Maharashtra Coronavirus LIVE Update : रेमडेसिव्हीर  इंजेक्शनचा काळाबाजार उघड, 2 जणांना घेतले ताब्यात

| Updated on: May 10, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : रेमडेसिव्हीर  इंजेक्शनचा काळाबाजार उघड, 2 जणांना घेतले ताब्यात
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 May 2021 11:23 PM (IST)

    रेमडेसिव्हीर  इंजेक्शनचा काळाबाजार उघड, 2 जणांना घेतले ताब्यात

    यवतमाळ- रेमडेसिव्हीर  इंजेक्शनचा काळाबाजार उघड

    काळाबाजार करणाऱ्या आणखी 2 जणांना घेतले ताब्यात

    यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने पुरवले काळाबाजरी करणाऱ्यांना इंजेक्शन

    नर्सला पोलिसांनी घेतले ताब्यात

    पूनम मेश्राम असे नर्सचे नाव

  • 09 May 2021 11:22 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1341 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1341 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 46 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2648 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16968 वर

    तर उपचार घेणारे 1355 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 71138 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90754 वर

  • 09 May 2021 11:07 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं, खासदार हेमंत पाटील यांची मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानन्तर विशेष अधिवेशन बोलावून तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणवर विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी त्यांनी केली.

  • 09 May 2021 10:07 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 48 हजार 401 नवे कोरोनाबाधित, 572 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात 48 हजार 401 नवे रुग्ण राज्यात आज 60 हजार 226 रुग्णांनी केली कोरोनावर मात आज राज्यात 572 रुग्णांचा मृत्यू

  • 09 May 2021 09:44 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 7 हजार 541 नवे रुग्ण, 11 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त

    पुणे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी

    दिवसभरात 7 हजार 541 नवे कोरोनाबधित रग्ण

    तर एकाच दिवशी 11 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त

    उपचारादरम्यान दिवसभरात 124 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात एकूण 9 लाख 21 हजार 159 जण कोरोनाबधित

  • 09 May 2021 09:43 PM (IST)

    नाशिकमध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी उद्या लसीकरण चालू

    नाशिक – नाशिकमध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी उद्या लसीकरण चालू राहणार

    – शहरात पाच लसीकरण केंद्रांवर दिली जाणार लस

    – ऑनलाईन नोंदणी करून निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर येण्यास परवानगी

    – नोंदणी करून आलेल्या नागरिकांनाच दिली जाणार लस

    – 44 + वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मात्र बंदच राहणार

  • 09 May 2021 09:41 PM (IST)

    मुंबईत कोरोनामुळे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    मुंबई : कोरोनामुळे गेल्या 48 तासात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 113 जवानांचा मृत्यू

    मुंबईत कोरोनामुळे एकूण 8716 पोलीस कर्मचारी संक्रमित

    ऐकूण सक्रिय रुग्ण पोलीस कर्मचारी- 379

  • 09 May 2021 09:04 PM (IST)

    पुण्यात दुसऱ्या लसीसाठी उद्यापासून लसीकरण

    पुण्यात उद्यापासून लसीकरण सुरळीत

    पुण्यात उद्या 111 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार

    तर 6 केंद्रावर 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार

    पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    नोंदणी केलेल्या नागरिकांनाच मिळणार लस

    लसीकरण केंद्रावर गर्दीन करण्याचं आवाहन

    पहिला डोस घेतलाय, दूसरा डोस घ्यायचा आहे अशा व्यक्तींना प्राधान्य

    दुसऱ्या डोससाठी उद्यापासून लसीकरण होणार

  • 09 May 2021 09:02 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात लहान बालकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग

    पुणे : पुणे जिल्ह्यात लहान बालकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग

    तिसऱ्या लाटेआधीचं लहान मुलं संक्रमित व्हायला सुरुवात

    पुणे जिल्ह्यात 1 वर्षाखालील 249 बालकांना कोरोनाची लागण

    जिल्हा आरोग्य विभागाकडं झाली नोंद

    100 पेक्षा अधिक वय असलेल्या 12 व्यक्तींना कोरोनाची लागण

    पुणे जिल्ह्यात बालकांनाही संसर्गाचा धोका अधिक

    लहान मुलांची काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन

  • 09 May 2021 08:42 PM (IST)

    नागपुरात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे सोमवरी लसीकरण नाही

    नागपूर  : 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे  सोमवारी लसीकरण होणार नाही

    18 ते 44 वर्षे वयोगटासाठी 6 केंद्रांवर लसीकरण

    नागपूर शहराकरीता राज्य शासनाकडून लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सोमवारी बंद

    अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

  • 09 May 2021 08:07 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 3002 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट

    दिवसभरात बरे झालेले रुग्ण- 3025

    – दिवसभरात आढळलेले नवे रुग्ण – 3002

    नाशिक मनपा- 1584 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 1220 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा- 0115 नवे रुग्ण

    जिल्हा बाह्य- 0083 नवे रुग्ण

    – नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3865

    – दिवसभरात 40 जणांचा मृत्यू

  • 09 May 2021 08:00 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 74 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 2025 नवे कोरोनाबाधित

    पुणे : – दिवसभरात २०२५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४८२५ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील. – १४०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४४६५६४. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३३७३२. – एकूण मृत्यू -७३५८. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४०५४७४. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३१०७.

  • 09 May 2021 07:57 PM (IST)

    जालना जिल्ह्यात आज कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू

    जालना :

    जालना जिल्ह्यात आज कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू 642 रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले 566 नवीन कोरोना रुग्ण आढळले सर्वात जास्त रुग्ण जालना तालुक्यात आज पर्यंत 45,317 जणांनी केली कोरोनावर मात

  • 09 May 2021 07:55 PM (IST)

    येवला तालुक्यात दिवसभरात 42 नवे रुग्ण

    येवला तालुका कोरोना अपडेट:

    नविन कोरोना बाधित अहवाल आलेले रुग्ण – 42

    शहरी भागातील 1 तर तालुक्यातील ग्रामीण भागातील 41 असे अहवाल पॉझिटिव्ह

    येवला तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 4501

    आजपर्यंत एकूण बरे झालेले – 4099

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 181

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 218

    आजचे डिस्चार्ज – 101

  • 09 May 2021 07:54 PM (IST)

    नागपूरला काहीसा दिलासा, बाधित रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपूर :

    नागपूरला आज सुद्धा काहीसा दिलासा, बाधित रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

    आज नागपुरात 6544 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    3104 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    तर 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 449075

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 386201

    एकूण मृत्यू संख्या – 8142

  • 09 May 2021 07:31 PM (IST)

    वसई विरारमध्ये दिवसभरात 670 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    मागच्या 24 तासात 670 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरात 08 जणांचा मृत्यू

    662 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 60,032

    कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या – 47,337

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या – 1196

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या – 11499

  • 09 May 2021 07:30 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 2020 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 65 जणांचा मृत्यू

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट :

    आज कोरोना रुग्ण -2020 कोरोनामुक्त -2471 मृत्यू -65

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -230223 कोरोनामुक्त -205023 मृत्यू -3339

  • 09 May 2021 07:28 PM (IST)

    सांगलीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणखी 2 दिवसांचा लॉकडाऊन वाढवला

    सांगली : सांगलीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने 2 दिवस लॉकडाऊन वाढवले. 15 तारखेनंतर लॉकडाऊन संपत आहे, त्यानंतर राज्य सरकार जो निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

  • 09 May 2021 07:26 PM (IST)

    कोल्हापुरातील शासकीय बाल संकुलातील 14 मुलींना कोरोनाची लागण

    कोल्हापूर :

    कोल्हापुरातील शासकीय बाल संकुलातील 14 मुलींना कोरोनाची लागण

    दोन कर्मचारी महिलाही बाधित

    6 ते 18 वयोगटातील आहेत बाधित मुली

    एकाच वेळी 14 मुली बाधित आढळल्याने खळबळ

    सर्वांना शिवाजी विद्यापीठातील कोविड केंद्रात हलवलं

    14 मुलींसह दोन कर्मचारी महिलांचीही प्रकृती ठिक, कोणतीही लक्षणं आहेत

  • 09 May 2021 07:25 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 59 रुग्णांचा मृत्यू

    सातारा जिल्ह्यात आज 59 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2,334 नागरिकांचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह तर आज 1,516 जण झाले कोरोनामुक्त

    जिल्ह्यात सध्या 22,815 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    सातारा जिल्ह्यात एकूण 2887 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 97,586 रुग्ण कोरोनामुक्त

  • 09 May 2021 07:04 PM (IST)

    जळगावात पाचोरा रुग्णालयाची रुग्णवाहिका जळून खाक

    जळगाव – पाचोरा रुग्णालयाची रुग्णवाहिका जळून खाक

    रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मोठी दुर्घटना टळली

    नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आटोक्यात आणली आग

  • 09 May 2021 07:02 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 625 नवे कोरोनाबाधित, सात जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 625 आज झालेले मृत्यू – 07 आज बरे झालेले – 574

    तालुका नुसार रुग्ण संख्या

    गोंदिया————–213 तिरोडा————–46 गोरेगाव————–36 आमगाव————–95 सालेकसा————-74 देवरी——————55 सडक अर्जुनी ———–38 अर्जुनी मोरगाव——–70 इतर राज्य————–04

    एकूण रुग्ण – 37036 एकूण मृत्यू – 594 एकूण बरे झालेले – 32326 एकूण उपचार घेत असलेले – 4116

  • 09 May 2021 06:58 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 469 नवे रुग्ण

    वाशिम :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 02 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 469 नवे रुग्ण, तर 448 जणांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 9 दिवसात 38 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 4714 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 4089 कोरोनामुक्त झाले

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 32075

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4496

    आतापर्यंतचे डिस्चार्ज रुग्ण – 27243

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 334

  • 09 May 2021 06:22 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात संचारबंदीत बदल, दूध विक्री केंद्रे सकाळी 7 ते 11 दरम्यान सुरु राहणार

    अमरावती : जिल्ह्यात १५ मेपर्यंत जारी संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात थोडा बदल करणारे शुद्धीपत्रक जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले असून, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ११ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँका अंतर्गत कामांसाठी सुरू राहणार

  • 09 May 2021 06:20 PM (IST)

    सांगली जिल्ह्याला 26 हजार लसींचा डोस मिळाला, लसीकरण पुन्हा सुरु

    सांगली :

    जिल्ह्यासाठी 26 हजार लसींचा डोस आज मिळाला

    उद्यापासून लसीकरण मोहीम सुरू

    लसीचे वाटप मनपा आणि ग्रामीणमधील सर्व केंद्रांना सुरू

  • 09 May 2021 06:19 PM (IST)

    लसीकरणाला घाबरू नका, लस हेच कवचकुंडले, आरोग्यमंत्र्याचं आदिवासी बांधवांना आवाहन

    राज्यातील आदिवासी बांधव लसीकरनाला घाबरत असल्याचं समोर आले होते. त्यामुळे आता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी आदिवासी समाजातील बांधवाना विनंती केली आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, आदिवासी समाजाने लसीकरनाला घाबरू नये आणि लस हेच तुमचे कवच कुंडले आहेत. आणि या महामारीत हे लसीकरण तुम्हला वाचवू शकते, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

  • 09 May 2021 05:40 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 1180 नवे कोरोनाबाधित, 22 रुग्णांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात 1180 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 22 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 71728

    एकूण कोरोनामुक्त : 56599

    ऍक्टिव्ह रुग्ण : 14027

    एकूण मृत्यू : 1102

    एकूण नमूने तपासणी : 412583

  • 09 May 2021 05:27 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात दिवसभरात 1186 नवे कोरोनाबाधित, 23 रुग्णांचा मृत्यू

    अमरावती : -अमरावतीत दिवसभरात 1186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

    -दिवसभरात 23 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू

    -दिवसभरात 934 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 75435 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    -अमरावतीत आतापर्यंत 63847 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    जिल्हात आतापर्यंत 1122 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

    अमरावतीत10466 रुग्णांवर उपचार सुरू

  • 09 May 2021 04:16 PM (IST)

    बोईसरमधील तुंगा कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

    पालघर :

    बोईसरमधील तुंगा कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

    एका रुग्णाचे बिल कमी करण्याचा भाजपच्या कार्यकर्त्याने लावला होता तगादा

    बिल कमी करण्याच्या वादातून रुग्णालय व्यवस्थापकच्या कानशिलात लगावली

    रुग्णालयातील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, गुन्हा दाखल करण्याची मागणी, कर्मचारी वर्ग बोईसर पोलीस ठाण्यात दाखल

    रुग्णालयात 35 रुग्ण उपचार घेत आहेत

  • 09 May 2021 03:33 PM (IST)

    मदतीचे विमानेच्या विमाने येत आहेत, ती कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्र सरकारने करावा : जयंत पाटील

    “मदतीची विमानेच्या विमाने भारतात उतरत आहेत असे दिसत आहे. पण ती मदत कुठे जात आहे. हे कळत नाही. महाराष्ट्रला तर काही मदत मिळाली नाही. याचा खुलासा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

  • 09 May 2021 03:14 PM (IST)

    तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

    “माझा डॉक्टर” म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावे

    या सभेच्या प्रारंभी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.

  • 09 May 2021 03:02 PM (IST)

    परभणी जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सोमवारपासून तीन दिवस सूट

    परभणी :

    परभणी जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सोमवारपासून तीन दिवस सूट

    किराणा दुकान,भाजीपाला, फळ विक्री करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सूट

    दुपारी 2 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत राहणार कडक निर्बंध

    जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे आदेश

  • 09 May 2021 01:53 PM (IST)

    यवतमाळमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड, मृतदेह बदलल्याने संताप

    यवतमाळ- यवतमाळ मध्ये डॉ महेश शाह हॉस्पिटल मध्ये तोडफोड मृतदेह बददल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी केली तोडफोड यवतमाळ येथील ऍड अरुण गजभिये यांचा आज शाह रुग्णालयात मृत्यू झाला त्याच्या मृतदेहा ऐवजी त्याच्या नातेवाईकांना शेळके नामक दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह दिला स्मशानभूमीत गेल्यानंतर सदर ची बाब लक्षात आली त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात केली तोडफोड शाह हॉस्पिटल चा अनागोंदी कारभार पुन्हा उघड या आधी सुद्धा शाह हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली होती डॉ शाह विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे सुरू

  • 09 May 2021 01:36 PM (IST)

    दिल्लीत कोरोनाचा कहर, लॉकडाऊन एका आठवड्यांसाठी वाढवला

    दिल्लीत कोरोनाचा कहर, लॉकडाऊन एका आठवड्यांसाठी वाढवला

    दिल्लीतील लॉकडाऊन 17 मे पर्यंत लागू राहणार

    मेट्रो सेवा बंद राहणार

  • 09 May 2021 01:31 PM (IST)

    पंढरपूरमध्ये कोरोना लसींचा तुटवडा, 1 लाखांची मागणी असताना फक्त 7 हजार लस मिळाल्या

    पंढरपूर: पंढरपूरमध्ये कोरोना लसींचा तुटवडा…. मागणी एक लाख असताना मिळाल्या फक्त सात हजार लसीं, एकाच केंद्रावर सुरू आहे लसीकरण, लसीकरणासाठी नागरिकांची पहाटेपासूनच होतेय गर्दी, लस मिळवण्यासाठी नागरिकांना मारावे लागतायत हेलपाटे…. फक्त पाच हजार लोकाना मिळालाय पहिला डोस तर दोन हजार लोकांना मिळाला दुसरा लोक … जवळपास अजुन नव्वद हजार लोक लसीकरणा पासुन आहेत वंचीत .. दररोज एक हजार डोसचि आहे मागणी मात्र मिळतायत दोनशे डोस …आठवड्यातून चार ते पाच दिवसच सुरु असते लसीकरण केंद्र ..

  • 09 May 2021 01:30 PM (IST)

    सांगली जिल्ह्यातील लसीकरण मोहीम आज बंद, सर्व केंद्रावर शुकशुकाट

    सांगली जिल्ह्यातील लसीकरण मोहीम आज बंद,सर्व केंद्रावर शुकशुकाट

    शुक्रवारी आलेले 10 हजार लसी चे डोस 2 दिवसात संपले आहेत

    जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 98 हजार 386 जनां चे केले लसीकरण केले आहे

  • 09 May 2021 11:32 AM (IST)

    पंढरपूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

    पंढरपूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

    मागणी एक लाख असताना मिळाल्या फक्त सात हजार लसी,

    एकाच केंद्रावर सुरू आहे लसीकरण

    लसीकरणासाठी नागरिकांची पहाटेपासूनच होतेय गर्दी,

    लस मिळवण्यासाठी नागरिकांना मारावे लागतायत हेलपाटे

  • 09 May 2021 11:31 AM (IST)

    नागपुरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी रांगा

    नागपुरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण साठी रांगा

    18 ते 44 च फक्त 9 सेंटर वर होत आहे लसीकरण

    तर 45 वरील नागरिकांचं सगळ्याच केंद्रा वर सुरू आहे लसीकरण

    युवा वर्गाचा मिळतो आहे चांगला प्रतिसाद

    नागपुरात लसीकरणाला मिळत आहे गती

  • 09 May 2021 10:59 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात आजघडीला 266 गावं हायरिस्क कोरोना हॉटस्पॉट

    पुणे जिल्ह्यात आजघडीला 266 गावं हायरिस्क कोरोना हॉटस्पॉट,

    तर जिल्ह्यातील 166 गावात जिल्हाधिकाऱ्यांचे कडक लॉकडाऊनचे स्थानिक प्रशासनाला आदेश

    13 तालूक्यात कोरोनाचा कहर झपाट्याने, तर 106 गावात लॉकडाऊनचे निर्बंध पाळण्याचं आवाहन,

    आंबेगाव, भोर, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, जून्नर आणि खेड तालूक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने,

    प्रत्येक तालूका स्तरावर एका आरोग्य अधिकाऱ्याची केली नेमणूक

    शहराबरोबरचं जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासनाची चिंता वाढली

  • 09 May 2021 10:56 AM (IST)

    सातारा जिल्हयातील 5 दिवसाचा लाॅकडाउन आणखी वाढवला

    सातारा जिल्हयातील 5 दिवसाचा लाॅकडाउन आणखी वाढवला…

    कोरोनाची वाढती संख्या विचारात घेउन 15 मे पर्यन्त लाॅकडाउन वाढवला

    पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

  • 09 May 2021 10:40 AM (IST)

    भिवंडी पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद

    भिवंडी पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद आहेत…

  • 09 May 2021 10:24 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन

    जिल्ह्यातील कोरोनाचा उंचावणारा आलेख खाली आणण्यासाठी 10 ते 15 दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी केली जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा….

    जिल्ह्यात आज रात्री 12 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन….

    सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने,फळविक्रेते,डेअरी,बेकरी,मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने पूर्णपणे बंद राहणार.

    सकाळी 7 ते 11 घरपोच सेवा देता येईल.आंबा वाहतुकीस परवानगी मात्र वाहतुकीदरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन करायला हवं….

    कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी.हॉटेल व रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी सहा ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील.

  • 09 May 2021 09:02 AM (IST)

    साताऱ्यात कोरोनाची भीषण परिस्थिती, रुग्णसंख्येत 7 व्या क्रमांकावर तर मृत्यूदर 4 थ्या स्थानावर

    सातारा जिल्हा राज्यात कोरोना रुग्णसंख्येत 7 व्या क्रमांकावर तर मृत्युदर 4 थ्या स्थानावर…

    सातारा जिल्हयात सध्या 20,448 रुग्ण कोरोना बाधित…

    जिल्हयात आतापर्यन्त 2828 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु…

    सातारा जिल्हयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान

  • 09 May 2021 08:49 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात विकताना तिघांना अटक

    पिंपरी चिंचवड

    -‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात विकताना ‘स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक

    -त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, दोन इंजेक्शन असा 30 हजार 389 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

    – डिलक्स चौक ते काळेवाडीकडे जाणा-या रोडवर डेंटल प्लॅनेट हॉस्पिटल समोर हा प्रकार उघडकीस आला

    -नितीन हरिदास गुंड,सागर काकासाहेब वाघमारे व स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने ऑटोक्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

    -पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई

  • 09 May 2021 08:47 AM (IST)

    सातारा जिल्हा राज्यात कोरोना रुग्णसंख्येत 7 व्या क्रमांकावर, तर मृत्यूदर चौथ्या स्थानावर

    सातारा जिल्हा राज्यात कोरोना रुग्णसंख्येत 7 व्या क्रमांकावर तर मृत्यूदर 4 थ्या स्थानावर…

    सातारा जिल्हयात सध्या 20,448 रुग्ण कोरोना बाधित…

    जिल्हयात आतापर्यन्त 2828 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु…

    सातारा जिल्हयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान

  • 09 May 2021 08:31 AM (IST)

    श्रीगोंदामध्ये विनापरवाना सॅनिटायझर बनवणाऱ्याला केली अटक

    अहमदनगर

    श्रीगोंदामध्ये विनापरवाना सॅनिटायझर बनवणाऱ्याला केली अटक ,

    तब्बल २ लाख १८ हजार ३६७ रुपये किंमतीचे हॅण्ड सॅनिटायझर जप्त,

    श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

    मेडिकल , हॉस्पिटलमध्ये विकत होता सॅनिटायझर,

  • 09 May 2021 08:30 AM (IST)

    नाशकात नियम धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांना भरारी पथकाचा दणका, 24 तासात 1 लाख 70 हजार दंड केला वसूल

    नाशिक – नाशकात नियम धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांना मनपाच्या भरारी पथकाचा दणका कायम – गेल्या 24 तासात 1 लाख 70 हजार दंड केला वसूल – अनेक नागरिकांकडुन होतीये नियमांची पायमल्ली – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज

  • 09 May 2021 08:30 AM (IST)

    औरंगाबादच्या बाजारपेठात तुफान गर्दी, प्रशासनाचा मात्र कानाडोळा

    औरंगाबाद ;-

    औरंगाबादच्या बाजारपेठात तुफान गर्दी

    सिटी चौक बाजारात पहाटेपासूनच नागरिक करतायेत गर्दी

    प्रशासनाचा मात्र याकडे कानाडोळा

    मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यांवर, लॉकडाऊनच्या नियमांना केराची टोपली

    अवैधपणे दुकाने खुली करत व्यवसाय सुरू

    कोरोनाचा उद्रेक होण्याची वेळ तरीही नागरिक बेफिकीर

  • 09 May 2021 07:34 AM (IST)

    नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाची भयावह स्थिती, आठ तालुक्यात व्हेंटिलेटर नाही

    नागपूरच्या ग्रामीणमध्ये कोरोनाची भयावह स्थिती आणि अपुरी यंत्रणा

    – ग्रामीणमध्ये २२ लाख लोकसंख्या आणि केवळ ९४ व्हेंटिलेटर

    – नागपूर ग्रामीणमधील आठ तालुक्यात व्हेंटिलेटर नाही

    – गावा गावात पसरले संक्रमण, चाचण्या कमी, पॅाझीटीव्ह दर ४० टक्क्यांवर

    – नागपूर ग्रामीणमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?

    – ग्रामीणमध्ये गेल्या २४ तासांत ५८७९ आणि पॅाझीटीव्ह १७९७

  • 09 May 2021 07:32 AM (IST)

    कोल्हापुरात लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 22 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

    कोल्हापूर – कोल्हापूरात लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करायला सुरुवात

    पहिल्याच दिवशी 22 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

    अत्यावश्यक सेवेत नसताना दुकान उघडण,वेळेच्या नियमांचं उल्लंघन तसच पार्सल सेवा न देता जागेवरच खाद्यपदार्थ विक्री करण व्यवसायिकांना पडल महागात

    वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या कारवाईच्या सूचना

    वारंवार सूचना करूनही नियमांचे पालन होत नसल्याने आता थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

  • 09 May 2021 07:29 AM (IST)

    नांदेडमध्ये कोरोना लसींचा तुटवडा, दीड लाखांची मागणी असताना फक्त 16 हजार लस प्राप्त

    नांदेड: नांदेडमध्ये कोरोना लसींचा तुटवडा,

    मागणी दीड लाख असताना मिळाल्या फक्त सोळा हजार लसीं,

    400 पैकी अवघ्या बारा केंद्रावर सुरू आहे लसीकरण,

    लसीकरणासाठी नागरिकांची पहाटेपासूनच होतेय गर्दी,

    लस मिळवण्यासाठी नागरिकांना मारावे लागतायत हेलपाटे.

  • 09 May 2021 07:28 AM (IST)

    नाशकात रेमडिसिव्हरचा काळाबाजार सुरूच, 4 हजारांचा इंजेक्शन 24 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक

    नाशिक – रेमडिसिव्हरचा काळाबाजार सुरूच – नाशकात 4 हजारांचा इंजेक्शन 24 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अंबड पोलिसांनी ठोकल्या बेड्या – इंजेक्शन सह होंडा सिटी कार ही पोलिसांनी केली जप्त

  • 09 May 2021 07:27 AM (IST)

    नाशिकमध्ये मृत्यू दर कायम असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली

    – नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी – गेल्या 24 तासातल्या बाधित रुग्णसंख्यत घट, 2795 रुग्ण पॉझिटिव्ह तर 41 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू – रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक,24 तासात 4069 रुग्णांनी कोरोनावर केली मात – मृत्यू दर कायम असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली..

  • 09 May 2021 07:10 AM (IST)

    नागपुरात बधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

    नागपूर ब्रेकिंग –

    गेल्या काही दिवसात नागपुरात बधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली ..

    त्यामुळे काहीसा दिलासा

    गेल्या २४ तासांत नागपुरात ७७९९ रुग्ण झाले कोरोना मुक्त

    ३८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    मात्र २४ तासांत ८१ जणांचा मृत्यू, मृत्यूंच्या संख्येमुळे चिंता कायम

    २४ तासांत २०२३५ जणांच्या चाचण्या

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ५८२४५वर

    काहीसा दिलासा वाटत असला तरी चिंता कायम . प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन

  • 09 May 2021 07:07 AM (IST)

    नागपूर शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे 4 टँकर पोहोचले

    नागपूर –

    नागपूर शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे ४ टँकर पोहोचले

    एकूण १६९ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा

    नागपूर जिल्हयाला आज ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त

    कोरोना प्रतिबंधात्मक २९ हजार लसीची नवीन खेप प्राप्त

  • 09 May 2021 07:03 AM (IST)

    नागपुरात 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरु, 96 केंद्रावर सुविधा

    नागपूर –

    ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे आज ही लसीकरण सुरु राहणार

    १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी आता 9 केन्द्रांवर लसीकरण

    नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाला

    शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल.

    तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी आता 9 केन्द्र सुरु आहेत.

    विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

  • 09 May 2021 06:35 AM (IST)

    पुणेकरांना दिलासा, सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

    पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी

    सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

    शनिवारी दिवसभरात २ हजार ८३७ रुग्ण आढळले

    तर, दिवसभरात ४ हजार ६७३ रूग्ण बरे

    प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३६ हजार ५८६ झालाय

  • 09 May 2021 06:33 AM (IST)

    धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले 105 कोरोना बळी

    बीड जिल्ह्यात काेरोनाच्या वाढत्या रुग्णांसह मृत्यूही वाढ

    मृत्यूंचा आकडा रोखण्यात आरोग्य विभाग आणि प्रशासनाला अपयश

    अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड

    बीड आणि अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद

    तर, आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद

    यावरून १०५ कोरोना बळींचा आकडा दडविल्याचे सिद्ध

  • 09 May 2021 06:31 AM (IST)

    मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे 10 हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती

    कोरोनाचा प्रसार आता मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णसंख्येतही मोठी घट

    मुंबईतील १७८ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी राखीव

    ९,२७९ खाटा रिकाम्या

    तर अतिदक्षता विभागातही आता १६४ खाटा रिक्त

    मुंबईचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची माहिती

  • 09 May 2021 06:29 AM (IST)

    महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 53 हजार 605 नवे रुग्ण, 864 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात दिवसभरात 53 हजार 605 नवे रुग्ण

    काल राज्यात 82 हजार 266 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    काल  राज्यात 864 रुग्णांचा मृत्यू

Published On - May 09,2021 11:50 PM

Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.