Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबादमध्ये 400 नवे रुग्ण सापडले, 11 जणांचा मृत्यू

| Updated on: May 19, 2021 | 6:54 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबादमध्ये 400 नवे रुग्ण सापडले, 11 जणांचा मृत्यू
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असून, राज्यात 1 जूनपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 May 2021 11:09 PM (IST)

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    निफाड : नविन कोरोना बाधित रुग्ण – 51

    एकूण कोरोना बाधित रुग्ण – 17413

    आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण – 15975

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 610

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 838

    एकूण झालेल्या टेस्ट – 530

  • 18 May 2021 11:07 PM (IST)

    सांगली कोरोना अपडेट

    सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 1258 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 46 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3016 वर

    अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 14337 वर

    तर उपचार घेणारे 2027 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 85553 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 102906 वर

  • 18 May 2021 08:44 PM (IST)

    नाशिकच्या बिटको रुग्णालयात शॉर्ट सर्किट

    नाशिक – मनपाच्या बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट

    शॉर्ट सर्किटमध्ये व्हेंटिलेटर जळाल्याची प्राथमिक माहिती

    नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनावर उपचार घेताहेत

    सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने व्हेंटिलेटर जळाल्याची प्राथमिक माहिती

    वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल

  • 18 May 2021 08:13 PM (IST)

    पुण्यात आज 1021 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2892 रुग्णांना डिस्चार्ज

    ⦁ पुण्यात दिवसभरात 1021 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 2892 रुग्णांना डिस्चार्ज

    ⦁ करोनाबाधित ६८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू, 22 रूग्ण पुण्याबाहेरील.

    ⦁ 1364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    ⦁ पुण्यात आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 4,36,690.

    ⦁ पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या -16,523

    ⦁ एकूण मृत्यू – 9258

    ⦁ आज केलेल्या एकूण चाचण्या – 7895

  • 18 May 2021 08:11 PM (IST)

    उस्मानाबादमध्ये आज 400 नवे रुग्ण सापडले

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 400 रुग्ण सापडले तर 11 जणांचा मृत्यू झाला. आज 697 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उस्मानाबाद तालुका 102, तुळजापूर 80, उमरगा 30, लोहारा 35, कळंब 28, वाशी 57, भूम 25 व परंडा 43 रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5151 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबादमध्ये 2 लाख 65 हजार 267 नमुने तपासले त्यापैकी 49 हजार 903 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याचा दर 38.60 टक्के.

  • 18 May 2021 08:05 PM (IST)

    चंद्रपूरात गेल्या 24 तासात 370 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपूर : गेल्या 24 तासात 370 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 23 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 78509

    एकूण कोरोनामुक्त : 68835

    अॅक्टिव्ह रुग्ण : 8373

    एकूण मृत्यू : 1301

    एकूण नमूने तपासणी : 439035

  • 18 May 2021 08:05 PM (IST)

    पुण्यात दोन दिवसांनी लसीकरण होणार

    पुण्यात सध्या केवळ एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुण्यात आता दोन दिवसांनंतर लसीकरण होणार आहे.

  • 18 May 2021 07:39 PM (IST)

    नाशिककरांसाठी आज दिलासा, दिवसभरात फक्त 1073 रुग्ण पॉझिटिव्ह

    – नाशिककरांसाठी आज दिलासादायक बातमी – दिवसभरात फक्त 1073 रुग्ण पॉझिटिव्ह तर 32 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू – रुग्णसंख्येत मोठी घट – तर आज 680 रुग्णांनी कोरोनावर केली मात

  • 18 May 2021 07:38 PM (IST)

    नागपूरमध्ये खाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत

    खाजगी रुग्णालयांतर्फे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करताना ‍विहीत दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे तज्ज्ञ लोकांची एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

    समिती कोव्हिड रुग्णांच्या उपचार करताना विहीत दरापेक्षा जास्त दर आकारण्याची तक्रार झाल्यानंतर तीन दिवसाचे आत बिलाची तपासणी करुन आपले अभिप्राय सादर करेल.

    समिती गठीत करण्यासंबंधी आदेश मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी आज निर्गमित केले.

  • 18 May 2021 03:09 PM (IST)

    मुंबईनंतर नाशिक महापालिका 5 लाख लसींचा खरेदी देखील करणार

    नाशिक – मुंबईनंतर नाशिक महापालिका देखील करणार 5 लाख लसींचा खरेदी

    मुंबईने काढलेल्या ग्लोबल टेंडरिंग मधेच नाशिकचा समावेश करण्याचा प्रयत्न

    कोव्हीशिल्ड आणि कोव्हेक्सीन व्यतिरिक्त लस मिळण्याची शक्यता

    स्पूटणीक आणि फायझर ला प्राधान्य

    वेगळं टेंडर काढल्यास प्रक्रिया राखडण्याची शक्यता असल्याने ग्लोबल टेंडरिंग चा पर्याय समोर

    मुंबई महापालिकेच्या होकारावर नाशिकच पुढील नियोजन अवलंबून

  • 18 May 2021 01:50 PM (IST)

    राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिस रुग्ण सर्वाधिक, 318 जणांना लागण

    पुणे

    राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिस रुग्ण सर्वाधिक,

    म्युकोरमायकोसिस रुग्ण असणारा पुणे जिल्हा अव्वल क्रमांकावर,

    आतापर्यंत 318 जणांना झाली म्युकर मायकोसिसची लागण,

    20 जणांचा म्युकर मायकोसिसनं घेतला बळी,

    राज्यात आजच्या तारखेपर्यंत 1257 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा,

    राज्यातील हॉस्पिटल्सना म्युकर मायकोसिसची बाधा टाळण्यासाठी नवीन नियमावली जाहीर,

    राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांची माहिती …।

    कोरोना रुग्णसंख्येच्या हॉटस्पॉट नंतर आता पुणे म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट,

  • 18 May 2021 01:38 PM (IST)

    नाशिककरांकडून नियमांची पायमल्ली, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकांचा बाहेर फेरफटका

    नाशिक

    – नाशिककरांकडून होतीये नियमांची पायमल्ली – शहर लॉकडाउन असतानाही नाशिककर फिरतायत सर्रासपणे रस्त्यावर – अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकांचा बाहेर फेरफटका – नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

  • 18 May 2021 01:37 PM (IST)

    केडीएमसीत विनाकारण फिरणाऱ्या 401 जणांची अँटीजेन चाचणी

    कल्याण-डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केडीएमसी आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे या पाश्र्वभूमीवर 2 दिवसात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान विनाकारण फिरणा:या 401 जणांना ताब्यात घेऊन त्याची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये केवळ एक जण पॉझीटीव्ह आढळला आहे. गेल्या दोन दिवसात विना मास्क फिरणा:यांकडून 1 लाख 30 हजार रुपये दंड वसूली करण्यात आली आहे.  कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 15 दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली आहेत.

  • 18 May 2021 01:35 PM (IST)

    शेतीसाठी पुढील वर्ष अडचणीचं जाण्याची शक्यता : सुनील केदार

    सुनील केदार यांची पत्रकार परिषद

    – कोरोनाच्या संकटात इतर उत्पन्न कमी होत असताना, ग्रामीण अर्थकारणाने मोठा हातभार लावला

    – १९२० च्या तुलनेत २०२१ मध्ये रब्बी हंगाम २० टक्के वाढला

    – शेतीसाठी पुढील वर्ष अडचणीचं जाण्याची शक्यता

    – यंदा शेतकऱ्यांना आधार नाही, कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न

    – खतांचे दर २५ टक्क्यांनी वाढलेय

    – केंद्र सरकारने खताच्या दरवाढीवर विचार करावा

    – पेट्रोल आणि डिझेलमध्ये रोज दरवाढ होतेय

    – डिझेल दरवाढीचा शेती वर मोठा परिणाम

  • 18 May 2021 11:11 AM (IST)

    यवतमाळमध्ये म्युकोरमायकोसिसचा पहिला बळी, 60 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

    यवतमाळ- यवतमाळमध्ये म्युकोरमायकोसिसचा पहिला बळी 60 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण असून यातील एक रुग्ण उपचार घेत आहे तर एकाला उपचार नंतर सुट्टी देण्यात आली आहे म्युकरमायकोसिसचा रुग्णासाठी विशेष वॉर्ड रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे

  • 18 May 2021 11:09 AM (IST)

    लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा

    कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला.

    एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले

    काल राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण

    महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

  • 18 May 2021 11:07 AM (IST)

    सांगली महापालिकेच्या कोविड सेंटरमधून 21 दिवसात 652 रुग्ण कोरोनामुक्त

    सांगली – महापालिकेच्या जिपीएम कोविड सेंटरमधून 21 दिवसात 652 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    166 रुग्ण आहेत सध्या उपचारखाली

    मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि टीमची कामगिरी

  • 18 May 2021 11:03 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता, 88 पदासाठी भरती

    पुणे

    पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता,

    जिल्ह्यातील ग्रामीण भागात उभारलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये नव्यानं कंत्राटी भरतीची प्रक्रिया,

    एम डी फीजीशिअन, एमबीबीएस डॉक्टर, बीएएम एस, नर्स,ईसीजी विभाग कर्मचारी असे एकूण 88 पदासाठी काढली भरती,

    गेल्या चार महिन्यापासून जिल्हा परिषदेला मिळेनात एम डी डॉक्टर,

    पाच राज्यात एम डी डॉक्टरसाठी दिली होती जाहीरात,

  • 18 May 2021 11:02 AM (IST)

    पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात कोरोना संकट निवारणासाठी विशेष यज्ञ 

    पुणे –

    – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात कोरोना संकट निवारणासाठी विशेष यज्ञ

    – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी मृत्युंजय व धन्वंतरी महायज्ञ पार पडला,

    – तर उद्या उग्रनरसिंह व सुदर्शन महायज्ञ होणार आहेत,

    – सर्व धार्मिक कार्यक्रम ट्रस्टच्या यू ट्यूब, फेसबुक, वेबसाइट व सोशल माध्यमांवरून भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

  • 18 May 2021 10:00 AM (IST)

    सांगलीचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मृत्यूमुळे पोलीस धास्तावलेत

    सांगली –

    जत पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मृत्यू मुळे पोलीस धास्तावलेत

    गेले वर्षभरात 350 पोलीस अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

    त्यामुळे सर्व कुटुंबाचे आरोग्य आले धोक्यात

    8 जणांचा आतापर्यंत मृत्यू

    त्यामुळे तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारीचा जीव लागला टांगणीला

    नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये पोलीस दलाकडून आवाहन

  • 18 May 2021 09:58 AM (IST)

    इचलकरंजी शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांची तिसऱ्या दिवशी धडक कारवाई

    इचलकरंजी –

    इचलकरंजी शहरातील मॉर्निंग करणाऱ्यांवर पोलिसांची तिसऱ्या दिवशी धडक कारवाई

    शहरातील मॉर्निंग वॉक फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट

    शहरातील शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलिसांची धडक कारवाई

    पोलिसांनी शंभर जणांना घेतले ताब्यात आणि केली दंडात्मक कारवाई

    शहरातील नागरिक बेफिकीरपणे वागतील त्यांच्या होणार आता गुन्हे दाखल

    नागरिकांनी घरी राहावे सुरक्षित राहावे माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रशासनाला सहकार्य करावे

  • 18 May 2021 09:57 AM (IST)

    लस द्या अन्यथा सर्व औषध दुकाने बंद ठेवणार, औषध विक्रेता संघटनेचा इशारा

    सांगली –

    लस द्या अन्यथा सर्व औषध दुकाने बंद ठेवणार

    औषध विक्रेता संघटनेचा इशारा

    कोरोना मुळे आता पर्यंत देशात 200 औषध विक्रते चा बळी तर 1 हजार विक्रते आणि नातेवाईक बाधित

    संघटना नी वेळोवेळो पत्र व्यवहार करूनही सरकार चे दुर्लक्ष

    कोरोना योद्धा म्हणूनही सन्मान केला नाही

    त्यामुळे किमान महाराष्ट्र सह देशात सर्व औषध विक्रेता ना त्वरित लस देया

    अन्यथा देशातील सर्व औषध दुकाने बंद ठेवणार

    अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना चे आदेक्ष जगनाथ शिंदे यांनी इशारा

  • 18 May 2021 09:54 AM (IST)

    गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे नवीन 2,63,533 रुग्ण

    गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे नवीन 2,63,533 रुग्ण आढळून आले आहेत 

    तर 4,329 जणांचा मृत्यू झाला आहे

    गेल्या २४ तासांत तब्बल 4,22,436 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत 

    एकूण कोरोना रुग्ण : 2,52,28,996

    बरे होणाऱ्यांची संख्या : 2,15,96,512

    एकूण मृत्यू : 2,78,719

    सक्रीय रुग्णसंख्या : 33,53,765

    एकूण लसीकरण  : 18,44,53,149

  • 18 May 2021 09:22 AM (IST)

    सोलापूर शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प

    सोलापूर – शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प

    कोव्हिड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने 24 केंद्रावर लसीकरण बंद

    शासनाकडून लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत माहिती देऊन लसीकरण सुरू करण्यात येणार

    ग्रामीण भागात सुधा लसीकरणाचा साठा संपला

    साठा संपल्याने 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना दुसरा डोस देणे हे बंद

  • 18 May 2021 09:20 AM (IST)

    रुग्णसंख्या घटतेय, पिंपरी-चिंचवड शहरात 846 नवीन रुग्णांची नोंद, 2067 जणांना डिस्चार्ज

    पिंपरी-चिंचवड

    -रुग्णसंख्या घटतेय ! शहरात 846 नवीन रुग्णांची नोंद, 2067 जणांना डिस्चार्ज

    -आजपर्यंत शहरातील 3 हजार 693 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    -शहरातील 2 लाख 42 हजार 580 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण तर 2 लाख 22 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त

    -सध्या 16 हजार 561 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 11 हजार 482 रुग्ण गृहविलगीकरणात असून 5 हजार 79 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू

    -शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून ही मोठी दिलासादायक बाब

  • 18 May 2021 09:19 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरासाठी लसींचा साठा उपलब्ध झाला नाही

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरासाठी लसींचा साठा उपलब्ध झाला नाही

    – त्यामुळे आज ही शहरात लसीकरण होणार नाही

    -लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

  • 18 May 2021 09:15 AM (IST)

    सोलापूर- ग्रामीणमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन

    सोलापूर- ग्रामीणमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन

    एक जून पर्यंत राहणार कडक लॉकडाऊन

    किराणा साहित्य, भाजीपाला, फळांची सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये फक्त घरपोच सेवा देता येणार

    ग्रामीण भागातील अंडी, मांस मटण विक्री दुकान, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट बंद राहणार

    सर्व बाजार समिती आठवडे बाजार ,ठोक किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद राहणार

    कृषी क्षेत्राशी निगडित असलेली तशी दुकाने व इतर सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी

    ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

  • 18 May 2021 08:40 AM (IST)

    पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी घट

    पुणे –

    पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी घट

    दोन आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्ह रेट दुपटीने कमी

    3 मेला 21 टक्के असणारा पॉझिटिव्ह रेट 17 मेला 9 टक्क्यांवर…

    पुणे शहरासाठी दिलासादायक बातमी!

    तर रुग्ण बरे होण्याचा रेट 90 टक्क्यांच्या वर…

    गेल्या काही दिवसापासून पुणेशहरातील रुग्णसंख्येत सातत्याने घट…

    शहरात सध्या 18 हजार 440 ऍक्टिव्ह रुग्ण

  • 18 May 2021 08:40 AM (IST)

    फीसाठी ऑनलाईन शिक्षण थांबवणाऱ्या शाळांवर शिक्षण उपसंचालकांचे कारवाईचे आदेश

    पुणे –

    फी साठी ऑनलाईन शिक्षण थांबवणाऱ्या शाळांवर शिक्षण उपसंचालकांचे कारवाईचे आदेश

    ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना,

    शाळांची फी वसूलीही सक्तीनं न करण्याचे दिले आदेश,

    अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची फी भरली नसल्यानं ऑनलाईन शिक्षण केलंय बंद,

    शाळांच तीन वर्षाचं ऑडिट ही लवकर सादर करण्याच्या सूचना,

    शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी काढले आदेश,

    पालक आणि विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

  • 18 May 2021 08:39 AM (IST)

    म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वार्डची व्यवस्था

    पुणे –

    म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वार्डची व्यवस्था,

    पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर ससून रुग्णालयात वार्ड तयार,

    50 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही करणार व्यवस्था,

    तर कोरोना आणि म्युकर मायकोसिस अशा रुग्णासाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था तयार,

    लवकरचं रुग्णभरतीला होणार सुरुवात,

  • 18 May 2021 08:28 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका

    – नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका

    – नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे सात बळी गेल्याची माहिती

    – जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे २८४ तर पूर्व विदर्भात ३४० रुग्ण

    – म्युकरमायकोसीसचे सर्वाधिक रुग्ण खाजगी रुग्णालयात

    – लक्षणं दिसल्यास डॅाक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन

  • 18 May 2021 08:28 AM (IST)

    नाशिक – महापालिका स्वत:च खरेदी करणार कोरोना वरील लस

    नाशिक – महापालिका स्वत:च खरेदी करणार कोरोना वरील लस

    केंद्र आणि राज्याकडून लस मिळत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांचा निर्णय

    महापौरांनी बोलावली आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक

    केंद्राने ऑगस्ट पर्यंत डोस उपलब्ध करून देण्याचे दिले आहे आश्वासन

    मात्र त्यापूर्वी लस खरेदी केली जात असेल तरच खरेदी जरावी अशी आयुक्तांची सूचना

    मुंबई ठाणे पाठोपाठ लस खरेसी करण्याची नाशिक मनपाची देखील तयारी सुरू

  • 18 May 2021 08:26 AM (IST)

    नाशिक – कोरोना ग्रस्तांमध्ये लहान मुलांचा आकडा वाढला

    नाशिक – कोरोना ग्रस्तांमध्ये लहान मुलांचा आकडा वाढला

    नाशिक मनपाच्या ठक्कर डोम कोव्हिडं सेंटर मध्ये ७ लहान कोरोना बाधित मुले दाखल

    नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयातही लहान कोरोना बाधित मुलाचं दाखल होण्याचं प्रमाण वाढलं

    प्रशासनाचे आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश

  • 18 May 2021 08:21 AM (IST)

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन मोठी घोषणा, 8 कोटी कोरोना लसीचे डोस जगभरातील देशांना देणार

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन मोठी घोषणा

    8 कोटी कोरोना लसीचे डोस जगभरातील देशांना देणार

    पुढील सहा आठवड्यात लसीचे डोस जगातील विविध देशांना देणार

    भारतालाही मिळणार लसीचे डोस

    जून मध्ये अमेरिकेत निर्माण होणार्या लस उत्पादनांचा १३ टक्के लसीचे डोस दिले जाणार

    फायझर , माँर्डना आणि जाँन्सन अँड जाँन्सन कंपनीच्या लसीचे डोस अमेरिका इतर देशांना देणार

  • 18 May 2021 08:13 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | मुंबईच्या बेलार्ड एस्टेटमध्ये झाड पडलं

    मुंबईत वादळीवारे आणि मुसळधार पाऊस, बेलार्ड एस्टेटमध्ये झाड पडलं

  • 18 May 2021 07:39 AM (IST)

    विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग, सध्या ते गृह विलगीकरणात

    पुणे –

    – विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग,

    – सध्या ते गृह विलगीकरणात असल्याची माहिती,

    – राव यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता,

    – राव यांनी यापूर्वीही लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी काही दिवसांनतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता,

    – मागील शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता,

    – दरम्यान दोन दिवसांपासून ताप असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली काल सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,

    – त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

  • 18 May 2021 07:29 AM (IST)

    रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरण, पालघर इथून आणखी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    नाशिक –

    रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरण, पालघर इथून आणखी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानं आरोपींची संख्या झाली 8

    के के वाघ कॉलेज जवळ, रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना 3 दिवसांपूर्वी केली होती अटक

    3 नर्सेससह टोळीकडून आणखी ’20’ इंजेक्शन जप्त

    तपासात,या प्रकरणाचं पालघर कनेक्शन उघड

    राज्यातील सर्वात मोठी टोळी उघड होण्याची दाट शक्यता

    पोलकसांचा तपास सुरू

  • 18 May 2021 07:10 AM (IST)

    नागपूर जिल्हयात सहा ॲाक्सिजन प्रकल्पासाठी हिरवा कंदील

    – नागपूर जिल्हयात सहा ॲाक्सिजन प्रकल्पासाठी हिरवा कंदील

    – मेडीकलमध्ये ३, मेयो रुग्णालयात २ आणि एम्समध्ये एक प्रकल्प

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश

    – आदेश कार्यान्वीत केल्यापासून १६ आठवड्यात प्रकल्प उभारण्याचे निर्देश

    – प्रकल्पाला लागणारे १४ कोटी ९६ लाख सीएसआर निधीतून देणार

  • 18 May 2021 07:05 AM (IST)

    75 दिवसानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 971 वर

    – ७५ दिवसानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ९७१ वर

    – जिल्हयात २४ तासांत ३८९४ जणांनी केली कोरोनावर मात

    – २४ तासांत जिल्हयात ९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – २४ तासांत जिल्ह्यात ३० कोरोनाबाधीतांचा मृत्यू

    – जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २६८९० वर

    – जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १३२६१ जणांची कोरोना चाचणी

  • 18 May 2021 06:50 AM (IST)

    वसई विरारमध्ये 24 तासात 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    वसई-विरार कोरोना अपडेट

    मागच्या 24 तासात 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 07 जणांचा मृत्यू

    765 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63,008 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 52,795 वर

    आतापर्यंत एकूण 1271 जणांचा मृत्यू

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8942 वर

  • 18 May 2021 06:48 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, खासगी रूग्णालयात एका रुग्णाची नोंद

    गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव

    खासगी रूग्णालयात  एका रुग्णाची नोंद

    म्युकर मायकोसिसचे आणखी 20 संशयित रूग्ण, अनेकांवर नागपुरात उपचार

    कोरोनानंतर म्युकरमायकोसिसमुळे खळबळ

  • 18 May 2021 06:48 AM (IST)

    पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

    पुणे :

    पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

    दोन महिन्यांपूर्वी राव यांना झाली होती पहिल्यांदा कोरोनाची लागण

    मागच्या शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर राव यांनी घेतली होती कोरोना लस

  • 18 May 2021 06:42 AM (IST)

    राज्यात आज 26,616 नवे रुग्ण सापडले, मृतांची संख्याही घटली

    राज्यात आज 26,616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 516 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.53 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 26,616 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात आज रोजी एकूण 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,05,068 झालीय.

  • 18 May 2021 06:42 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या राहणार बंद, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय

    अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या राहणार बंद

    मंगळवार (18 मे) रात्री 12 पासून 31 मे पर्यंत बाजर समित्या बंद ठेवण्याचे आदेश

    अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय

    गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णांमध्ये भर

Published On - May 18,2021 11:09 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.