Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश

सहकारम मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 31 मे ही साखर कारखाने बंद करण्याची मुदत नसून जोपर्यंत ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे.

संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश
संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 4:46 PM

कराडः राज्यातील ऊस उत्पादक (Cane growers) सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. कारण आता ऊस फक्त वाळलाच नाही तर त्याला तुरे येऊन ऊस खराब होऊ लागला आहे. उसाचा गळीत हंगाम सुरु होऊन सात ते आठ महिने होत आले तरी अजूनही शेतकऱ्यांचा ऊस फडातच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी साखर आयुक्तांनी साखर परिक्षेत्रातील ऊस तोडण्याचे आदेश साखर कारखान्यांन दिले होते. त्यानंतर आज आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांनी संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने (Sugar Factory) सुरू ठेवण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलास मिळाला असला तरी वजनाचा विचार करता त्यांना हा तोटा सहन करावा लागणार आहे.

साखर बंद करण्याची मुदत

राज्यातील अनेक भागातील ऊस फडात जैसे थे अवस्थेच आहेत, त्यामुळे त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागातील ऊस उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे सहकारम मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 31 मे ही साखर कारखाने बंद करण्याची मुदत नसून जोपर्यंत ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे.

ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरु

शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात राहिल्याने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच त्यांनी सांगितले आहे की, 1 मे पासून तोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक तोटा भरुन काढण्याचा प्रयत्न असल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनाही पाच रुपये जादा

ऊस तोड झाली नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसर वाहतुकदारही अडचणी सापडले आहेत. अनेक वाहतूकदारांचा कारखान्याबरोबर असलेला करार संपला आहे, मात्र कारखाना सुरु असल्याने अनेक वाहने ऊस वाहतूक करत आहेत. उसतोडीच्या शेवटच्या टप्प्यात ऊसतोड असल्यामुळे पन्नास किलोमीटरच्या पुढे वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनाही पाच रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.