Corona Cases and Lockdown News LIVE : लसीकरणावरुन महाराष्ट्र सरकार राजकारण करत नाही : राजेश टोपे
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
लसीकरणावरुन महाराष्ट्र सरकार राजकारण करत नाही : राजेश टोपे
“लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे”, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं.
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. https://t.co/8ewkNm216D
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
-
पंढरपुरात बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी लॅब सील
पंढरपूर : बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील करण्यात आली आहे. वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबचे चालक आदमिले आणि उमेश शिंगटे दोघांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
-
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 405 नवे कोरोनाबाधित, पाच रुग्णांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट :
जिल्ह्यात आज दिवसभरात 405 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1832 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 3241 वर
तर उपचार घेणारे 223 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 49220 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 54293 वर
-
नाशिक जिल्ह्यात तब्बल 6508 रुग्णांची वाढ
नाशिक : जिल्ह्यात आज तब्बल 6508 रुग्णांची वाढ
दिवसभरात तब्बल 34 जणांचे मृत्यू
नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याच्या परिस्थितीत
केंद्रीय पथक दोन दिवस नाशिकमध्ये
-
पुण्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ, दिवसभरात तब्बल 7010 नवे रुग्ण
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात उच्चांकी 7010 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज
– करोनाबाधित 43 रुग्णांचा मृत्यू, 16 रूग्ण पुण्याबाहेरील
– 999 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,12,382
-ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 48939
– एकूण मृत्यू – 5610
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 257833
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 23595
-
-
पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 2351 नवे रुग्ण
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
दिवसभरात नवे कोरोना रुग्ण -2351
आज दिवसभरात कोरोनामुक्त रुग्ण -1453
आज दिवसभरात एकूण मृत्यू -21
आतापर्यंत कोरोना रुग्ण -161119
आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण -133839
आतापर्यंत एकूण मृत्यू -2122
-
राज्यात कोरोनाता उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 56 हजार 286 नवे रुग्ण, तर 376 जणांचा मृत्यू
राज्यात आज दिवसभरात तब्बल 56 हजार 286 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 376 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात आज 36 हजार 130 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
-
देशात खरंच लॉकडाऊनची गरज आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी देशात खरंच लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे का? या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी संपर्ण देशात आता लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असं स्पष्ट केलं.
-
‘कोरोना लढ्यात राजकारण नको, अशी समज सर्वांना द्या’, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींना विनंती
मुंबई : कोविड लढ्यात राजकारण आणू नका म्हणून सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
पूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
-
निफाडमध्ये दिवसभरात 255 नवे कोरोनाबाधित रुग्ण
निफाड तालुका कोरोना अपडेट :
नविन कोरोनाबाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 255
आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 223
निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 8451
आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 6187
सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2041
-
कल्याण डोंबिवलीत दिवसभरात 1224 नवे रुग्ण, तर 4 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज १२२४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत. आजच्या या १२२४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८९,७५८ झाली आहे. यामध्ये १२,३६९ रुग्ण उपचार घेत असून ७६,१०७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. .
-
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 668 नवे रुग्ण, तर 9 जणांचा मृत्यू
चंद्रपूर : गेल्या 24 तासात 668 नव्या रुग्णांची नोंद, तर 9 जणांचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 31168
एकूण कोरोनामुक्त : 26918
ऍक्टिव्ह रुग्ण : 3794
एकूण मृत्यू : 456
एकूण नमूने तपासणी : 291853
-
हिंगोलीत दिवसभरात 255 नवे कोरोनाबाधित
हिंगोली : आज 255 जनांना नव्याने कोरोनाची लागण तर सहा जणांचा मृत्यू
192 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला
हिंगोलीची करोनाबधितांची संख्या पोचली 7 हजार 986 वर,
त्यापैकी 6 हजार 881 जणांना मिळाला डिस्चार्ज ,
993 रुग्णांवर उपचार सुरु तर आता पर्यंत 112 रुग्णांचा मृत्यू
180 रुग्णांची प्रकृती गंभीर तर 25 रुग्णांची अतिगंभीर
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु, कोरोना परिस्थितीचा आढावा सुरु
-
जालना जिल्ह्यात दिवसभरात 619 नवे कोरोनाबाधित रुग्ण
जालना : जिल्ह्यात आज नवीन 619 कोरोना रुग्णांची भर, कोरोनामुळे आज सहा रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत कोरोनामुळे 552 रुग्णांचा मृत्यू, तर आज दिवसभरात 395 रुग्ण बरे, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 30 हजार 680 वर, आतापर्यंत 24 हजार 175 रुग्णांना डिस्चार्ज, सध्या 5 हजार 956 रुग्णांवर उपचार सुरु
-
राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही, त्यावर राज्याचा एकही मंत्री बोलत नाही : देवेंद्र फडणवीस
“महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका निर्माण झालीय. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही. ही जबाबदारी तर राज्य सरकारची आहे. पण या विषयावर कुणीच बोलत नाही. हे आधी उपलब्ध करा. मग राजकारण करा”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
-
वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 213 नवे कोरोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू
वाशिम : जिल्ह्यात आज आढळले नवे 213 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज 202 जण झालेत कोरोनामुक्त
जिल्ह्यात आज कोरोना बाधित 03 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात मागील एका महिन्यात 43 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मागील दहा दिवसात आढळले 2515 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 18004
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2149
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 15655
आतापर्यंत एकूण मृत्यू – 199
-
औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णावाहिकेचा स्फोट
औरंगाबाद : औरंगाबादेत रुग्णवाहिकेचा झाला स्फोट, आग लागल्यानंतर काही क्षणात रुग्णवाहिकेचा स्फोट, औरंगाबाद वाळूज मुख्य रस्त्यावर घडली घटना, आगीचं आणि स्फोटाचं कारण अस्पष्ट, रुग्णवाहिकेच्या दुर्घटनेत जीवितहानीबाबत अद्याप माहिती नाही, अग्निशमन दलाच्या जवनाकडून मदत सुरू, कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती रुग्णवाहिका
-
नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य पथक दाखल, कोरोना परिस्थितीवर आढावा बैठक सुरु
नाशिक : केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल, थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात, केंद्रीय पथक घेणार कोरोना परिस्थितीचा आढावा, बैठकीला जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित, नाशिक जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बैठकीत महत्वपूर्ण चर्चा, बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
-
कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा ते देवेंद्र फडणवीसांनी दाखवून द्यावं, आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? : जयंत पाटील
“सांगली जिल्ह्यासाठी आम्हाला 2 लाख 64 हजार लस मिळाल्या होत्या. त्यापैकी 2 लाख 59 हजार लसी आम्ही प्रत्येक प्राथनिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात, जिल्ह्यात लसीकरणाची व्यवस्था केल्या. आता फक्त चार हजार लसी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात जास्त कोरोनाचा फैलाव आहे. महाराष्ट्राची तुलना गुजरातशी होऊच शकत नाही. गुजरातची संख्याही साडेसहा कोटी तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहे. तिथे महाराष्ट्राच्या तुलनेत कमी कोरोनाबाधित आहेत. आम्हाला महाराष्ट्रात लसी हवी आहेत. आमची आरोग्य यंत्रणा व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात लीसकरण करायचं आहे. म्हणून महाराष्ट्रात आम्हाला लवकरात लवकर लसी देण्यात यावेत”, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
“महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लसी कमी पडत आहेत म्हणूनच तर लसी मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी दिल्लीच्या बाजूने न बोलता महाराष्ट्राच्या बाजून बोलावं. त्यांनी लसीची मागणी केली असती तर बरं झालं असतं”, असं जयंत पाटील म्हणाले.
-
पुण्यात 13 फेब्रुवारीला कोरोनाची दुसरी लाट आली, महापालिका आयुक्तांची माहिती
पुणे : 13 फेब्रुवारीला शहरात दुसरी लाट सुरु झाली, 50 दिवसात 1250 रुग्णांची संख्या 46 हजारांवर पोहोचली, वेगाने कोरोनाचा प्रसार होतोय, 6 हजार 500 लोक हॉस्पिटलमध्ये, त्यापैकी 555 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 4000 ऑक्सिजनवर, पॉझिटिव्ह रेट हा जवळपास 28 टक्के, तो कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं. तसेच 21 मार्चला 3500 बेडस, 900 व्हेंटिलेटर, तर 2000 ऑक्सिजन बेड होते. 15 दिवसात यामध्ये दुप्पट वाढ केली, असंही त्यांनी सांगितलं.
-
चंद्रपूर जिल्ह्यात लसीची कमतरता, लससाठी नसल्यामुळे लसीकरण ठप्प
चंद्रपूर : जिल्ह्यात लसीकरण झाले ठप्प
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसींचा साठा पोहोचला नसल्याने केंद्रं होणार बंद
केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा चंद्रपूरच्या लस साठवण केंद्रात शिल्लक
जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लागले लसीकरण बंदचे फलक
लवकरच लसींचा साठा येईल अधिकाऱ्यांनी दिली माहिती
आतापर्यंत दीड लाख लोकांना लस दिली गेल्याच केले स्पष्ट
-
नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा, शिवसेना शिष्टमंडळाने घेतली अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांची भेट
नाशिक – शिवसेनेचं शिष्टमंडळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांच्या भेटीला
शहरात रेमडेसिव्हीरच्या तुटवड्याबाबत भेट घेऊन केली चर्चा
रेमडेसिव्हीर तत्काळ उपलब्ध करून देण्याची शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी
सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांची भेट
-
नाशिकमध्ये अन्न आणिऔषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तपदी डी. एम. भामरे यांची नियुक्ती
नाशिक – अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तपदी डी. एम. भामरे यांची नियुक्ती
अतिरिक्त कार्यभार असलेल्या माधुरी पवार यांनी दिला भामरे यांना चार्ज
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांच्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागातही बदल
ऐन कोरोनाच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा झाल्यानेच बदलाची चर्चा
-
मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी, लोकल पुन्हा बंद होण्याची शक्यता, मंत्री विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान
मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्र सरकार लोकल ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई लोकल कदाचित पुन्हा बंद होऊ शकते. याबाबतचं सूचक विधान मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
लोकल सुरु करावी किंवा बंद करावी का? किंवा मागच्या वेळेस जसा काही निर्बंध घातला होता, त्याबाबतचा विचार केला जाऊ शकतो. आम्ही रेल्वेशी संपर्क केला. रेल्वे प्रशासन त्यावेळी वारंवार नकार देत होते. मात्र, लोकांचा रोजगार बुडत असल्याने आपण लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. आता रेल्वेत गर्दी आहे. याशिवाय संख्याही वाढत आहे. त्यामुळे याबाबत नक्की निर्णय घेतला जाईल.
-
वसईत कडक निर्बंध विरोधात दुकानदारांचं शांततेत आंदोलन
वसई : कडक निर्बंधच्या विरोधात आज वसई, विरार, नालासोपारा येथील हॉटेल व्यावसायिकांनी शांततेत आंदोलन केले. प्रत्येकाने आपापल्या हॉटेल समोर कामगार आणि हॉटेल मालकांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले. सामोसे मे आलू तब रहेगा, जब बनानेवाला जिंदा रहेगा, अब की बार सिर्फ हमे क्यू बेरोजगार, दुनिया को खिलाने वाले, अब भुखे सोएगे, वारे मेरी सरकार अशा आशयाचे फलक हातात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी शांततेत आंदोलन केले.
-
अहमदनगरमध्ये मोठी रुग्णवाढ, जिल्ह्यात 2233 रुग्णांना कोरोनाची लागण
अहमदनगर जिल्ह्यात मोठी रूग्णवाढ, आज सर्वात मोठा आकडा आला समोर, जिल्ह्यातील 2233 जणांना कोरोनाची बाधा, अहमदनगर शहरासह अनेक तालुक्यात मोठी रूग्णवाढ, कर्जत, संगमनेर, अकोले , राहाता , कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढले, अनेक तालुके झाले हाॅटस्पाॅट, जिल्ह्यात 11 हजारापेक्षा जास्त जणांवर उपचार सुरू, प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली
-
नागपुरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा
नागपूर जिल्ह्यात रोज १५०० के २००० रेमडेसवीर इंजेक्शनच तुटवडा, नागपूर जिल्ह्यात ५५०० रेमडेसवीर इंजेक्शनची गरज, रोज ३५०० हजार रेमडेसवीर इंजेक्शनचा होतो पुरवठा, आणखी १५ दिवस चालणार तुटवडा, ड्रग्ज इन्स्पेक्टर सतीश चव्हाण यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती, नागपूरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी मोठी भंटकंती, रुग्ण वाढल्याने इंजेक्शनची मागणी वाढली
-
केंद्र सरकारचं आरोग्य पथक नागपुरात, कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक सुरु
नागपूर : केंद्र सरकारचं आरोग्य पथक नागपूरात दाखल, नागपूरातील कोरोनाच्या विस्फोटक स्थितीचा घेत आहेत आढावा, मनपा आयुक्तांसोबत केंद्रीय आरोग्य पथकाची बैठक सुरु, नागपूरात गेल्या २४ तासांत ५ हजारपेक्षा जास्त रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य पथक घेत आहेत परिस्थितीचा आढावा
-
मला कुणाशी वाद घालायचा नाही, मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण आहोरात्र काम करतोय: राजेश टोपे
डॉ.हर्षवर्धन यांच्याशी बोललो, पवार साहेब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात. त्यामुळे ती दिली जावीत. सातारा, सांगली , पनवेलला लसीकरण बंद पडलं. लसीकरणाची केंद्र वाढवली. या गोष्टी हर्षवर्धन यांना कळवल्या. महाराष्ट्रााला साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का? मला कुणाशी वाद घालायचा नाही. मला कोणाला दोष द्यायचा नाही.
18 ते 45 हा वयोगट जास्त फिरणारा वयोगट आहे. तो जास्त संसर्गित होत आहे. त्यामुळे इतरांना संसर्ग होत आहे. त्यामुळे त्यांना लस देण्यात यावी. हापकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.
केंद्र सरकार मदत करत आहे. पण जशी मदत करायला हवी तशी मदत होत नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता. गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? गुजरातला 1 कोटी लसी दिल्या आणि महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्या.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण करण्यास सांगितलं आहे. मात्र, आम्हाला एका आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी देण्याची मागणी केली. हर्षवर्धन दखल घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.
आपण इतर देशांशी तुलना करतो त्यावेळी दहा लाखच्या पटीत तुलना करतो. दहा लाख हे तुलना करण्याचं परिमाण असेल तर त्या प्रमाणात लसी दिल्या पाहिजेत.
महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. त्यामुळे दहा लाख हा मानांक आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीनं कारभार करत आहोत. चाचणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करतोय. महाराष्ट्र 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन टेस्ट करतो. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात. अँटिजने टेस्ट करुचं नये. मुंबई आणि पुण्यामध्ये टेस्टिंग वाढवलं आहे. दहा लाखांमागं तीन ते चार लाख लोकांचं टेस्टिंग करतोय.
महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय हे सांगितलं जातंय हे चुकीचं आहे. महाराष्ट्राकडे दीड दिवसाचा लसीचा साठा आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते हे चुकीचं आहे. साडे सात लाखाचा स्टॉक वाढवून 17 लाख दिले गेले आहेत. आमची मागणी 40 लाख लसी इतकी आहे.
आरटीपीसीआर 4500 होता तो 500 रुपयांवर आणला. रेमडेसिव्हीरबाबत बैठक घेणार आहोत. आमच्या गरजेप्रमाणं रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. आणि त्याची किंमत 1200 रुपये झाली पाहिजे. काही खासगी दवाखाने रेमडेसिव्हीर गरज नसताना वापरतात. बाबांनो हे पॅनडेमिक आहे नफेखोरीचे दिवस नव्हे, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.
महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत. त्या लसीकरण, रेमडेसिव्हीर, सोयी याची ते माहिती घेणार आहेत. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. इथं विमानतळ आहेत. 50 टक्के शहरीकरण झालेलं राज्य आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करता येणार नाही. आम्हाला जनतेची काळजी आहे त्यामुळे वाद न घालता हात हात घालून केंद्र आणि राज्यानं काम केलं पाहिजे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार रेमडेसिव्हीरच्या कंपन्यांशी बोलत आहेत. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य राज्याचा विषय असला तरी लसीकरण हा केंद्राचा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्रानं आम्हाला आमच्या गतीप्रमाण लस उपलब्ध करुन द्यावी, असं राजेश टोपे म्हणाले. बाहेरच्या राज्यातून लस द्या, अशी मागणी करत आहोत. मालेगावला रात्री बारा वाजता गेलो.
प्रत्येक जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सिजन बसवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत.
-
नांदेड जिल्ह्यात दोन ते अडीच दिवस पुरतील इतका लसीचा साठा
नांदेड :
जिल्ह्यात दोन ते अडीच दिवस पुरतील इतका लसीचा साठा
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली माहिती
जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 38 हजार 530 लसी उपलब्ध
त्यापैकी 1 लाख 95 हजार लोकांना दिलेले आहेत
सध्या 47 ते 50 हजार लशी आता उपलब्ध आहेत
जिल्ह्यातील 51 लसीकरण केंद्रावर दररोज 20 हजार डोजेज दिल्या जातात
-
यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषयी आढावा घेण्यासाठी दिल्ली येथील 2 सदस्यीय केंद्रीय पथक यवतमाळमध्ये दाखल
यवतमाळ –
यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषयी आढावा घेण्यासाठी दिल्ली येथील 2 सदस्यीय केंद्रीय पथक यवतमाळमध्ये दाखल
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरु
दिल्ली येथील डॉ जयंत दास, डॉ देवांग भारती ची ही समिती आहे
राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य संस्थान येथील सदस्य
जिल्ह्यातील कोरोना आढावा घेणारी बैठक सुरू बैठकीत
-
मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटर येथे लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी
– मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटर येथे लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी
– केवळ पाच हजार लसींचा साठा ऊपलब्ध आहे
– आजच लसीकरण होईल एवढाच साठा शिल्लक
– ऊद्या जर स्टाॅक आला नाही तर लसीकरणावर होणार परिणाम
– मुंबईतील बीकेसी कोविड सेंटर हे सगळ्यात मोठं जंबो कोवीड सेंटर आहे
– कोरोना वाढतोय, आधी २०० बेड फिल होते, आत्ता १ हजार बेड फिल झालेयत… त्यामुळे काळजी वाढलीये
– आमचा स्टाफ दोन शिफ्टमधे काम करत आहे.. लसीकरण होत आहे, आज गर्दी वाढली असेल, पण साठा हा आजचा पुरता आहे
– याबाबत वरिष्टांनाही कळवण्यात आलं आहे
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथक वाशिम जिल्ह्यात दाखल
वाशिम :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथक वाशिम जिल्ह्यात झालं दाखल
जिल्ह्यातील चार तालुक्याचा कालपासून घेत आहे आढावा
जिल्हा प्रशासना सोबत हो आहे बैठक
-
योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर महिलेचा मृत्यू
योग्य वेळेत उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने कोव्हिडं पॉझिटिव्ह गरोदर मातेचा नालासोपाऱ्यात मृत्यू झाला असल्याची घटना उघड झाली आहे.
वसई विरार महापालिकेच्या नालासोपाऱ्यातील तुलिंज रुग्णालयात रात्री 10 च्या सुमारास घडली घटना
शेहना शेख अस 26 वर्षीय मृत्यू झालेल्या गोरोदर महिलेचे नाव असून, नालासोपारा गावराईपाडा येथील शुक्ला चाळीत ही महिलां राहत होती.
श्वसनाचा त्रास होत असल्याने गरोदर महिलेला तपासणीसाठी नालासोपा-यांच्या तुलिंज रुग्णालयात आणले होते. त्याठिकाणी तिची तपासणी केली असता कोव्हिडं पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
-
नाशकात न्हावी संघटनेचं सरकार विरोधात आंदोलन
नाशिक –
न्हावी संघटनेचं सरकार विरोधात आंदोलन
सरकारी आदेशाच्या विरोधात घोषणाबाजी करत केले निदर्शने
शासनाने दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
-
कोल्हापूर शहरात फक्त फिरंगाई आणि सदर बाजार या दोनच लसीकरण केंद्रावर कोरोना लस उपलब्ध
कोल्हापूर :
शहरात फक्त फिरंगाई आणि सदर बाजार या दोनच लसीकरण केंद्रावर कोरोना लस उपलब्ध
या दोन्ही ठिकाणी ही मर्यादित स्वरूपातच लस उपलब्ध
नऊ लसीकरण केंद्र बंद झाल्याने सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
लस घेण्यासाठी लोकांची धडपड
लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या आवाहनानंतर हे केंद्रावरील गर्दी हटेना
-
पालघरमध्ये कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची तूफान गर्दी
पालघर
पालघरमध्ये कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची तूफान गर्दी,
लसींचा साठा एक दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याचे समझल्यावर झाली नागरिकांची तुफान गर्दी
पहाटे चार वाजेपासूनच लस घेण्याससाठी नागरिक लसीकरण केंद्रावर
काही वेळ संभ्रमाचे वातावरण पसरले, टोकन घेण्याससाठी नागरिकांची एकच झुंबळ,
सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाला,
गोंधळ शांत करण्याससाठी पोलिसांना पाचारण करावे लागले
-
लसीच्या तुटवड्यामुळे कोल्हापूर शहरातील नऊ केंद्र प्रशासनाने केली बंद
कोल्हापूर
लसीच्या तुटवड्यामुळे कोल्हापूर शहरातील नऊ केंद्र प्रशासनाने केली बंद
केंद्र बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय
लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना जावं लागलं परत
लस घेण्यासाठी दोन दिवसानंतर ेण्याची केंद्रावरील कर्मचार्यांकडून लोकांना सूचना
-
राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी आयुक्तांचे 7 कंपन्यांना आदेश
राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी आयुक्तांचे 7 कंपन्यांना आदेश
अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी 7 कंपन्यांना दिले लेखी आदेश
10 एप्रिल ते 30 एप्रिल व नंतर कशा स्वरूपात इंजेक्शन पुरवठा करायचा याचा प्लॅन आयुक्तांनी दिला
राज्यात 10 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान 36 लाख 40 हजार रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार
जुब्लियंट जेनिरीक्स लिमिटेड , सिपला , डॉ रेड्डी , सन फार्मा, हेट्रो हेल्थ केअर,झायडस हेल्थ व मायलॅन या 7 औषधी कंपन्यांना आदेश
30 एप्रिलच्या पुढे या 7 कंपन्यांना प्रतिदिन 35 हजार प्रमाणे पुरवठा करायचा आदेश
-
रायगड जिल्ह्यात दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लसीकरण साठा उपलब्ध
रायगड
रायगड जिल्ह्यात दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लसीकरण साठा उपलब्ध
जिल्ह्यात एकूण 75 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून या केंद्रांमधून लसीकरण मोहीम सुरु आहे.
जिल्ह्यात एकूण 45 कोविड सुविधा केंद्र सुरू असून 2331 विलगीकरण बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेड 1205 उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 17 व्हेंटिलेटर बेड आहेत.
जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसचे 1,34,200 व कोव्हॅक्सिनचे 15,820 डोस उपलब्ध करून दिले आहेत.
त्यापैकी कोवीशिल्ड 12600 लस शिल्लक आहेत.
कोव्हॅक्सिन 15820 लस प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 9820 तर पनवेल महानगरपालिकेकडे 6000 लस वितरित करण्यात आल्या आहेत.
-
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवीन रुग्ण आढळले
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवीन रुग्ण आढळले आहेत
त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,29,28,574 वर पोहोचली
तर 685 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा 1,66,862 वर पोहोचली
देशात सध्या 9,10,319 सक्रिय रुग्ण
तर 1,18,51,393 जण कोरोनातून मुक्त
-
मुक्ताईनगर तालुक्यात 5 लसीकरण केंद्रा पैकी 2 केंद्रावर लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद
मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यात 5 लसीकरण केंद्रा पैकी 2 केंद्रावर लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद
इतर लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा मुक्ताईनगर 170 लस एक दिवस पुरेल एवढीच लस उपलब्ध
लस नसल्यामुळे कु-हा अंतुर्ली लसीकरण केंद्र बंद पडले
मुक्ताईनगर तालुक्यात काल कोरोनाचे 92 रुग्ण आढळले आहेत तर काल 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तालुक्यात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ग्रामीण भागात होम कोरनटाँईन केलेल्या रुग्णांवर कुठल्याही उपाययोजना नाहीत
-
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4 दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4 दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध
जिल्ह्यात 16 हजार 790 लस उपलब्ध
आजवर 71 हजार 026 जणांना दिला डोस त्यात 62 हजार 233 जणांना पहिला तर 8 हजार 793 जणांना दुसरा डोस
-
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
शहरात फक्त 15 ते 20 हजार लसींचा साठा शिल्लक
दर आठवड्याला 1 लाख लसीच्या डोसची गरज
मात्र मिळतो फक्त 60 हजार लसींचा साठा
दररोज 5 ते 6 हजार डोसेसचे होतेय लसीकरण
दोन दिवसात लस उपलब्ध नाही झाली तर रविवारपासून लसीकरण होणार ठप्प
-
वाढत्या कोरोना संक्रमणामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच आता नागपूर सुधार प्राण्यास कार्यालयात सुद्धा नागरिकांना प्रवेश बंदी
नागपूर –
वाढत्या कोरोना संक्रमणामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच आता नागपूर सुधार प्राण्यास कार्यालयात सुद्धा नागरिकांना प्रवेश बंदी
लिखित अर्ज स्वीकारण्यासाठी ड्रॉप बॉक्स ची करण्यात आली व्यवस्था
शक्यतो इमेल चा वापर करण्याच करण्यात आलं आवाहन
31 एप्रिल पर्यंत असणार प्रवेश बंदी
नागपूर सुधार प्राण्यास मध्ये असते नागरिकांची मोठी वर्दळ
त्यामुळे घेण्यात आला निर्णय
-
पुण्यात व्हेंटिलेटर आणि आयसीयुचा एकही बेड शिल्लक नाही
पुणे –
पुण्यात व्हेंटिलेटर आणि आयसीयुचा एकही बेड शिल्लक नाही
तर फक्त 376 ऑक्सिजन बेड शिल्लक
बेड मिळत नसल्याने पुण्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल
-
औरंगाबाद जिल्ह्यात आज 1407 रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात आज 1407 रुग्णांची नव्याने भर
रुग्णांचा आकडा पोचला 92673 वर
तर काल एका दिवसात 29 रुग्णांचा झाला मृत्यू
मृतांचा आकडा पोचला 1873 वर
सध्या रुग्णालयात 14897 रुग्णांवर उपचार सुरू
-
चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरात कोरोनाचा हाहाकार, सोसायटीत शेकडो रुग्ण
चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरात कोरोनाचा हाहाकार
सोसायटीत शेकडो रुग्ण
गुडअर्थ या एकाच सोसायटीत सापडले २२ रुग्ण
मनपाने संपुर्ण इमारत केली सील
हायकोर्टच्या वकिल चित्रा साळूंखे राहत असलेली इमारतही सील
इमारतीत राहतात ५०६ लोक
आकडा वाढण्याची भीती, सोसायटी सुरू करणार कम्युनिटी किचन
घरकाम करणार्या महिलांना इमारतीत प्रवेशास मनाई
-
लग्नात गर्दी जमविणे आले अंगलट, नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल
बीड:
लग्नात गर्दी जमविणे आले अंगलट
कन्हैय्या हॉटेल मालकासह तिनशे जणांवर गुन्हा दाखल
गुन्ह्यात वधू- वराचाही समावेश
जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दखल
नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल
-
आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथे विवाह समारंभावर घोडेगाव पोलिसांची कारवाई
पुणे
-आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथे विवाह समारंभावर घोडेगाव पोलिसांची कारवाई
-जांभोरी येथील केंगले परिवार आणि अहमदनगर तालुक्यातील शिंगाडे परिवार यांचा शुभ-विवाह होता त्या वेळी 250 ते 300 लोकं जमवून हा विवाह सोहळा करत असताना सोशल डिस्ट्सनसिंग चे पालन न करणे तसेच तोंडावर मास्क न लावले म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल
-आरोपी तुकाराम केंगले यांच्या वर मानवी जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणू संसर्ग पसरण्याची जाणीव असताना सुद्धा 50 पेक्षा अधिक लोक जमवून विवाह सोहळा केला म्हणून भा. द.वी.कलम 188,269 प्रमाणे गुन्हा दाखल
-
लसींचा तुटवडा असल्याकारणाने पनवेल महानगरपालिका लसीकरण कार्यक्रम काही दिवस बंद
पनवेल लसीकरण काही दिवसांकरीता बंद
मनपा क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाच्या तिसरा टप्पा होता सुरु
लसींचा तुटवडा असल्याकारणाने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद
कोव्हॅक्सीन दुसरा डोस काही प्रमाणात उपलब्ध
मात्र ते ही दुसरा डोस 16 एप्रिलपासून देण्यास सुरूवात होणार
महानगरनगरपालिका क्षेत्रात सद्या २१ लसीकरण केंद्र कार्यरत
यामध्ये नऊ शासकीय आणि बारा खाजगी लसीकरण केंद्रा
-
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘वायसीएमएच’मध्ये फक्त कोरोनाबाधितांवर होणार उपचार
पिंपरी-चिंचवड
-आता ‘वायसीएमएच’मध्ये फक्त कोरोनाबाधितांवर होणार उपचार
-शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्व कोरोनाबाधितांना योग्य उपचार आणि बेड्स उपलब्ध असावेत, या हेतूने पिंपरी येथील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आजपासून पूर्णतः कोविड-19 समर्पित
-वायसीएम रुग्णालयास पूर्णतः कोविड-19 समर्पित रुग्णालय करण्यात आले असून येथील सर्व नॉन-कोविड, विना तातडी, ओपीडी सेवा बंद
-
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
शहरात फक्त 15 ते 20 हजार लसींचा साथ शिल्लक
दर आठवड्याला 1 लाख लसीच्या डोसची गरज
मात्र मिळतो फक्त 60 हजार लसींचा साथ
दररोज 5 ते 6 हजार डोसेसचे होतेय लसीकरण
दोन दिवसात लस उपलब्ध नाही झाली तर रविवारपासून लसीकरण होणार ठप्प
-
पुण्यात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाकडून पंचवीस हजार रुपयांचे बाँड लिहून घेणार
पुणे –
– होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाकडून पंचवीस हजार रुपयांचे बाँड लिहून घेतल्यानंतरच त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार,
– होम आयसोलेशनमध्ये असताना काही तरी निमित्त काढून बाहेर पडणार्या कोरोना बाधित रुग्णांना चाप बसविण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करीत,
– क्वांरटांईन काळात बाहेेर आढळून आल्यास त्या रुग्णाकडून पंचवीस हजार रुपये वसुल करण्यासंदर्भात प्रशासन विचार,
– कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरांत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय,
– शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ४५ हजाराच्या घरात पोचली आहे.
– यापैकी सुमारे ३८ हजार ४०१ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-
पुण्यात रेमीडिसीव्हीरच्या चार हजार इंजेक्शनचा साठा शिल्लक
पुणे –
– पुण्यात रेमीडिसीव्हीरच्या चार हजार इंजेक्शनचा साठा शिल्लक
– आज आणखी बारा हजार इंजेक्शन शहरात प्राप्त होणार,
– इंजेक्शनसाठी हेल्पलाईनही सुरू केल्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे चित्र,
– रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती.
-
रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, स्थानिक गुन्हे शाखेने केली चौघांना अटक
नांदेड :
रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड
स्थानिक गुन्हे शाखेने केली चौघांना अटक
अटक केलेल्यात दोन मेडिकल विक्रेते आणि एका एमआरचा समावेश
अकराशे रुपयांचे इंजेक्शन विकत होते आठ हजार रुपयांना
गुन्हा दाखल करत पोलीस घेतायत अन्य साथीदारांचा शोध
-
कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा, पुढचे दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा
पुढचे दोन दिवस पुरेल इतका लसीचा साठा शिल्लक
लस्सी च्या कमतरतेमुळे शहरातील नऊ लसीकरण केंद्र आजपासून होणार बंद
दोनच केंद्रांवर सुरू राहणार लसीकरण
जिल्ह्याच्या आता पर्यंत चार लाखाहून अधिक लोकांच लसीकरण झालाय पूर्ण
साध्य लसीचे 49 हजार डोस शिल्लक
-
कोरोनामुळे नागपूरातील 33 वर्षीय क्रीकेटपटूचा मृत्यू
– कोरोनामुळे नागपूरातील 33 वर्षीय क्रीकेटपटूचा मृत्यू
– दाभा परिसरातील रहिवाशी कुणाल लोणकरचा कोरोनामुळे निधन
– आठवडाभरापासून होता कोरोनामुळे आजारी
– १५ वर्षाखालील विदर्भ संघाचं भूषवलं होतं कर्णधारपद
– नागपूरातील क्रीडा जगतावर शोककळा
-
नागपूर शहरात कोरोनाच्या सुपरस्प्रेडरचं आजपासून लसीकरण
– नागपूर शहरात कोरोनाच्या सुपरस्प्रेडरचं आजपासून लसीकरण
– नागपूर मनपाकडून ऑटोचालक, डिलीवरी बॉयचं विशेष लसीकरण
– आजपासून विशेष लसीकर मोहिमला सुरवात
– शहरातील लसीकरण केंद्रावर मिळणार लस
– ॲाटोचालक, सायकल रिक्षाचालक, टॅक्सीचालकांचं लसीकरण आज
– कोरोना नियंत्रणासाठी मनपाचं महत्त्वाचं पाऊल
– लसीकरण केंद्रावर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंन्स दाखवणं गरजेचं
-
नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 26 कोरोना बाधितांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 970 मृत्यू
नांदेड –
गेल्या 24 तासात 26 कोरोना बाधितांचा मृत्यू
आतापर्यंत नांदेडमध्ये एकूण 970 मृत्यू
गेल्या 24 तासात नव्याने 1255 पॉजिटिव्ह
आतापर्यंत एकूण 50892 जण झाले बाधित
सद्यस्थितीत नांदेडमध्ये 10787 एक्टिव्ह रुग्ण
त्यापैकी 189 रुग्ण गंभीर
-
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 338 नवे कोरोना रुग्ण आढळले
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 338 नवे कोरोना रुग्ण आढळले
3 हजार 668 जण पूर्णपणे कोरोनामुक्त
गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला
नव्या आकडेवारीसह जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 42 हजार 933 वर
-
पुण्यात गेल्या 24 तासात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
पुण्यात गेल्या 24 तासात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
दिवसभरात 4 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त
पुण्यात आज दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
13 जण हे पुण्याबाहेरील
पुण्यात सध्या 4 लाख 60 हजार 71 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
957 जणांची कोरोना स्थिती चिंताजनक
पुण्यात आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण
तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार
मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे
मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के
-
गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले
राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261
-
कल्याण आसपास शहरात रेमिडिसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा
कल्याण –कल्याण आसपास शहरात रेमिडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडाकल्याणच्या अमय मेडिकल समोर नागरिकांची एकच गर्दी
मेडिकल मध्ये इंजेक्शनच्या साठा उपलब्ध असल्याने रुग्णांच्या नाते वाइकांनी लावला लांबच लांब रांगा
मेडिकल परिसरात पोलीस फाटा तैनात
Published On - Apr 08,2021 10:40 PM