Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात तीन महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

| Updated on: Jun 05, 2021 | 11:16 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात तीन महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
Corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2021 10:48 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 887 नवे कोरोनाबाधित

    सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 887 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 209, आज आढळलेले रुग्ण 2 आज मृत्यू 3 एकूण मृत्यू 13

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 18 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3548 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 10222 वर

    तर उपचार घेणारे 1192 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 109269 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 123049 वर

  • 05 Jun 2021 08:54 PM (IST)

    राज्यात तीन महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    मुंबई : राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. दि. १० मार्च २०२१ रोजी आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.

    • राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • 05 Jun 2021 08:04 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून नव्या नियमावलींची अंमलबजावणी होणार, सलून, स्पा हे 50 टक्के ग्राहकांसह खुली राहणार

    वाशिम :

    वाशिम जिल्हा लेव्हल 3 मध्ये असल्यानं लॉक डाऊनच्या नियमांत सोमवार 7 जून पासून बदल

    जिल्ह्याचा पॉझीटीव्हीटी रेट 5.19 टक्के आणि एकूण ऑक्सीजन बेड 18.90 टक्के भरलेले असल्याने नवीन नियमावलीची सोमवारपासून अमंलबजावणी

    सोमवारपासून सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

    सलून, स्पा हे 50 टक्के ग्राहकांसह खुली राहणार

    जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी काढले आदेश

  • 05 Jun 2021 08:02 PM (IST)

    साताऱ्यात दिवसभरात 1394 नवे कोरोनाबाधित, 27 रुग्णांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट :

    1394 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 27 बाधितांचा मृत्यू

    2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

    आज अखेर सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -844646 एकूण बाधित – 173479 घरी सोडण्यात आलेले -154148 मृत्यू -3828 उपचारार्थ रुग्ण-15490

  • 05 Jun 2021 08:00 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 495 नवे कोरोनाबाधित

    नाशिक :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 898

    आज  पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 495

    नाशिक मनपा- 182 नाशिक ग्रामीण- 295 मालेगाव मनपा- 11 जिल्हा बाह्य- 07

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4917

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -47 नाशिक मनपा- 31 मालेगाव मनपा- 01 नाशिक ग्रामीण- 15 जिल्हा बाह्य- 00

  • 05 Jun 2021 07:11 PM (IST)

    अकोलेकरांना थोडा दिलासा, दिवसभरात 84 नवे कोरोनाबाधित

    अकोल्यात कोरोना अपडेट :

    अकोलेकरांना थोडा दिलासा

    अकोल्यात आज दिवसभरात 84 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत 1101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 52374 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 3036 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 454 जण कोरोना मुक्त झाले आहेत

  • 05 Jun 2021 07:09 PM (IST)

    नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश, सर्व दुकान, आस्थापना 4 वाजेपर्यंत सुरू राहणार : छगन भुजबळ

    नाशिक :

    छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे :

    – नाशिकची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे – नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश – सर्व दुकान, आस्थापना 4 वाजे पर्यंत सुरू राहणार – शनिवार,रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचा विचार – सोमवार पासून नवीन नियमावली लागू होणार – मॉल्स,थेटर्स,नाट्यगृह बंद राहणार – हॉटेल,50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यँत सुरू राहतील,नंतर पार्सल सेवा सुरू होणार – ओपन गार्डन,जॉगिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहणार – गव्हर्नमेंट ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार – लग्न 50 लोक,अंत्यविधी 20 लोक,तसेच मीटिंग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार – बांधकाम 4 वाजे पर्यँत सुरू राहील – निर्बंध कमी करण्यात आपण एक पाऊल पुढे – कोविड रेट 0 वर आला की सर्व सुरू करू – म्युकरमायकोसीस धोका अधिक,औषध मिळत नाही – कॅबिनेट मध्ये ही याबाबत उहापोह झाला – ऑक्सिजन सद्या पुरेसा आहे,इतर सेंटर सुरू करणार आहोत – 3 ऱ्या लाट संदर्भात तयारी सुरू आहे – नाशिक जिल्ह्यात रात्री 12 ते दुपारी 5 पर्यँत जमावबंदी लागू असेल,त्यानंतर 5 ते रात्री 12 पर्यँत संचार बंदी लागू असेल – लवकरच जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदेश काढणार

  • 05 Jun 2021 06:36 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 380 नवे कोरोनाबाधित, 641 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे : ……. – दिवसभरात ३८० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ६४१ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०. – ७०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७१९५७. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५६३. – एकूण मृत्यू -८३७९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५९०१५. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९०९.

  • 05 Jun 2021 05:56 PM (IST)

    वाशिमला दिलासा, दिवसभरात 89 नवे कोरोनाबाधित, 347 जणांना डिस्चार्ज

    वाशिम :

    जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून तीन महिन्यांत पहिल्यांदाच मागील तीन दिवसात दोन अंकी संख्येत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

    जिल्ह्यात आज नवे आढळले 89 रुग्ण तर आज 347  जणांना देण्यात आला डिस्चार्ज तसेच 01 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40528

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 1104

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 38833

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 590

  • 05 Jun 2021 05:23 PM (IST)

    गडचिरोली दोन महिन्यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण, 50 च्या खाली पॉझिटिव्ह आकडा

    गडचिरोली :

    जिल्ह्यात दोन मृत्यूसह 43 कोरोनामुक्त, तर 48 नवीन कोरोनाबाधित

    आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29596 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28316 वर पोहचली. तसेच सद्या 555 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

    आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 725 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

  • 05 Jun 2021 04:41 PM (IST)

    कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज ठेवू नका : विजय वडेट्टीवार

    गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी भागात सुरुवातीपासूनच लसीकरणाला प्रतिसाद नव्हता .आदिवासी समाजात एक मोठा गैरसमज निर्माण झाला होता. लसीकरणाबाबत हे गैरसमज दूर करण्याकरिता प्रशासनाने जनजागृती केली .आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लसीकरणाबाबत आदिवासी समाजाला गैरसमज दूर करण्यासाठी व गडचिरोली वासियांना आव्हान केले की, लसीकरणला प्रतिसाद द्या. लसीकरणाबाबत गैरसमज ठेवू नका. मी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मला कोणतेही बाधा किंवा ताप, नुकसान झालेलं नाही. लस घेतली तरच कोरोनापासून बचाव होणार. तिसरी लाट येण्याआधी लसीकरण पूर्ण करा, असे आव्हान गडचिरोली वासियांना वडेट्टीवार यांनी केलं.

  • 05 Jun 2021 03:26 PM (IST)

    पुण्यात लॉकडाऊन उठवणार का? अजित पवार म्हणतात….

    बारामती :

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    पुणे लॉक डाऊन

    – 10 टक्के पेक्षा जास्त आहे तिथं शिथिलता मिळणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    -पुणे शहर आणि ग्रामीण दोन भाग करायला सांगितले आहे.

    मुंबई कोरोना – मुंबई मोठं शहर आहे – मुख्यमंत्री, महापौर, आयुक्त मिळून निर्णय घेतात – सुरुवातीपासून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतात

    ऑन शिवराज्यभिषेक

    – मी उद्या जिल्हा परिषद पुणे इथे हजेरी लावणार आहे – ग्रामपंचायत जिल्हापरिषदेत उत्साहात साजरा करण्याचे आदेश काढले आहेत ह्या पहिल्यांदा असा सोहळा करणार आहेत -प्रत्त्येकाने नियमांचे पालन करून साजरा करावा.

    ऑन वारी-

    -वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत – दोघांना मान्य मार्ग निघेल असा तोडगा निघाला नाही – सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ते अभ्यास करतील आणि राज्याच्या प्रमुखाकडे प्रस्ताव देतील

    परदेशी लस

    – दर किती आहेत ते आम्ही पाहतो आहे. – 18 ते 44 वयोगटातील सिरम 300 रुपये आणि भारत बायोटेकला 400 दर होते – मी शरद पवारांशी बोललो त्यांनी जाधव याच्याशी बोलायला सांगितले – सिरमचे 50% केंद्रला द्यावं लागतं. राहिलेले 50 टक्के इतरांनाही द्यावं लागतं

    ऑन पर्यावरण दिन

    प्राण वायूचे महत्त्व संगल्यानं कळायला लागलं आहे

    – स्थानिक वातावरणात मिसळणारी झाडे लावली पाहिजेत – मुख्यमंत्राच्या उपस्थित बोलून दाखल की शाळेतील मुलांना मार्क दिली पाहिजेत.

    ऑन बियाणे

    महाबीजचे बियाणे सगळ्याना मिळू शकत नाहीत..

    – शेतकऱ्यांना हे योग्य वाटेल ते बियने घ्यावं – खताच्या बद्दल शरद पवारांनी वरिष्ठांना पत्र लिहल त्या नंतर खताच्या किमती कमी झल्या

    ऑन इथेनॉल

    – व्याजातच कारखाने अडचणीत येतात त्यामुळे इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल – ज्यूस to इथेनॉल करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे आता साखर करायची नाही – ऑन पेट्रोल

    इंधनाचे दर वाढत आहेत म्हणून आम्ही इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि बसेसला प्रोत्साहन देतोय

    – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत

    इलेक्टिक कारचा वापर करावा

  • 05 Jun 2021 12:58 PM (IST)

    कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत, नगरसेवक कुणाल पाटील फाउंडेशनचा उपक्रम

    कल्याण : कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व कल्याणमधील नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी,यांना सुद्धा मदत करण्यात आली आहे

  • 05 Jun 2021 12:58 PM (IST)

    नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊन असताना आस्थापने आणि भाजी विक्री सर्रास सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

    येवला

    – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांच्या मतदार संघातील येवल्यात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

    – विकेंड लॉकडाऊन असताना आस्थापने व भाजी विक्री सर्रास सुरू

    – कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

    – भाजी विक्रेते व ग्राहक विनामास्क खरेदी विक्री करतांना कॅमेऱ्यात कैद

  • 05 Jun 2021 08:41 AM (IST)

    वैद्यकीय सेवा वगळता नाशिकमध्ये शनिवार रविवार पूर्ण बंद

    नाशिक

    – वैद्यकीय सेवा वगळता नाशिकमध्ये शनिवार रविवार राहणार संपूर्णतः बंद – हॉटेल,फूड टॉल्स मध्ये फक्त होम डिलिव्हरी राहणार सुरू – एरवी दुकान, आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यँत राहणार सुरू – नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये अन्यथा,पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यास भाग पडेल – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती

  • 05 Jun 2021 08:39 AM (IST)

    नाशिकसाठी दिलासादायक बातमी, तब्बल 260 गाव कोरोनामुक्त

    नाशिक

    – नाशिक जिल्हावासियांसाठी दिलासादायक बातमी – जिल्ह्यातील तब्बल 260 गाव झाली कोरोनामुक्त – त्यात बागलाण तालुक्यातील सर्वाधिक 81 गावांनी कोरोनावर केली मात – तर अनेक गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर – ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला धीर

  • 05 Jun 2021 08:39 AM (IST)

    नाशिक शहरात आज 23 ठिकाणी लसीकरण

    नाशिक

    – नाशिक शहरात आज 23 ठिकाणी होणार लसीकरण – 21 केंद्रांवर कोविशिल्ड तर 2 केंद्रांवर कोव्हॅकसीन चा दुसरा डोस दिला जाणार – लस घेण्यासंदर्भात झालेल्या जनजागृती नंतर नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

  • 05 Jun 2021 08:38 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोनाचा पॅाझिटिव्ही रेट 1.75 टक्क्यांवर

    नागपूर जिल्हयात कोरोनाचा पॅाझिटीव्हीटी रेट पोहोचला १.७५ टक्क्यांवर

    – पॅाझीटीव्हीटी रेट १.७५ टक्क्यांवर आल्याने मोठा दिलासा

    – जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – नागपूर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर १.८८ टक्क्यांवर

    – नागपूर जिल्हयात सध्या १६३२ कोरोना रुग्ण हॅास्पीटलमध्ये दाखल

  • 05 Jun 2021 06:30 AM (IST)

    सांगलीत जिल्ह्यात काल दिवसभरात 880 कोरोना रुग्ण, म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांतही वाढ

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात काल दिवसभरात 880 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 207, काल आढळलेले रुग्ण 7

    जिल्ह्यात काल कोरोनामुळे 23 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3530 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 10545 वर

    तर उपचार घेणारे 1241 जण आज कोरोना मुक्त

    अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 108087 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 122162 वर

  • 05 Jun 2021 06:29 AM (IST)

    नाशिकच्या इगतपुरीजवळील एक आलिशान हॉटेल सील, ग्रामीण पोलिसांची कारवाई

    नाशिक :

    – कोरोना नियमांचं भंग करून हॉटेल सुरू ठेवल्यामुळे इगतपुरीजवळील एक आलिशान हॉटेल सील – हॉटेल मध्ये असलेल्या 10 मुंबईकरांवर गुन्हे दाखल – नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

  • 05 Jun 2021 06:27 AM (IST)

    मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

  • 05 Jun 2021 06:25 AM (IST)

    राज्यात काल 14,152 नवीन रुग्णांचे निदान,  मृत्यूदर 1.67 टक्के एवढा

    राज्यात काल  14,152 नवीन रुग्णांचे निदान

    राज्यात काल 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा

    राज्यात सद्यस्थितीत एकूण 1,96,894 सक्रिय रुग्ण

    राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,05,565

Published On - Jun 05,2021 10:48 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.