अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील ? भाजप खासदार काय बोलून गेले, चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. 24 तासांच्या आता मला खासदार केलं. मी एकेकाळी राज्याचा प्रमुख होतो. त्याची जाणीव ठेवून मला काम करण्याची संधी दिली. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्या पाहिजे.

अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील ? भाजप खासदार काय बोलून गेले, चर्चांना उधाण
Ashok Chavan
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 1:52 PM

नांदेड | दि. 28 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडताच दुसऱ्या दिवशीच भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवले. त्यांचा प्रवेश सोहळा होऊन पंधरा दिवस उलटून गेले. परंतु अद्यापही भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बुथ कार्यकर्ता बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांनी चक्क चव्हाण यांच्या उपस्थित धक्कादायक विधान केले. खासदार अजित गोपछडे यांनी त्यांना अजगराची उपमा दिली.

अजगरा एवढे मोठे होता की काय?

खासदार अजित गोपछडे म्हणले की, चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्या पक्षात आला आहात. तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागणार आहे. मात्र मला वाटते तुम्ही आतमध्ये जावून अजगरा एवढे मोठे होता की काय? भारतीय जनता पार्टी ही भल्या भल्यांना समजत नाही. मलाही माहिती नव्हती. खासदारकीसाठी माझं नाव येईल, पण अचानक माझे नाव आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

अब की बार चारसो पार

नांदेड येथे मध्यप्रदेश उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा लोकसभा बूथ कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण मिळाले की, ” देशातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे की “अब की बार चारसो पार, देशात स्थिर सरकार, मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार आहे. आता येणाऱ्या काळात चांगलं काम होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार, ही सर्वसामान्यांची भावना आहे. देवेंद्र फडणीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. 24 तासांच्या आता मला खासदार केले. आता नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे.”

नांदेड, परभणी, हिंगोली निवडून येणार

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. 24 तासांच्या आता मला खासदार केलं. मी एकेकाळी राज्याचा प्रमुख होतो. त्याची जाणीव ठेवून मला काम करण्याची संधी दिली. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्या पाहिजे. नांदेड, परभणी, हिंगोली या जागाही महायुतीचा निर्णय मान्य करून निवडून आणायचे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.