाबतीत भाजपाची भूमिका दुटप्पी असून भाजपामध्ये भाजपाच्याच महिला नेत्यांचा सन्मान ठेवला जात नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत पुढे म्हणाले की, भाजपा खासदार हेमामालिनी व महिलांबदद्ल कोणीही अशी भाषा वापरणे निषेधार्ह आहे. मोदी सरकारने महिला अत्याचारांच्या विरोधात भूमिका घेऊ असे अभिवचन दिले होते. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एक केंद्रीय मंत्री भाजपाच्याच महिला खासदारांबद्दल असे बोलतो हे गंभीर आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या व्याख्येनुसार भाजपाच्या नेत्याने भाजपाच्याच महिला खासदाराचा विनयभंग केला आहे. वाघ यांनी यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच गाल पाहणा-याचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही म्हटले होते. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही केली होती. आता ही मंडळी चिडीचूप आहेत. अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजप नेते आता गप्प का?

भाजपा नेत्यांनी आता कुलस्ते यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुन्हा दाखल करण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी सावंत यांनी केली. शिवाजी महाराजांचा रांजाच्या पाटलांबद्दलचा दाखलाही त्यांनी दिला होता. आज शिवजयंती आहे, भाजपा नेत्यांना खरेच महिलांबाबत काही वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या खासदारांबदद्ल त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याने केलेल्या विधानाबदद्ल त्यांना संताप यायला हवा. अपेक्षा आहे की भाजपा नेते हेमामालीनींच्या या विनयभंगाबदद्ल तातडीने कारवाईची मागणी करतील‌‌. त्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भीती वाटत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

विनयभंग झाल्याचे दिसत नाही?

फग्गनसिंह कुलस्ते यांनी हेमामालीनींबाबत त्याच पठडीतील वक्तव्य केले आहे जे गुलाबराव पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र पोलिसांना विनयभंग दिसत नाही का असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता मग आता तुम्हाला त्याच वक्तव्याबद्दल विनयभंग झाल्याचे दिसत नाही का? विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाईची सिलेक्टिव्ह मागणी करणे चुकीचे आहे. कोणीही असो महिलांचा आदर राखला गेला पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनीही माफी मागितली पाहिजे. हेमामालिनी महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्याने राज्य महिला आयोग त्याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत म्हणाले.

किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचं तातडीने आव्हान, चला महिला आयोगाकडे, मी येतो बरोबर

किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर दिशाची बदनामी थांबण्यासाठी महिला आयोगाने उतरावं-किशोरी पेडणेकर

लाव रे तो व्हिडिओः फडणवीस-सोमय्यांचा व्हिडिओ लावून विनायक राऊतांकडून राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.