महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 9:47 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर

  1. सोलापूर – प्रणिती शिंदे
  2. कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
  3. पुणे – रवींद्र धंगेकर
  4. नंदुरबार – गोवाल पाडवी
  5. अमरावती – वळवंत वानखेडे
  6. लातूर – डॉ. शिवाजी कलगे
  7. नांदेड – वसंतराव चव्हाण

उमेदवारी मिळाल्यानंतर प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. ही लढाई सर्वांची आहे. लोकशाहीसाठी ही सर्वांची लढाई आहे. गावपातळीवर फिरल्यावर भाजपच्या विरोधात प्रचंड रोष आहे हे लक्षात येत आहे. नक्कीच यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढलेली दिसेल”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचा अफवा पसरवण्यात आल्या. कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी हे करण्यात आला, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. लोकांमध्ये रोष दिसून येतोय. “भाजपने लोकांचा विश्वासघात आणि फसवणूक केली आहेच. लोकांनी आता ठरवलं आहे. देशभरात इंडिया आघाडीच्या खासदारांना नागरीक जास्त मतदान करतील. भाजपचं फक्त 400 ची घोषणा आहे. गावपातळीवर लोक त्यांच्यावर चिडले आहेत. कामं बरेच करण्यासारखे आहेत. पण सत्ता त्यांच्याबाजूला होती. पाण्याचं नियोजन करु शकले नाही. विमानतळ सुरु करु शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून लोक आता मतदान करणार नाहीत’, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

काँग्रेसची यादी पाहा

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.