Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये 3784 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, मृतांचा आकडा 2407 वर

| Updated on: Apr 02, 2021 | 12:14 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये 3784 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, मृतांचा आकडा 2407 वर
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2021 10:39 PM (IST)

    नाशिकमध्ये 3784 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, मृतांचा आकडा 2407 वर

    नाशिक कोरोनाअपडेट

    आज दिवसभरात 3104 रुग्ण कोरोनामुक्त

    दिवसभरात 3784 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

    नाशिक मनपा- 2262 रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 1335 रुग्ण

    मालेगाव मनपा- 0136 रुग्ण

    जिल्हा बाह्य- 0051 रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2407

    आद दिवसभरात 15 जणांचा मृत्यू

    नाशिक मनपा- 04 रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 11 रुग्ण

  • 01 Apr 2021 10:36 PM (IST)

    ठाण्यात आज 1,432 जणांना कोरोनाची बाधा, 5 जणांचा मृत्यू

    ठाण्यात आज 1,432 जणांना कोरोनाची बाधा

    कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 79,328 वर

    आतापर्यंत 68,011 जण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 86 टक्क्यांवर

    सध्या 9,922  कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

    दिवसभरात 579 जण कोरोनामुक्त

    आज दिवसभरात 5 जणांचा मुत्यू

    आतापर्यंत एकूण 1,395 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 01 Apr 2021 10:33 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 284 कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा 1804 वर

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 284 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 4 रुग्णांंचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1804 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2261 वर

    आज दिवसभरात 63 जण  कोरोनामुक्त

    आतापर्यंत 47869  रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 51934 वर

  • 01 Apr 2021 09:38 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 80 हजारांचा टप्पा

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 80 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज दिवसभरात 898 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या 24 तासांत 682 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 80040  वर पोहोचली आहे. सध्या 8845 जण उपचार घेत असून 69976  जणांना डिस्चार्ज करण्यात आला आहे. मृतांचा आकडा 1228 वर पोहोचला आहे.

  • 01 Apr 2021 09:19 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4103 कोरोना रुग्णांची वाढ, मृतांचा आकडा 5337 वर

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 4103 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 2077 रुग्णांना डिस्चार्ज

    – करोनाबाधित 35 रुग्णांचा मृत्यू, 14 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 825 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 273446 वर

    – ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 35849

    – एकूण मृत्यू – 5337

    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 232260

  • 01 Apr 2021 09:18 PM (IST)

    खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश- भुजबळ

    नाशिक – सध्यातरी लॉकडाऊन न करता गृहविलगीकरणातील रुग्ण शोधणं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि अन्य आरोग्य सुविधा पूर्ण क्षमतेनं वापर सुरू करण्याचे आदेश- छगन भुजबळ

    – लॉकडाऊनसाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल

    – सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना

    – खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश- भुजबळ

  • 01 Apr 2021 09:13 PM (IST)

    सोलापुरात 642 नवे कोरोनाबाधित आढळले, 11 जणांचा मृत्यू

    सोलापूर– सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या आज 642 वर

    तर 11 जणांचा कोरोनाने मृत्यू

    शहरात 290 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    तर ग्रामीण भागात 352 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    शहरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू त्यात सहा पुरुष तर एका स्त्रीचा समावेश

    ग्रामीण भागातील चार मृतात 4 पुरुषांचा समावेश

  • 01 Apr 2021 08:21 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्युवर भर- महापौर ढोरे

    पिंपरी चिंचवड : शहरात लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्युवर भर देत कडक निर्बंध लावणार

    -पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी केले स्पष्ट

    -शहरातील अनेक संघटनांनी पत्रे दिली की लॉकडाऊन करू नका

    -कडक लॉकडाऊन केला तर दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची साखळी तुटेल परंतु विनाकारण गरज नसताना बाहेर पडले तर कोरोनाला नक्कीच आमंत्रण देण्याचं काम होईल. तेंव्हा नागरिकांनी स्वतःहून कर्फ्युमध्ये सहभागी व्हावं- ढोरे

    राज्य सरकारने लॉकडाऊन केलं तर त्याला पाठिंबा देणार- ढोरे

  • 01 Apr 2021 08:19 PM (IST)

    नांदेडमध्ये 24 तासांत 26 रुग्णांचा मृत्यू, 995 नवे कोरोनाग्रस्त

    नांदेड – कोरोना अपडेट

    24 तासात 26 रुग्णांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण 820 रुग्णांचा मृत्यू

    24 तासात 995 नवे कोरोना रुग्ण

    कोरोनाग्रस्तांचा आकडा 44030 वर

    सध्या 10319  सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

    एकूण 172 रुग्णांची प्रकृती चिंताजनक

  • 01 Apr 2021 08:10 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 323 नवे कोरोना रुग्ण

    वाशिम कोरोना अपडेट

    जिल्ह्यात दोन दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत घट आल्यानंतर आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 323 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 278 जण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आज 01 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 32 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात आढळले 7719 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 16398

    सध्या सक्रिय  रुग्ण – 2663

    आतापर्यंत 13546 जणांना डिस्चार्ज

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 188

  • 01 Apr 2021 08:08 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात 353 नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत 429 जणांचा मृत्यू

    चंद्रपूर: गेल्या 24 तासांत 2362 नमुने तपासणीतून 353 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 3 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 28110

    एकूण कोरोनामुक्त : 25390

    सक्रिय रुग्ण : 2291

    एकूण मृत्यू : 429

    एकूण नमूने तपासणी : 276112

  • 01 Apr 2021 08:06 PM (IST)

    येवला तालुक्यात दिवसभरात 48 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    येवला : दिवसभरात 48 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    आता पर्यंत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2112  वर

    आतापर्यंत 1629 जणांची कोरोनावर मात

    सध्या 417 जणांवर उपचार सुरु

  • 01 Apr 2021 08:03 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4103 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 35 जणांचा मृत्यू  

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 4103 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 2077 रुग्णांना डिस्चार्ज

    – करोनाबाधित 35 रुग्णांचा मृत्यू. 14 रुग्ण पुण्याबाहेरील

    – 825 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 273446 वर

    – सक्रिय रुग्णांची संख्या- 35849 वर

    – एकूण मृत्यू – 5337 वर

    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण 232260

  • 01 Apr 2021 06:11 PM (IST)

    वसई विरारमध्ये कोरोनाचा स्फोट, आणखी 325 जणांना कोरोनाची लागण

    वसई-विरार कोरोना अपडेट

    वसई विरार नालासोपारा क्षेत्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

    मागच्या 24 तासात 325 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 2 जणांचा मृत्यू, 66 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33,496 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30,417 वर

    आजपर्यंत कोरोनामुळे 916 बाधितांचा मृत्यू

    सध्या वसई विरारमध्ये 2163 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु

  • 01 Apr 2021 05:29 PM (IST)

    हिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड जंबो हॉस्पिटलमधील एसीची सुविधा ठप्प, रुग्णांना गर्मीचा त्रास

    पिंपरी चिंचवड : पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड जंबो हॉस्पिटलमधील एसीची सुविधा ठप्प

    -शंभरहून अधिक रुग्णांना गर्मीचा त्रास. रुग्णांनी दुसरीकडे शिफ्ट करण्याची केली मागणी.

    -एसी शिवाय 10 मिनिटे ही आत थांबणं रुग्णांना कठीण होत आहे. अशा परिस्थितीत एसी पूर्ववत करायला 72 तासांचा कालवधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

    –  या घटनेमुले जंबो हॉस्पिटल चालविणाऱ्यांची तारांबळ उडाली  आहे.

  • 01 Apr 2021 04:54 PM (IST)

    नागपुरात कोरोनामुळे दिवसभरात 60 जणांचा मृत्यू, 3630 नव्या रुग्णांची नोंद

    नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे 60 जणांचा मृत्यू

    दिवसभरात 3630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    आज दिवसभरात 2928 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 229668

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 184537

    एकूण मृतांचा आकडा 5158 वर

  • 01 Apr 2021 04:52 PM (IST)

    निफाड तालुक्यात 190 नवे कोरोना रुग्ण, 1465 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    निफाड तालुक्यात 190 नवे कोरोना रुग्ण

    आतापर्यंत कोरोनामुळे 193 जणांचा मृत्यू

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 6941

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 5283

    सध्या  1465 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु

  • 01 Apr 2021 02:29 PM (IST)

    कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात न नेता महापालिकेत आणणं, हा स्टंटबाजीचा प्रकार, नाशिक आयुक्तांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया

    नाशिक –

    – कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात न नेता महापालिकेत आणणं, हा स्टंटबाजीचा प्रकार

    – नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया

    – 35 टक्के ऑक्सिजन लेव्हल असलेला रुग्ण कसा वाचणार? आयुक्तांचं अजब उत्तर

    – या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आयुक्तांचे आदेश – चौकशीत सत्य समोर येईल, रुग्णाच्या नातेवाईकांनी बेड मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, ही वस्तुस्थिती चौकशीतून समोर येईल, आयुक्तांचा दावा

    – शहरात बेड्स उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार

    – बिटको रुग्णालयात रुग्णाला व्हेंटिलेटर बेड का मिळाला नाही? या प्रश्नाला मात्र आयुक्तांची बगल

  • 01 Apr 2021 12:36 PM (IST)

    सोलापुरातील ग्रामीण भागात मार्च महिन्यात कोरोनाचे 5,126 रुग्ण वाढले

    सोलापूर –

    ग्रामीण भागात मार्च महिन्यात कोरोनाचे 5126 रुग्ण वाढले तर 51 जणांचा मृत्यू

    पंढरपूर ,माळशिरस, करमाळा, माढा ,बार्शी तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग

    नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात पूर्ण संसर्ग झाला होता कमी

    फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्ण संख्या वाढू लागली

    गेल्या आठवडाभरापासून दररोज पॉझिटिव्हचा आकडा तीनशेच्या वर

    उन्हाचा कडाका वाढला तरी कोणाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत असल्याने चिंता वाढली

  • 01 Apr 2021 10:29 AM (IST)

    बारामती शहर आणि तालुक्यात वाढतोय कोरोना संसर्ग

    बारामती :

    बारामती शहर आणि तालुक्यात वाढतोय कोरोना संसर्ग..

    – बारामतीत कोरोनाचा समूह संसर्ग..

    – वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील रुग्णालये फुल्ल..

    – गृह विलगीकरणास परवानगी देण्याची मागणी..

  • 01 Apr 2021 10:24 AM (IST)

    देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यात आज पासून 10 दिवस जनता कर्फ्यू

    देवळा –

    देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यात आज पासून 10 दिवस जनता कर्फ्यू

    मेडिकल, दवाखाने,दूध केंद्र आणि पिठाच्या गिरण्या वगळता सर्व दुकानी,व्यवहार आहे बंद

    कोरोना बाधित रुग्णांची वाढत्या संख्येला आळा बविण्यासाठी सर्व पक्ष व प्रशासनाने घजनता कर्फ्युचा घेतला निर्णय

  • 01 Apr 2021 10:07 AM (IST)

    कोरोना लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा आजपासून सुरु

    पुणे –

    – कोरोना लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला आहे,

    – या टप्प्यातील शहरातील पहिली लस महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात येणार आहे,

    – कोथरूडच्या सुतार दवाखान्यात लस देण्यात येणार आहे,

  • 01 Apr 2021 09:29 AM (IST)

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत बंद

    नाशिक –

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत बंद…

    – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात मंदिर प्रशासनाचा निर्णय

    – या काळात निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा आणि नैमित्तिक पूजा सुरु राहणार…

    सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 5 दिवस बंद

    – साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 1 ते 5 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद

    – सप्तश्रृंग गड तसंच कळवण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय

    – या काळात भाविकांनी दर्शनासाठी गडावर न येण्याचं मंदिर प्रशासनाचं आवाहन..

    – बंद काळात देवीची नैमित्तिक पूजा आणि आरती मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते सुरू राहणार…

  • 01 Apr 2021 09:23 AM (IST)

    औरंगाबाद शहरात रक्ताचा भीषण तुटवडा, शासकीय रुग्णालयासह ब्लड बँकांमध्येही रक्ताचा तुटवडा

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात रक्ताचा भीषण तुटवडा

    शासकीय रुग्णालयासह ब्लड बँकांमध्येही रक्ताचा तुटवडा

    औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात फक्त एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

    काही रक्तगटांचे रक्त तर उपलब्धच नसल्याची माहिती

    रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी होतेय भटकंती

  • 01 Apr 2021 09:22 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात आज 1,542 कोरोना रुग्णांची वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यात आज 1542 रुग्णांची वाढ

    कोरोना बधितांचा आकडा पोचला 82679 वर

    आजपर्यंत 1670 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    काल एका दिवसात तब्बल 19 रुग्णांनी गमावला जीव

    तर आजपर्यंत 65438 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

    तर सध्या 15571 रुग्णांवर उपचार सुरू

  • 01 Apr 2021 09:22 AM (IST)

    औरंगाबादेत आजपासून 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत आजपासून 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू

    लसीकरणासाठी मिळवले तब्बल 1 लाख 92 हजार डोस

    आरोग्य उपसंचलकांनी थेट पुणे गाठून आणले लसीचे डॉस

    औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र 45 वर्षांवरील प्रत्येकाचे होणार लसीकरण

    दररोज 2 हजार नागरिकांना दिले जाणार लसीचे डोस

  • 01 Apr 2021 09:21 AM (IST)

    नागपुरात गेल्या आठवडा भरापासून कोरोना मृत्यूचा मोठा उद्रेक, आकडा 50 च्या वर पोहोचला

    नागपूर –

    नागपुरात गेल्या आठवडा भरापासून कोरोना मृत्यूचा मोठा उद्रेक, आकडा 50 च्या वर पोहोचला

    गेल्या 24 तासात 58 मृत्यू झाले तर 2885 नवीन रुग्णांची नोंद झाली

    नागपुरात संध्या 39 हजार 331 सक्रिय रुग्ण आहेत

    नागपुरात रिकव्हरी रेट 80.34 आहे

    मृत्यूचा आकडा बघता प्रशासनाची चांगलीच झोप उडाली

  • 01 Apr 2021 09:20 AM (IST)

    सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 1 ते 5 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद

    नाशिक –

    – सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 5 दिवस बंद

    – साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 1 ते 5 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद

    – सप्तश्रृंग गड तसंच कळवण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय

    – या काळात भाविकांनी दर्शनासाठी गडावर न येण्याचं मंदिर प्रशासनाचं आवाहन

    – बंद काळात देवीची नैमित्तिक पूजा आणि आरती मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते सुरू राहणार…

  • 01 Apr 2021 09:07 AM (IST)

    नागपुरात आता फक्त रात्रीची संचारबंदी लागू असणार

    नागपूर –

    नागपुरात आता फक्त रात्रीची संचारबंदी लागू असणार

    जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले अन्य निर्बंध उठविण्यात आले

    आता फक्त राज्य सरकार चे निर्बंध नागपुरात लागू असणार

    मात्र वाढत असलेल्या कोरोना चा सामना करण्याची जबाबदारी नागपुरकरांची

  • 01 Apr 2021 09:06 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आजपासून 10 दिवस जनता कर्फ्यू

    नाशिक –

    – नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आजपासून 10 दिवस जनता कर्फ्यू

    – 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु

    – देवळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कर्फ्यूचा निर्णय…

    – कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय

    – अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद..

    – किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय…

  • 01 Apr 2021 09:04 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिर हे सकाळी 7 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असणार

    उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे सकाळी 7 ते सांयकाळी 7 असे 12 तास दर्शनासाठी खुले असणार

    दर रविवारी जनता कर्फ्युमुळे ते बंद असणार आहे

    दररोज 5 हजार भाविकांना मोफत दर्शन पास दिले जाणार

    नो मास्क नो एन्ट्री नियम लागू असणार

    सर्व पूजा विधी या मंदिर संस्थान करेल

  • 01 Apr 2021 08:02 AM (IST)

    नागपुरातील मेडिकल, मेयोमधील बेडची संख्या तातडीने वाढवा, पालकमंत्री नितीन राऊतांचे निर्देश

    नागपूर ब्रेकिंग –

    मेडिकल, मेयो मधील बेडची संख्या तातडीने वाढवा

    पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

    दोन्ही हॉस्पिटलच्या डीन सोबत उच्चस्तरीय बैठक

    मेडिकल कॉलेजमधील सर्व डॉक्टरांना वैद्यकीय सेवा अनिवार्य

    ग्रामीण भागातील रूग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करा

    ॲम्बुलन्समध्ये रुग्ण ताटकळत राहता कामा नये

    रुग्णालयाच्या आस्थापना गैरवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश

    आणीबाणीत सर्व डॉक्टरांना वैद्यकीय सेवेत रुजू होण्याचे आदेश

    45 वर्षावरील सर्व बाह्य रूग्णांनाही कोविड लसीकरण करा

  • 01 Apr 2021 08:01 AM (IST)

    पुण्यात काल दिवसभरात सर्वाधिक 8 हजार 605 नवे कोरोनाबाधित आढळले

    पुणे –

    – पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये काल वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ,

    – काल दिवसभरात तब्बल ८ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित आढळले आहे.

    – तर जवळपास ५ हजार ७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली,

    – पुणे शहरात बुधवारी ४ हजार ४५८ तर पिंपरीत २ हजार २८८ रुग्णांची भर पडली.

    – तसेच पुणे शहरात ३ हजार ३७४ तर पिंपरीत १४१० जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.,

    – जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • 01 Apr 2021 08:01 AM (IST)

    नंदूरबारमध्ये 1 ते 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

    नंदूरबार –

    जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज पासून ते 15 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन राहणार आहे

    यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद होणार आहे

    त्यामध्ये सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकान नाशवंत वस्तूंचे दुकान चालू राहणार आहे

    कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात मदत होणार असल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे

  • 01 Apr 2021 07:59 AM (IST)

    पुणे विभागासाठी कोविशिल्डचे 5 लाख 13 हजार 860 डोस मिळाले

    पुणे –

    – पुणे विभागासाठी कोविशिल्डचे ५ लाख १३ हजार ८६० डोस मिळालेत.

    – यापैकी सर्वाधिक ३ लाख २५ हजार ७८० डोस पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत.

    – जिल्ह्यातील एकूण डोसपैकी पुणे व पिंपरी चिंचवडला प्रत्येकी १ लाख ४० हजार तर, ग्रामीण भागासाठी ४५ हजार ७८० डोस वितरित करण्यात आलेत,

    – येत्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्याला आणखी १ लाख अतिरिक्त डोस मिळणार आहेत.

    – राज्यात येत्या १ एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे.

    – शिवाय याआधीच्या दोन टप्प्यात लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस दिला जाणार आहे.

  • 01 Apr 2021 07:57 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडच्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर सुरु

    पिंपरी चिंचवड

    -नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर सुरु

    -कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु

    -ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिथे 25 रुग्ण उपचार घेतायत

    -शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत

    -त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

    -1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे

  • 01 Apr 2021 07:55 AM (IST)

    आजपासून 45 वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार, नागपुरात यंत्रणा सज्ज

    नागपूर –

    केंद्र शासनाच्या ‍दिशानिर्देशानुसार कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.

    नागपुरात खाजगी आणि शासकीय रुग्णालये मिळून एकूण ८६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

    महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले आहे.

    नागपुरात आतापर्यंत २,१८,५२८ नागरिकांनी लसीकरण केले आहे.

    यामध्ये ३७,४४३ आरोग्य सेवक, २५,०८७ फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षावरील १,०२,५५५ नागरिक आणि विविध आजाराने पीडित ३२,१९५ नागरिकांनी लस घेतली आहे.

    आता १ एप्रिल पासून लसीकरणाच्या मोहिमेत ६.५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

  • 01 Apr 2021 07:01 AM (IST)

    बुलडाण्यात रात्रीच्या संचारबंदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, आता रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू 

    बुलडाणा

    रात्रीच्या संचारबंदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

    आता रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू

    तर मास्क न वापरणाऱ्यास 500 आणि थुंकणाऱ्यास 1 हजाराचा दंड

    जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांचे आदेश

    जिल्हा प्रशासनाने आज 31 मार्चच्‍या रात्री उशिरा लॉकडाऊनमधील पूर्वीचे निर्बंध कायम ठेवतानाच रात्रीची संचारबंदी आता रात्री 8 ते सकाळी 7 अशी केली आहे.

  • 01 Apr 2021 06:58 AM (IST)

    सीबीएसईकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास सुरूच

    सीबीएसईकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

    बंगळुरुमध्ये 474 मुलांना कोरोनाची लागण

    महाराष्ट्रात 4 मुलांचा मृत्यू

    तरीही सीबीएससीचा ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास सुरूच

Published On - Apr 01,2021 10:39 PM

Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.