Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात आज 623 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jun 15, 2021 | 12:27 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात आज 623 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 रुग्णांचा मृत्यू
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2021 10:38 PM (IST)

    साताऱ्यात आज 623 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 रुग्णांचा मृत्यू

    साताऱ्यात आज 623 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 17 रुग्मांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 2064 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    आतापर्यंतची कोरोना आकडेवारी

    एकूण बाधित – 181161

    घरी सोडण्यात आलेले – 168009

    मृत्यू – 4065

    उपचारार्थ रुग्ण – 9267

  • 14 Jun 2021 08:12 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 242 नव्या रुग्णांची वाढ, 16 रुग्णांचा मृत्यू 

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 242 नव्या रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 388 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधित 16 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 7  रुग्ण

    – 511 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477413  वर

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3027

    – एकूण मृत्यू -8475

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 462610

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5532

  • 14 Jun 2021 07:07 PM (IST)

    नागपुरात आज 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    193 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 476445

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 465668

    एकूण मृत्यूसंख्या – 9007

  • 14 Jun 2021 05:33 PM (IST)

    रायगडमध्ये सध्या 6319 सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 93% टक्क्यांवर

    रायगड कोरोना अपडेट

    पॉझिटिव्हिटी – 13.64%

    सध्या सक्रिय रुग्ण – 6319

    म्रुत्युदर – 2%

    रिकव्हरी दर – 93%

    रोज सरासरी रुग्ण – 559

    रोज टेस्टीगं सरासरी – 5218

    रोजचे सरासरी म्रुत्यू – 20

  • 14 Jun 2021 03:57 PM (IST)

    कुठल्या महानगरपालिका कुठल्या लेव्हलमध्ये ?

    कुठल्या महानगरपालिका कुठल्या लेव्हलमध्ये ?

    पाहिली लेव्हल

    सोलापूर

    औरंगाबाद

    नागपूर

    दुसरी लेव्हल

    ठाणे

    नवी मुंबई

    वसई – विरार

    पुणे

    तिसरी लेव्हल

    मुंबई

    कल्याण

    नाशिक

    पिपंरी चिचंवड

  • 14 Jun 2021 03:56 PM (IST)

    पहिल्या लेव्हलचे निर्बध कुठल्या जिल्ह्यात ? वाचा संपूर्ण माहिती

    पहिल्या लेव्हलचे निर्बध कुठल्या जिल्ह्यात ?

    अहमदनगर, जळगाव, धुळे, पऱभणी, नांदेड, जालना, लातूर, अमरातवती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया

    दुसऱ्या लेव्हलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

    नंदुरबार, हिंगोली

    तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

    मुंबई, मुंबई उपनगर,  ठाणे, पालघर, नाशिक,  सोलापूर,  सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, बुलडाणा, गडचिरोली

    चौथ्या लेव्हलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

    रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग,  पुणे, कोल्हापूर, सातारा

  • 14 Jun 2021 03:48 PM (IST)

    बारामतीतील दुकाने आता सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार 

    बारामती : बारामतीतील दुकाने आता सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार

    – व्यापारी आणि प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

    – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्याने निर्बंध शिथील

    – बारामतीतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरु राहणार

  • 14 Jun 2021 03:47 PM (IST)

    पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावात 100% लसीकरण, शरद पवार यांनीही केलं कौतुक 

    पुणे : पुरंदर तालुक्यातल्या बहिरवाडी गावात 100% लसीकरण

    ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम

    100%  लसीकरण करणारे बहिरवाडी ठरले पहिले गाव

    शरद पवार यांनीही केलं कौतुक

  • 14 Jun 2021 09:55 AM (IST)

    मुंबईत आठवड्याच्या पहिल्या दिवशी बस स्टाॅपवर तुफान गर्दी

    – मुंबईत आठवड्याच्या पहिल्या दिवशी बस स्टाॅपवर तुफान गर्दी

    – सायन राणी लक्ष्मीबाई चौक येथून बांद्रा बोरिवली या साईडला जाणाऱ्या स्टॉपवर प्रवासांच्या लांबच्या लांब रांगा

    – रस्त्याच्या मधोमध उभे राहून इतर वाहनांना याचा अडथळा होत आहे

    – सकाळी 9 वाजेपासूनच गर्दी, एसटी बसेस सेवेतून कमी केल्याचा नागरीकांना फटका बसल्याची चर्चा

  • 14 Jun 2021 09:54 AM (IST)

    नगर शहरातील व्यापारी आजपासून करणार सहा वाजताच दुकाने बंद

    अहमदनगर

    नगर शहरातील व्यापारी आजपासून करणार सहा वाजताच दुकाने बंद

    शरतील कोरोना बधितांची संख्या आटोक्यात अली असली तरी तिसरी लाट थोपवण्यासाठी व्यपाऱ्यांचा पुढाकार

    तर पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी आज पासून दुकाने 6 नंतर बंद राहणार

  • 14 Jun 2021 09:50 AM (IST)

    नाशकात धरण परिसरात सायकलिंग करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाची कारवाई

    नाशिक – धरण परिसरात सायकलिंग करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाची कारवाई

    – धरण परिसारात सायकलिंग करणाऱ्याच्या सायकल जप्त

    – गंगापुर धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात सायकलिंग करणं पडलं महागात

    – जलसंपदा विभागाच्या कारवाईत ५० हुन अधिक सायकल जप्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई

  • 14 Jun 2021 09:48 AM (IST)

    24 तासात भारतात 70 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासात भारतात 70 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 921 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 19 हजार 501 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

  • 14 Jun 2021 09:45 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम

    पिंपरी चिंचवड

    – पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम

    -शहराचा पॉझिटिव्ह दर सव्वापाच ते साडेपाच टक्के असल्याने केवळ अर्ध्या ते एक टक्केने शहरावरील निर्बंध कायम

  • 14 Jun 2021 09:22 AM (IST)

    वर्धा जिल्हा पहिल्या फेजमध्ये मात्र निर्बंधात शिथिलता नाही

    वर्धा

    – वर्धा जिल्हा पहिल्या फेज मध्ये मात्र निर्बंधात शिथिलता नाही

    – जिल्ह्यात तिसऱ्या फेजचे निर्बंध राहणार लागू

    – रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय

    – अत्यावश्यक वस्तू व सेवासंबंधी व्यवसाय दररोज सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत राहणार सुरू

    – अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत उघडण्याची मुभा

  • 14 Jun 2021 08:11 AM (IST)

    वाशिम जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ 2.25 टक्के

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ 2.25 टक्के झाल्यानं आणि 9.01 टक्के ऑक्सिजन बेड भरलेले असल्यानं जिल्ह्याचा लेव्हल 1 मध्ये समावेश…

    आजपासून नवीन नियमावली होणार लागू…

    अत्यावश्यक सेवा व इतर सर्व दुकाने नियमित राहणार सुरु….

    मॉल्स,सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास मुभा…

    रेस्टॉरंट,भोजनालय नियमित सुरु ठेवण्यास देण्यात आली परवानगी…

    जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पामध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून टोकन पद्धतीचा वापर..

    कोरोना नियमांचे पालन करत मैदाने सुरू ठेवण्यास मुभा…

    लग्न समारंभात 50 व्यक्ती आणि अंत्यविधीला 20 व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा…

  • 14 Jun 2021 07:08 AM (IST)

    कोरोनामुळे यंदाही ‘हज’ला मुकावे लागणार

    सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सौदीमधील स्थानिक ६० ते ६५ हजार नागरिकांनाच हज यात्रा करता येणार आहे. हज यात्रा करणाऱ्या इतर देशांमधील इच्छुकांना कोरोनामुळे प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे सौदीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या भारतीय मुस्लिमांना दुसऱ्यांदा यात्रेला मुकावे लागणार आहे.

  • 14 Jun 2021 07:07 AM (IST)

    पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर खराब?

    नाशिक- पीएम केअर फंडातून मिळालेल्या ६० व्हेंटिलेटरसाठी पूरक साहित्य नसल्याने त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेेला संंबंधित कंपनीच्या अभियंत्याने येऊन ते सध्या प्रचलित सेन्सर आणि स्टँडवरून सुरू करून दाखवले हेाते. त्यानंतर महापालिकेने त्यातील तीस व्हेंटिलेटर मविप्रच्या डॉ. वसंत पवार रुग्णालयाला देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता हे व्हेंटिलेटर कार्यान्वित होऊ शकत नसल्याने परत पाठवण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे

  • 14 Jun 2021 07:07 AM (IST)

    अमरावतीत शाळा राहणार ‘लॉक’

    अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना आला आणि शाळा-महाविद्यालये बंदचा निर्णय शासनाने घेतला. हल्ली कोविड- १९ चे रुग्ण कमी होत असल्याने अनलॉकचा निर्णय घेत, संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जून उजाडला असताना शाळा सुरू होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, विद्यार्थी, शिक्षकवृंद कधीपर्यंत ‘लॉक’ राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

  • 14 Jun 2021 07:06 AM (IST)

    कोल्हापुरकरांची चिंता वाढली; अजित पवार, राजेश टोपे घेणार आढावा

    कोल्हापूर: करोनाचा कहर कायम असलेल्या आणि सात टक्के लसीकरण झालेल्या कोल्हापूरचा १६ टक्के हा पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक आहे. शेजारच्या सांगली जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत असताना कोल्हापूरसह सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत परिस्थिती चिंताजनकच बनत चालली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आढावा घेण्यासाठी सोमवारी ताकदीने कोल्हापुरात दाखल होत आहेत.

  • 14 Jun 2021 07:05 AM (IST)

    करोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती विभागात 341 शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

    नागपूर : राज्य शासन शेतकऱ्यांसाठी खूप काही करत असल्याचे दाखवते. परंतु जानेवारी २०२१ ते मे २०२१ या करोनाच्या दुसऱ्या लाटेतील कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत ३४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्यांच्या चौकशीत आर्थिक कारण असलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवत त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये शासन मदत करते. परंतु ३१ मे २०२१ पर्यंत येथील एकूण आत्महत्यांपैकी ६७.१५ टक्के प्रकरणांची (२२९ प्रकरणे) चौकशी प्रलंबित असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.

  • 14 Jun 2021 07:01 AM (IST)

    आजपासून 20 जिल्ह्य़ांना सूट, मुंबईत नियम कायम; ठाणे, पुण्याला दिलासा

    मुंबई : करोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध आज, सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पंचस्तरीय विभागणीनुसार ठाणे शहरात निर्बंधांतील शिथिलता कायम असून, दुकाने नियमितपणे सुरू राहतील. ठाणे ग्रामीणमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू आहेत. पुणे शहरात मात्र निर्बंध शिथिल करण्यात आल्याने दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.

  • 14 Jun 2021 06:56 AM (IST)

    आजपासून 20 जिल्ह्य़ांना सूट, मुंबईत नियम कायम, ठाणे, पुण्याला दिलासा

    मुंबई : करोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध आज, सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पंचस्तरीय विभागणीनुसार ठाणे शहरात निर्बंधांतील शिथिलता कायम असून, दुकाने नियमितपणे सुरू राहतील. ठाणे ग्रामीणमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू आहेत. पुणे शहरात मात्र निर्बंध शिथिल करण्यात आल्याने दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.

  • 14 Jun 2021 06:55 AM (IST)

    आठ जिल्ह्यांमध्ये दुकाने 4 पर्यंत सुरु

    ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 14 Jun 2021 06:54 AM (IST)

    सवलत कोणत्या जिल्ह्य़ांना?

    नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील. अन्यथा या जिल्ह्य़ांमध्ये आता कुठलेही निर्बंध नसतील. पालघर जिल्ह्य़ाचा दुसऱ्या स्तरात समावेश झाल्याने तेथील बहुतांशी निर्बंध रद्द झाले आहेत.

  • 14 Jun 2021 06:53 AM (IST)

    अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

    गडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती व्हावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे एक ना अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

  • 14 Jun 2021 06:45 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून निर्बंध आणखी शिथिल

    सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून निर्बंध आणखी शिथिल

    लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले

    शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू राहणार

    विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी

    तर अंत्यसंस्कार ही नियमितपणे पार पाडता येणार

    शाळा , महाविद्यालय प्रार्थनास्थळे, वगळता इतर सर्व बाबींना शिथिलता

    आजपासून सकाळी 7 वाजल्यापासून लागू होणार आदेश

    ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी होत नसल्यामुळे निर्बंध कायम

Published On - Jun 14,2021 6:35 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.