Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात 15,169 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 2,16,016
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईत 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासात नव्यानं 925 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत बुधवारी (2 जून) सायंकाळी 6 वाजता 24 तासात 925 बाधित रुग्णांची नोंद, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1632, आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 674296, बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्के, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 16,580, दुप्पटीचा दर 477 दिवस, कोविड वाढीचा दर (26 मे ते 1 जून) 0.14 टक्के
#CoronavirusUpdates २ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण – ९२५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १६३२ बरे झालेले एकूण रुग्ण – ६७४२९६ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १६५८०
दुप्पटीचा दर- ४७७ दिवस कोविड वाढीचा दर ( २६ मे ते १ जून)- ०.१४ % #NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2021
-
राज्यात 15,169 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, आता एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 2,16,016
राज्यात आज (2 जून) 15,169 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच नव्याने 29,270 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 54,60,589 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,16,016 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54 टक्के झाले आहे.
राज्यात आज 15169 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 29270 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 5460589 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 216016 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहे.#MeechMazaRakshak pic.twitter.com/7mOlaAyN5m
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 2, 2021
-
-
पुण्यात दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 651 रुग्णांना डिस्चार्ज, 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू
पुण्यात दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 651 रुग्णांना डिस्चार्ज, 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू (पुण्याबाहेरील 14 जणांचा समावेश), 761 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू, एकूण कोरोना बाधित रूग्णसंख्या 4,70,778, सक्रीय रुग्ण संख्या 5,305, एकूण मृत्यू 8313, आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 4,57,160, आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी 7483
-
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेची घोषणा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेची घोषणा, प्रत्येक महसुली विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख आणि 15 लाख रुपयांचे बक्षीस
राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल… https://t.co/0ZfzXdnyG1 @mrhasanmushrif | #CoronafreeVillage | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
-
मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याचा अनोखा जन्मदिवस, 501 दिव्यांगांना रेशन किट वाटप
मुंबईत पोलीस दलातील दिलदार पोलीसवाल्याची सर्वत्र चर्चा, गोवंडी पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र घोरपडेंनी आपला 51 वा वाढदिवस कोविड काळात गोरगरिबांना धान्य वाटप करून साजरा केला, 501 दिव्यांगांना वाटलं रेशन किट, मनोगत मांडताना दिव्यांगांना अश्रू अनावर, कोविड काळात नोकरी धंदा गमावलेल्यांना आधार देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, पोलिसांनीही दानशुरता दाखवावी अशी नागरिकांची भावना
-
-
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडणार : मंत्री असलम शेख
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडणार, मंत्री असलम शेख यांची माहिती, लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन केंद्र सरकारच्या मदतीने करणार, ग्लोबल टेंडर मंजूर झालं असेल यावरही सादरीकरण होईल, शेतकरी आणि आंबा बागायतदार, मच्छिमार यांच्या मदतीसह कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती
-
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारावरुन मनपा आणि डॉक्टरांमधील पेच कायम
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारावरुन मनपा आणि डॉक्टरांमधील पेच कायम, आयुक्तांशी चर्चा झाल्याशिवाय रुग्ण दाखल करून घेणार नाही, खासगी डॉक्टर असोसिएशन संघटनेचा निर्णय, सायंकाळी आयुक्त कैलाश जाधव यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार, आम्हाला काही काळ विश्रांती मिळवा म्हणून ही भूमिका घेतल्याचं डॉक्टरांकडून स्पष्टीकरण, तसेच डॉक्टरांपुढील अनेक प्रश्नांवरही चर्चा करणार असल्याची माहिती
-
गडचिरोलीत महिलांचा अनोखा उपक्रम, कोरोना मृतांना अखेरचा सन्मान
गडचिरोलीत केवळ महिला सदस्य असलेल्या ‘आधारविश्व फाउंडेशन’चा अनोखा पुढाकार, कोरोनाने मृत्यू झालेल्या आणि नातेवाईकांनी दूर केलेल्या मृतदेहांवर अंतिम संस्कार, माणुसकीच्या भावनेतून या मृतदेहांना दिला जातोय मुखाग्नि
-
फडणवीस 3 जून रोजी वाशिम जिल्हा रुग्णालयाला भेट देणार
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस 3 जून रोजी दुपारी वाशिम जिल्हा दौऱ्यावर जाणार, जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्यविषय विविध समस्यांचा आढावा घेणार
-
दिल्लीतले मराठी अधिकारी अनंत शेरखाने यांचं कोरोनामुळे निधन
दिल्लीतले मराठी अधिकारी अनंत शेरखाने यांचं कोरोनामुळे निधन
पहाटे साडेपाच वाजता घेतला अखेरचा श्वास
दिल्लीतल्या फोर्टिस हॉस्पिटल मध्ये सुरु होते पोस्ट कोविड उपचार
लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयात ॲडिशनल कमिशनर म्हणून कार्यरत होते अनंत शेरखाने Repl
-
देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 32 हजार 788 नवे रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 32 हजार 788 नवे रुग्ण
देशात गेल्या 24 तासात 2 लाख 31 हजार 456 रुग्णांनी केली कोरोनावर मात
देशात 3 हजार 207 रुग्णांचा 24 तासात मृत्यू
India reports 1,32,788 new #COVID19 cases, 2,31,456 discharges & 3,207 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,83,07,832 Total discharges: 2,61,79,085 Death toll: 3,35,102 Active cases: 17,93,645
Total vaccination: 21,85,46,667 pic.twitter.com/wqyIwRhogm
— ANI (@ANI) June 2, 2021
-
अहमदनगरमध्ये कोरोनाबाधितांमध्ये बालकांचे प्रमाण वाढतच, तीन महिन्यांत 18000 बालकांना लागण
अहमदनगर
जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांमध्ये बालकांचे प्रमाण वाढत असून गेल्या तीन महिन्यांत 18000 बालकांना झाला करोना
तर एकट्या मे महिन्यामध्ये शून्य ते अठरा वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली.
नगरमध्ये एकूण ८० हजार ७८५ नागरिकांना मे महिन्यात संसर्ग झाला होता. या तुलनेत बालके बाधित होण्याचे प्रमाण ११.६५ टक्के
-
कोरोनावर डायएबीझेडआय चा एकच डोस पुरेसा, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा
कोरोनावर डायएबीझेडआय चा एकच डोस पुरेसा, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा
या औषधामुळे कोरोना वायरसला गंभीर स्वरुपात जाण्यापासुन रोखता येउ शकते
तसेच हे औषध इतर श्वसनासंबधित आजारांसाठी पुरक
तसेच रोगप्रतिकारक शक्ती सक्रीय करते
अमेरिकन अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा
-
राज्यात आतापर्यंत कारागृहातील 4 हजार कैद्यांना कोरोनाची लागण
पुणे
राज्यात आतापर्यंत कारागृहातील 4 हजार कैद्यांना कोरोनाची लागण
सर्वच कारागृहातील 70 हजार जणांचे घेण्यात आले नमुने त्यामध्ये 4 हजार 32 जणांची झाली पॉझिटिव्ह नोंद ,
पहिल्या आणि दूसऱ्या लाटेत कारागृहातील 14 जणांचा झालाय मृत्यू
आतापर्यंत 3 हजार 800 कैदी हे कोरोनामुक्त ही झालेत, 219 कैदी रुग्णांवर उपचार सुरू आहेत,
सध्या उस्मानाबाद, ठाणे, कल्याण या कारागृहातील सर्वाधिक कैदी हे सध्या उपचार घेतायेत,
महाराष्ट्र कारागृह प्रशासनानं दिली माहिती
-
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना रुग्णसंख्या घटली
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना रुग्णसंख्या घटली
पालिकेची 11 कोविड सेंटर बंद होणार
वाशी येथील सिडको एक्झिबेशन सेटंर हे एकच केद्रं सुरु राहणार
तर अन्य ठिकाणाची कोविड सेंटर येत्या तीन दिवसात बंद होणार
अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची माहिती
-
कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी संख्या घटल्यानं पुणे विभागातील रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय
पुणे –
कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी संख्या घटल्यानं पुणे विभागातील रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय
15 जूनपर्यंत पुणे – सोलापूर ,पनवेल. नांदेड ही या मार्गावरील गाड्या राहणार बंद,
राज्यांतर्गत धावणाऱ्या दक्षिणेकडील गाड्यांच आरक्षित बुकिंग होत नसल्यानं गाड्या रिकाम्या धावत आहेत,
त्यामुळे पुणे सोलापूर पुणे विशेष रेल्वे ही रद्द करण्यात आलीये,
यामध्ये पनवेल हूजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस, 2 ते16 जूनपर्यंत तर नांदेड पनवेल एक्स्प्रेस 15 जूनपर्यंत बंद राहणार,
लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही 3 ते 17 जूनपर्यंत रद्द करण्यात आलीये
-
औरंगाबादेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला नाकारले पेट्रोल
औरंगाबाद –
मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला नाकारले पेट्रोल
पंपावरच सुमारे तासभर रुगवाहिकेत होता मृतदेह
औरंगाबादेतील क्रांतिचौक पेट्रोल पंपावरील घटना
रुग्णवाहिकेचा चालक करीत होता विनवणी, पपं चालकाचा मात्र इंधन देण्यास नकार
सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोकोचा इशारा दिल्याने पंपावर बराच वेळ सुरू होता गोंधळ
बंदोबस्तावरील पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रुग्णवाहिकेला मिळाले इंधन
-
वसई-विरारच्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये दिलासा, अत्यावश्यक वस्तुंची दुकानं आजपासून 7 ते 2 पर्यंत सुरु
वसई-विरार
– वसई-विरारच्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये दिलासा
– सर्व अत्यावश्यक वास्तू व सेवेची दुकान आजपासून 7 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी
– अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकान (मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स वगळता) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत चालू राहतील…तर शनिवार रविवार दोन दिवस बंद राहतील
– जीवणावश्य वस्तूंच्या बरोबर अन्य वस्तू देखील इ कॉमर्स माध्यमातून वितरित करता येतील
– कोव्हिडं 19 व्यतिरिक कामकाज करणाऱ्या काईयालया व्यतिरिक्त इतर सर्व कार्यालय 25 टक्के कर्मचारीच्या उपस्थितीत सुरू राहतील
– कृषी विषयक दुकान सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत चालू राहतील शनिवार रविवार बंद राहतील
– वैद्यकीय व इतर तातडीचे कारण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मज्जाव असेल..
– हे सर्व आदेश 15 जून पर्यंत कायम राहतील असा आदेश वसई विरार महापालिका आयुक्त यांनी काढला आहे
-
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 1007 नवे रुग्ण, 26 रुग्णांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट –
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत 1007 कोरोना रुग्ण
म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 179, आज आढळलेले रुग्ण 10, आज मृत्यू 1
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे 26 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3450 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 11462 वर
तर उपचार घेणारे 1452 जण गेल्या २४ तासांत कोरोना मुक्त
गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुगणांची संख्या 104462 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 119374 वर
-
नागपुरात 203 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 833 जणांची कोरोनावर मात
नागपूर : नागपुरात गेल्या २४ तासांत 203 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
833 जणांनी केली कोरोनावर मात
तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 474808
बरं होणाऱ्यांची संख्या – 460275
एकूण मृत्यूसंख्या – 8914
-
नाशकातील शहरातील खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय, आजपासून कोव्हिड रुग्ण दाखल करुन घेणार नाही
नाशिक – शहरातील खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय
आजपासून कोव्हिड रुग्ण दाखल करुन घेणार नाही
पत्रक काढून खासगी डॉक्टरांनी दिली माहिती
रुग्ण संख्या कमी झाल्याने आता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन
खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण वेगळं असल्याची चर्चा
-
नाशिक जिल्ह्यात 1499 रुग्ण कोरोनामुक्त, 430 नव्या रुग्णांची वाढ
नाशिक : गेल्या 24 तासांत पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1499
गेल्या 24 तासांत रोजी पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 430
नाशिक मनपा- 216 नवे रुग्ण
नाशिक ग्रामीण- 181 नवे रुग्ण
मालेगाव मनपा- 15 नवे रुग्ण
जिल्हा बाह्य- 18 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4754
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -30
नाशिक मनपा- 16 रुग्णांचा मृत्यू
मालेगाव मनपा- 01 रुग्णांचा मृत्यू
नाशिक ग्रामीण- 13 रुग्णांचा मृत्यू
Published On - Jun 02,2021 11:16 PM





