Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 8 हजार 602 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 170 जणांचा मृत्यू
कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.15 % झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 14 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यात दिवसभरात 8 हजार 602 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 170 जणांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 8 हजार 602 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 6 हजार 67 रुग्णांची कोरोनावर मात, दिवसभरात 170 कोरोनाबाधितांचा मृत्यू
-
अकोल्यात दिवसभरात 5 नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू
अकोला कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाचा मृत्यू
आतापर्यंत 1132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56523 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 53 रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत
-
-
नाशिकमध्ये दिवसभरात 153 नवे कोरोनाबाधित, तीन जणांच्या मृत्यूची नोंद
नागपूर :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 100
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 153
नाशिक मनपा- 75 नाशिक ग्रामीण- 70 मालेगाव मनपा- 04 जिल्हा बाह्य- 04
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8444
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 03 नाशिक मनपा- 02 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 01 जिल्हा बाह्य- 00
-
नागपुरात दिवसभरात 22 नवे कोरोनाबाधित, 2 जणांचा मृत्यू
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आज 22 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद
17 जणांनी केली कोरोनावर मात
तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्ण संख्या 477396
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 468248
एकूण मृत्यू संख्या – 9038
-
पुण्यात दिवसभरात 331 नवे कोरोनाबाधित, 12 जणांचा मृत्यू
पुणे : दिवसभरात ३३१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २७७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७. -२२७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८२५८२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९१७. – एकूण मृत्यू -८६६८. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७०९९७. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८०९९.
-
-
कोल्हापुरातील व्यापार सुरू करण्याबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा नाही, व्यापारी नाराज
कोल्हापूर :
कोल्हापुरातील व्यापार सुरू करण्याबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील चर्चा नाही
परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांची निराशा
सरकारची संवेदनशीलता हरवली आहे का? व्यापाऱ्यांचा सवाल
निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा
अन्यथा शुक्रवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकान उघडणार
पोलीस,आर्मी आली तरी आम्हाला पर्वा नाही
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांची भूमिका
-
वारकऱ्यांना पंढरपूरला दिंडी काढून जाण्यास परवानगी न दिल्याने विश्व हिंदू परिषद आक्रमक
अहमदनगर :
वारकऱ्यांना पंढरपूरला दिंडी काढून जाण्यास परवानगी न दिल्याने विश्व हिंदू परिषद आक्रमक
सरकारने सीमित वारकऱ्यांना दिंडीने पंढरपूरला जाण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊन महापूजा करू नये, विश्व हिंदू परिषदेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
येत्या 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक दिंडी नेऊन करणार सरकारचा निषेध
-
कोरोना काळात संघाचं काम शेवटपर्यंत पोहोचले : भागवत कराड
मोहन भागवत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : -कोरोना काळात संघाच काम शेवटपर्यंत पोहोचले -जेवढं विज्ञान आम्हाला माहिती होत, तेवढं आम्ही कोरोना काळात वापरलं -कोरोना येण्यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी पासून पाय धुवून घरात येण्याची आमची परंपरा -सगळ्यांना निरामय बनवण्यासाठी व्रतस्थ परिश्रमाची आवश्यकता -आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र -त्याचं आपलं एक वेगळं शास्त्र आहे -अलोपथीमध्ये अनेक रोगांचे उपचार नाहीत, जे आयुर्वेदात आहेत -आयुर्वेदाच्या उपचाराला वेळ लागतो हा गैरसमज -अन्य पॅथी बरोबर आदानप्रदान करणं आवश्यक -प्रत्येक पॅथीमध्ये आणखी काय होऊ शकते याचा विचार होणे गरजेचे -भारतातील आणि पाश्चिमात्य देशातील रुगणांची प्रकृती वेगळी -मात्र आयुर्वेद स्टॅंडरडाईज उपचार पद्धती -आयुर्वेद हे प्राथमिक चिकित्सा आणि पुढील चिकित्सेचे सर्वात स्वस्त माध्यम -चिकित्सा स्वस्तात उपलब्ध होणारी हवी -हे फक्त भारताला आणि आयुर्वेदाला संभव -स्वास्थ ही मोठी आवश्यकता -स्वस्तात प्रस्थमिक चिकित्सा झाल्यास पुढे जाण्याची आवश्यकता नाही -हे आयुर्वेद पूर्ण करू शकेल -पूर्वी वैद्य निशुल्क चिकीत्सा होत -वैद्य त्याला कर्तव्य मानत -प्रत्येक व्यक्ती स्वस्थ रहावा यासाठी हे वैद्य प्रयत्न करायचे -आता आपण यासारखं काही करू शकतो का हे बघावं लागेल
-
रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
रायगड
जिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
कोविड सेन्टरमधील रुग्णानेच केली मारहाण.
डॉक्टरच्या डोक्यात घातला सलाईनचा स्टँड.
मारहाणीत डॉक्टरच्या डोळ्याला गंभीर इजा.
जखमी डॉक्टर स्वप्नदीप थळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट.
-
कोरोना काळात रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर
चंद्रकांत पाटील –
कोरोना काळात रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य
आधीच्या काळात लोक स्वतःहून मदतीला पुढे यायचे
स्वातंत्र्या नंतर मात्र शासनाने सर्व केलं पाहिजे ही मानसिकता झाली आहे
कोरोना काळात काम करून पुन्हा एकदा समाज ही आपली जबाबदरी हर तुम्ही लोकानी दाखवून दिलं
कोरोना काळात काम करणारे कोल्हापूर मध्ये ही अनेक जण आहेत
या सर्वांना एकत्र करण्याचा त्यांना मदत मिळवून देण्याचा माझा प्रयत्न
-
कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना दणका
नाशिक –
कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना दणका..
तीन वर्षांत 26 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल..
तर तब्बल 9 रेशन दुकानदारांना अटक..
जिल्हा पुरवठा विभागाकडून दीड लाख रुपयांच्या दंडाची देखील वसुली..
पुरवठा विभागाने केली तब्बल 8 हजार दुकानांची तपासणी..
51 दुकानात धान्य वाटपात गंभीर दोष आढळले..
तर 44 दुकानांचे परवाने कायमचे रद्द..
-
वायसीएम रुग्णालयात ओपीडी, शस्त्रक्रिया सुरु
पिंपरी-चिंचवड –
-वायसीएम रुग्णालयात ओपीडी, शस्त्रक्रिया सुरू
-शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इतर आजारांच्या रुग्णांचा विचार करता वायसीएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात ओपीडी सुरू करण्यात आली आहे
-रुग्णालयात आता शस्त्रक्रियादेखील सुरू झाल्या आहेत.
-जून महिन्यात जवळपास 400 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे
-सद्यस्थितीत बाह्यरुग्ण विभागात ओपीडी सुरू झाली आहे.तसेच शस्त्रक्रियादेखील सुरू झाल्या आहेत. कोरोनाकाळात फक्त अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या
-
औरंगाबाद शहरातील लसीकरण आज राहणार पूर्णपणे बंद
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरातील लसीकरण आज राहणार पूर्णपणे बंद
औरंगाबाद शहरातील सर्वच लसींचा साठा संपला
अवघ्या तीन दिवसात औरंगाबाद शहरात लसींचा साठा संपला
आजपासून लसींसाठी नागरिकांच्या नशिबी पुन्हा निराशा
सातत्याने लस टंचाई होत असल्यामुळे नागरिक हवालदिल
-
सोलापुरात कोरोना प्रतिबंधक नियम शाळा सुरु करण्यासाठी 81 टक्के पालकांची सहमती
सोलापूर –
कोरोना प्रतिबंधक नियम शाळा सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांची सहमती
एससीईआरटीच्या राज्यव्यापी ऑनलाईन सर्वेक्षणात सोलापूरचे 22 हजार पालक झाले होते सहभागी
पहिली ते बारावी पर्यंत शाळा सुरू केल्यास पालक मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी राज्यातील 81.18 पालकांनी दर्शवली
-
नाशिक शहरात आतापर्यंत अवघे 25 टक्के लसीकरण
नाशिक –
शहरात आतापर्यंत अवघे 25 टक्के लसीकरण
सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची मागणी
लसीकरण केंद्र भरपूर, मात्र लसींचा पुरवठा नाही
3 लाख 77 हजार नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
तर 1 लाख 17 हजार नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण
शहरात 110 केंद्र , मात्र प्रत्येक केंद्रांवर फक्त 50-60 लसींचा पुरवठा
-
सोलापुरात कोरोना तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आरोग्य यंत्रणेला हवे आहेत 31 कोटी
सोलापूर –
कोरोना तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आरोग्य यंत्रणेला हवे आहेत 31 कोटी
सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी 31 कोटी 22 लाख खर्चाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही
सध्या आरोग्य यंत्रणा यावर कोणताच ताण नाही मात्र संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू तिसऱ्या लाटेसाठी दररोज 190 ऑक्सिजनचा साठा निर्मिती करण्यात येणार
-
नाशकात कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना दणका
नाशिक – कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना दणका..
तीन वर्षांत 26 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल..
तर तब्बल 9 रेशन दुकानदारांना अटक..
जिल्हा पुरवठा विभागाकडून दीड लाख रुपयांच्या दंडाची देखील वसुली..
पुरवठा विभागाने केली तब्बल 8 हजार दुकानांची तपासणी..
51 दुकानात धान्य वाटपात गंभीर दोष आढळले..
तर 44 दुकानांचे परवाने कायमचे रद्द..
-
कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी ८१ टक्के पालकांनी दर्शविला होकार
पुणे –
कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी ८१ टक्के पालकांनी दर्शविला होकार…
आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास पाच लाख ६० हजार ८१९ पालकांनी सहमती…
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर
शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
त्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले…
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता शाळा सुरु होण्याच्या मार्गावर…
Published On - Jul 14,2021 6:36 AM