Maharashtra Lockdown News LIVE : अकोल्यात दिवसभरात 231 नवे कोरोनाबाधित रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल”, असं फडणवीस म्हणाले.
कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण,बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या
वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
अकोल्यात दिवसभरात 231 नवे कोरोनाबाधित रुग्ण
अकोला कोरोना अपडेट
आज दिवसभरात 231 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…
1222 अहवाला पैकी 991 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत…
ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 31394 झाला आहे….
आज दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला आहे….
*कोरोनामुळे आतापर्यंत 528 जणांचा मृत्यू …
आज दिवसभरात 330 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…
*तर 27093 जणांनी कोरोनावर मात केली आहे….
*उपचार घेत असलेले रुग्ण 3773 आहेत……
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 657 नवे कोरोनाबाधित रुग्ण
सांगली कोरोना अपडेट :
जिल्ह्यात आज दिवसभरात 657 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 10 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1862 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 4431 वर
तर उपचार घेणारे 265 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 50444 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 56737वर
-
-
लॉकडाऊन विरोधात महाराष्ट्रातील नाभिक समाज आणि सलून पार्लर व्यावसायिक यांचा आंदोलनाचा पवित्रा
राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज आणि सलून पार्लर व्यावसायिक बारा बलुतेदार कामगार तसेच कलाकार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार,
– सलून व पार्लर व्यवसायिक बारा बलुतेदार कलाकार कामगार दुकानदार यांचा संताप अनावर होणार,
– हाॅटेल सुरू भाजीपाला सुरू छोट्या-मोठ्या हातगाड्या सुरू सर्वांना मदत जाहीर,
– मात्र सलून व पार्लर व्यवसायिकांनी व बारा बलुतेदार कलाकार कामगार यांनी सरकारचं काय घोडं मारलं ? सलून असोसिएशनचा सवाल
– पुन्हा सलून व पार्लर व्यवसायिकांवर बारा बलुतेदार कारागीरांवर व कलाकारांवर मोठा अन्याय,
-
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात दिवसभरात तब्बल 197 रुग्ण
मुक्ताईनगर तालुक्यात आज कोरोनाचे 197 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण मुक्ताईनगर तालुक्यात आज आढळल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे
मुक्ताईनगर तालुक्यात आज 197 कोरोनाचे रुग्ण आढळले तर आतापर्यंत आढळलेली कोरोना रुग्ण संख्या 3290 तर आतापर्यंत 2696 रुग्णांनी मात केली आतापर्यंत 46 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे मुक्ताईनगर तालुक्यात 548 अॅक्टिव आहेत
-
उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचा स्फोट, दिवसभरात तब्बल 590 नवे रुग्ण
उस्मानाबाद : कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 590 रुग्ण व 07 मृत्यू तर 224 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 307, तुळजापूर 40,उमरगा 74, लोहारा 35, कळंब 36, वाशी 21, भूम 42 व परंडा 35 रुग्ण
24 मार्च – 176 25 मार्च – 174 26 मार्च – 155 27 मार्च – 224 28 मार्च – 184 29 मार्च – 239 30 मार्च – 242 31 मार्च – 253 01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590
ग्राफिक्स –
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4940 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद – 1 लाख 77 हजार 613 नमुने तपासले त्यापैकी 26 हजार 467 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 20.24 टक्के
20 हजार 884 रुग्ण बरे 79.99 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 643 तर 2.44 टक्के मृत्यू दर
-
-
मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर फडणवीसांंची पहिली प्रतिक्रिया, राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल”, असं फडणवीस म्हणाले.
कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण,बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या
वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
-
गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर 370 नवे रुग्ण
गडचिरोली : जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधिंताचा मृत्यू झाला. तसेच जिल्हयात 370 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 108 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12952 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10854 वर पोहचली. तसेच सद्या 1911 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 157 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. असे महिला व पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.99 टक्के तर मृत्यू दर 1.21 टक्के झाला.
-
मुख्यमंत्री राज्यात आठ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता : प्रविण दरेकर
“मुख्यमंत्री आठ दिवांसाचा लॉकडाऊन करतील, अशी शक्यता आहे. अनेकांची पंधरा दिवसांची मागणी आहे. पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. व्यापारी, दुकानदार रस्त्यावर उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी महत्त्वाचा प्लॅन द्या, असं सांगितलं. मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषण करत असतील तर त्यांचा त्याबाबतचा प्लॅन कदाचित तयार असतील. येत्या एक-दोन दिवसात ते घोषणा करतील, ते कधी कृतीत येईल याची आम्ही वाट बघतोय
-
मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार? छगन भुजबळ म्हणतात…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. यामुलाखतीत त्यांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जाईल?
मला याबाबत कल्पना नाही. कारण मी नुकताच नाशिक येथून मुंबईला आलो आहे. मला वाटतं की, मुख्यमंत्री उद्या किंवा परवा लॉकडाऊन लागू करु शकतात. आज रात्रीच ते लॉकडाऊ लागू होणार अशी घोषणा करणार नाही.
किती दिवसांचा लॉकडाऊन लागू शकतो?
मागच्या पंधरा दिवसात ब्रेक द चेन अंतर्गत आणला त्याअंतर्गत रुग्णांचं प्रमाण कमी होतंय. हे प्रमाण शुन्यवर आणायचं आहे. त्यासाठी काही दिवस कडक निर्बंध घालावे लागतील. सरकार जे निर्णय घेत आहे तो योग्य आहे. थोडे दिवस लोकांनी कळ सोसली पाहिजे. लॉकडाऊन होणार म्हणून लोकांनी आधीच खरेदी करुन ठेवली आहे. याशिवाय अन्नधान्याची दुकाने सुरुच राहतील.
लोकांनी काही दिवस घराबाहेर पडू नका. संचारबंदीत बाहेर फिरणं चुकीचं आहे. नंतर पोलिसांनी लाठी उचलली तर काठी उचलली म्हणणार. सध्या आरोग्य कर्मचारी जीव मुठीत घालून काम करत आहे. त्यांच्या मेहनतीसाठी तरी थोडे दिवस घरी थांबा. सगळं आता हाताच्या बाहेर चाललं आहे. त्यामुळे सगळ्यांनी घरात थांबावं.
विरोधी पक्षाने संयम पाळावा का?
अजूनतरी चार-पाच दिवसांपासून आपण लॉकडाऊन होईल, असं सांगतोय. त्यामुळे काही मजूर परराज्यात जात आहेत. लोक जीवनाश्यक वस्तूंची खरदी करत आहेत. एवढी चर्चा झाल्यानंतर आठ दिवसांचा लॉकडाऊन झाला तर काय फरक पडणार आहे. मागचा लॉकडाऊन किती भयानक होता. रात्री नऊ वाजता भाषण आणि सकाळी लॉकडाऊन. त्यावेळी विरोधकांनी तक्रार केली नाही. मग आता का? आपले लोक जगले पाहिजेत याला प्राधान्य दिलं पाहिजे. राजकारण करायचंय, ते कुणासाठी करायचंय? जनतेसाठीच ना. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे.
-
नागपुरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार
नागपूरमधील कोविड रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूममध्ये महापौर, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ड्रग्स डिलर असोसिएशन तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणाऱ्या रुग्णालयांना २४ तासांत परवानगी देण्याचे निर्देश यावेळी गडकरींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टॅंकर्सची संख्या वाढवण्यासाठी गडकरीजींनी पुढाकार घेतला असून याबाबत अनेक खाजगी कंपन्यांशी बोलणे करून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मागवण्यात आला आहे.
नागपूरला ऑक्सिजनची कमी पडू देणार नाही, अशी हमी गडकरीजींनी दिली असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले आहे. इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरीजींनी पत्र पाठवले असून इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
-
बारामतीत ठिकठिकाणी रस्त्यांवर बॅरिगेट्स, अचानक रस्ते बंद करण्याच्या तयारीमुळे नागरीक संभ्रमात
बारामती : बारामतीत ठिकठिकाणी रस्त्यांवर बॅरिगेट्स. शहरातील अनेक भागांमधील रस्ते बंद करण्याची तयारी. बारामती नगरपरिषद आणि पोलिस यंत्रणेकडून लॉकडाऊनची तयारी? अचानक रस्ते बंद करण्याच्या तयारीमुळे नागरीक संभ्रमात
-
नांदेडमध्ये पावसाची जोरदार हजेरी
नांदेड – अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, नांदेडसह काही तालुक्यात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, 15 ते 20 मिनिटे पावसाचा जोर
-
अंबरनाथमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा
अंबरनाथ :
अंबरनाथमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा
रेमडेसिविर मिळत नसल्यानं HRCT स्कोअर १५ च्या पुढे असलेल्यांना घेणं पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरनं केलं बंद
तर खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर सोबतच ऑक्सिजनचाही निर्माण झाला तुटवडा
त्यामुळे ५०-६० टक्क्यांपेक्षा जास्त लंग्ज इन्फेक्शन असलेल्या रुग्णांवर उपचार करणं शक्यच नसून आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन झालं हतबल
-
रमजानसाठी राज्य सरकारची नियमावली जारी, घरीच नमाज पठण करण्याचं आवाहन
रमजानसाठी राज्य सरकारची नियमावली जारी, धार्मिक स्थळी गर्दी न करण्याचं आवाहन, तसेच घरीच नमाज पठण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इफ्तार पार्टी आणि खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला नियमावली बनवण्याचे आदेश दिले आहेत.
-
येवला तालुक्यात दिवसभरात 106 रुग्णांचा मृत्यू
येवला :- कोरोनाबाधित 106 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
आतापर्यंत 101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील कोरोनबधितांची एकूण संख्या पोहचली 2719
कोरोनावर 2185 जणांची कोरोनावर मात
उर्वरित 433 रुग्णांवर उपचार सुरु
-
चंद्रपूरमध्ये कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 1010 नवे रुग्ण
चंद्रपूर : गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार, 4370 नमुने तपासणीतून आतापर्यतच्या विक्रमी 1010 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 14 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 35513
एकूण कोरोनामुक्त : 28448
ऍक्टिव्ह रुग्ण : 6549
एकूण मृत्यू : 516
एकूण नमूने तपासणी : 308868
-
नाशिकमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन रणकंदन
नाशिक : खाजगी रुग्णालयांना रेमडेसिव्हीर मिळत नसल्याने संताप
– येत्या आठ दिवसात मुबलक रेमडेसिव्हीर साठा न मिळाल्यास काम करणं कठीण
– मनुष्यबळ आहे मात्र रेमडिसिव्हर आणी ऑक्सिजन मिळत नसल्याने हॉस्पिटल चालक संतप्त
– शहरातील हॉस्पिटल चालक डॉकंटरांची पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला आर्त हाक
-
सोलापुरच्या ग्रामीण भागात तब्बल 925 नवे रुग्ण, 12 रुग्णांचा मृत्यू
सोलापूर : ग्रामीण भागात आज कोरोनाचे 925 रुग्ण आढळले
तर 12 जणांचा कोरोनाने मृत्यू
ग्रामीण भागातील 5751सक्रिय रुग्णावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
-
लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार घराकडे परतायत, पुणे स्टेशनवर परप्रांतीय कामगारांची गर्दी
लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार घराकडे परतायत,
– पुणे स्टेशनवर परप्रांतीय कामगारांची गर्दी,
– मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेक कामगार अडकून पडले होते,
– कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची कामगारांना भीती
-
वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 296 नवे रुग्ण
वाशिम कोरोना अपडेट :
आज पुन्हा आढळले 296 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत
तर 234 रुग्ण झालेत कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 37 दिवसात एकूण 55 रुग्णांचा मृत्यू तर मागील 12 दिवसात आढळले 3127 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 19697
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2484
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 16987
आतापर्यंत एकूण मृत्यू – 211
-
कोरोनाचं बोगस निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या टोळीला अटक
मीरा भाईंदर:- कोरोनाचा बोगस निगेटिव्ह रिपोर्ट काढून गुजरात घेवून जाणारे ट्रॅव्हल्स मालकासह 33 जणांना काशीमिरा लोकल क्राईम ब्रांचने अटक केली आहे. महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना अनेक राज्य निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट शिवाय प्रवेशबंद केला आहे. त्याकरिता अनेक ठिकाणी कोरोनाच्या बोगस निगेटिव्ह रिपोर्ट काढण्यासाठी टोळी सक्रिय आहे. अशाच एका टोळीला काशीमीरा लोकल क्राईम ब्रांचने अटक केली आहे.
-
नागपुरात कोरोनाचा हाहा:कार सुरुच, दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू, तर 6826 नवे कोरोनाबाधित
नागपूर –
नागपुरात आज कोरोना मुळे 65 जणांचा मृत्यू
6826 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
तर 3518 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 291043
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 224078
एकूण मृत्यू संख्या – 5903
-
नाशिकमध्ये FDA कडून खाजगी हॉस्पिटलला रेमडेसिव्हरची खैरात, छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप
नाशिक ब्रेकिंग
FDA कडून खाजगी हॉस्पिटलला रेमडेसिव्हीरची खैरात
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा खळबळ जनक आरोप
एकाच हॉस्पिटलला दिले एका दिवसात तब्बल १००० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन
८६ रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला दिले तब्बल एक हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन
भुजबळांच्या चौकशीत आली धक्कादायक माहिती समोर
नाशिक जिल्ह्यात FDA कडून करण्यात आलेल्या असमान वाटपामुळे जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा ?
भुजबळांच्या दणक्यानंतर प्रशासन सतर्क
भुजबळ यांची मायलॉन कंपनी व्यवस्थापनाशी थेट चर्चा
भुजबळांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये उद्या येणार 7000 रेमडेसिव्हीर इंजेक्शन
-
यवतमाळ जिल्यात आज कोरोनाचा ब्लास्ट, 953 नवे बाधि, तर 23 रुग्णांचा मृत्यू
यवतमाळ –
यवतमाळ जिल्यात आज कोरोनाचा ब्लास्ट तब्बल 953 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह, तर 23 जणांचा मृत्यू जिल्ह्यात एकूण सक्रीय रुग्णसंख्या 3786
एकूण रुग्ण संख्या 35591 एकूण मृत्यू संख्या 782 जिल्याचा पॉझिटिव्ह रेट 11.12 मृत्यू दर 2.20
-
लॉकडाऊनचे संकेत मिळाल्यानंतर डी मार्ट, सुपर स्टोअरकडे नागरिकांची धाव
नवी मुंबई :
लॉकडाऊनचे संकेत मिळाल्यानंतर डी मार्ट, सुपर स्टोअरकडे नागरिकांची धाव
डी मार्ट, सुपर स्टोअर बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा
खारघरच्या डिमार्ट बाहेर 500 मीटरपर्यंत रांग
सोशल डिस्टन्सचा फज्जा उडू नये म्हणून डी मार्टकडून विशेष अंतरावर मार्क
डी मार्टच्या प्रतिनिधी कडून 5 ते 10 लोकांनाच एन्ट्री
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
लॉकडाऊनबाबत महत्त्वाची अपडेट, आता वीकेंड लॉकडाऊनपेक्षाही कडक निर्बंध, मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु झालीय, या बैठकीत वीकेंड लॉकडाऊनपेक्षाहील कडक निर्बंध लागू करण्याच्या विचारात मुख्यमंत्री आहेत, याबाबत आज संध्याकाळी सात वाजता नियमावली जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली
-
…तर आम्हाला लॉकडाऊन मान्य नाही : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : “एक वर्षांपूर्वी डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. मात्र, यातील फुटकी कवडी ही कामगारांना मिळाली नाही. कोरोना विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवली पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटित कामगारांना काहीच पॅकेज वर्षभरात दिलं नाही. महिनाभर लॉकडाऊन करणार असाल, रेशन, किराणा, भाजी मोफत देऊ अशी घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करणार असाल तर आम्हाला मान्य नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ऑन एनआयएचे शुक्ला यांच्या बदलीवर :
संशय व्यक्त करणाऱ्या इतका मी तज्ञ नाही (हसन मुश्रीफ यांना टोला)
ही रूटीन बदली आहे. ती तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती.
आपल्याकडे खूप हुशार लोक आहेत त्यांनी सांगाव बदली काय असते ते
ऑन लॉकडाऊन
काल एक चांगला मेसेज पाठवला आहे. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल ( मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उडवली खिल्ली)
-
रायगडमध्ये मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकले
रायगड : रोहा शहरा लगत हनुमान टेकडीवर मोठ्या प्रमाणात औषधांसह मेडिटल वेस्ट सामान फेकले. विनावापर असणारा साठा, किवां मुदनबाह्य ( expiry date) साठा उघड्यावर फेकण्यास कायद्याने मनाई. तरीही रोहा शहराबाहेर रोहा – मुरुड मार्गालगत ताबंडी बुद्रुकजवळ हनुमान टेकडीवर खोल भागात साठा फेकल्याने रायगड औषध व अन्न प्रशासनाचा भोगंळ कारभार उडकीस. वापरुन झालेले टाकाऊ मेडीकल साहीत्य, विना वापर पडून असलेले औषध किंवा मेडिकल संबंधी साहीत्य आणि मुदतबाह्य साहीत्य औषध प्रशासनाच्या देखरेखीखाली एकत्र जमा करुन विल्हेवाट लावली जाते. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात मेडीकल वेस्ट रोहा शहरालगत सापडल्याने रायगडच्या औषध व अन्न प्रशासनाचा भोगंळ कारभार उघडकीस आला आहे. जंगल भागात हा साठा फेकून देण्यात आल्याने जंगलातील श्वापदे किवां मोकाट गुरे ढोरे, प्राण्यांनी हे यातील साहीत्य प्राशान केल्यास परिसरात मोठा धोका उद्भवू शकतो.
-
वसई विरारमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ
वसई विरार महापालिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. महापालिका हद्दीत सध्या 5 हजार 969 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 190 खाजगी हॉस्पिटलमध्ये तर 195 महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये असे 385 रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर 5 हजार 584 रुग्ण हे होम आयसोलेशन आणि कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांना दिवसाला 15 टन ऑक्सिजनचा साठा लागत आहे. सध्या मुबलक ऑक्सिजन साठा वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले आहे.
वसई विरार महापालिकेत 23 खाजगी तर 2 महापालिकेचे असे 25 कोव्हिड रुग्णालय आहेत. काल ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. पण तात्काळ 10 टन संध्याकाळपर्यंत आणि आज 12 टन असा 22 टन ऑक्सिजनचा साठा महापालिकेकडे आला असल्याचाही निर्वाळा महापालिकेने दिला.
-
पुण्यात चाचण्यांची संख्याही घटली, एका सेंटरवर अवघ्या 100 चाचण्या
पुणे महापालिकेच्या चाचण्यांची संख्या घटली,
दिवसाला एका सेंटरवरती होतात अवघ्या 100 च चाचण्या,
चाचण्यांअभावी अनेकांना सेंटरवरून जावं लागतंय परत,
महापालिकेनं चाचण्यांची संख्या नेमकी का घटवलीये ?
दिवसाला पालिका करते अवघ्या 2 हजार चाचण्या ….
महापालिकेकडे बेड, रेमडेसीवीरबरोबरच चाचण्यांचाही मोठा तुटवडा ….
-
रायगडमध्ये सध्या दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा
रायगड :
ऑक्सिजन साठा 1.5 KL इतका शिल्लक आहे.
दोन दिवस पुरेल.
ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले का? नाही.
ऑक्सिजन बेड 1176 शिल्लक आहे.
एकुण अॅक्टिव्ह रुग्ण 7866 त्यातील गंभीर 236.
रेमडिसिमीर चा एकुण साठा 1347 शिल्लक आहे.
-
उस्मानाबादेत सध्या एक दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा
उस्मानाबाद :
जिल्हात ऑक्सिजन किती शिल्लक : 400 सिलेंडर
किती दिवस पुरेल : 1 दिवस
ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले का? : नाही
ऑक्सिजन बेड किती शिल्लक : 1 हजार 35 बेड , 734 रुग्ण रिकामे 301
अॅक्टिव्ह रुग्ण किती आणि त्यातील गंभीर किती ? : 4 हजार 581 रुग्ण पैकी 500 गंभीर
रेमडिसिमीरचा साठा किती शिल्लक? : 560 इंजेक्शन
-
चढ्या दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
धुळे –
चढ्या दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
संपला रचून धुळे पोलिसांनी 3 तरुणांना घेतलं ताब्यात
इजनेक्शचा काळाबाजार थांबवण्यासाठी पोलीस यांची उत्कृष्ट कामगिरी
रोख रक्कमेसह घेतले ताब्यात
-
महाराष्ट्रात 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन असू शकतो : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ –
राज्यातल्या परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका
तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल
महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो
परप्रांतीय नागरिकांनी गर्दी करून रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर गर्दी करू नये
महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे
लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो
एनआयए प्रमुख शर्मांच्या बदलीची चौकशी झाली पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मार्फत ही चौकशी झाली पाहिजे
-
लॉकडाऊन करणं गरजेच आहे – अस्लम शेख
अस्लम शेख –
गेल्या आठवड्यापासून आपण मिटींग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन टास्क फोर्स निणिर्य घेऊन आपण लोकांची पण मत जाणून घेतली आहेत
ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल
लॉकडाऊन करणं गरजेच आहे
मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये की 50 टक्क्या पेक्षा जस्त्त टेस्ट केले आहेत, त्यामुळे केस जास्त आहेत
साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणार
नियमावली आज जहिर होणार
परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही आहोत
सिलेब्रिटी हॉस्पिटल अडवत आहेत का?
-
परभणी जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे
परभणी-
>>जिल्ह्यात ऑक्सिजन किती दिवस पुरेल
परभणी जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे, 8 टन ऑक्सिजनचा साठा आला आहे तो 3 ते 4 दिवस पुरेल
>>ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले का? – नाही
>>ऑक्सिजन बेड किती शिल्लक
ऑक्सिजन बेड 125 शिल्लक आहेत
परभणी जिल्ह्यात सध्या बेड उपलब्ध आहेत.
>>ऍक्टिव्ह रुग्ण किती आणि त्यातील गंभीर किती:
4518 ऍक्टिव्ह तर त्यापैकी 80 गंभीर आहेत
>>सध्या जिल्ह्यात रेमडिसिव्हीर चा तुटवडा आहे
त्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत आहे
जिल्ह्यात दर दिवसाला रेमडिसिव्हीर 200 ते 300 ची मागणी आहे
-
यवतमाळ जिल्ह्याला गेल्या दीड महिन्यापासून पालकमंत्री नाही
यवतमाळ –
यवतमाळ जिल्ह्याला गेल्या दीड महिन्यापासून पालकमंत्री नाही
कोरोनाला रोखण्यात प्रशासन कमी पडत आहे
अश्या परिस्थितीमध्ये जिल्यात गेल्या दीड महिन्यापासून पालकमंत्री नाही
बिना पालकमंत्र्याचा जिल्हा यवतमाळ आहे
जिल्ह्यात कोरोना काळात काय उपाययोजना कराव्या याच्या नियोजन प्रशासकीय स्तरावर होत असतात हे निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री नाही
संजय राठोड यांच्या राजीनाम्यापासून जिल्हा वाऱ्यावर
-
मुंबईकरांनी घरीच हा सण साजरा करावा – महापौर
गेल्यावर्षी जे संकट होत ते यंदा सुद्धा गडद आहे
हिंदू सण आहे
अगदी साध्य पद्धतीने सण साजरा करत आहोत
यंदा संकल्प केला आहे की कोरोना नष्ट होऊ दे हा संकपल अशे आहे
मुंबईकरांनी घरीच हा सण साजरा करावा
वरळीत 200 बेड सुरू केलेत
-
सातारा जिल्ह्यात 15 मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक
सातारा जिल्हा –
जिल्हा ऑक्सिजन किती शिल्लक- 15 मेट्रिक टन
किती दिवस पुरेल- लागेल तसे रोज टॅन्कर येत आहेत, तुटवडा नाही
ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले का?- नाही
ऑक्सिजन बेड किती- एकुण- 1776 बेड पैकी 860 शिल्लक
ऍक्टिव्ह रुग्ण किती आणि त्यातील गंभीर किती- 9018 (गंभीर 176)
रेमिडिसीव्हर 3 एप्रिलला 3000 आले होते मात्र शिल्लक माहिती प्रशासन देत नाही
-
वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा
वर्धा
– वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे
– दररोज पुरवठ्याच नियोजन करण्यक्त आला आहे सोबतच १५० ऑक्सिजनचे मोठे सिलेंडरचा बफर स्टॉक वेगळा ठेवण्यात आला आहे.
– जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा बाबत टंचाई नाही
– ऑक्सिजन न मिळाल्याने जिल्ह्यात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
– जिल्ह्यात सावंगी आणि सेवाग्राम या दोन वैद्यकीय महाविद्यालयाचे ऑक्सिजन बेड पूर्ण भरले आहे मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय , आर्वी उपजिल्हा रुग्णालय आणि हिंगणघाट उपजिल्हारुग्णालय येथे ऑक्सिजन बेड शिल्लक आहे.
– जिल्ह्यात १६५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे.
– जिल्ह्यात 3032 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.
– जिल्ह्यात सध्या 1200 रेमडिसिमीरचा साठा आहे.आणखी मागणी केली आहे.
-
यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा
यवतमाळ –
यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा
ऑक्सिजन साठा करण्याची व्यवस्था नसल्याने रोजच्या साठ्यावर राहावं लागतं अवलंबून
खाजगी साठी 10 मेट्रिक टन, तर सरकारी साठी 10 मॅट्रिक टन असा 20 मॅट्रिक टन चा रोजचा साठा येतो
एक दिवस आड ऑक्सिजन टॅन्कर येतो चाकण पुणे, देवळी वर्धा या ठिकाणाहून त्यावर जिल्याची गरज भागवली जाते
-
पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कोरोनाची लागण
पालघर –
पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कोरोनाची लागण
अधीक्षक यांना कोरोनाची लागन झाल्याने पोलिस मुख्यालयत खळबळ
एंटीजेन्ट टेस्टिंग अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
वसई येथील गोल्डन पार्क रुग्णालयात पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे दाखल
तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांची माहिती
-
नागपुरातील लेबर ठिय्यावर मजुरांची गर्दी, लॅाकडाऊन लागलं तर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाचा शोध
– नागपुरातील लेबर ठिय्यावर मजुरांची गर्दी
– लॅाकडाऊन लागलं तर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाचा शोध
– लॅाकडाऊनच्या काळात जगण्याची अन्नधान्य, किराण्याची सोय व्हावी म्हणून मजुरांची भटकंती
– प्रतापनगर परिसरात मजुरांची गर्दी
– काम मिळत नसल्याने मजुरांचा जगण्याचा प्रश्न
-
अखेर मालेगावला मिळाले 400 रेमडेसिव्हीर इंजेक्शन
मालेगाव –
अखेर मालेगावला मिळाले 400 रेमडेसिव्हीर इंजेक्शन
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मिळाले रेमडेसिव्हीर
भुसे यांनी रात्री सामान्य रुग्णालय, महानगरपालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल तसेच शहरातील कोव्हिड हॉस्पिटल यांना दिले 400 रेमडेसिव्हीर
इंजेक्शन मिळाल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळाला मोठा दिलासा
-
नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शनची विक्री
– नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शनची विक्री
– एक्सपायरी डेट असलेल्या जागेवर नवीन स्टिकर चिपकवून केली जातेय विक्री
– नागपूरात रेमडेसीव्हीर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात होतोय काळाबाजार,
– 899 रुपयांचे इंजेक्शन विकले जाताहेत अव्वाच्या सव्वा भावात,
– तुटवड्याच्या नावावर रुग्णांची होतोय अक्षरशः लूट,
– एक्सपायरी संपलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शन देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळ
-
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोना रुग्ण आढळले
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत
तर 97,168 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे
तर गेल्या 24 तासांत देशात 879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
एकूण कोरोना रुग्ण : 1,36,89,453 बरे झालेले रुग्ण : 1,22,53,697 सक्रिय रु्गण : 12,64,698 मृत्यू: 1,71,058 एकूण लसीकरण : 10,85,33,085
-
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचे 19 हजार 200 डोस मिळाले
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचे 19 हजार 200 डोस मिळाले
आजपासून लसीकरणाला पुन्हा सुरु होणार, आरोग्य प्रशासनाचा दावा
कोव्हिशिल्ड लसीचे डोस मिळाले, मागणीच्या केवळ १० टक्के डोस
९० हजार डोसची केली होती आरोग्य विभागाने मागणी
-
कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी, मुख्यमंत्र्यांच्या नागरिकांना शुभेच्छा
कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी! गर्दी टाळणे,मास्कचा वापर व वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना केले आहे.
कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी! गर्दी टाळणे,मास्कचा वापर व वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना केले आहे. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्य, सुख-समृद्धी, भरभराट घेऊन येवो.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021
-
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आवाक्याबाहेर
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आवाक्याबाहेर
जिल्हा महिला रुग्णालय सुद्धा पडू लागले अपूरे
त्यामुळेच जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड सेंटर म्हणुन सुरु
यापुर्वी जिल्हा शासकीय रुग्णालय होते ना्ॅन कोविड रुग्णालय
डाॅक्टर आणि परिचारकांची संख्या वाढवण्यासाठी मानधन तत्वावर भरती सुरु
-
सोलापुरात गेल्या 24 तासांत 23 कोरोना बधितांचा मृत्यू
सोलापूर –
गेल्या 24 तासांत 23 कोरोना बधितांचा मृत्यू
मृतात शहरातील 31 वर्षीय पुरुष तर पंढरपुरातील 36 वर्षीय महिलेचा समावेश
जिल्ह्यात एकूण मृत्यूचा 2131 वर
कोव्हिडबाधितांच्या वाढत्या प्रमाणाबरोबर मृत्यूमध्ये ही वाढ
शहर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 9 हजा 85 जणांवर उपचार सुरू
-
संपूर्ण लॉकडाऊन झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील
पुणे –
– संपूर्ण लॉकडाऊन झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील,
– मात्र संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही तर आम्ही दुकाने उघडू, पुणे व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा,
– पुण्यातील दुकाने बुधवारपर्यंत बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय,
– विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांचा निर्णय,
– व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांची माहिती
-
कोल्हापुरात विकेंड लॉकडाऊन काळात जिल्ह्यात 2 हजार 882 जणांवर गुन्हे
कोल्हापूर
विकेंड लॉकडाऊन काळात जिल्ह्यात 2 हजार 882 जणांवर गुन्हे दाखल
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा
दोन दिवसात वसूल केला चार लाखाहून अधिकचा दंड
विना मास्क फिरणार्या 945 जणांवर कारवाई तर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 1 हजार 9 37 जणांवर गुन्हे दाखल
-
नाशकातील रुग्णालयातील बेड पाठोपाठ आता पंचवटीतील अमरधाम देखील हाऊसफुल्ल
नाशिक –
रुग्णालयातील बेड पाठोपाठ आता पंचवटीतील अमरधाम देखील हाऊसफुल्ल
स्मशानभूमीत क्षमतेपेक्षा जास्त अंत्यसंस्कार
दिवसाला 300 च्या वर मृत्यू होत असल्याने समशानभूमीत जागेचा तुटवडा
मोकळ्या जागेत रचले जाताहेत सरण ..
पंचवटी अमरधाम मध्ये विद्युत दाहिनी सुरू करण्याच्या मागणीला जोर
-
पर्यावरण मंत्री आदीत्या ठाकरे यांची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह
– पर्यावरण मंत्री आदीत्या ठाकरे यांची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह
– लवकरच समाज माध्यमासमोर येतील, जोमाने काम करतील असं मत केलं व्यक्त
– झूमद्वारे केलं वरळी एनएससीआय इथे कोवीड रुग्णालयाचं लोकार्पण
-
हॉटस्पॉट असलेल्या सिन्नर शहरात 5 खाजगी रुग्णालयांना कोव्हिड सेंटरचा दर्जा
नाशिक –
हॉटस्पॉट असलेल्या सिन्नर शहरात 5 खाजगी रुग्णालयांना कोव्हिड सेंटरचा दर्जा
ऑक्सिजन बेड सह रेमडीसिव्हर ची देखील व्यवस्था होणार
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने थांबणार रुगणांची गैरसोय
-
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती भयावह
– नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती भयावह
– रुग्णांवरील उपचाराच्या चौकशीसाठी आ. समिर मेघे थेट कोरोना वॅार्डाच
– कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार आणि औषध मिळते?
– याची पाहणी करण्यासाठी आ. समिर मेघे थेट कोरोना वॅार्डात गेले
– रुग्णांना औषध वेळेवर मिळेल, याबाबत प्रशासनाला दिल्या सुचना
– उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांशी आ. मेघे यांनी केली चर्चा
-
रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची 17 सदस्यीय समिती गठीत
यवतमाळ –
कोरोना काळात खाजगी रुग्णालयाकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची 17 सदस्यीय समिती गठीत
जिल्ह्यातील 17 खाजगी रुग्णालयाचे ऑडिट करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला एक असे 17 ऑडिटर प्राधिकृत अधिकारी नेमले
निवासी उपजिल्हाधिकारी ललित व्हराडे यांच्या नियंत्रना खाली करणार काम
नागरिकांकडून ज्यादा दर घेतले तर तक्रार करण्याचे केले आवाहन
-
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सध्याच्या कोरोना परिस्थितीत ओढले ताशेरे
नागपूर –
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सध्याच्या कोरोना परिस्थितीत ओढले ताशेरे,
न्यायालयाने स्वतः दाखल करून घेतली जनहित याचिका
दिवसाला 900 ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होईल असा प्लांट तयार करण्या बाबत विचार करावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागपूर खंडपीठाचे आदेश,
मुख्यमंत्र्यांनी या विषयात विशेष लक्ष घालण्याच्या सूचना,
ऑक्सिजन प्लांट साठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा
या बाबत मंगळवार पर्यंत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे देण्यात आले आदेश
-
यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाची परिस्थिती भयंकर
यवतमाळ-
यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाची परिस्थिती भयंकर
जिल्ह्याचा भार असणारे शासकीय रुग्णालय फुल्ल,
ऍडमिट होण्यासाठी आलेल्या रुग्णांना बेड नाही
फिवर ओपीडीबाहेर पॉझिटिव्ह रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत झोपून
ऑक्सिजन लावलेले अनेक रुग्ण फिवर ओपीडीमध्ये बेंचवर झोपलेले एका एका रुग्णाला दाखल करण्यासाठी लागतात 2,ते 3 तास
-
नाशिक जिल्ह्यात 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत 3588 रुग्णांची वाढ
नाशिक
– कोरोनाची दाहकता कायम
– जिल्ह्यात 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत 3588 रुग्णांची वाढ
– दिवसभरात 38 जणांचा मृत्यू
– बळींची आतापर्यंतची उच्चांकी संख्या
– अवघ्या 5 दिवसात 200 बळी
– बळींची संख्या झाली 2720
– नाशिक शहर हॉटस्पॉट कायम
– दिवसभरात 1887 नवे बाधीत,13 बळी
– शहरात 1243 प्रतिबंधीत क्षेत्र
-
नागपुरात रेमडेसीव्हीरनंतर आता कोरोनाच्या इतर औषधांचाही तुटवडा
– नागपुरात रेमडेसीव्हीरनंतर आता कोरोनाच्या इतर औषधांचाही तुटवडा
– कोरोनाच्या इतर औषधांचा 30 टक्के पुरवठा कमी
– कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागते भटकंती
– फॅबी फ्लू, फेबीपीरावीर औषधांचा 30 टक्के पुरवठा कमी
– नागपूर जिल्ह्यात दररोज 6 हजारच्या आसपास पॅाझीटीव्ह रुग्ण
– सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली 57800 च्या पुढे
– रुग्ण वाढल्याने जाणवतो औषधांचा तुटवडा
-
कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर ॲाक्सिजन प्लान्ट उभारा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं मत
– कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर ॲाक्सिजन प्लान्ट उभारा
– सरकार, मनपा, जिल्हा प्रशासन, पोलिसांनी प्रभावी उपाययोजना उभारावी
– पालकमंत्र्यांनी यात लक्ष घावे, मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधावा
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं मत
– सरकारी रुग्णालयात पोलीस दल तैनात करावे, खाजगी रुग्णालयात पेट्रोलिंग करावी
– हॅास्पीटल तोडफोडीच्या घटनेनंतर न्यायालयाचे आदेश
-
अमरावतीत सण – उत्सवात पोलिसांचा गुन्हेगारांवर वॉच
अमरावती –
गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, वीर जयंती, रामनवमी आणि रमजान ईद आदी सणउत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये , यासाठी गर्दी टाळावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिस्ट्रीसिटर आणि रेकॉर्डधारी गुन्हेगारांवर कारवाई करा , असे निर्देश पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी गुन्हेविषयक बैठकीत अधिकाऱ्यांना दिले . त्यामुळे आगामी सण – उत्सवात पोलिसांचा गुन्हेगारांवर वॉच राहणार आहे
-
नागपूर वाडीतील वेलट्रीट हॅास्पीटलच्या आगीत चार जणांच्या मृत्यूचं प्रकरण, पहिला गुन्हा दाखल
– नागपूर वाडीतील वेलट्रीट हॅास्पीटलच्या आगीत चार जणांच्या मृत्यूचं प्रकरण
– वेलट्रीट हॅास्पीटलवर पहिला गुन्हा दाखल
– मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
– वेलट्रीट हॅास्पीटलवर आणखी दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता
– ९ एप्रिलला रात्री वेलट्रीट हॅास्पीटलमघ्ये लागली होती आग
-
नागपुरात गेल्या 24 तासांत 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नागपुरात गेल्या 24 तासांत 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
दिवसभरात 5 हजार 661 नवे कोरोना रुग्ण आढळून आले
तर 3 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले
नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 84 हजार 217 वर पोहोचली
2 लाख 20 हजार 560 जण कोरोनामुक्त झाले
आतापर्यंत 5 हजार 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
-
पुणे शहरात गेल्या 24 तासांत 4 हजार 849 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
पुणे शहरात गेल्या 24 तासांत 4 हजार 849 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
तर 3 हजार 896 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत
पुण्यात आज मृतांचा आकडा चिंताजनक बनलाय
आज दिवसभरात पुण्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय
त्यातील 12 मृत रुग्ण पुण्याबाहेरील होते
पुण्यात सध्या 53 हजार 376 सक्रिय रुग्ण आहेत
त्यातील 1 हजार 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे
-
मुंबईत गेल्या 24 तासांत 6 हजार 905 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
मुंबईत गेल्या 24 तासांत 6 हजार 905 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
9 हजार 37 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृतांपैकी 36 जणांचा काही दीर्घ आजार होते
मृतांमध्ये 30 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश
#CoronavirusUpdates 12-Apr, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/m5R1gREVeZ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 12, 2021
-
राज्यात गेल्या 24 तासांत 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले
राज्यात गेल्या 24 तासांत 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले
तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली
दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में 51,751 नए #COVID19 मामले, 52,312 रिकवरी और 258 मौतें दर्ज़ की गई।
कुल मामले: 34,58,996 कुल रिकवरी: 28,34,473 मृत्यु: 58,245 सक्रिय मामले: 5,64,746 pic.twitter.com/6KS9eEQnWM
— ANI_HindiNews (@AHindinews) April 12, 2021
Published On - Apr 13,2021 10:53 PM