महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE
शिर्डी :
पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त
रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी
वाहनधारकांना थांबवून पोलिसांकडून विचारपूस
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना सूचना
नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस गस्त.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर विनाकारण फिरू नका, पोलिसांकडून आवाहन
निफाड कोरोना अपडेट :
– नविन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 357
– आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 280
निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 10058
आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 7317
सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2461
उस्मानाबाद कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 613 रुग्ण व 14 मृत्यू तर 383 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 388, तुळजापूर 33,उमरगा 30, लोहारा 31, कळंब 45, वाशी 29, भूम 30 व परंडा 27 रुग्ण
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242
31 मार्च – 253
01 एप्रिल – 283
02 एप्रिल – 292
03 एप्रिल – 343
04 एप्रिल – 252
05 एप्रिल – 423
06 एप्रिल – 415
07 एप्रिल – 468
08 एप्रिल – 489
09 एप्रिल – 564
10 एप्रिल – 558
11 एप्रिल – 573
12 एप्रिल – 680
13 एप्रिल – 590
14 एप्रिल – 613
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5156 अॅक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद – 1 लाख 79 हजार 586 नमुने तपासले त्यापैकी 27 हजार 080 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 20.62 टक्के
21 हजार 267 रुग्ण बरे 79.94 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 657 तर 2.43 टक्के मृत्यू दर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विकेंड लॉकडाऊन नंतर शहापूर मध्ये कोरोना रुग्ण संख्येत आज मात्र सेंच्युरीच गाठली आहे लॉक डाऊन काळात शहापूर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत आज सर्वात जास्त वाढ झाली आहे.
शहापूर तालुक्यात आज एकूण 101 रुग्ण हे कोरोना बाधित असून 431 रुग्णांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत सुद्धा कमालीची वाढ झाली असून 531 रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत.
आतापर्यंत 133 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे
आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 4650 वर पोहचली आहे
आतापर्यंत 3986 रुग्ण हे बरे होऊन घरी सुखरूप परतलेले आहेत.
आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संखेमध्ये शहापूर नगर पंचायत हद्दीमधील 10 रुग्ण असून शहापूर ग्रामीण भागांमधील 91 रुग्ण आहेत. तर दोन्ही मिळून एकूण 87 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत
सांगली कोरोना अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 762 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 10 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1872 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 4869 वर
तर उपचार घेणारे 314 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 50758 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 57499 वर
ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट :
# आज 1,677 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,00,341 इतकी आहे
# आज 1,519 रुग्ण कोरोनातून झाले बरे
# आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 82,147 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 82% इतकं आहे )
# 16,727 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत
# आज 6 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,467 जणांचा मृत्यू झाला
# मागील 24 तासात एकूण 9,980 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 1,677 ( 11.11% ) कोरोना बाधित झाले आहेत
मालेगावमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
* रात्री १ वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक
* लिक्विड ऑक्सिजन कमरतेमुळे येतेय अडचण ..
* खासगी रुग्णालयात तुडवडा ..
* रुग्ण व नातेवाईकांचा जीव टांगणीला ..
* रात्रीतून पुरवठा न झाल्यास परिस्थिती होणार गंभीर ..
चंद्रपूर : राज्यभरात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुरू झाली पंधरा दिवसांची लॉकडाउन नियमावली, चंद्रपूर शहरातही प्रशासन आणि पोलीस सज्ज, रात्री 8 नंतर शहरातील रस्ते झाले निर्मनुष्य, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पोलीस वाहने संचारबंदीबाबत देताहेत माहिती, शहरातील शासकीय- खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने नागरिकांनी घरीच सुरक्षित राहण्याचे केले जात आज आवाहन, वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती व्यतिरिक्त पुढील पंधरा दिवस बाहेर निघू नये प्रशासनाने केले आवाहन
महाराष्ट्रात 58 हजार 952 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू, राज्यात 39 हजार 624 रुग्णांना डिस्चार्ज, पण बाधितांचा आकडा ही चिंतेची बाब
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकाने 15 दिवस 144 कलम म्हणजेच संचार बंदी लागू करून देखील रस्त्यावर विनाकारण वाहनधारक रस्त्यावर दिसत आहे. सरकारच्या नियमावली चे कुठेही पालन करताना नागरिक दिसत नाही अत्यावश्यक सेवा वगळता अनेक वाहने रस्त्यावर दिसत आहे दुचाकी ,चारचाकी असो या इतर वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे कोणाला कुठलाही भान नाही पोलिस हे बेरेटिंग करून अनेकांची विचारपूस करत आहे ..अडवायचे तरी कोणाला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे..मात्र अनेक कारणे देऊन वाहन धारक निघत आहे ..गेल्या 24 तासाचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी..
सोलापूर :
सोलापूरात आज 976 जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह
तर 25 जणांचा कोरोनाने मृत्यू
शहरातील 348 जणांचा तर ग्रामीण भागातील 669 जणांचा अहवाल पॉजिटीव्ह
मृतात ग्रामीण भागातील 17 तर शहारातील 8 जणांचा समावेश
शहर जिल्ह्यातील 9776 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू
जळगाव कोरोना अपडेट :
कोरोना रुग्ण -984
कोरोनामुक्त -1195
सध्या रुग्ण–11589
मृत्यू – 21
आत्तापर्यंत
कोरोना रुग्ण -105136
कोरोनामुक्त -91699
मृत्यू -1848
वर्धा कोरोना अपडेट :
– जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांचा उच्चांक
– जिल्ह्यात आज आढळले तब्बल 754 रुग्ण
– मृत्यूदरातही वाढ , आज तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू
– जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली 3471 वर
– जिल्ह्यात आतापर्यंत 24228 रुग्णांची नोंद तर 20242 रुग्ण कोरोनामुक्त
– जिल्ह्यात एकूण 515 रुग्णांचा मृत्यू
वाशिम : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून मुख्यमंत्री यांनी लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी अस आवाहन पंतप्रधान यांना केलं होत..आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांना पत्राद्वारे ऑक्सिजन अभावी राज्याची परिस्थिती गंभीर झाली असून राज्याची खासदार म्हणून आपल्याकडे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी देण्यात यावी अशी पत्राद्वारे करण्यात आली आहे…
पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी…
शहरात आज कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक…
दिवसभरात 4 हजार 208 रुग्ण वाढ तर 4 हजार 800 जण कोरोनामुक्त…
मात्र दिवसभरात 66 जणांचा कोरोनाने मृत्यू यातील 20 जण हे पुण्याबाहेरील…
शहरात 1158 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु.
पुणे शहरात एकूण 3 लाख 44 हजार कोरोनाबधित रुग्ण
गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 666
आज झालेले मृत्यू – 20
आज बरे झालेले – 312
तालुकानुसार रुग्णसंख्या :
गोंदिया—————373
तिरोडा—————92
गोरेगाव—————40
आमगाव————–52
सालेकसा————-12
देवरी——————50
सडक अर्जुनी ———–22
अर्जुनी मोरगाव——–18
इतर राज्य————–03
एकूण रुग्ण – 22802
एकूण मृत्यू – 265
एकूण बरे झालेले – 16844
एकूण उपचार घेत असलेले – 4888
पुणे कोरोना अपडेट :
– दिवसभरात ४२०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४८९५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
– ११५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४४०२९.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५३३२६.
– एकूण मृत्यू -५९०२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २८४८०१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१३२५.
मुंबईच्या चेंबूर परिसारात वाशीनाका येथे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा
भारतनगर एमएमआरडीए वसाहतीत हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर
– लाॅकडाऊनपूर्वीची खरेदी करताना नियमांचा भंग
नागपुरात आज 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
5993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तर 3993 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 297036
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 228071
एकूण मृत्यूसंख्या – 5960
चंद्रपूर: गेल्या 24 तासात कोरोना बाधितांचा उच्चांक
दिवसभरात तब्बल 1235 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 13 जणांचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 36748
एकूण कोरोनामुक्त : 28780
सक्रिय रुग्ण : 7439
एकूण मृत्यू : 529
एकूण नमूने तपासणी : 312440
नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
पदवी, पदव्यूत्तर, व्यावसायिक अभ्याक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
12 एप्रिलपासून सुरु झालेल्या आणि 15 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
5 मे नंतर परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार होतील
मुल्यमापन मंडळाच्या तातडीच्या बैठकीत झाला निर्णय
मुंबई : लॉकडाऊन संदर्भात पोलीस महासंचालक संजय पांडे पत्रकार परिषदेत बोलत आहेत. जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत लाठीचा वापर होणार नाही. मात्र, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा वापर होईल. होमगार्ड, पोलीस हे मिळून काम करत आहेत. जवळ जवळ 13 हजार होमगार्ड, 22 एसआरपीएफच्या तुकड्या सज्ज आहेत. आम्ही सर्व ग्रामपंचायत, मनपा यांच्याशी संपर्क साधून सध्याच्या संचारबंदीच्या परिस्थितीला हाताळणार आहोत.
मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी काळजी घ्यावी. सर्वांनी मास्क वापरावे, हात धुवावे. हे नियम पाळले नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होईल. आपल्यासाठी हे नवे नाही. मात्र, सर्वांनी सहकार्य केले तर आपल्या राज्यात 15 दिवसांच्या आधी कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होतील. पोलिसांकडे अधिकार आहेत. पण आम्ही त्याचा वापर कमीत कमी करणार आहोत. मात्र, लोकांनी सहकार्य केलं नाही. अति उत्साहीपणा दाखवला तर आम्हाला कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या कामवर खूत तणाव आहे. मागील वेळी बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना जवळजवळ 81 टक्के लोकांना लस दिलेली आहे. त्यामुळे आमच्या पोलीस दलातील जवळजवळ सर्व पोलीस कर्तव्य बजावण्यासाठी सक्षम आहोत.
पोलीस दल म्हणून कोरोना महामारीला थोपवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करु. यामध्ये आम्हाला लोकांच्या मदतीची गरज आहे. सर्व लोकांना नियम आणि अटी माहिती आहेत. मी पोलिसांकडून कोणालाही त्रास देणार नाही, याची हमी देतो. मात्र, नागरिकांना अशा परिस्थितीत सहकार्य करणे अपेक्षित आहे.
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
दिवसभरात नवे कोरोना रुग्ण –
दिवसभरात कोरोनामुक्त रुग्ण -3352
दिवसभरात मृत्यू -45
एकूण कोरोना रुग्ण -1,73319
एकूण कोरोनामुक्त -1,48628
एकूण मृत्यू -2249
सोलापूर : ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू
मृतात बारा पुरुष तर पाच स्त्रियांचा समावेश
दिवसभरात 669 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
6004 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमी अपुरी
कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 जणांवर उस्मानाबादेत अंत्यसंस्कार,
8 मृतदेह जागा नसल्याने अंत्यसंस्कारसाठी प्रलंबित,
उरलेल्या 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार,
आजवर 643 मृत्यू तर सध्या 4 हजार 940 सक्रिय रुग्ण
येवला : येवल्यात दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू
दिवसभरात एकूण 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आतापर्यंत 103 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यात कोरोनबधितांचा आकडा पोहोचला 2774 वर
आतापर्यंत 2205 जण कोरोनामुक्त
सध्या 468 जणांवर उपचार सुरु
नागपूर – परप्रांतीय नागरिकांची खासगी बसस्थानकावर गर्दी
मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमधील नागरिक निघाले आपापल्या राज्यात
खासगी बसेचे तिकीट मिळविण्यासाठी मोठीगर्दी
रोजगार बंद झाल्यास काय खाणार, कुठे राहणार, असे प्रश्न उपस्थित झाल्याने परप्रांतीय निघाले आपापल्या गावाला
सोलापूर- आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 99 जणांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
त्यातील 20 हजार 300 जणांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
54 हजार 688 कोमॉरबीड रुग्णांपैकी 996 जणांनीच घेतला दुसरा डोस
वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर
रिसोड तालुक्यातील गोवर्धन इथं आज 123 जण कोरोनाबाधित
आतापर्यंत एकूण 330 जण कोरोनाबाधित
सर्व गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर
सर्वांची आरोग्य तपासणी व लसीकरण सुरू
जिल्ह्यात उकळीपेन -100 ,शेलगाव बोदाडे -100 , चिखली इथं 44 रुग्ण कोरोनाबाधित
मुंबई : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी येथील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
“गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल,” असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचा पुरवठा
१९ हजार कोरोना लसीचे डोस आरोग्य यंत्रणेला मिळाले
रत्नागिरी शहरातील कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात
लाॅक डाऊनच्या आधी लसीकरणासाठी रत्नागिरीकांची आरोग्य केंद्रावर गर्दी
दोन दोन तास थांबून कोरोनाची लस घेण्यासाठी रत्नागिरीकरांचा रांगा
शहरी भागानंतर उद्या ११२ हून अधिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला होणार सुरवात
हाॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक
अंधेरीचा एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला केली अटक
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath says that he has tested positive for #COVID19. He is in self-isolation. pic.twitter.com/YBicvmVtO5
— ANI (@ANI) April 14, 2021
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath says that he has tested positive for #COVID19. He is in self-isolation. pic.twitter.com/YBicvmVtO5
— ANI (@ANI) April 14, 2021
सातारा
सातारा शहरातलगत असणाऱ्या यवतेश्वर घाटात अल्पवयीन युवतीची आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घटनास्थळी तालुका पोलिसांसह शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम दाखल,
मुलीचा मृतदेह काढण्याचे काम सुरु
– नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती, रुग्णांना बेड मिळत नाही
– नागपूरात मध्यप्रदेशातील कोरोना रुग्णांवर उपचार होऊ नये
– परराज्यातील रुग्णांसाठी महाराष्ट्रातील हॅास्पीटलमधील बेड वापरु नये
– आधार कार्ड पाहून कोरेना रुग्णांवर उपचार करावा
– काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी
– १४ महिने होऊनंही नागपूरात जंम्बो कोवीड रुग्णालय उभारत नाही
– मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जंम्बो कोवीड रुग्णालय उभारलं
– नागपूरात माणसं नाहीत का? आम्ही महाराष्ट्रातले रहिवाशी नाहीत का?
– काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा सरकारला सवाल
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहे, त्यांनी उपचारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करावा
सोलापूर –
शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये मोठी गर्दी
भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू आहे लॉकडाऊन
चंद्रपूर –
कोरोना रुग्णाचा बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास
24 तासांहून अधिक काळ धक्कादायकरित्या केवळ बेडसाठी प्रतीक्षा
वरोरा येथील नरहरशेट्टीवार परिवाराने व्यक्त केल्या संतप्त भावना
जिल्ह्यात कोरोना स्फोट झाल्यानंतरदेखील आरोग्य यंत्रणा ढिम्म
ना खाटा वाढल्या- ना ऑक्सिजन-ना व्हेंटिलेटर
एकतर बेड आणि सुविधा द्या नाहीतर इंजेक्शन देऊन जीव घ्या, अशी काळीज फोडणारी भाषा,
अजूनही शासकीय वैद्यकीय महा. रुग्णालयापुढे रुग्णवाहिकेत आहे वृद्ध रुग्ण
कोल्हापूर
पॅकेजमध्ये समावेश नसल्याने नाभिक समाज संतप्त
येत्या दोन दिवसात सलून व्यवसाईकांसाठी पॅकेज जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरून
कोल्हापुरातील सलून व्यवसायिकांचा इशारा
सर्वात आधी मागणी करू नये पॅकेज मिळाले नसल्याबद्दल व्यावसायिकांनी केला सरकार चा निषेध
अकोल्यात दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस अशोक वाटिका याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो
मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात येत आहे
अशोक वाटिका आज बंद ठेवण्यात आली आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बाहेरूनच अभिवादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे
आज अशोक वाटिका मध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.गणेश सोनोने,अकोला
पुणे –
– मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला राज्यमंत्र्यांनीच फासला हरताळ,
– आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली नियमांची पायमल्ली,
– चार लोकांना प्रवेश असतांनाही एकाच ठिकाणी केली गर्दी
– राज्यमंत्र्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळही उपस्थित
– पोलिसांचा आदेश झुगारून कार्यकर्त्यांनी केला प्रवेश
– मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केली होतं घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन,
– या आवाहनाला राज्यमंत्र्यांची दाखवली केराची टोपली
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करावी, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.
पुणे –
– पुणे स्टेशन परिसरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांची गर्दी,
– स्टेशन परिसरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी,
– स्टेशन परिसरात पुणे पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त,
– जागोजागी बॅरीकेटिंग करून नागरिकांना प्रवेश दिला जातोय,
– फक्त चार नागरिकांना अभिवादनासाठी प्रवेशन देण्याच्या पोलिसांच्या सूचना
सोलापूर –
सोलापुरात 781 रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध
शहरासाठी 341 तर ग्रामीण भागासाठी 440 इंजेक्शनचा समावेश
कोव्हीड रुग्णालयात आता खाटांच्या दहा टक्के रेमडीसिव्हरचा पुरवठा करण्याचा निर्णय
तर शहरातील पाच रुग्णालयात 30 जनरल 32 ऑक्सिजनचे बेड वाढवले
नवी मुंबई –
डीवायपाटील हॉस्पिटलमधील कोव्हिड रुग्ण महिलांचे हाल
हॉस्पिटल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा महिलांचा आरोप
40 महिला रुग्णांसाठी असलेल्या वॉर्ड मध्ये एकच नर्स
2 दिवस झाले मेडिसिन, इंजेक्शन, सलाईन नसल्याचे व्हिडियोत आरोप
वयोवृद्ध कोविड रुग्णांकडे स्टाफ करतय कानाडोळा
व्हिडियोच्या माध्यमातून मदत करण्याची केली विनंती
वॉर्ड मध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव
पाण्यासाठी दिवसभर ओरडावे लागते
मागितल्याशिवाय पाणी मिळतच नाही
महिलां रुग्णांनी डी वाय पाटील हॉस्पिटलचा केला पर्दाफाश
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाचे आठ ठरावधारक पॉझिटिव्ह
गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर आले पॉझीटीव्ह
निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतला होता मेळावा
मेळावा आयोजित करणारा नेताही पॉझीटीव्ह
कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
2 मे ला होणार आहे गोकुळ दूध संघासाठी मतदान
निफाड तालुका कोरोना अपडेट
नविन कोरोनाबाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 149
आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 271
निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 9701
आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 7134
सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2296
कोल्हापूर
जिल्ह्यात रेमेडेसिव्हीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन
कोविड रुग्णालय आणि केअर सेंटरना आता नियंत्रण कक्षाकडून मिळणार रेमडिसिव्हीर
इंजेक्शन ची वाढती मागणी पाहता साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न
अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी असणार नियंत्रण कक्षाचे प्रमुख
पुणे –
– पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 12 हजार 797 रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा
– सोमवारी शहर आणि जिल्ह्यात सहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा,
– तर मंगळवारी दिवसभरात ३७९७ इंजेक्शनचे वाटप नियंत्रण कक्ष मार्फत केले,
– पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला अतिरिक्त ३००० इंजेक्शन्स दिले आहेत,
– एकूण १२७९७ इंजेक्शन रुग्णालयांना वितरित करण्यात आलीत,
– इंजेक्शनचा तुटवडा आणि औषध विक्रेत्यांकडून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय.
मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर ग्राहकांची तोबा गर्दी
पाय ठेवायलाही जागा नाही
भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी
सोशल डिस्टेंसिंगचा ऊडाला फज्जा
करोना रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या घरात पोहोचला असताना करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लादले
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अशा करोना नियमांचं पालन करणं बंधनकारक
मात्र दादर भाजीमार्केटमध्ये करोनाच्या नियमांचा नागरीकांना विसर पडलाय
रत्नागिरी –
कोरोना रुग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे
गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्ण एकट्या दापोली तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तर दापोलीमध्ये गेल्या ३० तासांमध्ये ६ रूग्ण दगावले आहेत.
त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे.
– पुणे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली एक लाखाच्या घरात,
– सध्या जिल्ह्यात एकूण ९९ हजार ९७६ सक्रिय रुग्ण आहेत.
– एकूण रुग्णांपैकी २२ हजार ८२६ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत,
– जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १० हजार ११२ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत,
– एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ५७३ जण आहेत,
– पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७६५ , महागरपालिका हद्दीतील ६२३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक –
उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद
फक्त रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आदेश
जिल्हा उद्योग केंद्राचे ऑक्सिजन वितरकांना आदेश
100 टक्के ऑक्सिजन पुरवठा कोरोना रुग्णाणसाठी हॉस्पिटलला द्यावे अस आदेश
पुढील आदेश मिळेपर्यंत उद्यगांकडील रिकामे सिलेंडर प्राप्त करून घेण्याचे आदेश
नाशिक –
कोरोनाची दाहक वाढ कायम
जिल्ह्यात काल दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 3343 रुग्णांनी झाली वाढ
दिवसभरात 32 जणांचा मृत्यू
अवघ्या 3 दिवसात 106 बळी
बळींची संख्या झाली 2752
नाशिक शहर हॉटस्पॉट कायम
दिवसभरात 1853 नवे बाधीत,14 बळी
शहरात 1305 प्रतिबंधीत क्षेत्र
नाशिक –
मनमानी पद्धतीने रेमडिसिव्हर खाजगी रुग्णालयांना द्याल तर याद राखा
शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा FDA ला इशारा
FDA कडून अयोग्य पद्धतीने रेमडिसिव्हर च वाटप
भुजबळां अपाठोपाठ आता शिवसेना देखिल आक्रमक
आज घेणार FDA अधिकाऱ्यांची भेट
शिवसैनिकांनी सर्व्हे केलेल्या शहरातील रेमडिसिव्हर लागणाऱ्या रुग्णांची देणार यादी
नांदेडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 1664 रुग्ण ,तर 27 जणांचा मृत्यू
24 तासात 1387 जणांना सुट्टी
एकूण टेस्ट 6150 त्यापैकी 1664 पॉझिटीव्ह
आता पर्यंत 61072 पॉझिटीव्ह
बरे झाले 46578
एकूण मृत्यू – 1130
सध्या ऍक्टिव्ह – 13107
गंभीर – 204
गेल्या पाच दिवसात
9 एप्रिल – 1650 – 27
10 एप्रिल – 1750 – 27
11 एप्रिल – 1859 – 27
12 एप्रिल – 1798 – 26
13 एप्रिल – 1664 – 27
रत्नागिरी-
रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या स्ट्रेथचा फैलाव
80 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत- आरोग्य विभाग
गेल्या चौवीस तासात 337 कोरोना रुग्ण
सर्व खासगी कंपन्यातील आस्थापनांची कोरोना टेस्ट होणार
लाॅक डाऊनसाठी जिल्ह्याचा अँक्शन प्लॅन तयार
व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा नको- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्याच्या प्रसासनाला सुचना
– नागपूर मनपाच्या कोरोना कारभारावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
– क्रीडा संकुल, सहकारी रुग्णालयाच्या निरिक्षणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे
– ‘कोरोना स्थिती हाताळण्यात मनपा प्रशासन अपयशी’
– ‘रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी मनपाने हवा तसा पुढाकार घेतला नाही’
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं निरिक्षण
– कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे न्यायालयाने स्वत: दाखल करुन घेतली याचिका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली.
CM Uddhav Thackeray : 14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्देhttps://t.co/c77KLgfYbU#Maharashtra #Lockdown #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021
राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Maharashtra Lockdown news : राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू, उद्धव ठाकरेंच्या घोषणा जशाच्या तशा https://t.co/m7bjSW47gH
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021
पुण्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 5 हजार 313 कोरोना रुग्णांची वाढ
तर दिवसभरात 4 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त
पुण्यात गेल्या 24 तासांत 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
त्यातील 18 रुग्ण पुण्याबाहेरील होते
पुण्यात सध्या 54 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरु
त्यातील 1 हजार 86 जणांची प्रकृती चिंताजनक
मुंबईत गेल्या 24 तासांत 11 हजार 263 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
तर 7 हजार 898 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली
मुंबईत गेल्या 24 तासांत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृतांपैकी 15 जणांना काही दीर्घकालीन आजार होते
#CoronavirusUpdates
13-Apr, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/mqP8CkGSmS— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 13, 2021
राज्यात आज दिवसभरात 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद
तर 281 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय
दिवसभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं असून, आज दिवसभरात 31 हजार 624 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 60,212
*⃣Recoveries – 31,624
*⃣Deaths – 281
*⃣Active Cases – 5,93,042
*⃣Total Cases till date – 35,19,208
*⃣Total Recoveries till date – 28,66,097
*⃣Total Deaths till date – 58,526
*⃣Total tests till date – 2,23,22,393
1/4?— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 13, 2021
राज्यात कडक निर्बंध लावल्यामुळे सर्व मजुरांचा काम बंद पडले
त्यामुळे हे सर्व मजूर आता आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळा भागामधून कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर गर्दी करत आहेत,
सध्या मोठा संख्यामध्ये या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त करण्यात आला आहे,
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंबईचं कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे