Corona Cases and Lockdown News LIVE : रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 521 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 1748 वर
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 521 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 1748 वर
रायगड – आज दिवसभरात कोरोनाचे 521 नवे रुग्ण
पनवेल शहरात सर्वाधिक 358 नवीन रुगणांची नोंद
ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव
दिवसभरात 3 रुगणाचा मृत्यू
दिवस अखेर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3167 वर
दिवसभरात बरे झालेले रुग्ण -255
आतापर्यंत कोरोनामुळे 1748 जणांचा मृत्यू
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 64808
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 69723
-
सांगली जिल्ह्यात 231 नवे कोरोना रुग्ण, दिवसभरात 2 जणांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 231 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1780 वर
सध्या 11439 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत 47174 जण कोरोनामुक्त
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची 50393 वर
-
-
Bbhivandi Corona Update | भिवंडी येथे 83 नवे कोरोना रुग्ण, सध्या 529 जणांवर उपचार सुरु
भिवंडी करोना अपडेट
भिवंडीत 24 तासांत 83 नवे कोरोना रुग्ण
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 529 वर
आज दिवसभरात 1 रुग्णाचा मृत्यू
भिवंडी येथे रुग्णांचा आकडा 14746 वर
आतापर्यंत बरे झालले रुग्ण 13714
भिवंडीमध्ये आतापर्यंत 586 जणांचा मृत्यू
सध्या भिवंडी येथे 529 रुग्णांवर उपचार सुरु
-
सोलापूर ग्रामीण भागात आज 299 नवे कोरोना रुग्ण, सध्या 1993 जणांवर उपचार सुरु
सोलापूर -ग्रामीण भागात आज 299 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू
ग्रामीण भागात 1993 सक्रिय रुग्ण
शहरात 217 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
तर दोन जणांचा कोरोनाने मृत्यू
शहरात सध्या 1726 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु
-
सोलापूर ग्रामीण पाठोपाठ शहरातही वीकेंड लॉकडाऊन, शहरातील सर्व दुकाने शनिवार-रविवारी बंद
सोलापूर ग्रामीण पाठोपाठ शहरातही वीकेंड लॉकडाऊन जाहीर
शहरातील सर्व दुकाने शनिवार-रविवारी राहणार संपूर्णपणे बंद
उर्वरीत दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्यवहार करण्याची मुभा
कडक निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळ्याची माहिती
उद्यापासून आदेश लागू होणार असल्याची आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
-
-
लातूर जिल्ह्यात कोरोनाचे 525 नवे रुग्ण सध्या 3077 जणांवर उपचार सुरु
लातूर : जिल्ह्यात आज नव्याने आढळले 525 पॉझिटिव्ह रुग्ण,
जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण संख्या रुग्णसंख्या 29835 वर
सध्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु 3077
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 728 कोरोना रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत 25891 रुग्ण कोरोनामुक्त
दिवसभरात 139 रुग्णांना डिस्चार्ज
-
चंद्रपुरात 245 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, दिवसभरात दोघांचा मृत्यू
चंद्रपूर : गेल्या 24 तासांत 3200 नमुने तपासणीतून 245 नव्या रुग्णांची नोंद
24 तासांत 2 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 26489
एकूण कोरोनामुक्त : 24417
सक्रिय रुग्ण : 1657
एकूण मृत्यू : 415
एकूण नमूने तपासणी : 263094
-
राज्यातील करोनाची परिस्थिती बाबत राज्य सरकार गंभीर; आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांची बैठक
राज्यातील करोनाची परिस्थिती बाबत राज्य सरकार गंभीर
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांची बैठक
राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
काही जिल्ह्यांतील लॉकडाऊनवर वर बैठकीत चर्चा
-
वसई विरारमध्ये 179 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, सध्या 1073 जणांवर उपचार सुरु
वसई विरारमध्ये मागच्या दीड महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ
मागच्या 24 तासांत 179 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
दिवसभरात 2 जणांचा मृत्यू, तर 50 जणांनी केली कोरोनावर मात
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 31922
कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 29940
आतापर्यंत एकूण 909 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
वसई विरारमध्ये एकूण 1073 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सरु
-
Wardha Lockdown Update : वर्ध्यात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड संचारबंदीमध्ये वाढ
वर्धा : धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड संचारबंदीमध्ये वाढ, जिल्ह्यात ३६ तासांची असणारी संचारबंदी ६० तासांवर, वर्धा जिल्ह्यात शनिवारी 27 मार्चच्या रात्री 8 ते मंगळवारी 30 मार्चच्या सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी, 29 मार्च रोजी धुलिवंदन असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्बंध, प्रत्येक विकेंडला संचारबंदी लागू असून यावेळी 24 तासांची वाढ करत यावेळी 60 तासांची संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा सुरू राहणार, दुकान, मॉल्स, मार्केट, हॉटेल, बाजार, पेट्रोल, डिझेल पम्प, बँका, बस , ट्रॅव्हल्स , ऑटो सेवा आदी बंद राहणार, जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आदेश
-
Nanded Lockdown Update नांदेडमध्ये लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर गावी निघाले
नांदेडमध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जातायत. आज नांदेडच्या रेल्वे स्थानकांवर शेकडो मजुरांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. काहींनी तात्काळमध्ये प्रवासाचे आरक्षण काढून गावाकडचा रस्ता धरलाय. तर काही जणांची जमेल तसा प्रवास करण्याची तयारी आहे. लॉकडाऊनमुळे सकाळपासून उपाशी असणाऱ्या या मजुरांबाबत पत्रकारांनी लंगरसाहिबच्या बाबाजीना कळवले. त्यानंतर बाबाजीनी स्वतः स्थानकावर येऊन उपाशीपोटी असणाऱ्या या मजुरांना लंगर साहिबच्या वतीने जेवण दिलय, त्यामुळे या गरीब मजुरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
-
जळगावात कोरोनाचा प्रकोप, प्रशासनाकडून काटेकोर निर्बंध
जळगाव गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला असतांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. रेमडिसीवर औषधांचा कोणताही प्रकारचा तुटवडा नाही. कुण्या हॉस्पिटलमधून अमुक-तमुक ठिकाणाहून खरेदी करण्याची सक्ती केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.
तसेच आधीप्रमाणेच खासगी रूग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी आधींचेच नियम कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संशयित रूग्णांवरील उपचारासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून याच्या मदतीने उपचारांमध्ये सुसूत्रता येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. रूग्णांचे निदान वेळेत होणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने चाचण्या करणे गरजेचे आहे. यासाठी संशयित रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत येणार असल्याची माहिती दिली.
-
नाशिकमध्ये महापालिका आरोग्य अधिकारीच कोरोनाच्या विळख्यात
– नाशिकमध्ये महापालिका आरोग्य अधिकारीच कोरोनाच्या विळख्यात
– शहरातील कोरोना नियंत्रण जबाबदारी सांभाळनारे डॉ बापूसाहेब नागरगोजे आणि डॉ आवेश पलोड कोरोना पॉझिटिव्ह
– कोरोना योद्धेच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली
-
मालेगाव ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा
मालेगाव ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा
सहारा कोविड सेंटरमध्ये केवळ एक तास पुरतील एवढेच सिलेंडर शिल्लक.
सहारासह खासगी रुग्णालयातही ऑक्सिजन स्थिती गंभीर
रुग्णांच्या जिवितास गंभीर धोका ..
नाशिक ,मालेगाव सह जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडर ची मागणी वाढल्याने निर्माण झाला तुडवडा
मालेगावात कोरोनाची स्थिती गंभीर
एक तासाला लागतात १२ सिलेंडर
-
कोरोना संकटा बरोबरच आता नाशिककरांवर पाणी टंचाईच संकट घोंघावणार
नाशिक
– कोरोना संकटा बरोबरच आता नाशिककरांवर पाणी टंचाईच संकट घोंघावणार
– नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 50 % पाणीसाठा शिल्लक
– येत्या काळात पाणी कपातीचे मनपा आयुक्तांचे संकेत
-
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्टमध्ये चालणार
पुणे –
– पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्टमध्ये चालणार,
– शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आता कोर्टात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे,
– त्याबरोबरच ज्यांच्या खटल्याची सुनावणी आहे त्याच लोकांना न्यायालयाचा परिसरात प्रवेश दिला जाणार,
– यासंदर्भात बार असोसिएशनचा सदस्यांची बैठकीनंतर नियमावली लागू,
– उच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमावलीचा आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा निर्णय उद्या?
पुणे –
– पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा उद्या निर्णय ?
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात उद्या कोरोना आढावा बैठक,
– पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनासंदर्भात अजितदादा उद्या आढावा घेणार,
– कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन होणार की कडक निर्बंध यावर उद्या निर्णय,
– पुण्याचे महापौर लोकडाऊनच्या विरोधात तर प्रशासन लोकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत,
– विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि दोन्ही पालिकेचे आयुक्त उद्या बैठकीला उपस्थित राहणार
-
कोरोनामुळे जिल्हा परिषदेचा अर्थ संकल्प 21 कोटींनी घटला
सांगली –
जिल्हा परिषदेचा अर्थ संकल्प 21 कोटींनी घटला
कोरोनाचे संकट आणि व्याजाचे उत्पन्न कमी झालेचा परिणाम
काही योजनांना कात्री लावत काही योजना बंद केल्या
अर्थ समिती सभापती जगनाथ माळी यांनी मांडला अंतिम सुधारीत अर्थ संकल्प
सुधारित अर्थ संकल्प 79 कोटी 66 लाख 26 हजार चा झाला
-
महाराष्ट्रातील वाहनांना गुजरात राज्यात प्रवेश नाही; गुजरात पोलिसांनी वाहने परतवली
नंदुरबार :
महाराष्ट्रातील वाहनांना गुजरात राज्यात प्रवेश नाही; गुजरात पोलिसांनी वाहने परतवली
महाराष्ट्र राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता महाराष्ट्रातील वाहनाना गुजरात राज्यात प्रवेश नाकारला
गुजरात पोलीसांनी अनेक वाहने परतवली दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास गेला वाया
नंदुरबार,धुळे,जळगाव जिल्ह्य़ातील वाहनचालकांना प्रवेश नाकारल्याने रुग्णांचे हाल
-
पुण्यात ऑक्सिजन बेडचा पुन्हा तुटवडा, शहरात अवघे 378 बेड शिल्लक
पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा पुन्हा तुटवडा
शहरात अवघे 378 ऑक्सिजन बेड शिल्लक
जम्बो रुग्णालयात 200 ऑक्सिजन खाटा ऊपलब्ध करुनही पालिकेला करावी लागतीये धावपळ
तर अनेक रुग्णांना बेड मिळणं झालंय मुश्किल
शहरात अवघे 30 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध
शहरात 8 शासकीय रुग्णालय आणि खाजगी 86 मिळून होते 3 हजार 344 बेड होते उपलब्ध
मात्र आता 10 टक्केच बेड शिल्लक राहिल्यानं प्रशासनाची चिंता वाढली
-
नागपुरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख पार
नागपूर –
नागपुरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख पार
सक्रिय बाधित रुग्णांची संख्या 33 हजार पार
काल दिवसभरात नागपुरात 3717 नवीन रुग्णांची नोंद
तर 40 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची आणखी वाढली चिंता
काल दिवसभरात 17155 चाचण्या करण्यात आल्या
बरं होणाऱ्यांची संख्या 81. 17 टक्के इतकी
-
पिंपरी चिंचवडमध्ये कोविड-19 लसीकरणाचा 1 लाखाचा टप्पा पूर्ण
पिंपरी चिंचवड –
-पिंपरी चिंचवडमध्ये कोविड-१९ लसीकरणाचा १ लाखाचा टप्पा पूर्ण
-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३८ व १७ खाजगी लसीकरण केंद्रावर १६ जानेवारी पासून आज पर्यंत १,०७,३२१ नागरीकांना लसीकरण
-नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर, ६० वर्षावरील व्यक्ती तसेच ४५ ते ६० या वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण
-
नाशिकमधील कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्टवर
नाशिकमधील कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट
बंद झालेले जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
खाजगी रुग्णांलयांवर ही ठेवणार बारकाईने लक्ष
रुग्णांची फसवणूक केल्यास कडक कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
-
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाला मिळणार 25 लाख रुपये मिळणार
पिंपरी चिंचवड –
-कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाला मिळणार 25 लाख रुपये
-13 कर्मचा-यांच्या वारसास सुरक्षा कवच योजनेनुसार 25 लाख रुपये अदा करण्यासाठी येणा-या 3 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने दिली मान्यता
-आतापर्यंत कोरोनामुळे महापालिकेच्या 23 कर्मचा-यांचा मृत्यू
-
“मुंबई – पुण्याप्रमाणेच नागपुरात देखील खाजगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्या”
नागपूर –
मुंबई – पुण्याप्रमाणेच नागपुरात देखील खाजगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्या
महापौर दया शंकर तिवारी यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी
नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
यासाठी खाजगी रुग्णालयांना अनुमति दिली तर यावर नियंत्रण करण्यात मदत होईल,
त्यामुळे पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहरात देखील खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केन्द्र सुरु करण्याची परवानगी दयावी, अशी मागणी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांना एका पत्राव्दारे केली आहे.
-
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत नागरिकांसाठी निर्बंध
पुणे –
– कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत नागरिकांसाठी निर्बंध,
– टपाल किंवा कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रे स्वीकारण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ कक्ष सुरू करण्याचे नियोजन,
– तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पासची व्यवस्था करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या विचाराधीन,
– शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त जिल्हा परिषदेत येत असतात,
– करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा परिषद मुख्यालयात ज्याप्रकारे निर्बंध घातले होते त्याचप्रमाणे आताही लावण्याबाबत नियोजन केल्याची माहिती.
-
नागपुरात १४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर –
नागपुरात १४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
कोविड संदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी केली कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने १४ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,१०,००० चा दंड वसूल केला.
पथकाने के.आर.पांडव कॉलेज, निर्मल नगरी वर रु १०,०००, बिग बाजार एम्प्रेस मालवर रु. १०,००० तसेच आर.डी.डिस्ट्रीब्यूटर्स, टिंबर मार्केट वर रु २५,००० चा दंड केला. विदर्भ शेतकरी भंडार, प्रतापनगर आणि कृष्णा इंफोटेक, सीताबर्डी ला सुध्दा रु १०,००० चा दंड लावण्यात आला.
पथकानी ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
-
नांदेडमध्ये पुढील 11 दिवस लॉकडाऊन जाहीर
नांदेडमध्ये कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील 11 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय
नांदेडमध्ये आज दिवसभरात 1 हजार 165 जण कोरोना पॉझिटिव्ह
दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय
नांदेडमध्ये सध्या 7 हजार 816 रुग्णांवर उपचार सुरु
नांदेडमध्ये गेल्या पाच दिवसात 5 हजार 663 नवे रुग्ण आढळून आले
42 जणांचा मृत्यू झाला आहे
-
नागपुरात 24 तासात 3 हजार 717 नवे कोरोना रुग्ण आढळून आले
नागपुरात 24 तासात 3 हजार 717 नवे कोरोना रुग्ण आढळून आले
दिवसभरात 2 हजार 98 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
तर 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला
नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 3 हजार 488 वर जाऊन पोहोचली
त्यातील 1 लाख 65 हजार 179 जण कोरोनामुक्त
नागुरात आतापर्यंत 4 हजार 737 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे
पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे
आज दिवसभरात 1 हजार 865 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह
तर 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत
पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
पुण्यात 24 तासात 3 हजार 509 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
पुण्यात 24 तासात 3 हजार 509 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
तर 1 हजार 410 जण पूर्णपणे बरे झाले
पुण्यात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पुण्यात सध्या 26 हजार 515 जणांवर उपचार सुरु
त्यातील 598 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनाने सांगितलं
-
मुंबईत 24 तासात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले
मुंबईत 24 तासात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले
तर 2 हजार 88 जण कोरोनातून मुक्त झाले
मुंबईत दिवसभरातील मृतांची संख्या 6 आहे
त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते
मृतांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे
मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर 84 दिवसांवर आला आहे
-
राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881 वर जाऊन पोहोचला
राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु
राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881 वर जाऊन पोहोचला
त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले
तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय
-
2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात 24 तासात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!
2021 मधील सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात 24 तासात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह
15 हजार 98 जण कोरोनामुक्त
95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
Published On - Mar 25,2021 8:29 PM