Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्याला दिलासा, नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली, दिवसभरात 37,326 नवे कोरोनाबाधित रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
लसीकरणाचं हे राजकारण नाही तर मग काय? मनसे आमदार राजू पाटील यांची टिका
ठाणे : लसीकरणासाठी उद्या ठाणे महापालिकेस 3 हजार डोस प्राप्त झालेले आाहेत. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत केवळ एकच लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार आाहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्व पश्चिमेला शून्य डोस प्राप्त झाले आहेत. एकीकडे राजकारण करु नका, असा सल्ला देतात. मग हे राजकारण नाही तर काय आहे? असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर लगावला आहे.
-
राज्याला दिलासा, नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली, दिवसभरात 37,326 नवे कोरोनाबाधित रुग्ण
राज्याला दिलासा, दिवसभरात 37,326 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 61.607 रुग्णांना डिस्चार्ज, तर दिवसभरात 549 रुग्णांचा मृत्यू
-
-
पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार आणखी कडक
पुणे –
– पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार आणखी कडक
– नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन,
– उद्यापासून दुपारी १२ नंतर रस्त्यावर येणार्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येणार,
– हाय कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांचे कडक कारवाईचे संकेत,
– पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती
-
इचलकरंजीत पोलिसांचा बारवर छापा, चौघांना अटक
इचलकरंजी :
शहरातील बंडगर माळ परिसरातील एका घराजवळ बाबाज बारवर शिवाजीनगर पोलिसांचा छापा
पोलिसांनी देशी-विदेशी दारू केली जप्त, 5800 रुपयांचा माला जप्त
पोलिसांनी कमचिअर्स बार मालकाला घेतले ताब्यात, सुमारे 63 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
शिवाजीनगर पोलिसांनी चार आरोपींना घेतले ताब्यात, पोलिसांची शहरामध्ये धडक कारवाई
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, पीएसआय प्रमोद मगर, कर्मचारी उदय पाटील, रफिक पाथरवट, महेश पाटील, गजानन बरगाले, प्रकाश कांबळे, विजय माळवदे यांनी केली कारवाई
-
पुण्यात दिवसभरात 1165 नवे रुग्ण, 74 जणांचा मृत्यू
पुणे : – दिवसभरात ११६५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४०१० रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील. – १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४४७७२९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०८३६. – एकूण मृत्यू -७४०९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४०९४८४. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११४९९.
-
-
बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द
बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले नवीन आदेश
आता पूर्वीप्रमाणे सकाळी ७ ते ११ सगळी दुकानं सुरू राहणारतर त्यानंतर अत्यावश्यक दुकानं सुरू राहणार
शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे याबनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती
त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊन मागे घेतला
-
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1134 नवे रुग्ण, 64 जणांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
आज कोरोना रुग्ण -1134 कोरोनामुक्त -1965 मृत्यू -64
आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -231357 कोरोनामुक्त -206988 मृत्यू -3378
-
राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार
लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत
कॅबिनेट बैठकीमध्ये अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती कायम
लॉकडाऊन वाढवण्याची मागणी
याआधी lockdown बाबत घेतलेल्या निर्णयात कुठलीही सूट न मिळण्याची शक्यता
आता 15 मे पर्यंत आहे लॉकडाऊन
तो पुढे वाढवण्याचे संकेत
-
अहमदनगरशहरात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये वाढ, आणखी 5 दिवस नगर शहरात कडक निर्बंध
अहमदनगर : नगर शहरात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये वाढ आणखी 5 दिवस नगर शहरात कडक निर्बंध अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार किराणा तसेच भाजी विक्रीही बंद राहणार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहणार
-
लातूरमध्ये रमजान ईदच्या निमित्ताने दोन दिवस खरेदीसाठी सूट, लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता
लातुर जिल्ह्यात 8 मे ते 13 मे असा कडक लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेले आहेत, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेल्या असल्या तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात आली होती, मात्र ईदच्या निमित्ताने 11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत ईदच्या निमित्ताने खरेदी साठी सूट देण्यात आली आहे, किराणा, भाजीपाला, चिकन मटणची दुकाने या वेळेत सुरू राहतील तर फळ विक्रीलाही परवानगी देण्यात आल्याचे आदेश लातुर चे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जारी केले आहेत.
-
सोलापुरात रमजान ईदसाठी शिथिलता, दोन दिवस सकाळी 7 ते 11 पर्यंतच्या लॉकडाऊनला शिथिलता
सोलापूर :
सोलापुरात 11 आणि 12 मे रोजी सकाळी 7 ते 11 पर्यंत लॉकडाऊनला शिथिलता
किराणा सामान ,दूध, व इतर जीवनाश्यक वस्तूची दुकाने उघडी राहणार
रमजान ईदसाठी शहरात शिथिलता, मात्र ग्रामीण भागात शिथिलता नाही
12 मे च्या सकाळी 11 नंतर पुन्हा लॉकडाऊन
भाजीपाला, किराणा, दूध, बेकरी दुकानं बंद दूध आणि खाद्यपदार्थांसाठी घरपोच सेवांना परवानगी वैद्यकीय सेवा सोडून अत्यावश्यक सेवाही बंद
-
वाशिम जिल्ह्यात 9 ते 15 मे 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
वाशिम :
9 ते 15 मे 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंड पूर्णपणे बंद राहतील. या सर्व दुकानांना सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत घरपोच सेवा चालू
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु..
गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण..
15 व्यक्तींच्या उपस्थितीतच लग्नाला परवानगी…
दुध संकलन व घरपोच दुध वितरण सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत करता येईल…
अत्यावश्यक कामासाठी बँका, पोस्ट सुरू,सेतू केंद्र व दस्त नोंदणी बंद…
7 ते 11 या काळात होम डिलिव्हरीसाठी परवानगी बँकांच्या अत्यावश्यक कामासाठी 10 ते 2 ही वेळ निश्चित….
आरोग्य सेवा वगळता घराबाहेर पडल्यास कारवाई होणार…
-
यवतमाळमध्ये 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, 9 मे ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध असणार
यवतमाळ :
यवतमाळमध्ये 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन
9 मे ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध असणार
दूध भाजीपालासाठी सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत असणार उघडे
चौकात भाजीपाला, दूध विक्री करण्यास असणार बंदी
अनावश्यक फिरणाऱ्या विरोधात केली जाणार कडक कारवाई
कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही
सर्व किराणा दुकान, दूध डेयरी, बेकरी खाद्य पदार्थ च दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यत सुरू राहणार
आठवडी बाजार, पारंपरिक भाजी बाजार ठिकाणे पूर्णतः बंद, सोसायटी कॉलनीत जाऊन भाजीपाला विक्रीस मुभा
मंगल कार्यालयात लग्न समारंभ बंदी
सर्व खाजगी शासकीय निमशासकीय कार्यालय बंद, अत्यावश्यक सेवेतील वगळता
विनाकारण फिरणाऱ्यास 200 रु दंड, त्याची कोविड चाचणी केली जाईल, पॉझिटिव्ह निघाल्यास ccc सेन्टरमध्ये रवानगी, त्यासाठी होणारा खर्च वसूल केला जाणार आहे
-
वर्ध्यात कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद ?
वर्धा :
काय सुरू ?
– फक्त वैद्यकीय आस्थापने आणि मेडिकल दुकाने सुरू
घरपोच सेवा
– सकाळी 7 ते सकाळी 11 वाजतापर्यंत घरपोच सेवा देता येणार
– दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजतापर्यंत सुरू असणार
काय बंद ?
– 8 मे ते 13 मेच्या सकाळपर्यंत पाच दिवस कडक लॉकडाउन
– अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी
– किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थ सर्व दुकान बंद राहणार
– लग्न, सोहळा, मंगल कार्यालय, नागरी भागातील पेट्रोल पंप बंद राहणार
– मेडिकल, दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार
-
वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 472 नवे कोरोनाबाधित, सहा जणांचा मृत्यू
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज 06 रुग्णांचा मृत्यू
दिवसभरात 472 नवे रुग्ण
तर 428 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 10 दिवसात 44 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 5186 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 4517 कोरोनामुक्त झाले
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 32546
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4534
आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 27671
आतापर्यंत एकूण मृत्यू – 340
-
कोरोना उपचार सुविधेत मोठी भर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीसह सीएसआर फंडातून उभे झाले कोविड रुग्णालय
चंद्रपूर : कोरोना उपचार सुविधेत मोठी भर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीसह उद्योगांच्या सीएसआर फंडातून उभे झाले कोविड रुग्णालय, चंद्रपुरच्या वन अकादमी परिसरात 115 खाटांचे कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत झाले उभे, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांच्या सेवेत 1400 खाटा आहेत, आता यात 115 खाटांची भर पडली आहे, याच ठिकाणी पुढील काही दिवसात 35 खाटांच्या वेंटिलेटर सुविधाही होणार, सरकार- खाजगी उद्योग आणि दानशूर नागरिक यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात उत्तम सुविधेची निर्मिती
-
चंद्रपूरच्या मेहा गावात संपूर्ण गाव तापाने ग्रासले, आतापर्यंत दहा बाधित, आरोग्य विभागाची दमछाक
चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातील ‘मेहा’ हे पूर्ण गाव तापाने ग्रासले, आरोग्य विभागाचा चमू गावात दाखल, 50 हून अधिक नागरिकांवर तापासाठी करण्यात येत आहे उपचार, अँटिजेन चाचणीत आतापर्यंत दहा नागरिक आढळून आले बाधित, बाधित नागरिकांना सावली तालुका स्थानी व अन्यत्र करण्यात आले विलगीकरण, गावात अजूनही आरोग्य पथकाने नागरिकांच्या स्वास्थ्यावर ठेवली आहे नजर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील गाव असल्याने आरोग्य विभागाची दमछाक
-
मुंबई महापालिकेकडून लसीकरणात पक्षपातीपणा, मुंबईकरांना मोफत लसी मिळाव्या : प्रविण दरेकर
“आम्ही आज मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या लसीकरणाच्या विषयावर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग यांची भेट घेतली. आयुक्तांनी आधी भेट नाकारली होती. कारण राज्य सरकारने अशा प्रकारच्या बैठका न करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मुंबईकरांसाठी मोफत लस मिळाली पाहिजे. मोफत लसी देण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारकडून लसीकरण वेळेत होणार आहे. लसीकरणाबाबत योग्य नियोजन नाही. मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी आमच्या शिष्टमंडळाने केली. आयुक्तांनी अशा प्रकारे काम करण्याचं आश्वासन दिलं. मुंबईकरांना मोफत लसी मिळावी. केंद्राची लस त्याच घटकासाठी वापरली जावी. आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्या मतदारसंघात लसीकरण केंद्र नाही. मुंबई महापालिकेकडून लसीकरणाच्या बाबतीत पक्षपातीपणा सुरु आहे”, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा
खेड (पुणे) :
-पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा.
-ग्रामीण भागातील शेतक-यांची तुफान गर्दी..
-पिक कर्जाचा हप्ता घेण्यासाठी शेतक-यांची तुंबळ गर्दी….
-बँक व्यवस्थापनाकडून कुठल्याच उपाययोजना नाही,राजगुरुनगर येथील PDCC बँकेतील प्रकार
-यावर बँक प्रशासन काळजी घेत आहेत बँके कडून उपाययोजना करणार असल्याचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे
-
लॉकडाऊन असतानाही परवानगीशिवाय कॅम्प भरवल्याने आमदार अधिकाऱ्यांवर संतापले
वर्धा :
– लॉकडाऊन असतानाही बिना परवानगी कॅम्प भरवल्याने आमदार संतप्त
– गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असतानंही नेत्यांच्या उपस्थितीत शाळेत घेतले शिबीर
– कडक निर्बंध असतांना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत कोव्हिड चाचणी घेतल्याने आमदार संतप्त
– आमदाराने मतदारसंघात होणाऱ्या चाचणी शिबिराची माहिती न दिल्याने व्यक्त केली नाराजी
– जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने आमदाराने केली शिवीगाळ
– आमदार रणजित कांबळे यांचा ऑडिओ रेकॉर्ड करत आरोग्य अधिकाऱ्याने केला व्हायरल
– आरोग्य संघटनेचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन
– निवेदन देत कारवाईची मागणी
-
एकीकडे मोदीजींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर
“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी 1/2 https://t.co/ciFSw4xSYX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
-
कल्याण डोंबिवलीतील लसीकरणाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष, भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप
कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरिकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते. मात्र लसीचा साठा उपलब्ध नसल्याने एकच गोंधळाचे वातावरण आहे. यावरुन भाजप आमदार रविंद्र चव्हाण राज्य सरकारसह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एकीकडे राज्य लसीकरणात एकनंबर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून पुरवठा केला जात नाही हे सांगितले जाते. त्यांनी लसीकरण बाबत राज्य सरकारच्या दुर्लक्ष आहे असा आरोप करीत एमएमआर रिजनमध्ये लस उपलब्ध करुन दिली जात नाही याकडे लक्ष वेधले आहे.
-
वांगणीत डॉक्टर यु.एस.गुप्ता याला बेड्या
वांगणी :
अखेर डॉक्टर यु.एस.गुप्ता याला पोलिसांनी केली अटक
99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा केला होता दावा
मास्क न लावता आणि परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतेही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
7 मे ला कुळगांव बदलापूर पोलिस ठाण्यात झाला होता डॉ. गुप्ता विरोधात गुन्हा दाखल
-
चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यावर अँटिजेन टेस्ट, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात
चंद्रपूर : तब्बल सव्वा महिन्याच्या लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच रस्त्यावर अँटिजेन टेस्ट, शहरातील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची सुरू केली अँटीजेन टेस्ट, दिवसभर चालणार 2 ठाण्यांच्या हद्दीत टेस्टची मोहीम, सव्वा महिन्याच्या लॉकडाऊननंतर देखील कोरोना बाधितांच्या सतत वाढीनंतर पोलीस कारवाई झाली गतिमान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये पोलिसांनी दिला इशारा
-
अखेर वांगणीच्या त्या डॉक्टरला अटक
वांगणी –
अखेर डॉक्टर यु.एस.गुप्ताला अटक
99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णांला दोन दिवसात बरे केल्याचा केला होता दावा
मास्क न लावता आणि परवानगी नसतांना कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतेही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर करत होता उपचार
०७ मे ला कुळगांव बदलापूर पोलिस ठाण्यात झाला होता डॉ. गुप्ता विरोधात गुन्हा दाखल
-
नाशकात 12 तारखेपासून शहरात दहा दिवस शहरात राहणार कडक टाळेबंदी
नाशिक –
12 तारखेपासून शहरात पूर्ण टाळेबंदी
दहा दिवस शहरात राहणार कडक टाळेबंदी
12 तारखेला दुपारी 12 वाजे पासून 22 तारखेच्या दुपारी 12 वाजे पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन
सर्व दुकान राहणार बंद
हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार राहणार बंद
कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही
नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती
-
कोरोना रुग्ण स्वतःच्या हाताने करताय ऑक्सिजन लेवल कमी जास्त
अहमदनगर
कोरोना रुग्ण स्वतःच्या हाताने करताय ऑक्सिजन लेवल कमी जास्त
नगरच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
-
कर्नाटकमध्ये आजपासून कडकडीत लॉकडाऊन
बेळगाव
कर्नाटकमध्ये आजपासून कडकडीत लॉकडाऊन
पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू
विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका
अनेक दुचाकीस्वारांना लाठीचा प्रसाद
कर्नाटक पोलीस उतरले रस्त्यावर
बेळगाव सह सीमा भागात कडकडीत लॉक डाउन ला सुरुवात
मेडिकल स्टोअर्स सोडून सगळी दुकान पूर्णपणे बंद
-
इचलकरंजी शहरामध्ये पाच दिवसाचा लॉकडाऊन होणार
इचलकरंजी शहरामध्ये पाच दिवसाचा होणार लॉकडाऊन
शहरांमध्य कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन इचलकरंजी नगरपालिकेने घेतला निर्णय
शहरातील सह नियंत्रण बैठकीमध्ये झाला एकमताने निर्णय
शहरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार कडकडीत बंद
नागरिकांनी लॉकडाउन कडक पाळण्याचे प्रशासनाने केले आवाहन
शहरांमध्ये राहणार पोलिस बंदोबस्त
-
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही वाढले कोरोनाचे रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही वाढले कोरोनाचे रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली किंवा तालुका मुख्यालय कोरोना रुग्ण कमी झाले असले तरी दुर्गम भागात सध्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे सिरोंचा तालुक्यातील रामाजीगुडम या अतिदुर्गम व अतिसंवेदनशील आदिवासी भागात 70 रुग्ण अडलेले आहेत
अंकिसा हे छोटासा गाव अंकिसा येथे जवळपास सात ते आठ रुग्णांच्या मृत्यू या एका आठवड्यात झालेला आहे
कोरोणा चा वाढता प्रभाव गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला छत्तीसगड आणि तेलंगाना राज्यातून ये ना जाना करीत असल्याने नागरिक- कोरोना रुग्णनात मोठी वाढ होत आहे
-
लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीयेत – बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात –
केंद्राचे कुठलेही नियोजन नाही, कुठलेही धोरण नाही
सुप्रीम कोर्ट टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते?
पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट घातक आहे, तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे, या सर्वांवर उपाय लसीकरण आहे
लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीयेत
लसीकरणासाठी असणाऱ्या अँप मध्ये गोंधळ होत आहे
अँपचे नियोजन राज्याने केले पाहिजे
मुख्यमंत्र्यांनी ही केंद्राला विनंती केली आहे की आम्हाला आमचे अधिकार द्या
लसीकरणाचे धोरण केंद्राकडे नाही
आज देशाची जी अवस्था आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, केंद्र सरकारचे निष्क्रिय धोरण आहे
मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत
या बद्दल अधिक माहिती अशोक चव्हाण देतील
पण आरक्षण बद्दल आम्ही सरकार म्हणून काय करता येईल हे पाहत आहोत
महाराष्ट्र कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करत आहे
कडक निर्बंध सध्या सुरू आहेत, लोक आता जागृत आहेत काळजी घेतली जातेय
१५ मे नंतर काय याचा आढावा कॅबिनेट मध्ये घेतला जाईल
-
सोलापुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई
सोलापूर –
शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन असताना विनाकारण काही लोक रस्त्यावर
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई
नागरिकावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
शहरातील विविध ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी
-
सांगलीत लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात
सांगलीत लसीकरण मोहिम पुन्हा सुरू झाली आहे
दोन दिवस लस संपलेने लसीकरण मोहीम बंद होती
काल 26 हजार 400 लसी चे डोस उपलब्ध झाले
आज सकाळी आणि काल रात्री उशिरापर्यंत लसी चे वाटप करण्यात आले
-
पुण्यात तरुणाईला कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात, जिल्ह्यात 31 ते 40 वयोगटातील अधिक तरुण कोरोनाबाधित
पुणे
पुण्यात तरुणाईला कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात,
जिल्ह्यात 31 ते 40 वयोगटातील अधिक तरुण कोरोनाबाधित,
31 ते 40 वयोगटातील 55 हजार 441 रुग्ण कोरोनाबाधित,
तर 21ते 30 वयोगटातील 50 हजार तरुणांना कोरोनाची बाधा !
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने
जिल्ह्यातील अनेक गावात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्याचे आदेश
-
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, 13 तालुक्यात कंन्टेंमेंट झोनच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ
पुणे
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर
जिल्ह्यातील 13 तालुक्यात कंन्टेंमेंट झोनच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ
जिल्ह्यात कंन्टेंमेंट झोनची संख्या गेली तीन हजारावर
13 तालूक्यात 3 हजार 841 एवढ्या कंन्टेंमेंट झोनची निर्मिती
ग्रामीण भागातला कोरोना रोखण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान
266 गावांना अलर्ट मोडचा इशारा
-
विरार पूर्व कारगिल नगर रोडवरील बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्ज
विरार –
विरार पूर्व कारगिल नगर रोडवरील बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्ज
सकाळी 7 ते 11 या वेळेतच भाजीपाला विक्रीला परवानगी असल्याने दररोज नागरिक भाजीपाला खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहेत
लहान मुलांना घेऊन बिना मास्क नागरिक फिरत असतानाचे चित्र आहे
तर अनेक नागरिक व फेरीवाले ही बिना मास्क
वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे
तरीही नागरिक बेजबाबदार पणे वागत असल्याने कोरोनाला रोखायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे
-
नाशिक शहरात 4 केंद्रांवरच होणार आज लसीकरण
नाशिक –
शहरात 4 केंद्रांवरच होणार आज लसीकरण
18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार या 4 केंद्रांवर
45 वर्षांच्या पुढील गटाचे लसीकरण राहणार बंद
ज्यांची नोंदणी त्यांनाच लस मिळणार
केंद्रांवर गर्दी न करण्याचा प्रशासनाचे आवाहन
-
पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरल्या प्रकरणी 348 जणांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड –
– शहरात मास्क न वापरल्या प्रकरणी 348 जणांवर कारवाई
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
– शहरातील कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे
– मात्र नागरिक या आवाहनाला गांभीर्याने घेतनां दिसत नाहीत
-
नाशिक मनपा आयुक्तांनी केली तिसऱ्या लाटेच्या तयारीला सुरुवात
नाशिक –
मनपा आयुक्तांनी केली तिसऱ्या लाटेच्या तयारीला सुरुवात
शहरातील बिटको रुग्णालयात बालकांवर उपचारासाठी 100 बेडची व्यवस्था करणार
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने मनपाचे नियोजन सुरू
सरकारी डॉक्टर्स सोबत खाजगी डॉक्टरांची टीम देखील केली जाणार तयार
-
औरंगाबाद जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांत कमालीची घट
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांत कमालीची घट
दिवसभरत फक्त 759 रुग्णांची वाढ
सुरुवातीला दिवसाकाठी आढळायचे 1500 ते 1800 कोरोना रुग्ण
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 132369 वर
दिवसभरात 22 कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू तर एकूण 2755 जणांचा कोरोना बळी
जिल्ह्यात 121544 रुग्ण कोरोनामुक्त,8070 रुग्णांवर उपचार सुरू
-
पिंपरी-चिंचवडमध्ये आज 45 च्या पुढील वयोगटातील नागरिकांना 56 केंद्रांवर कोव्हिशील्ड तर 3 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार
पिंपरी-चिंचवड –
– पिंपरी-चिंचवडमध्ये आज 45 च्या पुढील वयोगटातील नागरिकांना 56 केंद्रांवर कोव्हिशील्ड तर 3 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार
– तीन केंद्रांवर 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना 160 नागरिकांच्या क्षमतेने लसीचा दुसरा डोस दिला जाणार
– तर 56 केंद्रांवर 100 लाभार्थ्यांच्या क्षमतेने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे
– तसेच आठ लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. या केंद्रांवर 200 नागरिकांच्या क्षमतेने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जाणार
-
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शुकशुकाट
सोलापूर –
शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शुकशुकाट
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर पोलिसांची कारवाई
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना आहेत बंद
-
कोव्हॅक्सिन लसीचा सातारा जिल्हयात मोठा तुटवडा
सातारा –
कोव्हॅक्सिन लसीचा जिल्हयात मोठा तुटवडा
45 वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना.
राज्य सरकारकडुन कोव्हॅक्सीन लस उपलब्ध करण्याची होतीये मागणी…
-
नाशकात रुग्णालयात जागा न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा रिक्षातच मृत्यू
नाशिक –
रुग्णालयात जागा न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा रिक्षातच मृत्यू
सिडको परिसरात मन हेलावून टाकणारी घटना
वडिलांना उपचारासाठी घेऊन गेलेल्या मुलीसमोर रिक्षातच वडिलांचा अंत
मयत व्यक्ती मनपाची सफाई कर्मचारी
-
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणास पुनः प्रारंभ, जिल्ह्याला 26 हजार लसी प्राप्त
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणास पुनः प्रारंभ
औरंगाबाद जिल्ह्याला 26 हजार लसी प्राप्त
आज 56 केंद्रांवर दिले जाणार 13 हजार लसीचे डोस..
45 ते 60 वयोगटातील नागरिकांना दिले जाणार कोविशील्डचे डोस..
पहिल्या डोस वाल्यांना ऑनलाईन नोंदणी तर दुसऱ्या डोस वाल्यांना थेट लसीकरण..
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे 6 केंद्रांवर होणार लसीकरण..
-
महाराष्ट्र सरकारचा उच्च न्यायालयात मोठा खुलासा, आतापर्यंत 26 लाख 48 हजार रुग्णांवर मोफत उपचार
औरंगाबाद –
महाराष्ट्र सरकारचा उच्च न्यायालयात मोठा खुलासा
आतापर्यंत 26 लाख 48 हजार रुग्णांवर मोफत उपचार
महाराष्ट्र सरकारचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खुलासा
महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवावी यासाठी खंडपीठात दाखल आहे याचिका
याचिकेवर उत्तर देताना महाराष्ट्र सरकारने केला खुलासा
महात्मा फुले योजनेसोबतच कोविड रुग्णांवर मोफत उपचार करत असल्याचा केला खुलासा
-
राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापुरात 11 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्लांट उभारण्यात येणार
सोलापूर –
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 11 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्लांट उभारण्यात येणार
शहर व ग्रामीण भागात वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या व त्यांना लागणारा ऑक्सिजन यासाठी प्रशासनाची रोज सुरु आहे धावपळ
शहरात तीन तर ग्रामीण मध्ये आठ ठिकाणी प्लांट उभारण्यात येणार
सध्या शहर आणि जिल्ह्यात 55 टन ऑक्सिजनची आहे मागणी
-
गोवा राज्यात जाण्यासाठी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक
गोवा –
गोवा राज्यात जाण्यासाठी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक
10 मेपासून म्हणजेच आज पासून गोवा राज्यात याची कडक अंमलबजावणी
गोव्यात दररोज कामासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्याना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची गरज नाही.
न्यायालयाच्या आदेशानंतर गोवा प्रशासनाचा निर्णय
-
सोलापुरात ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यामुळे 13 रुग्णालयांची कोव्हिड मान्यता रद्द
सोलापूर –
– ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यामुळे 13 रुग्णालयांची कोव्हिड मान्यता रद्द
– ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास अडचणी येत असल्याने महापालिकेने केली मान्यता रद्द
– तेरा रुग्णालयांची 180 बेडची होती क्षमता
– ऑक्सिजनवर रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर या रुग्णालयांना पुन्हा मिळणार मान्यता
– गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेने काडादी मंगल कार्यालय येथे 140 खाटांचे हॉस्पिटल केले सुरू
-
औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये अवैधपणे दुकाने उघडल्याने 28 जाणांवर गुन्हे दाखल
औरंगाबाद –
लॉकडाऊनमध्ये अवैधपणे दुकाने उघडल्याने 28 जाणांवर गुन्हे दाखल
28 आस्थापनाच्या मालकांविरुद्ध सिटी चौक आणि क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
गुन्हे दाखल केलेल्या 28 आस्थापना सील
कामगार उपायुक्त आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त कारवाई
-
पिंपरी पालिकेचे ऑटो क्लस्टर जम्बो हॉस्पिटलमधून स्पर्श संस्थेची हकालपट्टी
पिंपरी चिंचवड
-पिंपरी पालिकेचे ऑटो क्लस्टर जंबो हॉस्पिटलमधून स्पर्श संस्थेची हकालपट्टी
-मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची लूट आणि रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार या दोन्ही प्रकरणात दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉयला अटक झाली होती
-त्यानंतर आता महापालिकेने सर्व अधिकार स्वतःकडे घेत त्यांची अखेर हकालपट्टी केली आहे
-
राज्य शासनाचे 1500 रुपये मिळणार तर कधी, सांगलीतील 9 हजार रिक्षा चालकांना अद्याप मदत नाही
सांगली –
राज्य शासनाचे 1500 रुपये मिळणार तर कधी
जिल्ह्यातील 9 हजार रिक्षा चालकाना मदत अद्याप मिळाली नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डॉउन करताना राज्य शासन 1500 रुपये ची मदत रिक्षा चालकांना देऊ अशी केली होती घोषणा
महिना होत आला तरी रिक्षा चालकाना मदत न मिळत नसल्याने उपासमारीची आली वेळ
कर्जाचे हप्ते, 2 वेळचे जेवण या मुळे अनेकांनी रिक्षा विकून जगणे केले पसंद
जिल्ह्यातील रिक्षा चालकाचा उदरनिर्वाह चा प्रश्न झाला गंभीर
प्रशासन ,अधिकारी,लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प
परिणामी जिल्ह्यातील रिक्षा चालका मध्ये संतापाची लाट, तीव्र नाराजी
-
कोरोनाचा हॅाटस्पॅाट ठरलेल्या पाटण कोयना विभागातील गावात चक्क लग्नात नाच-गाण्यांचा धडाका
कराड –
कोरोनाचा हॅाटस्पॅाट ठरलेल्या पाटण कोयना विभागातील गावात चक्क लग्नात नाचगाण्यांचा धडाका
व्हिडिओ , फोटो पाहुन पाटण तहसिलदार आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई
लग्नानंतर रात्री डिजे लावून सुरू होता नाच
लग्न मालकाला दहा हजारांचा दंड
पाटण कोयनानगर विभागात आजपर्यंत कोरोनामुळे एकूण 13 मुत्यू झाले आहेत.
-
रेमडेसीव्हीरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांकडून पर्दाफाश
कोल्हापूर
रेमडेसीव्हीरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांकडून पर्दाफाश
इंजेक्शनचा साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या तिघांना केली अटक
सचिन जोगम,प्रणव खैरे आणि प्रकाश गोते अशी अटक केलेल्या संशयितांची नावे
तिघांकडून रेमडेसीव्हीरच्या तीन बाटल्या जप्त
अटक केलेले तिघे ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित
23 हजार रुपयांला एका इंजेक्शनची करत होते विक्री
-
अकोला ते वाडेगाव रोडची दुरुस्ती करून चांगला करावा या मागणी साठी शैलेश मापारी हा युवक चढला मोबाईल टॉवरवर
अकोला –
अकोला ते वाडेगाव रोडची दुरुस्ती करून चांगला करावा या मागणी साठी शैलेश मापारी हा युवक चढला मोबाईल टॉवरवर
वाडेगाव ते अकोला रोडवरून गावकरी येजा करता
त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी या मागणीला घेऊन वाडेगाव येथील युवक चढला मोबाईल टॉवरवर
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 15 तारखेपर्यंत कडक लाॅकडाऊन
सिंधुदुर्ग –
जिल्ह्यात आजपासून 15 तारखेपर्यंत कडक लाॅकडाऊन
वाढती रूग्ण संख्येच्या पाश्वभुमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय.
फक्त मेडीकल दुकाने राहणार सुरू इतर आस्थापणा राहणार बंद.
शेती विषयक अवजारे, किराणा दुकादारांना घरपोच सेवा देण्याची मुभा.
-
पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा पॉझिटीव्ह परिणाम जाणवू लागला
पुणे : शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा पॉझिटीव्ह परिणाम जाणवू लागला
दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट
त्याच्याबरोबर सक्रिय रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी
शहरात १८ एप्रिल रोजी ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण होते. तर, रविवारी ही संख्या ३३ हजार ७३२
मागील २२ दिवसांत तब्बल २२ हजार ९०४ सक्रिय रुग्ण झाले कमी
-
नागपूरकरांना दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासांत 3104 नवे रुग्ण
नागपूर :
नागपूरकरांना दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत घट
24 तासात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3104
साडेसात हजारावरून रुग्णसंख्या 3 हजारावर,
शहरात 1614 तर ग्रामीण मध्ये 1479 रूग्ण,
तर 24 तासात 73 रुग्णांचा मृत्यु,
तर 6644 रुग्ण बरे होऊन घरी गेले,
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 54732
-
नागपुरात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीक उन्हात, तर महापौरांचे तरुणाईसोबत सोहळे
– नागपुरात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीक उन्हात, तर महापौरांचे तरुणाईसोबत सोहळे
– प्रत्येक लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला सोहळ्याची काय गरज?
– नितीन गडकरींनी कान टोचल्यानंतरंही नागपुरात महापौरांचे सोहळे सुरुच
– नागपुरात ४५ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण आज पुन्हा बंद
– लस पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय
– १८ ते ४४ वयोगटातसाठी सहा केंद्रांवर आज लसीकरण
– लसीकरण होत नसल्याने ज्येष्ठ नागरीक व्यक्त करत आहेत संताप
-
लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू
– लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू
– नागपूर जिल्हा प्रशासनाने सुरु केली मोहिम
– लसीकरणात माघारलेली आणि कोरोनाग्रस्त गावांना भेटी
– कोरोनाचा विळखा असलेल्या गावांमध्ये उतरली शासकीय यंत्रणा
– जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दौरे सुरु
– मौदा, रामटेक, पारशिवनी आणि सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आढावा बैठका
– लसीकरणावर भर देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना
-
आमदार राजू पारवेंनी स्वीकारलं कोरोनाबळींच्या कुटुंबीयांचं पालकत्त्व
नागपूर –
– आ. राजू पारवेंनी स्वीकारलं कोरोनाबळींच्या कुटुंबीयांचं पालकत्त्व
– नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाबळीचे परिवार रस्त्यावर
– संकट ओढवलेल्या परिवाराला आधार देण्याचा प्रयत्न
– आ. राजू पारवेंनी स्वाकारली कुटुंबाची जबाबदारी
– उमरेड मतदारसंघातील कुटुंबीयांना सहारा देण्याचा प्रयत्न
– मुलींचे लग्न, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
– ‘गरज भासल्यास स्वत:ची संपत्ती विकणार’
– कोरोनात आई गमावलेल्या आ. राजू पारवेंचा निर्धार
– दानशुर लोकांनाही मदतीसाठी पुढं येण्याचं आवाहन
– मातृदिनापासून आ. पारवेंनी सुरु केली पालकत्व मोहिम
– कोरोनात आधार गमावलेल्या परिवांच्या भेटी सुरु
-
पुण्यात गेल्या 24 तासांत 7 हजार 541 नवे रुग्ण, 11 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त
पुणे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी
गेल्या 24 तासांत 7 हजार 541 नवे कोरोनाबधित रग्ण
तर एकाच दिवशी 11 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त
उपचारादरम्यान गेल्या 24 तासांत 124 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात एकूण 9 लाख 21 हजार 159 जण कोरोनाबधित
-
राज्यात गेल्या 24 तासांत 48 हजार 401 नवे कोरोनाबाधित, 572 रुग्णांचा मृत्यू
राज्यात गेल्या 24 तासांत 48 हजार 401 नवे कोरोनाबाधित,
572 कोरोानाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
राज्यात राज्यात आज 60 हजार 226 रुग्णांनी केली कोरोनावर मात
-
यवतमाळमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, 2 जणांना अटक
यवतमाळ- रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड
काळाबाजार करणाऱ्या आणखी 2 जणांना घेतले ताब्यात
यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने पुरवले काळाबाजरी करणाऱ्यांना इंजेक्शन
नर्सला पोलिसांनी घेतले ताब्यात
पूनम मेश्राम असे नर्सचे नाव
Published On - May 10,2021 11:19 PM