‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नाना पटोले

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे.

‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नाना पटोले
nana patole
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 6:14 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे.

सरकारने लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटला

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या नरसंहारचा निषेध करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले अन् नंतर अटक केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटला आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीच महाविकास आघाडीचा बंद

भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या भाजपा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी व लखीमपूर खेरी येथील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारलाय. शेतकरी जगला तरच हा देश जगेल, त्यामुळे राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनीही अन्नदाता बळीराजाच्या हक्कासाठी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेय.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना चिरडले, प्रियंका गांधींना रोखले, उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं आवाहन

ओबीसी आरक्षण: औरंगाबादेत 12 ऑक्टोबरला भाजपतर्फे विभागीय मेळावा, जनजागृतीसाठी मोहीम

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.