नागपूर : नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नागपुरात काँग्रेसला 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नागपूर गडावरील वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार शिवसेनेला फक्त दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. तर भाजपला 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).
90 जागा जिकंणार, काँग्रेसचा दावा
नागपुरात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस 90 जागांवर विजयी होणार, असा दावा केला. त्यांच्या दावा कितपत खरा ठरतो हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी नागपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).
“काँग्रेस पक्षाची चांगली घोडदौड सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एकतर्फी आणि एकहाती सत्ता काँग्रेस पक्षाने प्राप्त केली. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी बहुमताने विजयी झाले”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मुळक यांनी दिली.
“आता ग्रामपंचायतींचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळाला आहे. कारण काँग्रेस नेत्याचे सर्व नेते, मंत्री ते कार्यकर्ते सर्वजण एकत्रित आले. सर्व एकत्रित आल्याने ही ताकद निर्माण झाली. भाजपला विजयापासून आम्ही थांबवलं. आम्ही जवळपास 90 टक्के जागांवर विजयी झालो आहोत”, असा दावा त्यांनी केला.
नागपुरात आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजनीनुसार काँग्रेसने 53 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यात विजय मिळवला आहे. तर 21 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नागुरात भाजप 29 पंचायतींवर विजयी झाले. तर शिवसेनेचा 2 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.
संबंधित बामत्या :
सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू