Sharad Ponkshe | ‘शरद पोंक्षे आतंकवादी आणि नथुरामाची औलाद’… काँग्रेस नेत्या संगीता तिवारी संतापल्या!

रविवारी डोंबिवलीतील ब्राह्मण सभागृह येथे झालेल्या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी अहिंसेवरील वक्तव्य केलं.

Sharad Ponkshe | 'शरद पोंक्षे आतंकवादी आणि नथुरामाची औलाद'... काँग्रेस नेत्या संगीता तिवारी संतापल्या!
संगीता तिवारी, शरद पोंक्षेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:52 AM

मुंबईः शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हा आतंकवादी आणि नथुरामाची औलाद आहे. हिंदुंमध्ये (Hindu) नपुंसकता आल्याचं म्हणतोय, पण मी याचा खरच करेक्ट कार्यक्रम लावीन, असा इशारा काँग्रेसच्या महिल्या प्रदेशाध्यक्षा संगीता तिवारींनी (Sangeeta Tiwari) दिलाय. शऱद पोंक्षे यांनी काही दिवसापूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकांची झोड उठली आहे. हिंदु समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलच नाही. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं, पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं. काँग्रेस नेत्यांनी याविरोधात टीका केली आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संगीता तिवारी यांनी तर पोंक्षे यांच्यावर जहरी टीका केली.

काय म्हणाल्या संगीता तिवारी?

शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना संगीता तिवारी म्हणाल्या, ‘ शरद पोंक्षे नावाचा कुणीतरी अभिनेता आहे. तो स्वतःला मोठा नेता समजू लागला आहे. पण तो नेता नाही तो आतंकवादी आहे. नथुरामाची औलाद आहे. पण हा या भाषणात सांगतोय, अहिंसेचे डोस देऊन हिंदुंमध्ये नपुंसकता आली आहे. नपुंसकता हिंदुंमध्ये वाढलेली आहे. मी खरच याचा करेक्ट कार्यक्रम लावील’.

काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही टीका

शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी सातत्याने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. तर आता थेट हिंदु नपुंसक असल्याचं म्हटलंय. पुन्हा असे विधान केलं तर तोंडाला काळं फासू असा इशारा काँग्रेस कमिटीचे विशाल गुंड यांनी दिला. शरद पोंक्षे यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली आहे.

काय म्हणाले होते शरद पोंक्षे?

रविवारी डोंबिवलीतील ब्राह्मण सभागृह येथे झालेल्या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अहिंस परमो धर्मः असे आम्हाला शिकवले गेले. पण धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे, हे आम्हाला शिकवण्यात आलं नाही. अहिंसेचे एवढे डोस आम्हाला पाजले की आज हिंदु समाज नपुंसक झालाय हे आम्हाला कळलंच नाही. आम्हाला राग येत नाही, चीड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवलाच नाही. रक्त न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं. पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं शरद पोंक्षे म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.