AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! कारण काय?

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे.

औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! कारण काय?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 9:07 AM

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. पण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे.(Congress workers are not invited to Aditya Thackeray’s Aurangabad tour)

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे. कारण, काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असून, पुन्हा एकदा औरंगाबादेत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुनही वाद

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्यात आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असल्यामुळे ती अधिकच प्रखरपणे आणि सातत्याने मांडली जात आहे. CMOच्या ट्विटर अकाऊंटवरुनही औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुनही वातावरण चांगलंच पेटलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या भूमिकेला आणि औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबादेत पुन्हा ‘बॅनरवॉर’

औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनरवॉर सुरु झालं आहे. शिवसेनेच्या सुपर संभाजीनगर या कॅम्पेनविरोधात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (16 जानेवारी) औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

लव्ह औरंगाबाद बोर्डसमोर भाजपचे नमस्ते संभाजीनगर

औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने औरंगाबादच्या नामकरणाला जाहीर विरोध केलाय. काँग्रेसच्या या विरोधामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली असताना भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद या बोर्डासमोर नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. भाजपच्या याच बॅनरमुळे शहरातील राजकारण आता पुन्हा तापणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार; भाजपचा गंभीर आरोप

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार

Congress workers are not invited to Aditya Thackeray’s Aurangabad tour

पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.