भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? नाना पटोले यांनी ‘मविआ’तील मतभेदावर केले भाष्य

congress first list maharashtra 2024: शिवसेना उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदी मोदी यांचे कौतूक केले. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वतंत्र आहे. काय बोलावे, काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे.

भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? नाना पटोले यांनी 'मविआ'तील मतभेदावर केले भाष्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 11:17 AM

Congress First List Maharashtra 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित केले जात आहे. त्यात महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी जाहीर होणार? महायुतीच्या जागा वाटपाचा घोळ कधी संपणार? या विषयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. नवी दिल्लीत बैठकीसाठी आलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेसची यादी उद्या मंगळवारी जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाने नाना पटोले

काँग्रेसची पहिली यादी उद्या येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच विदर्भातील जागांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीच वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी संध्याकाळी तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटप जाहीर करतील. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. मेरीटच्या आधारावर महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून मोदींचे कौतूक

पवार साहेबांनी कोणत्याही काँग्रेस नेत्यांना फोन केले नाही. कालपासून आम्ही दिल्लीत आहोत. त्यामुळे जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नसीन खान शरद पवार यांच्याकडे गेले होते. शिवसेना काँग्रेसच्या जागा मागत आहे, असे काही नाही. शिवसेना उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नरेंद्र मोदी मोदी यांचे कौतूक केले. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वतंत्र आहे. काय बोलावे, काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचार करणार

खर्गेसोबतच्या बैठकीमध्ये नाराजी बाबत कोणतीही चर्चा झाली नाही. नाना पटोले यांनी शिवसेनेबाबत केलेली मागणी फेटाळली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. त्या महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार करणार आहे. शिवसेनेसोबत आमच्यात कोणतेही वाद नाहीत. थोड्याफार प्रमाणात असलेल्या जागाबाबत लवकरच तोडगा निघेल.

Non Stop LIVE Update
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?
भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार?कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?.
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार.
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.