Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात कोरोनाचा महाउद्रेक, दिवसभरात तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Apr 04, 2021 | 11:01 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात कोरोनाचा महाउद्रेक, दिवसभरात तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 रुग्णांचा मृत्यू
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Apr 2021 11:00 PM (IST)

    मालेगावात दिवसभरात 71 नवे रुग्ण

    मालेगावमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, दिवसभरात आज 71 नवीन रुग्ण, तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रोज मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाला भरली धडकी, मालेगाव मनपा क्षेत्रांतिल अॅकटिव्ह रुग्णांची संख्या 1999 वर

  • 04 Apr 2021 10:58 PM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात 340 नवे रुग्ण

    मीरा भाईंदर:

    मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज चोवीस तासात 340 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 31हजार 995 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 28 हजार 339 रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2 हजार 818 रुग्णावर उपचार सुरु आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 838 रुग्णांणचा मृत्यू झाला आहे..

  • 04 Apr 2021 10:57 PM (IST)

    ठाणे शहरात दिवसभरात 1701 नवे कोरोनाबाधित

    ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट :

    # आज 1,701 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 83,826 इतकी आहे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 70,618 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 85% इतकं आहे ) # 11,800 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # आज 1,046 रुग्ण कोरोनातून झाले बरे # आज 5 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,408 जणांचा मृत्यू झाला आहे

  • 04 Apr 2021 09:03 PM (IST)

    राज्यात कोरोनाचा महाउद्रेक, दिवसभरात तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात 27,508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पण कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे.

  • 04 Apr 2021 08:38 PM (IST)

    हिंगोलीत संचारबंदीला उद्यापासून थोड्या प्रमाणात शिथिलता

    हिंगोली : संचारबंदीला उद्या पासून थोड्या प्रमाणात शिथिलता

    सकाळी 10 ते 03 या वेळात भाजीपाला, फळे, मच्छि मटण,दारू, सह उर्वरीत व्यापार राहणार सुरू

    सकाळी 10 ते सायंकाळी 07 या वेळेत कृषी निगडित सर्व व्यवहार राहणार सुरू

    नागरिकांसाठी 11 ते सायंकाळी 05 पर्यँत बँकेचे व्यवहार राहणार सुरू

    दुकान उघडन्यासाठी rtpcr चाचणी केलेल्याचा अहवाल निघेटिव्ह असल्याच प्रमाणापत्र बंधनकारक..

    लग्न समारंभासाठी फक्त 50 जनांनाच परवानगी तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी असेल

    चित्रपट, शाळा/ महाविद्यालय,मंगल कार्यालय ,धार्मिक स्थळे सह इतर उघडण्यास परवानगी नसेल

    रेस्टॉरंट, हॉटेल,बियरबार ,वाईन बार फक्त पार्सल सुविधा सुरू..

  • 04 Apr 2021 08:32 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 6 हजार 225 नवे रुग्ण, 41 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात नवे ६ हजार ६२५ कोरोनाबाधित! पुणे शहरात आज नव्याने ६ हजार ६२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ९० हजार ०४४ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ७६२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ४२ हजार ६५२ झाली आहे.

    गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ९०१ !

    पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४१ हजार ९४० रुग्णांपैकी ९०१ रुग्ण गंभीर तर ३,८७६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

    नव्याने ४१ मृत्युंची नोंद !

    पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ४५२ इतकी झाली आहे.

  • 04 Apr 2021 08:26 PM (IST)

    मुंबईत दिवसभरात 11,163 नवे रुग्ण, दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू

    मुंबईत दिवसभरात 11,163 नवे रुग्ण, दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू, तर 5263 रुग्ण बरे, मुंबईत गेल्या 24 तासात 51,319 टेस्ट करण्यात आल्या

  • 04 Apr 2021 08:19 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 27 रुग्णांचा मृत्यू

    नांदेड कोरोना अपडेट : 

    24 तासात सर्वाधीक 27 मृत्यू

    आतापर्यंत एकूण 896 मृत्यू

    24 तासात 1186 पॉझिटिव्ह

    आतापर्यंत एकूण 46669 पॉझिटिव्ह

    सध्या 10891 सक्रिय रुग्ण, तर 165 रुग्ण अत्यवस्थ

  • 04 Apr 2021 08:17 PM (IST)

    कल्याण डोबिंवलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, दिवसभरात तब्बल 1693 रुग्ण

    कल्याण केडीएमसीत आज 1693 रुग्णांची नोंद,

    आज डिस्चार्ज – 981

    आज मृत्यू – 3

    अॅक्टिव्ह – 10308

    एकूण रुग्ण – 84116

    एकूण डिस्चार्ज – 72539

    एकूण मृत्यू –  1269

    मृत्यू दर- 1.50

  • 04 Apr 2021 07:40 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 3382 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : 

    आज नवे कोरोना रुग्ण – 3382 कोरोनामुक्त -1791 मृत्यू -18

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -150928 कोरोनामुक्त -126635 मृत्यू – 2065

  • 04 Apr 2021 07:34 PM (IST)

    भिवंडीत दिवसभरात 151 नवे रुग्ण, तर एकाचा मृत्यू

    भिवंडीत दिवसभरात 151 कोरोनाबाधित तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, भिवंडीत सध्या 1263 सक्रिय रुग्ण

    एकूण रुग्ण – 15964 एकूण मृत्यू – 600 एकूण बरे झाले रुग्ण – 14101

  • 04 Apr 2021 07:30 PM (IST)

    पिंपरी चिंचवड येथील देहूरोडच्या वाईन शॉप्स भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी

    पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनच्या भीतीने मद्यप्रेमीची दारू दुकानात दारूसाठी झुंबड, सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा

    -राज्यात लॉकडाऊन लागणार या भीतीने सध्या मद्यप्रेमींनी देहूरोडच्या वाईन शॉप्स भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र

    -पुणे जिल्ह्यात 6 वाजता संचारबंदी लागू होते. मात्र त्याआधीच मद्यप्रेमीनी दुकानाच्या बाहेर गर्दी

  • 04 Apr 2021 07:27 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू, तर 4110 नवे रुग्ण

    नागपूर : नागपुरात आज पुन्हा कोरोना मृत्यूने गाठला 60 चा आकडा

    आज नागपूर जिल्ह्यात 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    4110 नवीन कोरोना बधितांची नोंद

    तर 3 हजार 497 झाले कोरोनामुक्त

    एकूण रुग्ण संख्या – 241606

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 194908

    एकूण मृत्यू संख्या – 5327

  • 04 Apr 2021 07:26 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 234 नवे रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू

    वाशिम :  जिल्ह्यात आज कोरोनामूळ तीन जणांचा झाला मृत्यू

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 234 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 376 जण झालेत कोरोनामुक्त …

    जिल्ह्यात आज कोरोना बाधित 03 रुग्णाचा मृत्यू….

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 36 जणांचा मृत्यू…

    जिल्ह्यात मागील सात दिवसात आढळले 1706 नवे कोरोना रुग्ण….

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 17195

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2530

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 14472

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 192

  • 04 Apr 2021 07:24 PM (IST)

    हिंगोलीत दिवसभरात 88 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू

    हिंगोली : आज 88 जनांना नव्याने कोरोनाची लागण तर दोन जणांचा मृत्यू

    141 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला,

    हिंगोलीची करोनाबधितांची संख्या पोचली 7 हजार 146 वर,

    त्या पैकी 6 हजार 258 जणांना मिळाला डिस्चार्ज ,

    787 रुग्णांवर उपचार सुरु तर आता पर्यंत 101 रुग्णांचा मृत्यू..

    150 रुग्णांची प्रकृती गंभीर तर 10 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर

  • 04 Apr 2021 07:22 PM (IST)

    सोलापुरात दिवसभरात कोरोनाचा कहर, 872 नवे रुग्ण तर 14 जणांचा मृत्यू

    सोलापुरात आज तब्बल 872 नवीन कोरोनाबाधित रुग्ण तर 14 जणांचा मृत्यू

    शहरात आज 310 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू

    ग्रामीण भागात 562 जणांचे अहवाल पॉसिटीव्ह तर 5 जणांचं मृत्यू

  • 04 Apr 2021 03:11 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, उद्धव ठाकरेंचा दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्र्यांशी आढावा

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्र्यांशी आढावा घेत आहेत.

    मंत्रिमंडळातले सहकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी

  • 04 Apr 2021 03:03 PM (IST)

    लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस पूर्वसूचना द्या : छगन भुजबळ

    नाशिक : लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस नागरिकांना पूर्वसूचना द्यायला हवी असा माझा आग्रह आहे. नागरिकांचे हाल होऊ नयेत तसेच गोंधळ उडू नये यासाठी आधी माहिती द्यायला हवी . अद्याप लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होईल असं सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लोक डॉन पूर्वीची सर्व खबरदारी घेण्यात येईल असे संकेत दिले

  • 04 Apr 2021 02:15 PM (IST)

    पुण्यात व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

    पुण्यात व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

    भोर शहरातील सर्व व्यापाऱ्याना कोरोना टेस्ट सक्तीची नगरपालिकेने सर्व व्यापाऱ्याना दिल्या  नोटीसा

    एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2456 आहे
    उपचार घेत असलेले रुग्ण 149 आहेत
    उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण 2227 आहेत
    स्वॅब तपासलेले नागरिक 15986  आहेत तर तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 80 व्यक्तींचा मृत्यू
    आतापर्यंत 18,307 नागरिकांचे लसीकरण झाले आहे
  • 04 Apr 2021 02:11 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात 249 कंटेन्मेंट झोन, 192 गावात कोरोना रुग्ण

    अमरावती –

    जिल्ह्यात 249 कंटेन्मेंट झोन, 192 गावात कोरोना रुग्ण

    रोज 2600 चाचण्या

    पॉझिटिव्हीटी रेट 92.21 टक्के

    जिल्ह्यातला मृत्यूदर 1.38 टक्क्यांवर

    लसीचा किंवा रेमडेसिव्हीरचा तुटवडा नाही

    रुग्णसंख्या49198 आणि मृत्यू681

  • 04 Apr 2021 12:21 PM (IST)

    व्हेंटीलेटरची कमतरता अजिबात नाही :  किशोरी पेडणेकर 

    रुग्णांनी हा बेड किंवा ते रुग्णालय याची आशा धरु नका. जो बेड किंवा रुग्णालय मिळेल तिथे उपचार घेणे सुरु करावेत. महापालिकेत व्हेंटीलेटरची कमतरता अजिबात नाही :  किशोरी पेडणेकर

  • 04 Apr 2021 12:16 PM (IST)

    मुंबईत अद्याप लॉकडाऊनची काहीही माहिती नाही : किशोरी पेडणेकर

    ज्यांना महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढली पाहिजे असे वाटलं पाहिजे. ते अशाप्रकारे राजकारण करत आहे. मुंबईत अद्याप लॉकडाऊनची काहीही माहिती आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर याबाबत चर्चा होत आहे.

  • 04 Apr 2021 12:12 PM (IST)

    दोन किंवा चार महिन्यात कोरोनाच्या नियमावली पाळायला हवी : किशोरी पेडणेकर 

    लॉकडाऊन कोणालाही नको, जे नियम लावतो आहे, ते पाळणार नसाल. तर मग निर्बंध लावावे लागतील. पण जर रुग्ण वाढत असतील तर करायचं काय? पुढील दोन किंवा चार महिन्यात कोरोनाच्या नियमावली पाळायला हवी – किशोरी पेडणेकर

  • 04 Apr 2021 11:37 AM (IST)

    लवकरच निर्बंध लावण्यात येतील : मंत्री नवाब मलिक 

    अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. अजूनही लोकांबाबत गांभीर्य नाही. लोक विनाकारण गर्द करत आहे. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. हे भाजपला कळलं पाहिजे. त्यामुळे लवकरच निर्बंध लावण्यात येतील : मंत्री नवाब मलिक

  • 04 Apr 2021 11:22 AM (IST)

    मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय घ्यावा लागेल : अस्लम शेख

    गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय घ्यावा लागेल, अस्लम शेख यांचं मोठं विधान

  • 04 Apr 2021 11:19 AM (IST)

    ….तर कठोर निर्बंधलावावे लागतील – अस्लम शेख

    रुग्ण वाढले तर बेड्स कमी पडतील

    आमच्याकडे

    गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्बंध लावावे लागतील

    लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला जे करावे लागेत ते करु

    मुंबईकरांनी नियमांचं पालन करणे गरजेचं

    लॉकडाऊन नको हिच सर्वांची इच्छा

  • 04 Apr 2021 10:59 AM (IST)

    एकाच ठिकाणी दोन लग्न, कल्याणमध्ये गुन्हा दाखल

    कल्याण :

    लग्न समारंभ आयोजन प्रकरणी गुन्हा दाखल

    कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

    एकाच ठिकाणी होते दोन लग्न

    एका मुलीचे वडील माजी नगरसेवक सुनील वायले आणि दुसऱ्या मुलीचे वडील सुरेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    लॉन्स चालक रमेश सिंग विरोधात देखील गुन्हा दाखल

    कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लग्नात झाली होती मोठी गर्दी

  • 04 Apr 2021 10:28 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, कोरोना उपाययोजनांसदर्भात बैठक

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा..

    – कोरोनासंदर्भात पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात..

    – विद्या प्रतिष्ठान सभागृहात कोरोना आढावा बैठक..

    – बारामतीत कोरोनानं घेतलाय रुद्रावतार..

    – कोरोना उपाययोजनांसदर्भात बैठकीत होणार चर्चा…

    – बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष..

  • 04 Apr 2021 10:27 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा तुटवडा,

    उस्मानाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात आणि औषधी दुकानात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा,

    प्रशासनाचे नियोजन कोलमडले

    अनेक रुग्णाना इंजेक्शन मिळत नसल्याने धावपळ

  • 04 Apr 2021 10:24 AM (IST)

    पुणे शहरातील मायक्रो कंन्टेन्मेटं झोनची संख्या 268 वर

    पुणे :  शहरातील मायक्रो कंन्टेन्मेटं झोनची संख्या 268 वर,

    शहरातील हडपसर आणि मुंढवा भागात सर्वाधिक कंन्टेन्मेटं झोन,

    दोन आठवड्यात वाढले 100 कंन्टेन्मेटं झोन,

    पालिकेनं आतापर्यंत 115 इमारती, 117 सोसायट्या व इतर 37 क्षेत्रात कंन्टेन्मेटं झोन घोषित केलेत,

    मायक्रो कंन्टेन्मेटं झोनमधील नागरिकांच्या हालचालींवर येणार मर्यादा,

    नियमांच उल्लंघन केल्यास पालिका करणार कारवाई

    मायक्रो कंन्टेन्मेटं झोन कमी होण्याऐवजी संख्या वाढतीचं

  • 04 Apr 2021 10:20 AM (IST)

    पुणे शहरातील मायक्रो कन्टेन्मेंट झोनची संख्या पोहोचली 268 वर

    पुणे –

    शहरातील मायक्रो कन्टेन्मेंट झोनची संख्या पोहोचली 268 वर,

    – शहरातील हडपसर आणि मुंढवा भागात सर्वाधिक कंन्टेन्मेटं झोन,

    – दोन आठवड्यात वाढले 100 कंन्टेन्मेटं झोन,

    – पालिकेनं आतापर्यंत 115 इमारती,117 सोसायट्या व इतर 37 क्षेत्रात कंन्टेन्मेटं झोन घोषित केलेत,

    – मायक्रो कंन्टेन्मेटं झोनमधील नागरिकांच्या हालचालींवर येणार मर्यादा,

    – नियमांच उल्लंघन केल्यास पालिका करणार कारवाई…..

    – मायक्रो कंन्टेन्मेटं झोन कमी होण्याऐवजी संख्या वाढतीचं ….

  • 04 Apr 2021 09:48 AM (IST)

    नागपूरच्या होप हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून तोडफोड आणि मारहाण, कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर संताप

    नागपूर –

    नागपूरच्या होप हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून तोडफोड आणि मारहाण

    काऊंटर जाळण्याचा सुद्धा केला प्रयत्न

    कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर घडला सगळा प्रकार

    कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर बॉडी देण्यास विलंब होत होता

    हॉस्पिटल सगळी प्रक्रिया करत असताना वेळ झाला त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला

    2 कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर काऊंटर जाळण्याचा प्रयत्न केल्याने उडाली खळबळ

  • 04 Apr 2021 09:46 AM (IST)

    कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तळेगाव येथील आठवडे बाजार बंद

    मावळ,पुणे

    -कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तळेगाव येथील आठवडे बाजार बंद

    -मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तळेगाव मध्ये देखील कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याने आज होणारा तळेगाव येथील आठवडे बाजार राहणार बंद

  • 04 Apr 2021 09:46 AM (IST)

    नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांसाठी नवीन 100 बेडची व्यवस्था

    नागपूर –

    नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांसाठी नवीन 100 बेडची व्यवस्था

    नागपूरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे

    बेड सुद्धा फुल होण्याच्या मार्गावर आहे

    मेडिकल मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांचा सर्वाधिक ताण आहे

    त्यामुळे या ठिकाणी करण्यात आली व्यवस्था

    नागपुरात बेड वाढविण्याची सतत होत होती मागणी

    100 बेड वाढल्याने रुग्णांना मिळणार काहीसा दिलासा

  • 04 Apr 2021 09:45 AM (IST)

    सांगली जिल्हा परिषद तर्फे ”कोरोना मिशन लसीकरण”

    सांगली –

    जिल्हा परिषद तर्फे ”कोरोना मिशन लसीकरण”

    जिल्ह्यात प्रत्येक केंद्रावर 150 जणांना लसी देणार

    सर्वांना सहभागाची सक्ती

    मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी याची माहिती

    सरकारने 45 वर्षा वरील सर्व व्यक्ती ना लस देण्याचे दिले आदेश

    जिल्हा परिषद महसूल विभाग पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याचा सहभाग सक्तीचा

    जिल्हा परिषद कडून लसीकरण चे सूक्ष्म नियोजन

  • 04 Apr 2021 09:37 AM (IST)

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

  • 04 Apr 2021 08:31 AM (IST)

    कोरोनाचा परिणाम, वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीत केवळ 2846 कोटींचे उत्पन्न

    पिंपरी चिंचवड

    – कोरोनाचा परिणाम वर्षभरात महापालिका तिजोरीत केवळ 2846 कोटींचे उत्पन्न

    – मागील वर्षीपेक्षा 307 कोटींनी घटले उत्पन्न

    – 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, बांधकाम परवाना, एलबीटी, जीएसटी, पाणीपट्टी, आकाशचिन्ह परवाना अशा विभागातून केवळ 2846 कोटींचे उत्पन्न महापालिका तिजोरीत झाले जमा

    – 2019-20 आर्थिक वर्षात 3153 कोटी 8 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यातुलनेत यावर्षी 307 कोटी 8 लाखांनी उत्पन्न घटले आहे

    – त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे

  • 04 Apr 2021 08:30 AM (IST)

    पुण्यात लसीकरणासाठी प्रशासनाच्यावतीने ‘मिशन 100डेज’ योजना राबविण्यात येणार

    पुणे –

    – लसीकरणासाठी प्रशासनाच्यावतीने ‘मिशन 100डेज’ योजना राबविण्यात येणार,

    – या माध्यमातून शंभर दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रशासन प्रयन्त,

    – पुण्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता शहरात जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न,

    – यासाठीच आता गणपती मंडळ तसेच सामाजिक संघटना आणि एनजीओची मदत घेतली जाणार,

    – त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना रुग्णालयात नेऊन लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे,

    – सोमवारी एकाच दिवसात तब्बल एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न पुणे प्लॅटफॉर्म पर कोविड रिस्पॉन्सच्या वतीने करण्यात येत आहे.

  • 04 Apr 2021 08:28 AM (IST)

    पुणे शहरातील काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

    पुणे –

    – शहरातील काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

    – शहरात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू हाेऊ लागले आहे.

    – गेल्या चाेवीस तासात पुणे शहरांत ५ हजार ७२० काेराेना बाधित नवीन रुग्ण आढळून आले.

    – तर ३ हजार २९३ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत.

    – शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या चाळीस हजाराच्या जवळ पाेचली आहे.

    – सध्या ३९ हजार ५१८ रुग्ण सक्रीय आहेत. त्यापैकी ८३७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

    – तर ३ हजार ७४३ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे

    – महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांची माहिती.

  • 04 Apr 2021 08:20 AM (IST)

    काटोल-नरखेडमध्येच सर्व सुविधा उपलब्ध करा, कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

    नागपूर –

    नागपूर जिल्ह्यातील काटोल-नरखेडमध्येच सर्व सुविधा उपलब्ध करा

    कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

    लसीकरणाचा वेग वाढविण्याचे दिले निदेश

    सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन

    वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मोठया प्रमाणात बेड व सोबतच ऑक्सीनजची व्यवस्था ही लागणार आहे.

    नागपूर शहरातच मोठया प्रमाणात रुग्ण निघत असल्याने तेथील सुविधांवर अवलंबुन न राहता काटोल व नरखेड मध्येच सर्व सुविधा उपब्दध कराव्यात अश्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

    ते काटोल व नरखेड येथे आयोजीत कोरोना आढावा सभेच्या बैठकीत विडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

    काटोल नरखेड हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदार संघ आहे

  • 04 Apr 2021 08:19 AM (IST)

    अत्यावश्यक काम असेल तरच विद्यापीठात या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कडक निर्बंध

    पुणे –

    – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कडक निर्बंध,

    – अत्यावश्यक काम असेल तरच विद्यापीठात येण्याचं आवाहन,

    – विद्यापीठात लहान सहान कामासाठी विद्यापीठात येऊ नका, शक्य तेवढी कामे ऑनलाईन आणि फोनवरून करून घ्या,

    – विद्यापीठ प्रशासाच्या सूचना

    – पुणे विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय कामानिमित्त पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी येत असतात त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे.

    – शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणलेली असली तरी विद्यापीठात वित्त, परीक्षा विभाग यासह अत्यावश्यक सेवा असलेल्या ठिकाणी १०० टक्के उपस्थिती आहे.

    – त्यातच विद्यापीठाततील काही अधिकारी व कर्मचारीही करोनाबाधित आढळून आले आहेत.

  • 04 Apr 2021 07:11 AM (IST)

    नवी मुंबईत शनिवारी 1,205 नवे करोनाबाधित आढळले

    नवी मुंबईत शनिवारी 1,205 नवे करोनाबाधित

    4 जणांचा मृत्यू झाला

    करोनाबाधितांची संख्या 68 हजार 662 वर

    627 जण करोनामुक्त

    आतापर्यंत 59 हजार 700 जण करोनामुक्त

    एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 1,186 वर

    नेरुळमध्ये सर्वाधिक 189 रुग्ण आढळले आहे.

  • 04 Apr 2021 07:09 AM (IST)

    आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह

    प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गायक मुलगा गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह

  • 04 Apr 2021 07:01 AM (IST)

    मुंबईत शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण आढळून आले

    मुंबईत शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण आढळून आले

    शहरात कोरोनाचे शुक्रवारी 8,832 नवीन रुग्ण

    गेल्या 24 तासांत 27 नवीन मृत्यूंची नोंद

    शहरातील मृतांची संख्याही आतापर्यंत 11,751 पर्यंत पोहोचली

    5,322 रुग्ण बरे झाले असून, एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 366,365 वर पोहोचली

    रुग्ण बरे होण्याचा दर 83% पर्यंत खाली आला

  • 04 Apr 2021 07:00 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासात 49 हजार 447 कोरोनाबाधित रुग्ण सापडले

    राज्यात गेल्या 24 तासात 49 हजार 447 कोरोनाबाधित रुग्ण सापडले

    तर कोरोनाने 277 रुग्णांचा मृत्यू

    राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्क्यांवर

    37 हजार 821 रुग्ण कोरोनातून मुक्त

Published On - Apr 04,2021 11:00 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.