Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 954 नवे कोरोनाबाधित, 27 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jun 10, 2021 | 12:09 AM

राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 954 नवे कोरोनाबाधित, 27 रुग्णांचा मृत्यू
corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jun 2021 10:32 PM (IST)

    सांगलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 954 नवे कोरोनाबाधित, 27 रुग्णांचा मृत्यू

    सांगली कोरोना / म्युकर अपडेट :

    जिल्ह्यात आज दिवसभरात 954 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 229 , आज आढळलेले रुग्ण 3, आज मृत्यू 1

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 27 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3649 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9018 वर

    तर उपचार घेणारे 1059 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 113823 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 126490 वर

  • 09 Jun 2021 08:52 PM (IST)

    साताऱ्यात दिवसभरात 872 नवे कोरोनाबाधित

    सातारा कोरोना अपडेट :

    आज 872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू

    2006 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

    आज अखेर सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -881767 एकूण बाधित – 177397 घरी सोडण्यात आलेले -161986 मृत्यू -3940 उपचारार्थ रुग्ण-11467 सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 09 Jun 2021 08:51 PM (IST)

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने खळबळ, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

    पिंपरी चिंचवड :

    -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने खळबळ उडाली होती

    -सुदैवाने दुसरा टॅंक भरलेला असल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे

    -टॅन्कमध्ये टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना हा गॅस लिक झाला होता सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली

    -तातडीने प्रशासनाच्या लक्षात ही बाब येताच, दुसऱ्या टॅंकमधील ऑक्सिजन पाईपलाईन द्वारे रुग्णांना पुरविण्यात आले

    -त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.काहीवेळातच लिकेज बंद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

  • 09 Jun 2021 08:49 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 311 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

    पुणे : – दिवसभरात ३११ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४५६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत २३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८. – ५६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३०३९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३५३९. – एकूण मृत्यू -८४३७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६१०६३. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७५८.

  • 09 Jun 2021 06:51 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 383 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    नाशिक :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 680

    आज  पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 383

    नाशिक मनपा- 115 नाशिक ग्रामीण- 248 मालेगाव मनपा- 11 जिल्हा बाह्य- 09

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 5103

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -72 नाशिक मनपा- 45 मालेगाव मनपा- 04 नाशिक ग्रामीण- 23 जिल्हा बाह्य- 00

  • 09 Jun 2021 06:49 PM (IST)

    हिंगोलीत तीन महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्णसंख्या, दिवसभरात फक्त 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    हिंगोली कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात आज आढळले फक्त 03 रुग्ण

    90 दिवसांनंतर आज सर्वात कमी रुग्ण

    90 दिवसांनंतर हिंगोलीकरांना दिलासादायक बातमी

  • 09 Jun 2021 06:10 PM (IST)

    नागपूरची रुग्णसंख्या घसरली, दिवसभरात 81 नवे कोरोनाबाधित, 322 जणांची कोरोनावर मात

    नागपूर :

    नागपुरात कोरोना रुग्णांची आणि मृत्यू संख्या आजही दिलासा देणारी,

    नागपुरात 81 नवीन कोरोना रुग्णांची नोंद,

    322 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 476088

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 464434

    एकूण मृत्यू संख्या – 8978

  • 09 Jun 2021 05:50 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 83 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात आज नवे आढळले 83 रुग्ण

    तर आज 114 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 02 रुग्णांचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40826

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 812

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39420

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 593

    जिल्ह्यातील 1 जून पासून 9 जून पर्यंत नवे कोरोना रुग्ण, डिस्चार्ज आणि मृत्यू

  • 09 Jun 2021 04:25 PM (IST)

    सोलापूर ग्रामीण भागातील 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    सोलापूर- ग्रामीण भागातील 23 जणांचा कोरोनाने मृत्यू

    तर 485 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

    3199 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

    महानगरपालिका हद्दीत 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर एक जणांचा मृत्यू

  • 09 Jun 2021 03:28 PM (IST)

    इचलकरंजीमध्ये लसीकरणावरुन नगरसेवक-आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ

    इचलकरंजी : शहरातील शहापूर आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्रावर लस देण्यावरून नगरसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये गोंधळ

    नगरसेवकांनी  लस केंद्रावर विकत असल्याचा केला आरोप

    आरोग्य केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला असता दिली उडवाउडवीची उत्तरे

    नगरसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रकार

    लस देण्यासाठी शापूर केंद्रावर नागरिकांनी केली मोठी गर्दी

  • 09 Jun 2021 10:36 AM (IST)

    कोरोनामुळे आतापर्यंत अहमदनगर पालिकेच्या 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    अहमदनगर

    कोरोनामुळे आतापर्यंत पालिकेच्या 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    पहिल्या लाटेत 3 तर दुसऱ्या लाटेत 16 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    मृत्यू झालेल्या पालिकेतील सर्व कर्मचारी फ्रंट लाईन वारीयर

    मृत्यू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यानेचे प्रस्तव पालिका वरिष्ठांना पाठवणार

    तर दोन कर्मचरांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असून उर्वरित प्रस्ताव आठ दिवसात पाठवणार

  • 09 Jun 2021 10:07 AM (IST)

    सांगलीत लॉकडाऊनमुळे डाळींब निर्यातीला मोठा ब्रेक, 2 कोटींची उलाढाल ठप्प

    सांगली –

    लॉकडाऊनमुळे डाळींब निर्यातीला मोठा ब्रेक

    2 कोटींची उलाढाल ठप्प

    आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका

    आधी अवकाळी पाऊस आणि आता लॉक डॉउन

    यामुळे एप्रिल मे मध्ये होणारी युरोपियन राष्ट्रातील निर्यात थांबली

    स्थानिक बाजारपेठ पण बंद परिणामी डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे लाखो रुपयांचा फटका

    निर्यात मधून होणारी करोडो रुपये ची उलाढाल ठप्प

  • 09 Jun 2021 10:06 AM (IST)

    सांगली कोरोनाच्या छायेतही 52 कोटी जीएसटी जमा

    सांगली –

    कोरोनाच्या छायेतही 52 कोटी जीएसटी जमा

    मे 2020 पेक्षा 14 कोटी महसूल अधिक

    लॉकडाऊन मध्येही व्यवसायिक आणि उद्योजक याची चांगली कामगिरी

    मे 2020 मध्ये जिह्यातुन 38 कोटी 42 लाख जीएसटी जमा तर

    मी 2021 मध्ये जिल्ह्यातून 52 कोटी 37 लाख जीएसटी जमा

    यावर्षी 14 कोटी रुपयाची झाली जीएसटी मधून वाढ

    शासनाने विवरण पत्र भरण्येस मुदत वाढ दिली आणि

    व्याजात सवलत दिली तर आणखी जीएसटी जमा होऊ शकतो

    असा अंदाज व्यक्त केला जात आहे

  • 09 Jun 2021 08:34 AM (IST)

    कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 339 बालके अनाथ

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 339 बालके अनाथ

    13 बालकांच्या आई वडिलांचे हरवले छत्र

    तर 326 बालकांच्या आई किंवा वडिलांचे निधन

    तर कोरोनामुळे 265 महिला झाल्या विधवा

    अनाथ बालकांसह विधवा महिलांना शासकीय मदत देण्याचे आदेश

    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठक घेऊन तातडीने मदत देण्याचे दिले आदेश

  • 09 Jun 2021 08:32 AM (IST)

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा विस्फोट, आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    औरंगाबादेत म्युकरमायक्रोसिसचा विस्फोट

    म्युकर मायक्रोसिस मुळे आतापर्यंत तब्बल 100 जणांचा झाला मृत्यू

    तर आतापर्यंत आढळले तब्बल 910 रुग्ण

    आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

    काल दिवसभरात म्युकरमुळे आणखी दोन जणांचा मृत्यू

    तर 15 नव्या रुग्णांची पडली भर

    म्युकर मायक्रोसिसच्या विस्फोटामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली

  • 09 Jun 2021 08:01 AM (IST)

    नाशकात लग्न समारंभाला 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाईचा इशारा

    नाशिक – लग्न समारंभाला 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाईचा इशारा

    आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश

    50 पेक्षा जास्त लोक असल्यास कार्यालय मालकाला 20 हजारांचा दंड

    तर वधू वर कुटुंबाला प्रत्येकी 10 हजारांचा दंड

    संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी

  • 09 Jun 2021 06:40 AM (IST)

    पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

    ठाणे :

    राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने अनेक पर्यटकांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्याचे बेत आखले

    जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील धरणे, तलाव आणि धबधब्यांवर मंगळवार, ८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली

  • 09 Jun 2021 06:40 AM (IST)

    मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात साडेसहा लाखांचा दंड वसूल

    मुंबई :

    विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

    सोमवारी दिवसभरात संपूर्ण मुंबईतून जेमतेम साडेतीन हजार लोकांविरोधात मुखपट्ट्या न लावल्याबद्दल कारवाई करण्यात आली

    दिवसभरात 3,434 नागरिकांकडून 6 लाख 86 हजारांचा दंड वसूल करण्यात आला

  • 09 Jun 2021 06:38 AM (IST)

    निर्बंध शिथिल होऊनही नाशिककरांसमोर प्रवासाची समस्या कायम

    नाशिक :

    राज्य शासनाने निर्बंध शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने दैनंदिन व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत

    राज्य परिवहनची बससेवाही जिल्ह्य़ात सुरू झाली असली तरी शहरात मात्र ती बंदच आहे

  • 09 Jun 2021 06:37 AM (IST)

    नवी मुंबईतील शहरातील आठवडे बाजार हे पूर्णपणे बंद राहणार

    नवी मुंबई महापालिकेचे नवे आदेश

    तीन वेळा नियम मोडल्यास करोनाकाळ संपेपर्यंत दुकान बंद

    उद्याने बंदच राहणार

  • 09 Jun 2021 06:34 AM (IST)

    रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार ‘जम्बो शीतगृह’

    मुंबई –

    रशियातील कोविड प्रतिबंधक स्पुतनिक लसींचा साठा मुंबईला मिळवावा, यासाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न

    यासाठी रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याशी चर्चा सुरू असून जून अखेरीस थोड्या लसी येण्याची शक्यता

    त्यामुळे या लसी साठविण्यासाठी मुंबईत जम्बो शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारण्यात येणार

Published On - Jun 09,2021 6:29 AM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.