Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

| Updated on: Jun 22, 2021 | 6:50 AM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
Corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jun 2021 10:04 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे

    आतापर्यंत 1120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55585 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 718 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 168 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 21 Jun 2021 09:02 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी

    नागपूर  : नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांना नियमित कालावधित सुरू ठेवण्याची परवानगी

    जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज एक आदेश काढत या संदर्भातील मागणीला मान्यता दिली

    आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये आता जीम, व्यायामशाळा नियमित खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

    21 ते 28 जून या कालावधीसाठी ही परवानगी असून पुढील शुक्रवारी पुन्हा या संदर्भातील नवे आदेश जारी करण्यात येणार आहेत.

  • 21 Jun 2021 07:29 PM (IST)

    ठाणे कोविड सेंटर येथे अजून एक भ्रष्टाचार, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप 

    ठाणे : मनसे जिल्हा अध्यक्ष आज ठाणे पालिका आयुक्तांना भेट देण्यासाठी गेले होते. ठाणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलण्यासाठी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड सेंटर आणि पार्किंग प्लाझा येथे नव्याने एका ठेकेदाराला टेंडर देण्यात आले.  या ठेकेदाराची तक्रार अविनाश जाधव यांच्याकडे केली असता या सर्व गोष्टींच्या चौकशीची मागणी मनसेने केली आहे. तसेच या भ्रष्टाचाराबद्दल अविनाश जाधव हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे मनसे  ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे

  • 21 Jun 2021 06:49 PM (IST)

    नागपुरात आज 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    136 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 476794

    एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 466973

    एकूण मृत्यू संख्या – 9019

  • 21 Jun 2021 03:39 PM (IST)

    प्रस्थापितांनी आरक्षण घालवलं, भाजपच्या वतीने 26 जूनला चक्का जामची हाक : गोपीचंद पडळकर

    कोल्हापूर : समाजा समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतंय

    Obcचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण नाकारल गेलं

    तारखा पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकार ने काही केलं नाही

    देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार या बाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता

    भाजपच्या वतीने 26 जूनला चक्का जामची हाक दिली आहे

    प्रस्थापितांनी हे राजकीय आरक्षण घालवलं

    यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील

  • 21 Jun 2021 12:13 PM (IST)

    जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील बारा कर्मचारी आढळले कोरोनाबाधित

    औरंगाबाद-

    जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील बारा कर्मचारी आढळले कोरोना बाधित..

    लेणी प्रशासनासह आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी..

    पर्यटन स्थळे खुली होऊन काही दिवस झाले असताच कर्मचारी बाधित निघाल्याने मोठा धक्का..

    रविवारी चाचणी अहवाल येताच उडाली खळबळ..

    नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

  • 21 Jun 2021 10:42 AM (IST)

    सोलापुरात 45 वर्षांवरील व्यक्तींनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

    सोलापूर –

    आज सोलापुरात 45  वर्षांवरील व्यक्तींनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

    30 ते 44 वयोगटाचे लसीकरण पुढील सूचना येईपर्यंत राहणार बंद

    राज्य शासनाकडून अद्याप आरोग्य विभागाला कोणतेही निर्देश आले नाहीत

    त्यामुळे 45 वर्ष पुढील वयोगटातील नागरिकांचे होणार लसीकरण

  • 21 Jun 2021 09:15 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर

    म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी

    मागील 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू

    औरंगाबाद जिल्ह्यात आढळले एकूण 1031 म्युकरमायकोसिसचे रुग्ण

    दोन दिवसात 11 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ

    663 जनांना दिला डिस्चार्ज तर 245 रुग्णांवर उपचार सुरु

  • 21 Jun 2021 07:25 AM (IST)

    जालन्यात नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, 50 % होत आहे लसीकरण

    जालना –

    जालन्यात नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, 50 % होत आहे लसीकरण.

    ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी उद्या समता परिषदेचे आक्रोश आंदोलन

    कोरोनाचे उल्लंघन करणाऱ्या कडुन, वाहतूक शाखेकडून 55 लाख दंड वसुल

    माजी मंत्री संजय राठोड यांचा जालना दौरा.

  • 21 Jun 2021 07:13 AM (IST)

    कोरोनाचे संकटही बहूतांशी निवळले आहे, त्यामुळे वाशिममध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी

    वाशिम जिल्ह्यात पॅसेंजर रेल्वेचा पर्याय सर्वानाच आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. कोरोनाचे संकटही बहूतांशी निवळले आहे, त्यामुळे रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

Published On - Jun 21,2021 6:22 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.