Maharashtra Coronavirus LIVE Update : सातारा जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 2156 नवे कोरोनाबाधित, 40 रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
सातारा जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 2156 नवे कोरोनाबाधित, 40 रुग्णांचा मृत्यू
सातारा :
सातारा जिल्हा कोरोना अपडेट :
आज 2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
40 बाधितांचा मृत्यू
943 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
आजची कोरोना आकडेवारी
एकूण नमुने – 724171 एकूण बाधित – 155490 घरी सोडण्यात आलेले – 131863 मृत्यू -3529 उपचारार्थ रुग्ण- 20086
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
-
अकोला जिल्ह्यात दिवसभरात 252 नवे कोरोनाबिधात, 9 रुग्णांचा मृत्यू
अकोल्यात कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 252 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला
आतापर्यंत 1037 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 47875 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 5675 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 521 जण कोरोनामुक्त झाले आहेत
-
-
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 306 नवे कोरोनाबाधित, 344 रुग्णांची कोरोनावर मात
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 306 रुग्ण व 05 मृत्यू तर 344 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 66, तुळजापूर 68,उमरगा 32, लोहारा 20, कळंब 33, वाशी 35, भूम 35 व परंडा 17 रुग्ण
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू 2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू 3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू 4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू 5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू 6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू 7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू 8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू 9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू 10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू 11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू 12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू 13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू 14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू 15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू 16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू 17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू 18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू 19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू 20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू 21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू 22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू 23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू 24 मे – 406 रुग्ण – 06 मृत्यू 25 मे – 409 रुग्ण – 08 मृत्यू 26 मे – 306 रुग्ण – 05 मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4104 सक्रीय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 88 हजार 858 नमुने तपासले त्यापैकी 53 हजार 490 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.51 टक्के
48 हजार 185 रुग्ण बरे 90.08 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 1201 तर 2.25 टक्के मृत्यू दर
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1274 नवे कोरोनाबाधित, 35 रुग्णांचा मृत्यू
सांगली कोरोना / म्युकर अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 1274 कोरोना रुग्ण
म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 108, आज 2 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 35 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3266 वर
सक्रीय कोरोना रुग्ण संख्या 12876 वर
तर उपचार घेणारे 1612 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 97066 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 113208 वर
-
राज्यात दिवसभरात 24 हजार 752 नवे कोरोनाबाधित, 453 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 24 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 23 हजार 65 रुग्णांची कोरोनावर मात, तसेच दिवसभरात 453 रुग्णांचा मृत्यू
-
-
नागपुरात दिवसभरात 685 नवे कोरोनाबाधित, 16 रुग्णांचा मृत्यू, 1754 जणांची कोरोनावर मात
नागपूर –
नागपुरात आज 685 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
1754 जणांनी केली कोरोना वर मात
तर 16 जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
मृत्यू संख्येत मोठी घट झाल्याने दिलासा
एकूण रुग्ण संख्या – 472496
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 454095
एकूण मृत्यू संख्या – 8838
-
नाशिकमध्ये दिवसभरात 1093 नवे कोरोनाबाधित
नाशिक :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1061
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1093
नाशिक मनपा- 403 नाशिक ग्रामीण- 674 मालेगाव मनपा- 016 जिल्हा बाह्य- 00
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4514
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -35 नाशिक मनपा- 19 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 16 जिल्हा बाह्य- 00
-
पुण्यात दिवसभरात 683 नवे कोरोनाबाधित, 1158 रुग्णांची कोरोनावर मात
पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ६८३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ११५८ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ३७ रुग्णांचा मृत्यू. त्यातील १० मृत्यू पुण्याबाहेरील. – १०२० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६७५४१. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८३५६. – एकूण मृत्यू -८११५. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५१०७०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८७५१.
-
पुणेकरांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळणार घरच्या घरी, होम आयसोलेट रुग्णांसाठी महापालिकेचा उपक्रम
पुणे :
पुणेकरांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळणार घरच्या घरी,
होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांसाठी महापालिकेनं उपक्रम घेतला हाती,
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ची पालिका करणार लायब्ररी,
रुग्णांना हॉस्पिटलचं प्रिस्क्रिप्शन आणि रुग्णांची माहिती द्यावी लागणार महापालिकेला ,
माहिती प्राप्त झाल्यास महापालिका ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर करणार उपलब्ध
-
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 278 नवे कोरोनाबाधित
चंद्रपूर:
गेल्या 24 तासात, 278 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 9 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 81790
एकूण कोरोनामुक्त : 76157
सक्रिय रुग्ण : 4222
एकूण मृत्यू : 1411
एकूण नमूने तपासणी : 459496
-
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन, मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि महाराष्ट्र सरकारने तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत आहेत. यासाठी महापालिका आणि शासकीय-निर्मित कोविड केअर सेंटरमधील मुलांसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. मुंबईच्या उपनगरातील मालाड पश्चिम इथे कोविड केअर सेंटर 2140 बेडचे उभारलं जातंय. यात 1536 ऑक्सिजनयुक्त युनिट्स असतील तर 190 आयसीयू बेड असतील. 190 पैकी 84 बेड मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी कोरोनाचा धोका जास्त असतो, अशा परिस्थितीत जर मुलांची तब्येत बिघडली तर त्यांना त्वरित आयसीयूमध्ये दाखल केले जाऊ शकते. आणि त्यांच्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात. मुंबईतील कांजूरमार्ग, वरळी, बीकेसी याठिकाणी अशी केंद्रे तयार केली जात आहेत, जिथे लहान मुलांसाठी विशेष आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांवर उपचार केले जातील तेथे एक दुसरी खोली आयसीयूशी जोडली जात आहे, जिथे कोरोनास उपचार घेत असलेल्या मुलांच्या पालकांना पीपीई किट घालून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-
वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 314 नवे कोरोनाबाधित, 410 जण कोरोनामुक्त
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात दिवसभरात 314 नवे कोरोनाबाधित रुग्ण,
चार रुग्णांचा मृत्यू, तर 410 जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 12 दिवसात 83 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 4446 कोरोना रुग्ण आढळले, तर या दरम्यान 6128 कोरोनामुक्त झालेत
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39131
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 2754
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 35937
आतापर्यंत एकूण मृत्यू – 439
-
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप, कोविड लसींचा घोटाळा केल्याचा दावा
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप, कोविड लसींचा घोटाळा केल्याचा दावा
किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
मुंबई महानगरपालिकेचा कोविड लस घोटाळा,
काल टेंडरची मुदत संपत होती, तर एका तासात 5 टेंडर आले!
हे 5 टेंडर बनावटी आहेत, कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही, तेच डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली.
गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका-ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला!
महानगरपालिकेने रेमडेसीवीर साठी रु.1568 ची ऑर्डर काढली व उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हाफकीनने रु.668 ची ऑर्डर काढली!
रेमडेसीवीर नंतर आता वॅक्सिन घोटाळा
-
मोठी बातमी ! IMA चं पतंप्रधान नरेंद्र मोदींना रामदेव बाबांविरूद्ध पत्र
IMA चं पतंप्रधान नरेंद्र मोदींना रामदेव बाबांविरूद्ध पत्र कोरोना लसीकरणाबाबत रामदेव बाबांचा चुकीचा प्रचार थांबवा – IMA रामदेव बाबांवर कायदेशीर कारवाई करा – IMA
-
गडचिरोलीत शिवसेनेकडून रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्ण आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवसेना पक्षाकडून नाश्ता आणि दोन वेळच्या भोजनची व्यवस्था, जवळपास प्रत्येक दिवशी 250 ते 275 रुग्णांना चहा-बिस्किट नाश्ता, भोजनाची व्यवस्था निशुल्क, सदर उपक्रम शिवसेनेकडून 12 दिवसांपासून सुरु, गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातून आलेले कोरोना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना एक मोठी मदत, लाकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहिल, शिवसेनेकडून जाहीर
-
पुणे जिल्ह्यात 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त
पुणे :
– पुणे जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती कोरोनामुक्त,
– पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संसर्ग मात्र दिवसेंदिवस वाढू लागला आहे,
– जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींनी मागील सव्वा वर्षापासून आजतागायत आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही,
– पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे,
– या गावांमध्ये प्रामुख्याने हवेली तालुक्यातील वाघोली, लोणीकंद, किरकटवाडी, मांजरी बुद्रूक, मांजरी खुर्द, नांदेड, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, पेरणे, केसनंद आदी गावांचा प्रामुख्याने समावेश आहे.
– या गावांसह जिल्ह्यातील ११७ गावांमध्ये हाय ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे,
– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती.
-
होम आयसोलेशन रद्दचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक नाही, राज्य आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची महापालिकेला माहिती
होम आयसोलेशन रद्दचा निर्णय पुणे शहरासाठी बंधनकारक राहणार नाही
ग्रामीण भागात काटेकोरपणे होणार अंमलबजावणी,
ज्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था आहे, अशा रुग्णांना कोव्हीड सेंटरला जाण्याची गरज नाही,
होम आयसोलेशन बंधनकारक नसल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलीये,
राज्य सरकारचा आदेश अजून प्राप्त नाही मात्र शासनप्रत आल्यावर निर्णय घेऊ,
शहरात कोव्हीड सेंटरला जाणं बंधनकारक राहणार नाही
राज्य आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची महापालिकेला माहिती
-
बार्शीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड अँटिजन टेस्ट
सोलापूर – बार्शीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड अँटिजन टेस्ट
दंडात्मक कारवाई केल्यानंतर सुद्धा विनाकारण करणाऱ्यांची संख्या होत नव्हती कमी
बार्शी शहर पोलिसांनी घेतला आहे निर्णय
बार्शी शहर आणि तालुक्यात कोरोना संसर्गाचा अद्याप नाही ओसरला
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बार्शी पोलिसांचा
-
मालेगाव येथील मसगा कॉलेज येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये वाजले फायर अलार्म वाजले आणि सुरु झाली पळापळ
मालेगाव – मालेगाव येथील मसगा कॉलेज येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये वाजले फायर अलार्म वाजले आणि सुरु झाली पळापळ
कोविड सेन्टर मध्ये उपचार घेत असलेल्या 55 रुग्णाचा जीव टांगणीला
काही क्षणातच मालेगाव अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत परिस्थिती मिळवतो नियंत्रण
मालेगाव येथे कोविड सेंटर मध्ये करण्यात आली मोकड्रिल
-
जादा पैसे मागून मृतदेह देण्यास नकार, इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलच्या 5 जणांवर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
सांगली –
जादा पैसे मागून मृतदेह देण्यास नकार
इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल च्या 5 जना वर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी शासनदरा पेक्षा जास्त पैसे घेऊन
आणखी 2 लाख 17 हजार ची हॉस्पिटल ने केली मागणी
उपचारासाठी आधीच 3 लाख 50 हजार रुग्ण च्या नातेवाईक यांनी भरले होते पैसे
18 मे ला उपचारा दरम्यान काशीनाथ कांबळे याचा झाला होता मृत्यू
मृतदेह न दिल्याने आणि जादा पैसे ची मागणी केलने
इस्लामपूर पोलीस ठाण्यात प्रकाश हॉस्पिटल च्या 5 जनावर मृतदेह ची विटंबना केले प्रकरणी फसवणूक आणि आट्रासिटी चा गुन्हा दाखल
-
बालकांवरील उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवा, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे आदेश
सांगली –
बालकांवरील उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी याचे आदेश
नियोजनासाठी टास्कफोर्स ची बैठक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका निर्माण होणे ची कारणाने तातडीने उपचार आणि उपाययोजना करणे चा दिला आदेश
-
पुणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडरचा निर्णय मुंबई महापालिकेवर अवलंबून
पुणे
पुणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडरचा निर्णय मुंबई महापालिकेवर अवलंबून,
मुंबई महापालिकेनं काढलेल्या ग्लोबल टेंडरला 8 वितरकांचा प्रतिसाद,
यापैकी ज्या कंपनीला कंत्राट मिळेल त्या कंपनीशी संपर्क करून पुणे महापालिका थेट लसीची खरेदी करणार,
त्याच दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने लसीची खरेदी करणार,
मुंबई महापालिकेनं नियम आणि अटींची पुर्तता केली असल्यानं नव्यानं निवीदा राबविण्याची गरज नाही,
महापालिका प्रशासनाची माहिती
-
देशात 24 तासांत 2,08,921 नवे रुग्ण, 4,157 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली –
देशात 24 तासात नवे रूग्ण – 2,08,921
देशात 24 तासात मृत्यू – 4,157
देशात 24 तासात डीस्चार्ज – 2,95,955
एकूण रूग्ण – 2,71,57,795
एकूण मृत्यू – 3,11,388
एकूण डीस्चार्ज – 2,43,50,816
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 24,95,591
आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -20,06,62,456
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
India reports 2,08,921 new #COVID19 cases, 2,95,955 discharges & 4,157 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,71,57,795 Total discharges: 2,43,50,816 Death toll: 3,11,388 Active cases: 24,95,591
Total vaccination: 20,06,62,456 pic.twitter.com/FMzmoG1yZH
— ANI (@ANI) May 26, 2021
-
नागपुरात कोरोनाच दिलासा दायक चित्र, 5 हजारच्यावर बेड उपलब्ध
नागपूर –
नागपुरात कोरोनाच दिलासा दायक चित्र निर्माण होत आहे
7 हजार 754 बेड पैकी 5 हजारच्यावर बेड उपलब्ध आहेत
एप्रिल महिन्यात दुसरी लाट असताना बेड उपलब्ध होत नव्हते
रुग्णालयावरील ताण कमी झाला
महापालिका तिसरी लाट बघता बालकांसाठी करणार कोविड रुग्णालयाची निर्मिती
-
पुणे शहरातील 90 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध
पुणे :
राज्य शासनाकडून महापालिकेला मंगळवारी दुपारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा झाल्याने
शहरातील ९० लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध
तर १४ ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी 60 टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार
तर 20 टक्के लस ही 45 वर्षे वयावरील हेल्थ केअर वर्कर, फ्र ंट लाईन वर्कर यांना लसीकरण केंद्रावर आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार
-
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नसलेल्या तिघांना म्युकरमायकोसिसची बाधा
कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना नसलेल्या तिघांना म्युकरमायकोसिसची बाधा
अनियंत्रित मधुमेह आणि रोगप्रतिकार शक्तीच्या आभाव हीच मुख्य कारणे असल्याचं तज्ञांच मत
कोरोना नसताना ही म्युकरमायकोसिस होत असल्यान चिंता वाढली
जिल्ह्यात आता पर्यत आढळले आहेत 56 म्युकरमायकोसिस बाधित तर 5 जणांचा झालाय मृत्यू
10 रुग्णांची म्युकरमायकोसिसवर ही मात
-
मेडिकल स्टाफच्या क्वॉरंटाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या शहरातील सत्तरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे 18 कोटी रुपयांचे बिल धकले
पुणे
मेडिकल स्टाफच्या क्वॉरंटाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या शहरातील सत्तरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे 18 कोटी रुपयांचे बिल धकले
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांना एक आठवडा ड्यूटी, तर एक आठवडा क्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय
त्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांची घेण्यात आली मदत
शहरातील सत्तर हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येत जिल्हा प्रशासनाला दिल्या रुम उपलब्ध करून
पंचतारांकित हॉटेलचालकांनीदेखील एक ते दोन हजार रुपयांच्या दरावर रूम दिल्या उपलब्ध करुन
एवढेच नव्हे, तर दोन वेळचे जेवण, नाष्ट्यासह या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली सेवा
जवळपास नोव्हेंबरपर्यंत या हॉटेल व्यावसायिकांनी रूम जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या
मात्र, अद्यापही जिल्हा प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना बिल दिले नाही
-
पुणे जिल्ह्याने पार केला 10 लाख कोरोनाबधित रुग्णांचा टप्पा, देशात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात
पुणे जिल्ह्याने पार केला 10 लाख कोरोनाबधित रुग्णांचा टप्पा, देशात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात
मंगळवारी दिवसभरात २७६६ कोरोनाबधित रुग्णांची नोंद
तर दिवसभरात ६२२५ जणांनी केली कोरोनावर मात
तर ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पुणे जिल्ह्यात ३८ हजार १७७ ऍक्टिव्ह रुग्ण
-
नाशिक – आठवडा भरात कोरोना रुग्णसंख्या आणखी आटोक्यात
नाशिक – आठवडा भरात कोरोना रुग्णसंख्या आणखी आटोक्यात
पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत झाला कमी
शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे
तर ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली
10 हजार रेमडिसिव्हर साठा देखील उपलब्ध
-
म्युकरमायकोसिस संदर्भात आज नाशकात महापौर निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
नाशिक – म्युकरमायकोसिस संदर्भात आज महापौर निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
तज्ञ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांच्यात होणार बैठक
म्युकर्माकोसिस नियोजनाबाबत बैठकीत होणार चर्चा
शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बोलावली तातडीची बैठक
-
सोलापुरात गेल्या आठ दिवसात म्युकरमायकोसिसच्या 100 रुपयांची भर
सोलापूर – गेल्या आठ दिवसात म्युकरमायकोसिसच्या शंभर रुपयांची भर
सर 15 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 243 जणांना म्युकरमायकोसिसचा आजार
पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयाने म्युकरमायकोसिस रुग्ण शोधण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
-
नागपूरात २०० खाटांचं लहान मुलांचं रुग्णालय सुसज्ज ठेवा, देवेंद्र फडणवीस यांच्या महानगरपालिका प्रशासनाला सूचना
– नागपूरात २०० खाटांचं लहान मुलांचं रुग्णालय सुसज्ज ठेवा
– विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या महानगरपालिका प्रशासनाला सुचना
– नॅशनल कॅंसर इन्स्टीट्यूट तर्फे सर्व मदतीची फडणवीसांची ग्वाही
– देवेंद्र फडणवीस यांनी घेतला म्युकरमायकोसीसचा आढावा
-
होम आयसोलेशनमधील रुग्णांना कोव्हीड सेंटरमध्येच उपचार घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानं महापालिकेची डोकेदुखी वाढली
होम आयसोलेशनमधील रुग्णांना कोव्हीड सेंटरमध्येच उपचार घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानं महापालिकेची डोकेदुखी वाढली,
आणखी 10 मोठ्या इमारती ताब्यात घेऊन महापालिका 10 हजार बेडची करणार व्यवस्था
महापालिकेला नव्यानं उभारावी लागणार कोव्हीड सेंटर,
सध्या पालिकेच्या सहा कोव्हीड सेंटरमध्ये 2 हजार 300 बेडचीच क्षमता आहे
शहरात सध्या 8 हजार 868 एवढी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे,त्यापैकी
सध्या कोव्हीड सेंटरमध्ये 455 रुग्णच उपचार घेत आहेत, तर 5 हजार 54 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत,
दिवसाला 700 ने रुग्णसंख्या वाढत राहिली तर 15 दिवसातच कोव्हीड सेंटर होणार फुल्लं,
महापालिकेची बेडची क्षमता आहे 10 हजार
आणखी यंत्रणा उभी करायची झाल्यास डॉक्टर , कर्मचारी करावे लागणार भरती
-
1 जुननंतर लॉकडाऊन औरंगाबाद शहरातील व्यापाऱ्यांचाही विरोध
औरंगाबाद –
1 जुननंतर लॉकडाऊन औरंगाबाद शहरातील व्यापाऱ्यांचाही विरोध
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दर्शवला विरोध
जर लॉकडाऊन लावला तरीही आम्ही दुकाने उघडणार
1 जूननंतर सरकारला सहकार्य करणार नाही
जर लॉकडाऊन वाढवला तर व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केला लॉकडाऊन ला विरोध
-
नागपूर जिल्हयात सलग दुसऱ्या दिवशी ५०० च्या आत रुग्णसंख्या
– नागपूर जिल्हयात सलग दुसऱ्या दिवशी ५०० च्या आत रुग्णसंख्या
– रुग्णसंख्या घटल्याने जिल्ह्यात ५००० पेक्षा जास्त बेड खाली
– जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आली १०८०० वर
– रुग्ण घटल्याने ॲाक्सीजन बेडसह व्हेटीलेटर्स बेड खाली
– आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाल्याने दिलासा
– नागपुरात लहान मुलांसाठी १०० बेडची व्यवस्था सज्ज
-
पुणे जिल्ह्यातील 42 गावांनी कोरोनाला रोखलं वेशीवरचं
पुणे
जिल्ह्यातील 42 गावांनी कोरोनाला रोखलं वेशीवरचं
,
जिल्ह्यातील 13 तालूक्यात 913 गावात कोरोनाचे रुग्ण,
तर 442 गावात कोरोनाचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नाही ,
कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा शहरापेक्षा ग्रामीण भागात झाला होता शिरकाव
मात्र आता जिल्हा परिषदेच्या उपाययोजनांमुळे गावं कोरोनामुक्त व्हायला सुरुवात ,
तरीही 913 गावांमध्ये अजून कोरोनाचे रुग्ण असल्यानं गावात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश .
बारामती, दौंड,हवेली, जून्नर, मावळ, या तालुक्यातील एकही गाव कोरोनापासून सुटलं नाही ..तालूक्यातील सगळ्याच गावात कोरोनाचा शिरकाव ….
-
नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरुवात, रुग्णाची संख्या आली 500 च्या खाली
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरवात
कालपासून रुग्णाची संख्या आली 500 च्या खाली
नागपुरात गेल्या 24 तासांत 470 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
1981 जणांनी केली कोरोनावर मात
तर 25 जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
गेल्या 24 तासांत झालेल्या चाचण्या – 14,145
एकूण रुग्ण संख्या – 472011
एकूण बरं झालेले – 452341
एकूण मृत्यू – 8822
-
यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यावर देखील कोरोनाचे सावट कायम
पुणे :
यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यावर देखील कोरोनाचे सावट कायम
पायी वारी संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी घेणार बैठक
कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता
यंदा देखील संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे
या पार्श्वभूमीवर यंदा देखील सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार किंवा कसे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार घेणार बैठक
-
दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक करु नये, महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका
पुणे
दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक करु नये अशी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका
येत्या शुक्रवारी होणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांचा बैठकीत ही भूमिका मांडणार
शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग
त्यामुळे टप्प्या टप्प्याने हा अनलॉक केला गेला पाहिजे
सुरुवातीला फक्त जे शनिवार रविवारी अत्यावश्यक दुकानं संपुर्ण बंद असतात ती सुरू करावीत
त्यानंतर हळू हळू सूट द्यावी अशी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका
-
पुण्यात गेल्या 24 तासांत 739 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 1560 जणांना डिस्चार्ज
पुणे कोरोना अपडेट
– गेल्या 24 तासांत 739 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– गेल्या 24 तासांत 1560 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात गेल्या 24 तासांत करोनाबाधित 49 रुग्णांचा मृत्यू, 14 रूग्ण पुण्याबाहेरील
– 1032 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 466858
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8868
– एकूण मृत्यू -8078
-आजपर्यंत एकूण डिस्चार्ज करण्या आलेले रुग्ण- 449912
Published On - May 26,2021 9:18 PM