Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 46,781 नवे कोरोनाबाधित, तर 58,805 रुग्णांना डिस्चार्ज

| Updated on: May 13, 2021 | 12:26 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 46,781 नवे कोरोनाबाधित, तर 58,805 रुग्णांना डिस्चार्ज
Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 May 2021 09:31 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 46,781 नवे कोरोनाबाधित, तर 58,805 रुग्णांना डिस्चार्ज

    राज्यात आज 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • 12 May 2021 08:59 PM (IST)

    पुण्यात कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चक्क तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

    पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये नातेवाईक रुग्णांना पुरवतायेत चक्क तंबाखू आणि गुटखा

    नातेवाईकाने रुग्णाला डब्यातून पुरवला गुटखा

    नातेवाईकांसमोर डॉक्टर आणि प्रशासनानं टेकले हात

    रुग्णांच्या नातेवाईकांकडून येणाऱ्या डब्याची तपासणी केली असता आला प्रकार उघडकीस

    रुग्णांना डबा देण्याच्या सुविधेचा काही नातेवाईक घेतायेत गैरफायदा

  • 12 May 2021 08:52 PM (IST)

    मीरा भाईंदर मनपामध्ये एकाच दिवशी 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    मीरा भाईंदर : मीरा भाईंदर मनपा अंतर्गत आज एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण  1154 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    आज 228 नवे रुग्ण आढळून आले

    दिवसभरात 209 रुग्ण कोरोनामुक्त

    मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत 46 हजार 518 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

    आतापर्यंत 43 हजार 320 जण कोरोनामुक्त

  • 12 May 2021 08:43 PM (IST)

    निफाड तालुक्यात दिवसभरात 145 नवे कोरोना रुग्ण

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    दिवसभरात आढळलेले रुग्ण – 145

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 16948

    आतापर्यंत एकूण बरे झालेले – 15176

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – 89.54 %

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 564 सध्याचा मृत्युदर – 3.33 %

  • 12 May 2021 08:31 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2366 नवे कोरोनाबाधित, 35 रुग्णांचा मृत्यू

    नाशिक कोरोना अपडेट –

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 5221

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2366

    नाशिक मनपा- 1217 नाशिक ग्रामीण- 1097 मालेगाव मनपा- 0052 जिल्हा बाह्य- 0000

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3970

    आज झालेले मृत्यू -35 नाशिक मनपा- 23 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 12 जिल्हा बाह्य- 00

  • 12 May 2021 07:57 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 827 नवे कोरोनाबाधित, 51 रुग्णांचा मृत्यू

    सातारा जिल्ह्यात आज 827 जण कोरोनामुक्त, तर जिल्हयात 2001 जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

    जिल्हयात आज 51 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात सध्या 24,100 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    सातारा जिल्ह्यात एकूण 3031 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,01991 रुग्ण कोरोनामुक्त

  • 12 May 2021 07:53 PM (IST)

    वसई-विरारमध्ये दिवसभरात 677 नवे कोरोनाबाधित, 9 जणांचा मृत्यू

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    मागच्या 24 तासात 677 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. तर आज दिवसभरात 09 जणांचा मृत्यू, 698 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या : 61,427

    कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या : 49,645

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या : 1224

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या : 10558

  • 12 May 2021 07:51 PM (IST)

    लसीकरण केंद्रावर आता फक्त दुसरा डोस घेण्यासाठी या : राजेश टोपे

    राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावेत.पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही…पहिल्या डोस नंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड तर 4 लाख कोवॅक्सिन अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड तर 4 लाख कोवॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

  • 12 May 2021 07:00 PM (IST)

    राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार का? राजेश टोपे म्हणतात….

    18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांना तूर्तास लसी दिली जाणार नाही. या गटासाठी खरेदी केलेल्या लसी 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देणार. लॉकडाऊनबाबतही चर्चा झाली. लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. राज्यातचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

  • 12 May 2021 06:57 PM (IST)

    राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती: राजेश टोपे

    राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती लसींची कमतरता असल्यानं देत असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते.  लसीचा पहिला डोस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

  • 12 May 2021 06:46 PM (IST)

    राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत एकमुखाने मागणी

    कॅबिनेट बैठकीत काय निर्णय? 

    लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमुखाने मागणी

    लसीकरनातं दुसरा डोस साठी प्राधान्य देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत

  • 12 May 2021 06:43 PM (IST)

    ज्येष्ठ नागरिक आणि अपंगासाठी कोरोना लसीकरण डोअर टू डोअर का राबवलं नाही? मुंबई हायकोर्टाचा केंद्राला सवाल

    स्वताहून केंद्रानं ज्येष्ठ नागरिक आणि अपंगासाठी कोरोना लसीकरण डोअर टू डोअर का राबवलं नाही? केद्रानं आज डोअर टू डोअर लसीकरण राबवलं असतं तर अनेक ज्येष्ठ वाचले असते. यात अनेक नामंकित ज्येष्ठ ज्यांचा मृत्यू झाला त्यांचाही जीव वाचला असता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.

  • 12 May 2021 06:32 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 39 रुग्णांचा मृत्यू, 1049 नवे कोरोनाबाधित

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात, 1049 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 39 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 74363

    एकूण कोरोनामुक्त : 61516

    ऍक्टिव्ह रुग्ण : 11682

    एकूण मृत्यू : 1165

    एकूण नमूने तपासणी : 421887

  • 12 May 2021 06:30 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 626 नवे कोरोनाबाधित

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 626 आज झालेले मृत्यू – 05 आज बरे झालेले – 572

    तालुकानुसार रुग्णसंख्या

    गोंदिया————–220 तिरोडा————–41 गोरेगाव————–34 आमगाव————–90 सालेकसा————-44 देवरी——————66 सडक अर्जुनी ———–28 अर्जुनी मोरगाव——–101 इतर राज्य————–02

    एकूण रुग्ण – 38672 एकूण मृत्यू – 616 एकूण बरे झालेले – 34005 एकूण उपचार घेत असलेले – 4051

  • 12 May 2021 06:29 PM (IST)

    प्रोत्साहन भत्ता दिला नाही, आणखी एक दिवसाचा पगार का कापताय? आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल

    करोनाकाळात सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा जीआर 7 मे रोजी काढला , या जीआरमधून आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना वगळावे, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे. आम्हाला प्रोत्साहन भत्ता तर दिला नाही. आता आणखी एक दिवसाचा पगार का कापत आहात? असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

  • 12 May 2021 06:26 PM (IST)

    नागपुरात कोरोनाबधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या वाढली

    नागपूर :

    नागपुरात आज सुद्धा कोरोना बधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या वाढली

    आज नागपूर जिल्ह्यात 5708 जणांनी केली कोरोनावर मात

    2532 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    तर 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 456380

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 404702

    एकूण मृत्यू संख्या – 8325

  • 12 May 2021 06:24 PM (IST)

    भारत बोयोटेककडून कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा राज्यांना कमी असल्याच्या आरोपावर खुलासा

    भारत बोयोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा राज्यांना कमी असल्याचा आरोपावर खुलासा भारत बायोटेकच्या सहायक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्विट करतं केला खुलासा 18 राज्यांना लसीचा पुरवठा दिला गेला आहे 50 कर्मचारी कोरोनामुळे सुट्टीवर आहेत तरीही 24 तास लसींचं उत्पादन सुरू आहे दिल्ली, महाराष्ट्रसह इतर राज्यांचा यात समावेश आहे

  • 12 May 2021 06:21 PM (IST)

    रशियाची स्पुतनिक लस महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता लांबणीवर

    रशियाची स्पुतनिक लस महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता लांबणीवर

    रशियन स्पुतनिक लस मिळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या इ मेलला अद्याप उत्तर नाही

    स्पुतनिक लस साठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील मात्र एक आठवड्यानंतरही रशियन कंपनीकडून उत्तर नाही, सूत्रांची माहिती

  • 12 May 2021 06:11 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू, 428 नवे कोरोनाबाधित

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 07 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 428 नवे रुग्ण

    तर 424 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 12 दिवसात 52 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 6081 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 5621 कोरोनामुक्त झालेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 33441

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4317

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 28775

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 348

  • 12 May 2021 05:16 PM (IST)

    भारतीयांसाठी खूशखबर ! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस निर्मितीची वेग मे आणि जूनमध्ये दुप्पट होणार

    भारतीयांसाठी खूशखबर, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस निर्मितीची वेग मे आणि जूनमध्ये दुप्पट होणार जुलै आणि आँगस्टमध्ये लसींचं उत्पादन 6 ते 7 पटीने वाढणार संप्टेबरपर्यंत महिन्याला भारत बायोटेक 10 कोटी डोसेस प्रति महिना तय़ार करणार, केेद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय माहिती

  • 12 May 2021 05:04 PM (IST)

    ऑक्सिजन अभावी मिरज शासकीय कोरोना रुग्णालय व्हेंटीलेटरवर, फक्त अर्धातास पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा

    सांगली :

    ऑक्सिजन अभावी मिरज शासकीय कोरोना रुग्णालय व्हेंटीलेटरवर गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

    सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे आवघा अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सीजनसाठा आहे

    वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यास मोठा अनर्थाला जिल्ह्याला समोरे जावं लागणार आहे

    तर ऑक्सिजनसाठा लक्षात घेता रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी रुग्णालय प्रशासनाला केली आहे.

  • 12 May 2021 04:11 PM (IST)

    वसईच्या कोविड सेंटरमधून 80 वर्षांचा रुग्ण बेपत्ता

    वसईच्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोव्हिड सेंटरमधून 80 वर्षांचा रुग्ण बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने आज वाळीव पोलीस ठाण्यात पत्र देऊन बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. रामचंद्र दास असे बेपत्ता झालेल्या रुग्णाचे नाव असून ते नायगाव परिसरात राहतात. 22 एप्रिल रोजी हा रुग्ण वसई विरार महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल झाला होता.  24 एप्रिल पर्यंत रुग्ण रुग्णालयात होता. मात्र त्यानंतर तो बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

  • 12 May 2021 03:59 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक द चेन मोहिमेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना आमदार तानाजी सावंतांचा आरोप

    पंढरपूर : मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक द चेन मोहिमेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना आमदार तानाजी सावंतांचा आरोप, शिवसेना आमदार तानाजी सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रिय, आज पंढरपूर विभागातील पदाधिकार्यांची घेतली बैठक, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शिवसेनेकडून उपाय योजना सुरू, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिपोर्ट करुन ठोस उपाय योजना करणार

  • 12 May 2021 03:58 PM (IST)

    बबनराव लोणीकर आरोग्य विभागाला उपाययोजनासाठी आमदार निधितून दीड कोटी रुपये देणार

    परतूरचे आमदार तथा माजी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर देणार आमदार निधितून दीड कोटी रुपये या निधीतीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्हेंटिलेटर, सोनोग्राफी, एक्सरे, आणि सिटी स्कॅन खरेदी करणार. परतूर मतदार संघातील मंठा, परतूर, आणि नेर आरोग्य केंद्रातील कोरोना बाधित रुग्णांना याचा मिळणार लाभ.

  • 12 May 2021 03:55 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळ बैठक सुरू,  बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता?

    राज्य मंत्रिमंडळ बैठक सुरू,  बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता?

    राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याची शक्यता

    ऑक्सिजन प्लांट मिशनसाठी 1 हजार 100 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळणार असल्याची शक्यता

    18 वर्षावरील लस बंद करत नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येऊ शकतो

    करोना आढावा आणि मराठा आरक्षण चर्चा

  • 12 May 2021 03:53 PM (IST)

    कल्याणमध्ये लसीकरणाचा गोंधळ सुरुच, पहाटे तीन वाजल्यापासून लसीकरणासाठी रांग

    एकतर लसीचा तुटवडा आहे. दुसरीकडे लसींचा दुसरा डोस संदभात संपूर्ण महिती नसल्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळाचे वातावरण आहे. कल्याणच्या आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर पहाटे तीन वाजल्यापासून 45 वयापेक्षा जास्त असलेल्या नागरीक रांग लावून उभे होते.

  • 12 May 2021 02:46 PM (IST)

    वर्ध्यातील कडक निर्बंधांत आणखी पाच दिवसांची वाढ

    वर्धा –

    # वर्ध्यातील कडक निर्बंधांत आणखी पाच दिवसांची वाढ

    # 18 मेच्या सकाळी 7 वाजतापर्यंत लागू असणार कडक निर्बन्ध

    # यापूर्वी वर्ध्यात 8 मे ते 13 मेच्या सकाळपर्यंत पाच दिवस होत निर्बंध

    # 18 मेच्या सकाळी 7 वाजतापर्यंत असणार निर्बन्ध

    # कोरोना बधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले सुधारित निर्देश

    # अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी

    # किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकान बंद राहणार, तथापी सकाळी 7 ते सकाळी 11 वाजतापर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही

    # शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केवळ घरपोच पार्सल सुविधा राहणार

    # बाजार समित्या, क्रीडांगण, उद्यान, शाळा, ट्युशन क्लासेस, लग्न, सोहळे, कार्यक्रम, मंगल कार्यालय, नागरी भागातील पेट्रोल पंप, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय बंद असणार

    # बँक, पतसंस्था, पोस्ट ग्राहकांना बंद राहील, प्रशासकीय कामकाज सुरू राहील

    # जिल्ह्याच्या सीमा रुग्ण, मालवाहतूककरीता सुरू असणार

    # दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजतापर्यंत सुरू असणार

    # मेडिकल, वैद्यकीय दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार

    # घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र आणि rtpcr टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

    # या काळात अत्यावश्यक सेवा, कोरोनाशी संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालय उघडे राहणार आहे तर इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहे

    # या काळात खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे

  • 12 May 2021 02:45 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक द चेन मोहिमेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना आमदार तानाजी सावंतांचा आरोप

    पंढरपूर –

    मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक द चेन मोहिमेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना आमदार तानाजी सावंतांचा आरोप

    शिवसेना आमदार तानाजी सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रिय

    आज पंढरपूर विभागातील पदाधिकार्यांची घेतली बैठक

    कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शिवसेनेकडून उपाय योजना सुरू

    जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना रिपोर्ट करुन ठोस उपाय योजना करणार

  • 12 May 2021 01:25 PM (IST)

    2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीची चाचणी, नागपुरातील मेडीट्रिना हॅास्पिटलमध्ये चाचणी होण्याची शक्यता

    नागपूर –

    – 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीची चाचणी

    – नागपुरातील मेडीट्रिना हॅास्पिटलमध्ये चाचणी होण्याची शक्यता

    – एक महिन्यात चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता

  • 12 May 2021 12:46 PM (IST)

    अमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत

    अमरावती –

    अमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार

    काळाबाजार करणारे 2 सरकारी डॉक्टर आणि 4 खाजगी रुग्णालयातील कर्मचारी अटकेत

    यात तिवसा ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालुसरे, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉ. अक्षय राठोड अटकेत

    10 रेमडेसिव्हीर सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    शहर पोलीस आयक्तालयातील गुन्हे शाखेची कामगिरी

    रात्री उशिरा शहर स्थानिक गुन्हेची कारवाई

    चढ्या दराने विकत होते रेमडेसिव्हीर इंजेक्शन

  • 12 May 2021 12:43 PM (IST)

    तिवसा ग्रामीण रुग्णालयातील रेमडीसिव्हीर इंजेक्शन विक्रीचा प्रकार

    तिवसा –

    तिवसा ग्रामीण रुग्णालयातील रेमडीसिव्हीर इंजेक्शन विक्रीचा प्रकार

    तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर पवन मालसुरे यांना अटक

    रात्री 12 वाजता क्राईम ब्रान्च अमरावती पोलिसांची मोठी कारवाई

    इंजेक्शन विक्रीच्या गोरख धंद्यात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता

    आरोग्य क्षेत्रात खळबळ

  • 12 May 2021 11:36 AM (IST)

    कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास रुग्ण बरा होतो, अहमदनगरातील डॉक्टरचा अजब फंडा

    अहमदनगर

    कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या डॉक्टरचा अजब फंडा

    कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास रुग्ण होतो बरा, डॉ. अरुण भिसे यांचा अजब दावा

    40 ते 50 रूग्णांना बरे झाल्याचा दावा, तर 10 गंभीर रुग्ण होते

    डॉक्टरांच्या दाव्याची सर्वत्र जोरदार चर्चा

  • 12 May 2021 11:27 AM (IST)

    राज्यातील सर्वच विद्यापीठात आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोव्हिड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे युजीसीचे आदेश

    पुणे –

    राज्यातील सर्वच विद्यापीठात आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोव्हीड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश,

    युजीसीनं सर्वच विद्यापीठाना दिले आदेश, तत्काळ कोव्हीड टास्क फोर्स उभारून मदत करण्याचे दिले आदेश,

    प्राध्यापक, शिक्षक , विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्समध्ये समावेश करा,

    शक्य होईल तितकी मदत आणि समाजामध्ये समूपदेशन करण्याचे दिले आदेश,

    युजीसीचे अध्यक्ष डॉ.डी पी सिंह यांनी विद्यापीठाला पाठवले पत्रक,

    राज्यातील सर्वच विद्यापीठात कोव्हीड हेल्पलाईन सुरू करण्याचे युजीसीचे आदेश ….

  • 12 May 2021 11:14 AM (IST)

    जिल्ह्यातील इस्लामपूर येथील लक्ष्मी नारायण हॉस्पिटलमधील कोविड सेंटर बंद करा – राजू शेट्टी

    सांगली –

    जिल्ह्यातील इस्लामपूर येथील लक्ष्मी नारायण हॉस्पिटलमधील कोविड सेंटर बंद करा

    राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मयत कुटुंब आणि वाळवा तालुका संघर्ष समितीने निवेदन द्वारे जिल्हाधिकारी यांना केली मागणी

    2 मे रोजी ऑक्सिजन पुरवठा कमी झालेने 6 ते 7 जणांचा झाला होता मृत्यू

    2 मे ला दुपारी 3 ला ऑक्सिजन कमी झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाईक केली होती धावपळ

    मात्र डॉक्टर दाम्पत्यांनी सर्वाना काढले बाहेर आणि सर्व माहिती लपवण्याचा केला प्रयत्न

    ऑक्सिजन साठ्याबाबत हॉस्पिटलकडून रुग्णाच्या नातेवाईकांना दिली नाही कोणतीच माहीत

    मृत्यूबाबतही शासनापासून हॉस्पिटलने माहिती लपवली

    याचा जाब विचारला असता, नातेवाईकासह अनके जणांवर केला गुन्हा दाखल

    कारवाई करा अन्यथा रस्त्यावर वर उतरून आंदोलन, राजू शेट्टी दिला इशारा

  • 12 May 2021 11:10 AM (IST)

    सरकारने आता सगळं काही अनलाॅकडाऊन करावं – विरेन शाह

    विरेन शाह –

    – सरकारने आता सगळं काही अनलाॅकडाऊन करावं, 40 दिवस दुकाने बंद होती, सरकारला या 40 दिवसात आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ मिळालाय

    – दुकानदारांना 50 हजार कोटींचं नुकसान झालंय

    – सरकारच्या मुंबई माॅडेलची देशभर चर्चा होतेय, आत्ता रुग्णसंख्या कमी झालीये त्यामुळे सरकारने आत्ता सगळॅ काही अनलाॅक करावं

  • 12 May 2021 11:09 AM (IST)

    कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम

    अहमदनगर

    कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम…

    ज्यांना कोरोना लस मिळणार आहे त्यांची यादी लसीकरण केंद्राबाहेर लावली जाणार…

    पालिकेच्या वेबसाईटवर देखील केंद्र आणि लसीकरण असलेल्या नागरिकांची यादी प्रकाशित करणार…

    कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दीच नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेचा उपक्रम…

  • 12 May 2021 09:34 AM (IST)

    सोलापुरात 45 वर्षांच्या पुढील नागरिकांना आज लस, नागरिकांच्या रांगा

    सोलापूर –

    45 वर्षांच्या पुढील नागरिकांना आज लस

    लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

    अकलूज रोडवरील सादुल पेट्रोल पंपा समोरील लसीकरण केंद्रासमोर नागरिकांची रांग

    शहरातील अठरा लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

  • 12 May 2021 09:32 AM (IST)

    जलनेती क्रिया केल्यास नाशिककर टाळू शकतील कोरोना संसर्ग, महापौर सतीश कुलकर्णी यांचा दावा

    नाशिक –

    महापौर सतीश कुलकर्णी यांचा दावा

    जलनेती क्रिया केल्यास नाशिककर टाळू शकतील कोरोना संसर्ग

    कोरोना संकट काळात महापौरांनी दिला जलनेती क्रियेचा नागरिकांना सल्ला

    महापौरांनी स्वतः दिल जलनेती क्रियेच प्रात्यक्षिक

    महापौरांच प्रात्यक्षिक बघून भाजप नेते देखील अचंबित

  • 12 May 2021 09:23 AM (IST)

    निफाडमध्ये 108 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

    निफाड तालुका कोरोना अपडेट –

    नविन कोरोना बाधित अहवाल आलेले रुग्ण – 108

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 16791

    आजपर्यंत एकूण बरे झालेले – 14934 (बरे होण्याचा दर Recovery Rate – 88.94 %)

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 549 (मृत्यू दर- 3.27 %)

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 1498

    एकूण झालेल्या टेस्ट – 773

  • 12 May 2021 09:19 AM (IST)

    पुण्यात म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी तारीख 13 जूनपर्यंत वाढवण्यात आली

    पुणे

    म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी तारीख १३ जून पर्यंत वाढवण्यात आली

    म्हाडाच्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या २१५३ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २९०८ सदनिकांची अंतिम नोंदणी १३ मे पर्यंत होती.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव या साठी अर्ज करण्याची तारीख १३ जून पर्यंत वाढवली

  • 12 May 2021 09:09 AM (IST)

    उस्मानाबादेत लसीकरण करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    उस्मानाबाद – लसीकरण करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण केंद्र

    45 वर्ष पुढील नागरिकांचे होणार आहे आज लसीकरण

    कोवक्सिन लस तुटवडा असल्याने नागरिकांची मोठी गर्दी

    अर्धा किमी पर्यंत नागरिकांच्या रांगा, 10.30 वाजता होणार आहे लसीकरन सुरुवात

    लसीकरण सुरुवात होण्यापूर्वीच नागरिकांच्या रांगा

  • 12 May 2021 08:54 AM (IST)

    सोलापुरात मृतावर अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम तरुण सरसावले, नातेवाईकांनी दाखवली होती असमर्थता

    सोलापूर –

    मृतावर अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम तरुण सरसावले, नातेवाईकांनी दाखवली होती असमर्थता

    हिंदू पद्धतीचे केले अंतिम संस्कार

    मुस्लिम तरुणांनी रमजानच्या काळात बंधूभाव आणि माणुसकी जपत कोरोनाने मृत  झालेल्या एका हिंदू व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार

    मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथील एका हिंदु व्यक्तीचे उपचारादरम्यान झाले होते निधन

    त्या व्यक्तीला मूलबाळ नसल्याने इतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास दाखवली असमर्थता

    जमियत उलमा ए  हिंद संस्थेच्या इब्राहिम शेख , जहीर खरादि, ऑफिस मुजीब या मुस्लीम या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार

  • 12 May 2021 08:53 AM (IST)

    सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या नागरिकांचे रॅपिड ॲडमिशन टेस्ट

    सोलापूर –

    कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या नागरिकांचे रॅपिड ॲडमिशन टेस्ट

    आज सकाळी सात ते अकरा पर्यंत लॉकडाऊन मधून देण्यात आले आहे  शिथिलता

    कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी बरोबरच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची केली जात आहे  रॅपिड ॲडमिशन टेस्ट

  • 12 May 2021 08:51 AM (IST)

    कोल्हापुरातील कोरोनाबाबत दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात

    कोल्हापूर

    कोरोनाबाबत दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात

    मास्क न वापरण्याच आवाहन करणाऱ्या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक

    सुहास पाटील असं अटक केलेल्या तरुणाच नाव

    सुहास पाटील यान ऑक्सीजन वाहतूक करणाऱ्या केएमटी कर्मचाऱ्यांच्या तोंडावरील मास्क जबरदस्तीने काढण्याचा केला होता प्रयत्न

    पाटील यांच मास्क न वापरण्या बाबतचा व्हिडीओ दोन दिवसा पासून होता व्हायरल

  • 12 May 2021 08:51 AM (IST)

    पुणे पोलिसांनी वर्षभरात मास्क न घालणाऱ्या तब्बल 3 लाख 54 हजार 969 पुणेकरांवर केली दंडात्मक कारवाई

    पुणे

    पुणे पोलिसांनी वर्षभरात मास्क न घालणाऱ्या तब्बल 3 लाख 54 हजार 969 पुणेकरांवर केली दंडात्मक कारवाई

    त्यांच्याकडून 17 लाख 85 हजार रुपयांचा दंड केला वसुल केला शहरात दररोज विना मास्क फिरणारे किमान दोन ते तीन हजार नागरीक पोलिसांना दिसत असून पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा

    परिमंडळनिहाय पोलिसांनी केलेली कारवाई

    परिमंडळ एक – 78 हजार 137

    परिमंडळ दोन- 52 हजार 761

    परिमंडळ तीन – 62 हजार 121

    परिमंडळ चार- 66 हजार 853

    परिमंडळ पाच- 55 हजार 642

    वाहतूक शाखा- 39 हजार 455

  • 12 May 2021 08:47 AM (IST)

    नागपूर शहरातील रुग्णालयात ग्रामीण रुग्णांसाठी बेड राखीव ठेवा, आमदार आशिष जैसवाल यांची मागणी

    – नागपूर शहरातील रुग्णालयात ग्रामीण रुग्णांसाठी बेड राखीव ठेवा

    – ग्रामीणच्या लोकसंख्येनुसार शहरात बेड राखीव ठेवा

    – शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आशिष जैसवाल यांची मागणी

    – बेड राखीव ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिलं पत्र

    – नागपूर ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेत स्थिती चिंताजनक

    – कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करणार

    – आ. आशिष जैसवाल यांची माहिती

  • 12 May 2021 08:06 AM (IST)

    औरंगाबादेत पीएम केअर फंडातील अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत पीएम केअर फंडातील अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त

    100 च्या जवळपास व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे

    व्हेंटिलेटर खराब असल्यामुळे वापर थांबवला

    घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाला दिले होते व्हेंटिलेटर

    पीएम केअर फंडातून आलेले अनेक व्हेंटिलेटर निघाले खराब

    औरंगाबाद जिल्ह्यात 523 व्हेंटिलेटरपैकी फक्त 411 व्हेंटिलेटर सुरु

    उर्वरित शंभरच्यावर व्हेंटिलेटर बंद

  • 12 May 2021 07:54 AM (IST)

    कोरोना मुक्तीच्या औरंगाबाद पॅटर्नची चर्चा सुरु

    औरंगाबाद –

    कोरोना मुक्तीच्या औरंगाबाद पॅटर्नची चर्चा सुरु

    अवघ्या दीड महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात

    अवघ्या दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग 1700 वरून आला 700 वर

    तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 16 हजारावरून अली सात हजारांवर

    तर आतापर्यंत केल्या दहा लाख कोरोना टेस्ट

    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची आकडेवारीसह माहिती

    राज्यात सर्वात प्रथम विकेंड लॉक डाऊन औरंगाबादेत सुरू

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कंट्रोल रुमही सर्वात प्रथम औरंगाबादेत

    कडक नाकाबंदी आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी यामुळे कोरोना आटोक्यात

    औरंगाबाद जिल्ह्याबाहेरील तब्बल 10 हजार रुग्णांवर औरंगाबादेत केले उपचार

  • 12 May 2021 07:50 AM (IST)

    नागपुरात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा

    – नागपुरात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा

    – म्युकरमासकोसीसवरील इंजेक्शनच्या दरवाढीच्या अनेक तक्रारी

    – म्युकरमासकोसीसवरील इंजेक्शनचा काळाबाजार होण्याची शक्यता

    – काही दिवसांपूर्वी २६०० ला विकल्या जाणाऱ्या इंजेक्शनची ६५०० रुपयांत विक्री

    – मेडीकलमध्ये म्युकरमासकोसीसच्या २४ रुग्णांवर शस्रक्रिया, २५ रुग्णांवर उपचार सुरु

    – रुग्ण वाढत असल्याने म्युकरमासकोसीसवरील इंजेक्शनचा तुटवडा

  • 12 May 2021 07:49 AM (IST)

    नाशकात स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने भाजप नगरसेवक जगदीश पाटील आक्रमक

    नाशिक – स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने भाजप नगरसेवक जगदीश पाटील आक्रमक

    मायको हॉस्पिटल मध्ये लसीकरण पाडलं बंद

    पहाटेपासून आलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी डावलला जात असल्याने जगदीश पाटील आक्रमक

    लसीकरण केंद्रांवर गोंधळ

    परिसरातील नागरिकांना प्राधान्य न दिल्यास लसीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा

  • 12 May 2021 07:48 AM (IST)

    तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर नाशिक मनपा आयुक्त आणि बालरोग तज्ञांची बैठक

    नाशिक – तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर मनपा आयुक्त आणि बालरोग तज्ञांची बैठक

    शहरातील सर्व बालरुग्णालयात 25 टक्के बेड आरक्षित करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

    तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने आयुक्तांकडून नियोजन

    रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्या टप्प्याने बेड ची संख्या वाढवण्याचा निर्णय

    50 पेक्षा जास्त बेड असलेल्या हॉस्पिटलने स्वताचे ऑक्सिजन प्लांट उभारावे

  • 12 May 2021 07:48 AM (IST)

    18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आज बंद; 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

    पिंपरी चिंचवड

    -18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आज बंद; 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

    -शासनाकडून महापालिकेला ‘कोविशिल्ड’ लसीचे केवळ 15 हजार 500 डोस प्राप्त

    -शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज पालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही

    -फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्यात येणार

  • 12 May 2021 07:47 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील मंचर गावामध्ये रहिवाशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश करायचा असेल तर कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

    आंबेगाव,पुणे

    -आंबेगाव तालुक्यातील मंचर गावामध्ये रहिवाशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश करायचा असेल तर कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

    –आरटीपीसीआर चाचणी न करता मंचर ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करणाऱ्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटांईन करण्यात येणार

    -मंचर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठकीत निर्णय

    -आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत 11345 रुग्ण कोरोना बाधित त्यामधील 10297 रुग्ण कोरोना मुक्त तर 231 रुग्णांचा मृत्यू तालुक्यातील सद्यस्थितीला 820 सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत

  • 12 May 2021 07:47 AM (IST)

    पीएम केअर फंडातून नागपूरला मिळेलाले काही व्हेंटिलेटर्स पडतात बंद

    – पीएम केअर फंडातून नागपूरला मिळेलाले काही व्हेंटिलेटर्स पडतात बंद

    – मेडीकल हॅास्पीटलला मिळालेले व्हेंटिलेटर्स बंद पडत असल्याच्या तक्रारी

    – व्हेंटिलेटर्स बंद पडून रुग्णाला ॲाक्सीजनचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार

    – मेयो रुग्णालयाला मिळालेल्या १३० पैकी १३ व्हेंटिलेटर्स बंद असल्याची माहिती

  • 12 May 2021 07:13 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यासाठी 50 हजार डोज लसीचा पुरवठा

    – नागपूर जिल्ह्यासाठी 50 हजार डोज लसीचा पुरवठा

    – अर्ध्या लसी नागपूर ग्रामीणमध्ये पाठवणार

    – लसीचा पुरवठा झाल्याने ४५ वर्षे वयोगटावरील लसीकरणाला येणार वेग

    – काल नागपूरला १२४ मेट्रीक टन ॲाक्सीजनचा साठा प्राप्त झाला

    – आज रात्री उशीरा ट्रेनने चार टॅंकर ॲाक्सीजन ओडीसावरुन येणार

    – तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाचा जनजागृतीवर भर

  • 12 May 2021 07:06 AM (IST)

    वसईवि-रार महापालिका हद्दीत गेल्या 24 तासात 461 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    वसई-विरार कोरोना अपडेट –

    गेल्या 24 तासात 461 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    तर आज दिवस भरात 08 जणांचा मृत्यू ….

    743 जणांनी केली कोरोनावर मात…

    वसईवि-रार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 60,750

    कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 48,947

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या 1215

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 10588

  • 12 May 2021 06:37 AM (IST)

    गेल्या 5 दिवसात विनाकारण घराबाहेर पडणार्‍या आणि नियमभंग करणार्‍या तब्बल 23 हजारांहुन अधिक पुणेकरांवर कारवाई

    पुणे

    गेल्या 5 दिवसात विनाकारण घराबाहेर पडणार्‍या आणि नियमभंग करणार्‍या तब्बल 23 हजारांहुन अधिक पुणेकरांवर पोलीस कारवाई

    सकाळी 11 नंतरही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांवर कारवाई

  • 12 May 2021 06:36 AM (IST)

    पुणे महापालिका सुरु करणार ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मोहीम

    पुणे

    पुणे महापालिका सुरु करणार ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मोहीम

    अनाथाश्रम, एडग्रस्त मुले, दिव्यांग, वृद्धाश्रम, आजारी व्यक्ती आदी असहाय घटकांना थेट त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले जाणार

    त्याकरिता स्पेशल बस तयार करण्यात आल्या असून या मोहिमेला देण्यात आलं ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ असे नाव

    राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर हा उपक्रम सुरू केला जाणार

    अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली माहिती

  • 12 May 2021 06:35 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 40,956 नवे कोरोनाबाधित, तर 71,966 रुग्णांना डिस्चार्ज

    राज्यात गेल्या 24 तासांत 40956 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

    गेल्या 24 तासांत नवीन 71966 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत

    एकूण 4541391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

    राज्यात एकूण 558996 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

    राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.67% झाले आहे

    अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • 12 May 2021 06:33 AM (IST)

    ठाणे शहरात गेल्या 24 तासांत 723 नवे रुग्ण

    ठाणे :

    #गेल्या 24 तासांत 723 रुग्ण कोरोनातून झाले बरे # गेल्या 24 तासांत 290 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,24,801 इतकी आहे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 1,17,866 इतके रुग्ण आहेत # 5,151 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # गेल्या 24 तासांत 8 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,784 जणांचा मृत्यू झाला

    # मागील 24 तासात एकूण 4,260 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 290 ( 6.81% ) कोरोना बाधित झाले आहेत

Published On - May 12,2021 9:31 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.