Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात तब्बल 59,907 रुग्णांना कोरोनाची लागण

| Updated on: Apr 07, 2021 | 11:57 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात तब्बल 59,907 रुग्णांना कोरोनाची लागण
corona viएकूणच दम्याची औषधं कोरोनाची लक्षणं कमी करण्यास मदत करत असल्याने दम्याच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.rus

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरां त कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Apr 2021 09:55 PM (IST)

    वसई विरारमध्ये 671 नवे कोरोनाबाधित

    वसई-विरार कोरोना अपडेट

    वसई विरार महापालिकेत क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच, गेल्या 24 तासात 671 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, आज दिवसभरात एकही मृत्यू नाही, तर 264 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या – 36,627

    कोरोना मुक्त झालेली रुग्णसंख्या – 31,508

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या –  926

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या –  4193

  • 07 Apr 2021 09:52 PM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात तब्बल 59,907 रुग्णांना कोरोनाची लागण

    राज्यात दिवसभरात 59,907 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 30,296 रुग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण : 31,73,261

    सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या : 5,01,559 आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या : 26,13,627 आतापर्यंत मृत्यू : 56,652

  • 07 Apr 2021 09:24 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 380 नव्या रुग्णांची नोंद, तर 5 जणांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात आज दिवसभरात 380 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1827 वर

    अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 3064 वर

    तर उपचार घेणारे 215 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 48997 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 53888

  • 07 Apr 2021 09:21 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 54 रुग्णांचा मृत्यू, तर 5651 नवे कोरोनाबाधित

    पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ५६५१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४३६१ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ५४ रुग्णांचा मृत्यू. १३ रूग्ण पुण्याबाहेरील. – ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३०५३७२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६०७१. – एकूण मृत्यू -५५६७. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २५३७३४. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६१२०.

  • 07 Apr 2021 09:18 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात दिवसभरात 92 नवे रुग्ण

    जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचे आज 92 रुग्ण आढळले, मुक्ताईनगर तालुक्यात आज 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्हा माहितीपत्रकवरून माहिती

  • 07 Apr 2021 09:16 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 934 रुग्णांची नोंद

    रायगड कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात दिवसभरात 934 नव्या रुगणांची नोंद

    पनवेल महापालिका हद्दीत सर्वाधिक 544 नवीन रुगणांची नोंद (हाँटस्पाँट)

    पनवेल वगळता अयत्र ग्रामिण भागात 390 नवीन रुग्ण

    अलिबाग तालुक्यात आज 76 नवे रुग्ण

    दिवसभरात 4 रुगणाचा मृत्यू

    दिवसाअखेर अॅक्टिव्ह रुगणांची संख्या 6137 वर

    दिवसभरात बरे झालेले रुग्ण 493

    आतापर्यंत कोरोना बळींची संख्या 1797

    आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 69993

    जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या 77927

  • 07 Apr 2021 09:12 PM (IST)

    कल्यामणध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी मेडिकल बाहेर तुफान गर्दी

    कल्याण :  कल्याणच्या आसपास शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा, कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसर जवळील अमय मेडिकलसमोर नागरिकांची एकच गर्दी, मेडिकलमध्ये इंजेक्शनच्या साठा उपलब्ध असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा, मेडिकल परिसरात पोलीस फौजफाटा तैनात

  • 07 Apr 2021 07:32 PM (IST)

    लस घ्या नाहीतर एक हजार दंड भरा, यवतमाळ जिल्हा प्रशासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांना आदेश

    यवतमाळ : वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना येत्या 9 एप्रिलच्या आत लस घेणे बंधनकारक, अन्यथा एक हजार रुपये दंड घेणार, यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे आदेश

  • 07 Apr 2021 06:31 PM (IST)

    रायगड जिल्हायतील अनेक भागात व्यापाऱ्यांचा सरकारच्या निर्णयाला विरोध

    रायगड : जिल्ह्यातून अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. रसायनी-मोहपाडा येथे व्यापाऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन. तर खोपोली येथील व्यापाऱ्यांनी सरकारचा विरोध करुन दुकाने उघडण्याचा इशारा दिला. व्यापाऱ्यांनी खालापुरचे तहसीलदारांकडे निवेदन दिले.

  • 07 Apr 2021 06:26 PM (IST)

    दुकान उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा 9 एप्रिलपासून खुलेआम दुकान उघडणार, व्यापारी संघटनांचा इशारा

    सांगली : सांगलीत व्यापारी संघटना आक्रमक, दुकान उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा 9 एप्रिलपासून खुलेआम दुकान उघडणार, व्यापारी संघटनांचा इशारा,

  • 07 Apr 2021 06:25 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 269 नवे रुग्ण

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 269 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात आज 252 जण झालेत कोरोनामुक्त, जिल्ह्यात आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. मात्र एका महिन्यात 40 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात गेल्या  नऊ दिवसात 2302 नवे कोरोनाबाधित रुग्ण,

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 17791

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2141

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 15453

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 196

  • 07 Apr 2021 06:07 PM (IST)

    बार्शीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड

    बार्शीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन काळाबाजार उघड, होलसेल औषध विक्रेत्याने काळाबाजार आणला समोर, बार्शीतील तुळशीराम रोडवरील शहा हॉस्पिटल येथे असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये चार हजार रुपयाला एक रेमडेसिव्हीर इंजेक्शन, होलसेल विक्रेते राजन ठक्कर यांनी किरकोळ मेडिकल दुकानात प्रिस्क्रिप्शन पाठवून केले स्टिंग ऑपरेशन, ते आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार

  • 07 Apr 2021 05:35 PM (IST)

    सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही : मुख्यमंत्री

    सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिलं आहे. आज मुख्यमंत्री आणि व्यापारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते.

  • 07 Apr 2021 05:31 PM (IST)

    नागपूरात भयानक परिस्थिती, दिवसभरात तब्बल 66 जणांचा मृत्यू

    नागपूर : नागपुरात आज पुन्हा कोरोना मृत्यू संख्येत वाढ, आज नागपुरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 5338 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 3868 जणांनी कोरोनावर मात केली.

    एकूण रुग्ण संख्या – 254221

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 205784

    एकूण मृत्यू संख्या – 5504

  • 07 Apr 2021 04:36 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 125 पैकी 35 लसीकरण केंद्र बंद

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात एकूण 125 लसीकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले होते. त्यापैकी लस कमी असल्याने 35 उपकेंद्र बंद करण्यात आली आहेत. तर 90 केंद्र सुरू आहेत. दररोज जवळपास साडे पाच ते सहा हजार नागरिकांना लस टोचली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

    सद्यस्थितीत उपलब्ध डोस:

    कोविशिल्ड : 4500

    कोव्हाक्सीन : 5360

    आतापर्यंत 84866 जणांचं लसीकरण पूर्ण

    दुसरीकडे किमान 4 ते 5 दिवसात लस मिळण्याची शक्यता

  • 07 Apr 2021 04:31 PM (IST)

    सांगलीत कोरोनाचा हाहा:कार, सहा दिवसात 1858 बाधित

    सांगली जिल्ह्यात गेल्या 6 दिवसात कोरोनाचा कहर, 1858 जण कोरोना पॉजिटिव्ह झाले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 07 Apr 2021 03:59 PM (IST)

    पुण्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमी, आता आर्मीची मदत घेणार

    पुण्यातील कोरोना परिस्थिती जास्त भीषण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होती नीहीयेत. त्यामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील आर्मी रुग्णालयातही कोरोनाबाधितांवर आता उपचार केला जाणार आहे. या रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याबाबत आर्मीकडून आज संध्याकाळपर्यंत प्रतिक्रिया देण्यात येणार आहे.

  • 07 Apr 2021 02:57 PM (IST)

    कुडाळ आठवडा बाजारात लोकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

    सिंधुदुर्ग –

    कुडाळ आठवडा बाजारात लोकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

    नागरीक बेफीकीरपणे बाजारात गर्दी करत असून कोणाच्या तोंडावर मास्क आहे तर काही जनांच्या तोंडावर मास्क नाही अशी परिस्थिती तर सोशल डीस्टन्सचा तर पत्ताचं नाही

    जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना लोक माञ बेफीकीर पणे वागून कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत

    जिल्हाधिका-यानी आठवडा बाजार बंदचे आदेश देऊनही पोलीस प्रशासन व कुडाळ नगरपरिषदेची लोकांच्या गर्दीकडे डोळेझाक

  • 07 Apr 2021 02:37 PM (IST)

    रायगड जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी केला रस्ता रोको

    रायगड जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी केला रस्ता रोको

    आज ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये व्यापा-यांनी दुकाने बदं करण्याच्या विरोधात निदर्शने, निवदने तर रस्ता रोको.

    खालापुर तालुक्यातील रसायनी भागात व्यापा-यांनी सतंप्त होत केला रस्ता रोको.

    काही वेळा नतंर मात्र पोलीसांनी कारवाई केल्याने रस्ता मोकळा करण्यात आला.

  • 07 Apr 2021 02:29 PM (IST)

    वैद्यकीय सेवेसाठी लागणारे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

    नागपूर – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची माहिती

    वैद्यकीय सेवेसाठी लागणारे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे

    कुठेही तुटवडा किंवा तक्रार नाही,

    भिलाई स्टील प्लांट कडून मोठ्या प्रमाणात लिक्विड ऑक्सिजनचा एक दिवसा आड पुरवठा होतोय,

    रेमडेसीवर चा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता, आम्ही आज पासून उपजिल्हाधिकारी आणि इत यंत्रणांकडून यासंदर्भात माहिती जाणून घेत आहो.

    खाजगी लॅब मध्ये RTPCR ची तपासणी आम्ही आमच्या चमू कडून करून घेत आहे, डेटा अप्लोडिंग आणि बिलिंग संदर्भातील माहिती घेतली जात आहे, काही ठिकाणी अपप्रकार घडल्याचं कानावर येत आहे त्याची शहानिशा या निमित्याने करण्याचा आमचा मानस आहे

  • 07 Apr 2021 01:26 PM (IST)

    रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात, 450 मजुरांना रोजगार

    औरंगाबाद : कोरोनाचा महामारीमुळे अनेक मजुरांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. परिणामी अनेक मजुरांना आपल्या गावाचा रस्ता धरावा लागला आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील धानोरा गावाने या मजुरांसाठी एक आदर्श घालून दिला. गावी परतलेल्या शेकडो मजुरांसाठी धानोरा ग्रामपंचायतने तातडीने रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास साडेचारशे मजुरांना रोजगार मिळाला आहे.

  • 07 Apr 2021 12:04 PM (IST)

    कोल्हापुरात जिल्हा बंदीचा आदेश अखेर मागे

    कोल्हापूर – अखेर जिल्हा बंदीचा आदेश मागे

    जिल्हा प्रशासनाचा 24 तासात निर्णय मागे

    परजिल्ह्यातील किंवा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना कुठलीही बंधन नसणार

    नागरिकांना त्रास होणार असल्याने निर्णय मागे

  • 07 Apr 2021 11:30 AM (IST)

    मुंबईत लस संपत आली आहे हे खरं आहे, महापौरांची कबुली

    मुंबईत लस संपत आली आहे हे खरं आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

    मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा आहे. आरोग्यमंत्री यांनी लसीसाठी केंद्रकडे मागणी केली आहे. दुसऱ्या डोसला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.

    केवळ तीन दिवस पुरेल एवढचा कोरोना लसीचा साठा – महापौर किशोरी पेडणेकर

    व्यापाऱ्यांनी राजकारणाला बळी पडू नये – महापौर किशोरी पेडणेकर

  • 07 Apr 2021 11:17 AM (IST)

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून कोरोनाची तपासणी

    सोलापूर– जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून कोरोनाची तपासणी

    शासनाने ऑनलाइन निवेदन देण्याच्या सूचना दिल्यानंतर सुद्धा अनेकजण निवेदन देण्यासाठी करताहेत गर्दी

    गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे रॅपिड टेस्ट करण्यात येणार

  • 07 Apr 2021 11:16 AM (IST)

    रत्नागिरीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार

    रत्नागिरी- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद

    प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापारी नाराज

    जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व्यापारी करणार ११ वाजता आंदोलोन

    मिनी लाॅक डाऊनबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम

  • 07 Apr 2021 11:15 AM (IST)

    राज्यात लसींचा तूट, नितीन राऊतांची नितीन गडकरींसोबत चर्चा

    मंत्री नितीन राऊत

    राज्यात लसींचा तुटवडा असल्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बोललो आहे, तूट भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

    रेमेडीसिव्हीरचा काळाबाजार सुरू आहे त्यावर कारवाई सुरू आहे

    मागील वेळेसारखी वाढीव बिलं येऊ नयेत यासाठी यावेळी ग्राहकांनी मीटरचा फोटो काढून पाठवावा जेणेकरून जितका वापर तितकंच बिल येईल

    वीज बिल कमी करणं हा ऊर्जा खात्याचा विषय नसून राज्य सरकारचा विषय आहे

  • 07 Apr 2021 11:13 AM (IST)

    नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर, संभाजी स्टेडियम कोव्हिडं केअर सेंटरला आयुक्तांची भेट

    नाशिक – शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

    महापालिकेकडून संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम येथे कोव्हिडं केअर सेंटरची उभारणी

    संभाजी स्टेडियम कोव्हिडं केअर सेंटरला आयुक्तांची भेट

  • 07 Apr 2021 11:10 AM (IST)

    नाशकात संभाजी स्टेडियम कोव्हिड केअर सेंटरला आयुक्तांची भेट

    नाशिक – शहर आणि जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरूच

    महापालिकेकडून संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम येथे कोव्हिडं केअर सेंटरची उभारणी

    संभाजी स्टेडियम कोव्हिड केअर सेंटरला आयुक्तांची भेट

  • 07 Apr 2021 11:02 AM (IST)

    रेमेडीसिव्हीरचा काळाबाजार सुरू आहे त्यावर कारवाई सुरू – नितीन राऊत

    मंत्री नितीन राऊत –

    राज्यात लसींचा तुटवडा असल्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बोललो आहे, तूट भरून निघेल अशी अपेक्षा आहे

    रेमेडीसिव्हीरचा काळाबाजार सुरू आहे त्यावर कारवाई सुरू आहे

    मागील वेळेसारखी वाढीव बिलं येऊ नयेत यासाठी यावेळी ग्राहकांनी मीटरचा फोटो काढून पाठवावा जेणेकरून जितका वापर तितकंच बिल येईल

    वीज बिल कमी करणं हा ऊर्जा खात्याचा विषय नसून राज्य सरकारचा विषय आहे

  • 07 Apr 2021 10:47 AM (IST)

    वसई-विरारमधील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

    – वसई-विरारमधील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

    – वसई नायगाव येथे आज दुपारी 1 वाजता व्यापारी काळ्या फीत बांधून, करणार सरकारचा निषेध

    – विरार पूर्व पश्चिम , नालासोपारा, वसई चे 100 च्या वर व्यापारी महापालिका आयुक्त ची 2 वाजता भेट घेऊन लॉक डाऊन विरोधात करणार निदर्शन

    – काल पासून 31 एप्रिल पर्यंत अचानक अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद केल्याने व्यापारी संभ्रमात

  • 07 Apr 2021 10:15 AM (IST)

    शरद पवारांना घरीच कोरोनाची दुसरी लस

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना घरीच कोरोनाची दुसरी लस घेतली, ट्वीट करत दिली माहिती

    आज सकाळी कोव्हिड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला, डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!

  • 07 Apr 2021 10:12 AM (IST)

    रत्नागिरीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रहाणार बंद

    रत्नागिरी-

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रहाणार बंद

    प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापारी नाराज

    जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व्यापारी करणार ११ वाजता आंदोलोन

    मिनी लाॅक डाऊनबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम

  • 07 Apr 2021 09:23 AM (IST)

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून कोरोनाची तपासणी

    सोलापूर–

    जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून कोरोनाची तपासणी

    शासनाने ऑनलाइन निवेदन देण्याच्या सूचना दिल्यानंतर सुद्धा अनेकजण निवेदन देण्यासाठी करताहेत गर्दी

    गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे रॅपिड टेस्ट करण्यात येणार

  • 07 Apr 2021 08:24 AM (IST)

    नाशकात गेल्या 24 तासात 4638 नव्या रुग्णांची नोंद

    नाशिक –

    कोरोनाचा वाढता आलेख कायम

    गेल्या 24 तासात 4638 नव्या रुग्णांची नोंद तर 3191 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज

    तर आतापर्यंत ची 24 तासातील सर्वाधिक बळी तब्बल 32 जणांचा मृत्यू

    मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली

    नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आव्हान

  • 07 Apr 2021 07:56 AM (IST)

    शहरात कोरोना निर्बंधांचा फज्जा बाजारपेठा सुरुच

    सांगली –

    शहरात कोरोना निर्बंधांचा फज्जा बाजारपेठा सुरुच

    कोरोनाचे नियम कडक जरूर करा

    पण सरसकट बंद नको व्यापारी चा आक्रमक आणि अदोलना चा पवित्रा

    विकेंड लॉक डॉउन ला सहमती

    जिल्हा बंदी करा पण लॉक डॉउन नको व्यापारी केली मागणी

  • 07 Apr 2021 07:56 AM (IST)

    नागपुरात लॅबकडून कोरोना रुग्णांची सरकारी पोर्टलवर माहिती देण्यास टाळाटाळ

    नागपूर –

    – लॅबकडून कोरोना रुग्णांची सरकारी पोर्टलवर माहिती देण्यास टाळाटाळ

    – माहिती मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला अडचणी

    – जिल्हा प्रशासन करणार लॅबची तपासणी

    – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं तीन अधिकाऱ्यांची टीम नियुक्त

    – लॅबमधील भोंगळ कारभारावर लावणार चाप

  • 07 Apr 2021 07:55 AM (IST)

    कोल्हापुरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन मंगल कार्यालयांवर पोलिसांची कारवाई

    कोल्हापूर :

    जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने शहर परिसरात दोन मंगल कार्यालयांवर पोलिसांची कारवाई

    50 पेक्षा अधिक लोक जमवून सुरू असलेल्या कार्यक्रमावर पोलिसांकडून छापा

    दोन मंगल कार्यालयाकडून प्रत्येकी दहा हजाराचा दंड केला वसूल

    आंबेवाडी इथल्या दत्त समर्थ मंगल कार्यालय आणि नागदेववाडी इथल्या वसंत हरी हॉल मालकांवर गुन्हा दाखल

  • 07 Apr 2021 07:53 AM (IST)

    पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार, लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय

    पुणे –

    – पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार,

    – लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय,

    – त्यामुळे एकूण लसीकरण केंद्रांची संख्या दोनशेच्या आसपास जाणार आहेत.

    – जिल्ह्यात दररोज एक लाख नागरीकांना लस देण्याचा संकल्प पुणे विभागाने केला आहे,

    – त्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत आलीय,

    – दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 86 केंद्रांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता.

    – या सर्व केंद्रांना केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार आहे.

    – सध्या शहरात 109 केंद्रांवर लसीकरण केलं जातय.

    – महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांची माहिती

  • 07 Apr 2021 07:53 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज 1337 रुग्णांची नव्याने भर

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात आज 1337 रुग्णांची नव्याने भर

    कोरोना बधितांचा आकडा पोचला 91266 वर

    तर आजपर्यंत 1844 रुग्णांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

    सध्या रुग्णालयात 15117 रुग्णांवर उपचार सुरू

  • 07 Apr 2021 07:50 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा

    सांगली –

    जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा

    फक्त एक दिवस पुरेल इतकाच शिलक आहे साठा

    रेमडेसिव्हर ची ही कमतरता

    राज्य शासनाकडे जिल्हाआरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करूनही पुरेसा पुरवठा नाही केला

    जिल्हा आरोग्य यंत्रणा झाली हतबल

    मंत्री, जिल्हा आणि पोलिस प्रशासन याचे दुर्लक्ष

    लॉक डाऊन करूनही लोक ऐकायला तयार नाहीत व्यापारी आंदोलन च्या तयारीत

    लस तातडीने न आलेस कोरोना चा उद्रेक होणेची भीती

    जिल्ह्यात कोरोनाचे स्थिती बिगडत चालली आहे

    मंत्री अधिकारी येतात बैठका घेतात सूचना देतात आणि निघुन जातात

    मंत्र्यांनी गंभीरपणेलक्ष घालणे ची मागणी होत आहे

  • 07 Apr 2021 07:48 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३७५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३७५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – २४ तासांत ५४ मृत्यूने पुन्हा वाढवली चिंता

    – जिल्ह्यात २४ तासांत ३३०५ कोरोना मुक्त

    – जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

    – संक्रिय रुग्णसंख्या पोहोचली ४१५०० वर

  • 07 Apr 2021 07:26 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज 1337 रुग्णांची नव्याने भर

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात आज 1337 रुग्णांची नव्याने भर

    कोरोना बधितांचा आकडा पोचला 91266 वर

    तर आजपर्यंत 1844 रुग्णांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

    सध्या रुग्णालयात 15117 रुग्णांवर उपचार सुरू

  • 07 Apr 2021 07:14 AM (IST)

    नागपूर शहरात कोरोनाच्या सुपरस्प्रेडरचं होणार लसीकरण

    – नागपूर शहरात कोरोनाच्या सुपरस्प्रेडरचं होणार लसीकरण

    – नागपूर मनपा करणार ऑटोचालक, डिलीवरी बॉयचे विशेष लसीकरण

    – ८ एप्रिल पासून लसीकर मोहिमला होणार सुरवात

    – लसीकरणाला वेग देण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी मनपाचा महत्त्वाचा निर्णय

    – नागपूरात दर बुधवारी महिलांसाठी विशेष लसीकरणाची सोय

  • 07 Apr 2021 07:08 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात फार्मसीतून रेमडेसवीर विक्रीला अखेर बंदी

    – नागपूर जिल्ह्यात फार्मसीतून रेमडेसवीर विक्रीला अखेर बंदी

    – रेमडेसवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

    – जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी जारी केले आदेश

    – कोवीड रुग्णालय आणि तेथील फार्मसीलाच रेमडेसवीर विक्रीची परवानगी

    – रेमडेसवीरच्या अनियंत्रित वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न

    – अव्वाच्या सव्वा दराने सुरु आहे रेमडेसवीरची विक्री

  • 07 Apr 2021 06:51 AM (IST)

    गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण 

    गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा

  • 07 Apr 2021 06:42 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2020 जणांना कोरोनाची बाधा

    अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठी रुग्णवाढ

    अहमदनगर जिल्ह्यात 2020 जणांना कोरोनाची बाधा

    जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, अकोले तालुक्यात मोठी रुग्णवाढ

    कोरोनाबाधितांच्या आकड्यांसह मृत्यूदरही वाढला

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2904 वर असून

    आज दिवसभरात 156 जण कोरोनामुक्त

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 53508 वर गेलीय.

  • 07 Apr 2021 06:36 AM (IST)

    ठाण्यात गेल्या 24 तासात 1,883 जणांना कोरोना संसर्गाची लागण

    ठाण्यात गेल्या 24 तासात 1,883 जणांना कोरोना संसर्गाची लागण

    कोरोनाग्रस्तांचा आकडा 87,289 वर

    आतापर्यंत एकूण 72,892 रुग्ण कोरोनामुक्त

    ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84 टक्क्यांवर

    12,980 रुग्णांवर उपचार सुरु

  • 07 Apr 2021 06:34 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासात 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

    राज्यात गेल्या 24 तासात 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

    राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,13,354 वर

    297 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    राज्यातील मृत्युदर हा 1.81 टक्के

  • 07 Apr 2021 06:32 AM (IST)

    कडक निर्बंधांना अमरावतीतील व्यापाऱ्याचा विरोध

    अमरावती :

    अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोणाची रुग्ण संख्या वाढल्याने पंधरा दिवसाचा कडक लॉक डाऊन लावण्यात आला होता

    मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी संपूर्ण राज्यासोबत अमरावती जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत

    या कडक निर्बंधाला अमरावती जिल्ह्यातील रेस्टॉरंट बार असोसिएशन, हॉटेल असोसिएशन आणि कपडा व्यापारी असोसिएशनने आणि इतर व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे

Published On - Apr 07,2021 9:55 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.