‘हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

"विदर्भामध्ये आपला मुख्यमंत्री नाही. भंडारा, गोंदिया याला बारामती बनविणे नाही, पूर्ण विदर्भाला बारामती करणे आहे. मराठवाडामध्ये जागा काँग्रेस जिंकेल. विदर्भ, मराठवाडामध्ये ताकद आहे. 100 जागा होतात. विदर्भ, मराठवाडामध्ये कॉम्प्रमाईज करू नका. कोणत्या सीट द्याच्या त्या दुसऱ्या द्या", असं सतीश चतुर्वेदी नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले.

'हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते...', काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
खासदार नवनीत राणा
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 9:43 PM

काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कौतुक केलं. “अमरावतीमध्ये हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. पुण्यात जिंकलो. 58 वर्ष पदवीधर कोणी जिंकले नाही ते काँग्रेस जिंकली. विदर्भामध्ये आपला मुख्यमंत्री नाही. भंडारा, गोंदिया याला बारामती बनविणे नाही, पूर्ण विदर्भाला बारामती करणे आहे. मराठवाडामध्ये जागा काँग्रेस जिंकेल. विदर्भ, मराठवाडामध्ये ताकद आहे. 100 जागा होतात. विदर्भ, मराठवाडामध्ये कॉम्प्रमाईज करू नका. कोणत्या सीट द्याच्या त्या दुसऱ्या द्या”, असं सतीश चतुर्वेदी नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले.

“आम्ही आपापसात लढत होतो म्हणून भाजपचा जन्म झाला. नागपुरात कोणाची हिम्मत नाही काँग्रेसला हरविण्याची. मात्र आम्ही आमच्यात लढत होतो म्हणून भाजप पुढे आला. नागपूर हे धर्मनिरपेक्ष शहर आहे. काँग्रेसचे शहर आहे. काँग्रेस नागपूरमध्ये 13 वेळ जिंकली आहे”, असं सतीश चतुर्वेदी म्हणाले.

“नाना पटोले यांना राज्याचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी सगळे झटतील. काँग्रेसमध्ये फ्रॉम भरे पर्यत धाकधूक असते. त्यामुळे काँग्रेसचं तिकीट आणणं कठीण, जिंकणं सोपं आहे. विदर्भातील सहाच्या 6 जागा आणा. त्या निवडून आणू. नानाभाऊ तुम्हाला आशिर्वाद आहे, लोकांचा तुमच्या भागातील हनुमानजीचा आहे. सध्या माहोल हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातला आहे”, असा दावा सतीश चतुर्वेदी यांनी केला.

नवनीत राणा यांनी ठाकरेंच्या घराबाहेर वाचलेली हनुमान चालीसा

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करत अनोखं आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनामुळे वातावरण प्रचंड तापलं होतं. या प्रकरणावरुन पोलिसांनी राणा दाम्पत्य यांना अटक केली होती. त्यांना बरेच दिवस या घटनेमुळे जेलमध्ये राहावं लागलं होतं.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.