Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 

| Updated on: Jun 20, 2021 | 12:30 AM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jun 2021 08:11 PM (IST)

    पु्ण्यात दिवसभरात 211 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 211 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 302 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 17 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 9

    –  387 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 475588

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2559

    – एकूण मृत्यू -8524

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 464505

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5724

  • 19 Jun 2021 08:09 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

    आतापर्यंत 1118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    आतापर्यंत 55334 जणांनी केली कोरोनावर मात

    तर सध्या 931रुग्ण उपचार घेत आहेत

    दिवसभरात 94 जण कोरोनामुक्त झाले

  • 19 Jun 2021 08:00 PM (IST)

    साताऱ्यात 895 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट

    895 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू

    756 जणांना दिला आज डिस्चार्ज

    एकूण नमूने – 971490

    एकूण बाधित रुग्ण – 185270

    घरी सोडण्यात आलेले रुग्ण – 173080

    एकूण मृत्यू -4182

    उपचारार्थ रुग्ण – 8549

    सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 19 Jun 2021 06:25 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अवघ्या 16 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – नागपूर जिल्ह्याला मोठा दिलासा

    – गेल्या 24 तासांत गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढीची नोंद

    – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अवघ्या 16 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – 9809 जणांच्या चाचण्यांमध्ये आढळले 16 नवे कोरोना रुग्ण

    – नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुन्हा शून्य कोरोना मुत्यूची नोंद

    – जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या आली हजारावर

  • 19 Jun 2021 06:21 PM (IST)

    औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक, जीम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृहे सुरु

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक

    औरंगाबाद जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांना अखेर मिळाली शिथिलता

    सोमवार 21 जूनपासून नियम होणार शिथिल

    जिम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, विवाह, कार्यक्रमात 50% क्षमतेच्या उपस्थितीची मुभा

    आता शासकीय कार्यालयात राहणार कर्मचाऱ्यांची 100% उपस्थिती

  • 19 Jun 2021 05:18 PM (IST)

    कांदीवलीत बोगस लसीकरण झालंय, ही गंभीर बाब : अस्लम शेख  

    मुंबई : कांदीवलीत बोगस लसीकरण झालंय ती गंभीर बाब आहे

    कुठेतरी यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे

    – ही लस कुणाला दिलीये, त्यांच्यावर काही विपरित परिणाम होतोय का याबाबत जबाबदारी देण्यात आलीये

    मनपाचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत

    – लोकलबद्दल आणि तिसऱ्या लाटेसंदर्भात टास्त फोर्ससोबत बैठक करू

    तिसरी लाट येणार नाही यासाठी हवे ते प्रयत्न करणार

    लोकलबाबदचा निर्णय लवकरच घेऊ

  • 19 Jun 2021 04:21 PM (IST)

    मिरज 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरण, अपेक्स हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

    सांगली : मिरज 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरण

    अपेक्स हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

    सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात न्यायालयाने दिली सहा दिवसांची पोलीस कोठडी

  • 19 Jun 2021 04:19 PM (IST)

    कोरोनामुळे पुण्यात पर्यटनस्थळं बंद, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पर्यटकांवर कारवाई

    पुणे : जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे पर्यटनस्थळ बंदी आहे. त्याच अनुषंगाने आता लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून टायगर पॉईंट या पर्यटनस्थळावर आलेल्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे. तर काही वाहनांना पुन्हा परत पाठवण्यात येत आहे.

  • 19 Jun 2021 04:17 PM (IST)

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई मनपा सज्ज, लहान मुलांसाठी 100 खाटांचा स्पेशल वॉर्ड

    मुंबई : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटर मध्ये 100 खाटांचे पीडियाट्रिक वार्ड तयार करण्यात आला आहे. चार आयसीयू बेड आणि 95 ऑक्सिजन बेड असलेल्या या वार्डमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या लहान मुलांचं मन रमावे यासाठी रंगीबिरंगी बेडशीट्स प्ले स्टेशन , वाचन करण्यासाठी कॉमिक्स आणि ड्रॉईंग शीट्स यांची सुविधा करण्यात आली आहे.

    वेगवेगळ्या कार्टून्स ने भिंती सजविलेल्या आहेत. यासोबतच लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डेडिकेटेड नर्सदेखील या विभागात 24 तास कार्यरत असणार आहे. सोबतच पालकांसाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात आलेला आहे . जेणेकरून लहान मुलांवर वेळेत उपचार होतील आणि लवकरात लवकर लहान मुलं बरी होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देता येईल.

  • 19 Jun 2021 01:22 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार

    पुणे

    पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार,

    ग्रामीण भागाला आजच्या बैठकीत कोणताही दिलासा नाही,

    ग्रामीण भागात निर्बंध जैसे थे च राहणार,

    आजच्या बैठकीत नियमात शिथीलता मिळण्याची ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षा होती,

    मात्र ग्रामीण भागात पॉझिटीव्हीटी रेट हा अजूनही 5 टक्क्यांच्या आत आला नसल्यामुळे निर्बंधामध्ये शिथीलता नाही

  • 19 Jun 2021 12:17 PM (IST)

     गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 60,753 नव्या रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 60,753 नव्या रुग्णांची नोंद

    उपचार घेत असलेल्या 1,647 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    काल दिवसभरात देशातील एकूण 97,743 कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले

    बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे 62480 कोरोना रुग्ण सापडले होते

    या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे

  • 19 Jun 2021 11:39 AM (IST)

    मुंबईच्या बस स्टाॅपवर प्रवाश्यांची तुफान गर्दी 

    – मुंबईच्या बस स्टाॅपवर प्रवाश्यांची तुफान गर्दी

    – सायन राणी लक्ष्मी चौक बसस्टाॅपवर २०० मिटर लांब रांग…

    – कोव्हिड काळ, त्यात पावसाची रिपरिप होत असल्याने नागरीक हवालदिल…

    – सकाळी ८ पासून नागरीकांनी गेलीये गर्दी, पुर्व ऊपनगरातून पश्चिम ऊपनगरात जाणार्या बस स्टाॅपवर एकच गर्दी..

    – बसेसच्या फ्रिक्वेंसी वाढवाव्यात अशा जनसामान्यांची मागणी…

  • 19 Jun 2021 11:37 AM (IST)

    पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू, अजित पवारांच्या बैठकीत एकमताने निर्णय

    पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू

    पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत एकमताने निर्णय,

    शनिवारी आणि रविवारी पुण्यात वीकेंड लॉकडाऊन,

    अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद …

    वाढती गर्दी पाहता प्रशासनानं घेतला निर्णय,

    कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नियोजन सुरु,

    गिरीश बापटांची माहिती …

  • 19 Jun 2021 08:55 AM (IST)

    अहमदनगरला पारनेर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील शाळा सुरू

    अहमदनगर

    अहमदनगरला पारनेर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील शाळा सुरू

    गेल्या काही दिवसापासून गावात एकही कोरोना रुग्ण न सापडल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय

    त्यामुळे हिवरेबाजार गावातील शाळा सुरू

  • 19 Jun 2021 08:16 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

    वाशिम :

    जिल्ह्यात आज शनिवार 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला होणार सुरुवात…

    33 केंद्रांवर नागरिकांना ऑन स्पॉट नोंदणी करून देण्यात येणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस…

    जिल्ह्यात कोविशील्ड लसीचे 6000 डोस उपलब्ध…

    जिल्ह्यात आतापर्यन्त झाले एकूण 2 लाख 94 हजार 442 एवढं लसीकरण…

    जिल्ह्यातील 2 लाख 22 हजार 509 नागरिकांना देण्यात आला लसीचा पहिला डोस…

    तर 71 हजार 933 नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

  • 19 Jun 2021 07:51 AM (IST)

    अजित पवार घेणार कोरोना आढावा बैठक, ग्रामीण भागातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता

    आज पालकमंत्री अजित पवार घेणार कोरोना आढावा बैठक,

    आजच्या बैठकीत ग्रामीण भागातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता,

    ग्रामीण भागाचा कोरोना संसर्ग दर हा 6.67 टक्क्यांवर आलाय, त्यामुळे ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यात येणार आहे …

    सध्या ग्रामीण भाग हा चौथ्या टप्प्यात असल्यानं ग्रामीण भागात निर्बंध आहेत मात्र ते आज शिथील होण्याची शक्यता आहे…

    नवे नियम असे असण्याची शक्यता

    सर्व प्रकारची दूकानं ही सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू

    हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू वेळ सायंकाळी 4 पर्यंतचं,

    खासगी कार्यालय सुरू राहणार,

    लग्न समारंभास 50 लोकांची उपस्थिती,

    दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी,

    जिम ,सलून स्पा, 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्याची शक्यता

  • 19 Jun 2021 07:23 AM (IST)

    सोमवारपासून नागपूर जिल्ह्यातील दुकानं रात्री आठपर्यंत खुले राहणार

    – सोमवारपासून नागपूर जिल्ह्यातील दुकानं रात्री आठपर्यंत खुले राहणार

    – रेस्टॅारंट आणि बार रात्री ११ पर्यंत सुरु राहणार

    – ५० टक्के क्षमतेनं कोचिंग क्लासेसलाही मिळाली परवानगी

    – जिल्हा प्रशासनाने काढले आदेश
    – ॲाक्सीजन बेड आणि पॅाझीटीविटी रेटनुसार नागपूर पहिल्या श्रेणीत
  • 19 Jun 2021 06:41 AM (IST)

    डेल्टा व्हेरिएंट जगभरातील कोव्हिड-19 चा डोमिनंट स्ट्रेन बनला आहे – WHO

    जागतिक आरोग्य संस्थ्येने सांगितलं की डेल्टा व्हेरिएंट जगभरातील कोव्हिड-19 चा डोमिनंट स्ट्रेन बनला आहे

  • 19 Jun 2021 06:36 AM (IST)

    नांदेडच्या हिमायतनगर शहराजवळ एक चार दिवसाचे अर्भक आढळलं

    नांदेडच्या हिमायतनगर शहराजवळ एक चार दिवसाचे अर्भक आढळलंय

    हिमायतनगर तालुक्यातील घारापूर ते वीरसनी रस्त्यावर हे अर्भक कॅरीबॅगमध्ये फेकून दिले होते

    सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार हे तिथून जात असताना त्यांना हे रडताना आढळले

    स्थानिक महिलांच्या मदतीने रामदिनवार यांनी हे अर्भक पोलिसांच्या हवाली केले आहे

    आता या अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

  • 19 Jun 2021 06:34 AM (IST)

    राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

    राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार

    शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार

    ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

  • 19 Jun 2021 06:31 AM (IST)

    राज्यात दिवसभरात 9 हजार 798 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    राज्यात दिवसभरात 9 हजार 798 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 14 हजार 347 रुग्णांची कोरोनावर मात, तर 198 जणांचा मृत्यू

  • 19 Jun 2021 06:29 AM (IST)

    कोल्हापूर येथील उत्तुरच्या हेल्पिंग हॅन्ड ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुर येथील हेल्पिंग हॅन्ड ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यात शेकडो तरुणांनी रक्तदान केले

Published On - Jun 19,2021 6:26 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.