Corona Cases and Lockdown News LIVE : पुण्यात दिवसभरात 4653 नवे रुग्ण, तर 46 रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे
| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
येवल्यात दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू
येवला : कोरोनाबाधित एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, येवल्यातील 2143 कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली, कोरोनावर 1711 जणांनी मात करत केली घरवापसी, उर्वरित 363 जण कोरोणा उपचार घेत आहे
-
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 15 हजार बेड्सची व्यवस्था करणार
अहमदनगर : कोरोना परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा उभारणार, 15 हजार बेड्सची व्यवस्था करणार, टेस्टींग रिपोर्ट लवकर देण्यासाठी प्रयत्न, नविन मशिन आणि ऑपरेटरची व्यवस्था केली, जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार नाही, निर्बंध आणखी कडक करणार, कारवाई होण्याची वाट बघू नका, लोकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचं आवाहन, राजेंद्र भोसले यांची अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात कोरोना आढावा बैठक, राहाता तालुक्यासह शिर्डी झालंय कोरोना हाॅटस्पाॅट
-
-
राज्यात दिवसभरात 47 हजार 827 रुग्णांची भर, तर मृतांचा आकडा 200 पार!
राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होतेय. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक बनलाय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांचा हा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे.
-
पुण्यात दिवसभरात 4653 नवे रुग्ण, तर 46 रुग्णांचा मृत्यू
पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ४६५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३३३७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ४६ रुग्णांचा मृत्यू. ०७ रूग्ण पुण्याबाहेरील. – ४७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७८०९९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३७१२६. – एकूण मृत्यू -५३७६. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३५५९७. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००७३.
-
सांगलीत दिवसभरात 276 नवे कोरोना रुग्ण
सांगली कोरोना अपडेट :
जिल्ह्यात आज दिवसभरात 276 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1806 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 2314 वर
तर उपचार घेणारे 221 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 48090 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 52210 वर
-
-
गोंदियात दिवसभरात 209 नवे कोरोनाबाधित, 48 रुग्णांना डिस्चार्ज, तर एकाचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेतून आज 2 एप्रिल रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 209 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. तर उपचारादरम्यान एकाच्या मृत्यु झाला. गोंदियात आजपर्यंत 16,436 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 15,191 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1053 आहे. 733 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 192 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 92.42 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.
-
पीएमपीएल बससेवामुळे पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची प्रतिक्रिया
पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची प्रतिक्रिया :
– पुण्यातील परिस्थिती गंभीर आहे, रोज 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतायत,
– पीएमपीएल बससेवा सुरू करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत खूप चर्चा, मात्र सात दिवसांपैकी 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे तसा परिणाम होणार नाहीय,
– पीएमपीएल बससेवामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, म्हणूनच पीएमपीएल बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय,
– 80 टक्के बेड्स अधिग्रहित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पालिकेच्या काही रुग्णालयात बेड्स वाढवणार आहेत
-
हिंगोलीत दिवसभरात 176 नवे कोरोनाबाधित
हिंगोली – आज 176 जणांना नव्याने कोरोनाची लागण तर चार जणांचा मृत्यू
159 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला
हिंगोलीची करोनाबधितांची संख्या 6 हजार 845 वर,
त्यापैकी 6 हजार 17 जणांना मिळाला डिस्चार्ज ,
730 रुग्णांवर उपचार सुरु तर आतापर्यंत 98 रुग्णांचा मृत्यू
150 रुग्णांची प्रकृती गंभीर तर 10 रुग्णांची अतिगंभीर
-
केडीएमसी हद्दीत आज कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 1108 नवे रुग्ण
केडीएमसी हद्दीत आज कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 1108 रुग्ण, आज डिस्चार्ज रुग्णांची संख्या 715, आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 81197,
एकूण डिसचार्ज 70682
आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू एकूण मृतांची संख्या 1262
ॲक्टिव रुग्णांची संख्या 9235
-
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? आरोग्यमंत्री म्हणतात….
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी टास्क फोर्स, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरु आहे याबाबतची माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
राजेश टोपे यांनी नेमकं काय सांगितलं?
कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम सुरु आहे. बेड्स, औषधे, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरु आहे. कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्याठिकाणी अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याबाबत चर्चा करुन निर्णय होईल. अजून निर्णय घेण्यात आलेला नाही.
लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालये वर्क फ्रॉम होम केले आहेत. नाईट कर्फ्यू लावले आहेत. जिथे निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत बारकाईने निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज हा लॉकडाऊन असतो. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत. तोंडातल्या शिंतोड्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे नियम पाळलं तर परिस्थिती नियंत्रणात येईल. लोकांनी अंगावर घेऊ नये. लगेच टेस्ट न केल्याने तरुणांनाही ऑक्सिनज बेड्सची गरज लागत आहे. लक्षणे दिसली की तातडीने टेस्ट करावे. ज्यांना बेड्सची आवश्यकता नाही त्यांनी आयसीयूचा बेड घेऊ नये. याबाबतच्या सूचना बैठकीत आम्ही देतोय. सगळ्या संसाधनांचा व्यवस्थित पुरवठा व्हावा त्याबाबत चर्चा सुरु आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बंद ठेवायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने चालत होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर अहवाल आणून निर्णय घेण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला. पुण्यात निर्बंध लावणं गरजेचं होतं. पण तसे सर्वदूर लावले असं नाही. कोणत्या जिल्ह्यात निर्बंध लावले पाहिजेत, तेही महत्त्वाचं आहे. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.
लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतीत काही गाईडलाईन्स जाहीर होतील. लोकलमध्ये कसं राहावं याबाबत सूचना दिल्याल जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जातोय.
-
रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत
इचलकरंजी –
आजच्या रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील घटना
कापरे मळ्यातील शिवाजी गुंडा कापरे यांच्या विहिरीवर पोहण्या करता गेली होती
या घटनेमध्ये 9 वीमध्ये शिकणाऱ्या शिवराज कृष्णा साळोखे आणि 8 वीमध्ये शिकणाऱ्या शुभम लक्ष्मण पाथरवट या दोघां शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागलाय
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज्यातील जनतेशी संवाद, महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता संबोधन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता
राज्यातील जनतेला समाजमाध्यमांच्या माध्यमातून संबोधित करणार
-
पुण्यात दिवसभर जमावबंदी, मॉल, हॉटेल्स, धार्मिक स्थळं सात दिवसांसाठी बंद
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद
- परिस्थिती बिकट होत चालली आहे
- पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय
- वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे
- हॉस्पिटल बेड वाढतोय
- पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील
- पुण्यामध्ये इतर जिल्ह्यात रुग्ण उपचारासाठी येत आहे
- त्यामुळं आरोग्य यंत्रणेवर ताण येणार
- लसीकरणाचा वेग वाढवणार
- मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण
- पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट
- येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
- सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक
- सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट सात दिवस बंद, पार्सल सुविधा सुरु राहणार
- मॉल, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळ, सार्वजनिक बस वाहतूक सात दिवस पूर्ण बंद
- आठवडे बाजारही बंद
- लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकिय कार्यक्रम होणार नाहीत
- संध्याकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी
- हे सर्व निर्णय उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू होणार
- दिवसभर जमावबंदी
- जिम सुरु राहणार
- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
-
राज्यात अंशत: लॉकडाऊन होण्याची शक्यता : अस्लम शेख
असलम शेख, मुंबईचे पालकमंत्री
राज्यात अंशत: लॉकडाऊन होण्याची शक्यता
मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची सरकार चा प्रयत्न
मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’ची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स १५ दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल..
रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवली जाईल
-
कोरोनामुळे सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा गावातील तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
औरंगाबाद –
कोरोनामुळे तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा गावातील चिमुरडीचा मृत्यू
पहाटे पाच वाजता घाटी रुग्णालयात झाला मृत्यू
कोरोनामुळे तीन वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ
-
बारामतीत कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासात 211 जणांना कोरोनाची लागण
बारामती :
– बारामतीत कोरोनाचा विस्फोट
– कालच्या दिवसभरात 211 जणांना कोरोनाची लागण
– 504 जणांची झाली होती तपासणी
– मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बारामतीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव
– कोरोना रुग्ण वाढल्यानं बारामतीतील रुग्णालये फुल्ल
-
पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करणार
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक
पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करणार
विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरु आहे
-
बारामतीत कोरोनाचा विस्फोट, 211 जणांना कोरोनाची लागण
बारामती : बारामतीत कोरोनाचा विस्फोट..
– कालच्या दिवसभरात २११ जणांना कोरोनाची लागण..
– ५०४ जणांची झाली होती तपासणी..
– मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बारामतीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव..
– कोरोना रुग्ण वाढल्यानं बारामतीतील रुग्णालये फुल्ल..
-
पुणे जिल्ह्याची बेड स्थिती, फक्त 2927 आयसीयू बेड्स उपलब्ध
पुणे जिल्ह्याची बेड स्थिती
एकूण बेड्सची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 9118 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093 – आयसीयु बेड्स – 2927 – व्हेंटिलेटर्स बेड – 996
उपचार बेडची स्थिती ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974 ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563 आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073 व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376
शिल्लक बेडची स्थिती – ऑक्सिजन बेड्स – 6144 – ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530 – आयसीयु बेड्स – 1854 – व्हेंटिलेटर्स बेड – 620
रुग्ण संख्येची स्थिती – ऍक्टिव्ह रुग्ण – 61740 – रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 ) – घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754
12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान – ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील – 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल – 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील – 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल
जिल्ह्याचा मृत्युदर – पुणे मनपा – 2 टक्के – पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के – पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के – पुणे ग्रामीण – 1.9 टक्के – पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8
-
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, मृत्यूदरही वाढण्याची शक्यता
पुणे –
– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम – पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती – पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार – जिल्ह्यात मृत्यूदरही वाढण्याची शक्यता – आठवड्याची परिस्थिती पाहता निर्बंध कडक लागण्याची शक्यता – बैठकीत लॉकडाऊन नकोचा सूर पण कडक निर्बंध लावण्याची मागणी
-
कोविड परिस्थितीवर किरीट सोमय्यांची सरकारवर टिका
किरीट सोमय्यांची सरकारवर टिका… – कोविड परिस्थितीवर ठाकरे सरकारला सवाल… – महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये जागा नाही, ऑक्सिजन नाही!!?? व्यक्त केली चिंता… – नाशिकमध्ये बाबासाहेब कोळे चे हॉस्पीटल मधे अॅडमिशन, ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू झाले. त्यांची पत्नी सुरेखा ताईने पत्रात व्यक्त केलेली वेयथा – बाईट बाॅटलाईनला
-
सोलापुरात भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे पालन नाही
सोलापूर –
भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून मास्कचा वापर
मात्र भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे पालन नाही
अर्ध्याहून अधिक भाजीविक्रेते मास्क शिवाय भाजी मंडईत
सोलापुरातील लक्ष्मी मंडईतील प्रकार
-
बारामती नगरपरिषदेत नागरीकांना प्रवेश बंद
बारामती :
– बारामती नगरपरिषदेत नागरीकांना प्रवेश बंद
– लोकप्रतिनिधी वगळता नागरीकांनी तातडीच्या कामाशिवाय न येण्याचं आवाहन
– 30 एप्रिलपर्यंत नागरीकांना प्रवेश बंद
– दैनंदिन कामकाजाच्या पत्रव्यवहारासाठी तळमजल्यावरच व्यवस्था
– बारामतीतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे नगरपरिषद प्रशासनाचा निर्णय
– नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद आणि तपासणी होणार
-
बारामती नगरपरिषदेत नागरिकांना प्रवेश बंद, तातडीच्या कामाशिवाय न येण्याचं आवाहन
बारामती : बारामती नगरपरिषदेत नागरिकांना प्रवेश बंद..
– लोकप्रतिनिधी वगळता नागरीकांनी तातडीच्या कामाशिवाय न येण्याचं आवाहन..
– ३० एप्रिलपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद..
– दैनंदिन कामकाजाच्या पत्रव्यवहारासाठी तळमजल्यावरच व्यवस्था..
– बारामतीतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे नगरपरिषद प्रशासनाचा निर्णय..
– नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद आणि तपासणी होणार..
-
बारामतीत कोरोना लसीकरणाला वेग, नव्या 18 केंद्रांची वाढ
बारामती : बारामती तालुक्याने कोरोना लसीकरणात आघाडी
– तालुक्यातील ३३ केंद्रांवर कोरोना लसीकरण..
– पूर्वी होती १५ केंद्र; आता नव्याने १८ केंद्रांची वाढ..
– लसीकरण केंद्र वाढल्यानं नागरीकांचाही मिळतोय प्रतिसाद..
-
रंगपंचमीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट, घरातच सण साजरा करण्याचे आवाहन
सोलापूर — आजच्या रंगपंचमीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक रंगपंचमी उत्सवावर बंदी
रंगपंचमी सण हे साधेपणाने आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन
अन्यथा कठोर कारवाई करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा
-
सोलापूर बस स्थानकात पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर – सोलापूर बस स्थानकात आढळले पाच प्रवासी पॉझिटिव्ह
मनपा प्रशासनाच्या आदेशानुसार सोलापूर बस स्थानकात जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी
आतापर्यंत केलेल्या कोरोना चाचणीत पाच प्रवासी पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच प्रवाशांना उपचारासाठी दाखल
-
रात्रीच्या संचारबंदीमुळे पुणे,पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएलएम बसच्या 492 फेऱ्या रद्द
पुणे
पुण्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवरील पीएमपीएलएम बसच्या 492 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय
सकाळी सातपूर्वीच्या २६२ फेऱ्या आणि रात्री आठनंतरच्या २३० फेऱ्या रद्द
जादा कामाच्या ३६७ तासांच्या बचतीमुळे पीएमपीची आर्थिक बचत होणार
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे आणि लॉकडाउनच्या धास्तीमुळे प्रवासी संख्या घटली
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची माहिती
-
पुणे शहरात लागू करण्यात आलेल्या रात्री आठनंतरच्या संचारबंदीमुळे येथील २० टक्के हॉटेल बंद
पुणे :
शहरात लागू करण्यात आलेल्या रात्री आठनंतरच्या संचारबंदीमुळे येथील २० टक्के हॉटेल बंद
सर्वाधिक व्यवसाय होत असलेल्या रात्री आठ ते १२ या वेळे दरम्यान सेवा बंद राहणार असल्याने हॉटेल काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
कामगारांना दिली १५ एप्रिलपर्यंत सुट्टी अनेक कामगारांचा रोजगार बुडाला
पार्सलला मिळेना प्रतिसाद, लॉकडाउनच्या भीतीने कामगार पुन्हा गावी जाताय
पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन अध्यक्ष गणेश शेट्टी यांची माहिती
-
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कर्नाटकचा व्हिजिटर आढळला पॉझिटिव्ह
सोलापूर –
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कर्नाटकचा व्हिजिटर आढळला पॉझिटिव्ह
जिल्हा परिषदेत गर्दी होऊ लागल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रवेशद्वारावरच केले आहे आरोग्य पथक तैनात
आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीत एक व्हिजिटर आढळला पॉजिटीव्ह
पॉजिटीव्ह आढळलेली व्यक्ती कर्नाटकातील इंडी येथील रहिवासी
आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आढळले आहेत पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
-
सोलापूर बस स्थानकात पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर-
सोलापूर बस स्थानकात आढळले पाच प्रवासी पॉझिटिव्ह
मनपा प्रशासनाच्या आदेशानुसार सोलापूर बस स्थानकात जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची सुरू आहे कोरोना चाचणी
आतापर्यंत केलेल्या कोरोना चाचणीत पाच प्रवासी पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच प्रवाशांना उपचारासाठी दाखल
-
आजच्या रंगपंचमीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट
सोलापूर –
आजच्या रंगपंचमीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक रंगपंचमी उत्सवावर बंदी
रंगपंचमी सण हे साधेपणाने आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन
अन्यथा कठोर कारवाई करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा
-
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी कोरोना पॉझिटिव्ह
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी कोरोना पॉझिटिव्ह
4 ते 5 दिवसात संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घेण्याच केलं आवाहन.
-
चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होणारा बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द
कोल्हापूर :
चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होणारा बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द
कोरोना संकटामुळे आदमापूर येथील देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
5 एप्रिल ते 13 एप्रिल होणार होता बाळुमामाचा भंडारा उत्सव
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा मधील लाखो भाविक येत असतात आदमापुरात
-
नाशिक जिल्ह्यासाठी 1 लाख 90 लस प्राप्त
नाशिक जिल्ह्यासाठी 1 लाख 90 लस प्राप्त
नाशिकरांना दिलासा
कोरोना प्रतिबंधक लसिकरण सुरळीत होणार
मागील दोन आठवडयापासुन जाणवत होता लसीचा तुटवडा
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक
पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक
पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र, निर्बंध कडक करण्याबाबत बैठकीत होणार निर्णय
विभागीय आयुक्त कार्यालयात काही वेळात होणार बैठकीला सुरवात
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार राहणार बैठकीला उपस्थित
-
महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलं डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ केयर सेंटर पाचपावलीचे उद्घाटन
नागपूर –
महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलं डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ केयर सेंटर (DCHC) पाचपावली चे उद्घाटन
पाचपावली येथे डीसीएचसी सुरु महापौरांनी केले उदघाटन
या सेंटरमध्ये ७२ खाटांची व्यवस्था कोव्हिड रुग्णांसाठी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मधले कोरोना रुग्ण स्थिर झाल्यानंतर इथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.
त्यांचेसाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ११०, आयुष येथे ४०, आयसोलेशन येथे ३२ कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता काहीसा मिळणार दिलासा
-
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, नव्या 122 रुग्णांची नोंद
कोल्हापूर –
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला
काल दिवसभरात नव्या 122 रुग्णांची नोंद
साडे पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसातील आकडा गेला शंभरी पार
जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या पोहचली 844 वर
वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनान देखील सतर्क
यंत्रणेच्या दिवसभर आढावा आणि नियंत्रण बैठका
-
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 2,137 नवीन रुग्णांची नोंद
पिंपरी चिंचवड
– शहरात दिवसभरात 2137 नवीन रुग्णांची नोंद,1161 कोरोनामुक्त, 17 मृत्यू
– ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 399 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 341 नवीन रुग्ण आले आढळून
– शहरात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 251 जणांना कोरोनाची लागण झाली
– 1 लाख 21 हजार 483 जण बरे होऊन घरी गेले
– शहरातील 2018 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 839 अशा 2857 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू
-
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1481 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1481 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84,160 झाली
1321 जणांना सुट्टी देण्यात आली
आजपर्यंत 66,759 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले
आज एकूण 34 रुग्णांचा मृत्यू
मृतांचा आकडा 1,704 वर पोहोचला
15,697 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
-
नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 3 हजार 784 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
नाशिकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ
नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 3 हजार 784 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
3 हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत 2 हजार 262, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 335, मालेगाव महापालिका हद्दीत 136 तर जिल्हा बाहेरिल 51 रुग्णांचा समावेश आहे.
-
नागपुरात गेल्या 24 तासात 3 हजार 630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नागपुरात गेल्या 24 तासात 3 हजार 630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
2 हजार 928 जणांनी कोरोनावर मात
नागपुरातील मृत्यूचा आकडा अधिकाधिक गंभीर
नागपुरात तब्बल 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख 9 हजार 668
18 लाख 4 हजार 537 जणांनी कोरोनावर मात
आतापर्यंत एकूण 5 हजार 158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
पुण्यात गेल्या 24 तासात 4 हजार 103 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
पुण्यात गेल्या 24 तासात 4 हजार 103 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
2 हजार 77 जण कोरोनामुक्त
आज दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पुण्यात सध्या 35 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरु
825 रुग्णांची स्थिती चिंतानजक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
-
मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण
5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त
दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार
मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश
मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु
-
राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
249 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली तर थोडासा दिलासा मिळतो
कारण, 32 हजार 641 जण आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले
महाराष्ट्रात सध्या 3 लाख 66 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरु
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 कोटी 85 लाख 6 हजार 163 वर
Published On - Apr 02,2021 10:36 PM