Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 283 नवे कोरोनाबाधित, 11 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 8,602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,44,801 रुग्ण बरे7 होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.17 % झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 16 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात दिवसभरात 283 नवे कोरोनाबाधित, 11 रुग्णांचा मृत्यू
पुणे : दिवसभरात २८३ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २६८ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५. -२२९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८३१९९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०४२. – एकूण मृत्यू -८६८०. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७१४७७. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९५०.
-
तिसरी लाट येईल हे गृहित धरूनच मुख्यमंत्र्याच्या काम करण्याच्या सूचना : बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया :
– मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली, महसूल मंत्री म्हणून मी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी होते – तिसरी लाट येईल हे गृहित धरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत – सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत – तिसरी लाट आली तरी उद्योग कसे सुरू राहतील त्यावर चर्चा प्रामुख्यानं झाली – त्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा केली – थोडीशी मोकळीक झाली तिथे रुग्ण वाढलेले दिसले – राष्ट्रीय पातळीवरून या सूचना दिल्या आहेत – परदेशात मोकळीक दिल्याने तिसरी लाट आल्याचं समोर आलंय ईडी कारवाई बाबत – आम्हाला वाटतं ईडीचा वापर राजकीय आकसाने होत आहे – आमचं सुरुवातीपासून मत आहे हे – नाना पटोले का दिल्लीला गेले माहित नाही – मीही अध्यक्ष राहिलेलो आहे – अध्यक्षाला नेहमी दिल्लीला जावं लागतं, चर्चा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी – त्यामुळे ते दिल्लीला गेले याचं मला विशेष वाटत नाही
-
-
महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या चिंताजनक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. लहान मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर याबाबतचे वक्तव्य केलं.
-
लवकरात लवकर दोन्ही डोस दिले पाहिजेत – अजित पवार
अजित पवार –
– कोरोनाबाधित असला त्याने गृह विलगिकरण करण्याऐवजी संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्यात,
– लवकरात लवकर दोन्ही डोस दिले पाहिजेत,
– संध्याकाळी पंतप्रधानासोबत मुख्यमंत्र्यांची व्हीसी आहे,त्यामध्ये लसीकरणाचा विषय मांडतील,
– लसीकरण पूर्ण करून कारखानदाराना कारखाने सुरू करण्याच्या सूचना
– निर्बंधांमध्ये काही बदल झालेले नाहीत, लेव्हल 3 असणार आहे
– पुण्यात 3500 बेडस उपलब्ध आहेत
– 176 रुग्ण म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला आहे
-
गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 949 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 949 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 542 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 40 हजार 26 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक
पुणे –
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक
– थोड्याच वेळात अजित पवार विधनभवनला पोहचणार,
– शिवाय खासदार सुप्रिया सुळेही सहभागी होणार आहेत,
– टिव्हीयुवरून लाईव्ह फ्रेम चेक करा
-
सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू
सोलापूर –
जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 590 रुग्ण आढळले
448 रुग्ण उपचारानंतर घरी परतले
60 रुग्णावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
म्युकरमायकोसिस झालेल्या 30 ते 40 टक्के रुग्णांना एक डोळा कायमचा गमवावा लागला
-
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या 640 पैकी 194 शाळा सुरू
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील 1 ते 8 वी पर्यंतच्या माध्यमिकच्या 640 पैकी 194 शाळा सुरू , पहिल्या दिवशी 15 हजार 89 विद्यार्थीनी लावली हजेरी – शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांची माहिती
Published On - Jul 16,2021 6:34 AM