Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  573 नवे रुग्ण

| Updated on: Apr 12, 2021 | 12:07 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Weekend Lockdown News LIVE

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  573 नवे रुग्ण
mumbai corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Weekend Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Apr 2021 11:12 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  573 नवे रुग्ण

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  573 नवे रुग्ण

    आज दिवसभरात 03 जणांचा मृत्यू तर 283 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 368 रुग्ण

    तुळजापूर 36 रुग्ण

    कळंब 45 रुग्ण

    उमरगा 41 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4188 सक्रिय रुग्ण

    आतापर्यंत एकूण 20 हजार 378 रुग्ण बरे

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.82 टक्क्यांवर

    आतापर्यंत एकूण 631 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात मृत्यूदर 2.49 टक्क्यांवर

  • 11 Apr 2021 10:10 PM (IST)

    नागपूर मेडिकल कॅालेजमध्ये क्षमतेपेभक्षा जास्त कोरोनाग्रस्तांवर उपाचार, 40 निवासी डॉक्टरांचे धरणे आंदोलन

    – नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांचं धरणे आंदोलन

    – रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर सुरु आहे उपचार

    – आरोग्य संत्रणेवर ताण आल्याने डॅाक्टर करतायत धरणे आंदोलन

    – रुग्णालयाचे 40 निवासी डॅाक्टरांचे आंदोलन

    – डॅाक्टरांची अडचण प्रशासनाला कळावी म्हणून धरणे आंदोलन

  • 11 Apr 2021 10:01 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 487 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 487 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1846 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3806 वर

    दिवसभरात 241 जण आज कोरोनामुक्त

    एकूण झालेल्या रुग्णांची संख्या 49902 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची  संख्या 55554 वर

  • 11 Apr 2021 10:00 PM (IST)

    ठाणे मनपा भागात 1,711 जणांना कोरोनाची बाधा

    ठाणे महानगरपालिका कोरोना  अपडेट # आज 1,711 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग  95,737 जणांना कोरोनाची लागण

    # आज 1,073 रुग्ण कोरोनातून मुक्त

    # कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण -78,462

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82% वर

    # 15,828 रुग्णांवर सध्या  उपचार सुरु आहेत

    # आज 7 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत कोरोनामुळे 1,447 जणांचा मृत्यू झाला

    # मागील 24 तासात एकूण 11,043 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या

  • 11 Apr 2021 09:45 PM (IST)

    राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 63294 नवे रुग्ण, 349 जणांचा मृत्यू

  • 11 Apr 2021 09:38 PM (IST)

    राज्यात कोरोनाचा महास्फोट ! दिवसभरात तब्बल 63 हजार 294 रुग्णांची वाढ

    राज्यात दिवसभरात तब्बल 63 हजार 294 नवे रुग्ण, आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. महाराष्ट्राती कोरोना रुग्णसंख्येचा हा महाविस्फोट आहे. तसेच राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 34 हजार 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

  • 11 Apr 2021 09:30 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 1086 नवे कोरोना रुग्ण 

    रायगड कोरोना अपडेट जिल्ह्यात दिवसभरात 1086 नवे कोरोना रुग्ण

    पनवेल ग्रामिण 98 रुग्ण

    अलिबाग 98 रुग्ण

    कर्जत 94 रुग्ण

    पेण 63 रुग्ण

    माणगाव 50 रुग्ण

    आज बरे झालेले रुग्ण 739 आज म्रुत्यू पावलेले रुग्ण 8.

  • 11 Apr 2021 09:28 PM (IST)

    रायगड जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे 9 लाख डोस, लवकरच आणखी 5 लाख डोस येणार 

    रायगड : जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी

    कोरोना प्रतिबंधक लसीचे 9 लाख डोस उपलब्ध

    आणखी 5 लाख डोस लवकरच उपलब्ध होणार

    जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती

    टीका महोत्सवाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

  • 11 Apr 2021 08:50 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 487 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 487 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1846 वर

    सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 3806 वर

    तर उपचार घेणारे 241 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रग्णांची संख्या 49902 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची 55554 वर

  • 11 Apr 2021 08:21 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 1,49,280 जण कोरोना प्रतिबंधक लस

    रायगड : जिल्ह्यात एकूण लसीकरण 1,49,280

    एकूण 85124  परुषांना लस

    एकूण 64148 स्त्रियांना लस

    इतर 8 जणांना लस

    पहिला डोस 1,34,255 जणांना दिला.

    दुसरा डोस 15025 जणांना दिला.

    एकूण 24453 फ्रटंलाईन वर्कर्सना लस

    एकूण 26013 हेल्थ वर्कर्सना लस

  • 11 Apr 2021 07:25 PM (IST)

    टास्क फोर्सच्या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली? आरोग्यमंत्री म्हणतात…

    आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

    मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत फक्त टास्क फोर्सचे सदस्य होते. या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. साधारणपणे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेतला. हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांचा ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. त्यामुळे दररोज पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल.

    अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

    रेमडेसिव्हीरबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. अनावश्यक वापरण्यावर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला आहे. तर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडून इंजेक्शन दिलं जाईल. त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल. हे इंजेक्शन 1400 रुपयांवर दिले जाणार नाही. काल मी याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आज सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं निर्यात केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभार

    बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. राज्यत सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, अशी टास्कफोर्समधील सदस्याची प्रतिक्रिया होती.

  • 11 Apr 2021 07:08 PM (IST)

    लॉकडाऊनमध्ये किराणा दुकान सुरुच राहील : नवाब मलिक

    “लॉकडाऊनबाबत मी अंदाज लावणार नाही. टास्क फोर्स जी सूचना देईल त्यावर निर्णय होईल. कोरोनाची साखळी तोडल्याशिवाय चर्चा होणार नाही. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली. लॉकडाऊन असताना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा कमी केला जाणार नाही. किराणा दूकान बंद राहणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

    “आजच्या घडीला ठिकठिकामी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. अनेक ठिकाणी कांगा लागल्या पाहिजेत. केंद्र सरकारने याबाबत प्रत्येक राज्याला कोठा ठरवून द्यावा. सरकारने जो निर्णय घेतला त्याचा स्वागत आहे”, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

  • 11 Apr 2021 07:03 PM (IST)

    टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली

    टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली आहे. जवळपास दोन तासांपासून ही बैठक सुरु होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली.

  • 11 Apr 2021 07:01 PM (IST)

    ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर यांसह अनेक विषयांवर टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर दिली आहे.

  • 11 Apr 2021 06:20 PM (IST)

    राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता, पण… : प्रविण दरेकर

    राज्यात सध्या 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. पण सरकार स्वत: घाबरली आहे. सरकारने आत्मविश्वासाने संकटाला सामोरे जायला हवं. लोकांनी धीर द्यायला हवं. पण सरकार लोकांना घाबरवत आहे.

  • 11 Apr 2021 06:05 PM (IST)

    मुख्यमंत्री आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करु शकतात, पण त्याआधी एक-दोन दिवसांचा वेळ दिला जाऊ शकतो

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करु शकतात. पण त्याआधी सर्वसामान्य नागरिकांना एक-दोन दिवसांचा वेळ दिला जाऊ शकतो. नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी वेळ दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी हे आठ दिवस महत्त्वाचे असतील.

  • 11 Apr 2021 05:52 PM (IST)

    राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करा, टास्क फोर्सच्या बैठकीत डॉ. तात्याराव लहाने यांचं मत

    राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करा, असं मत ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांनी मांडलं आहे. आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांनी याचबाजूने मत मांडलं आहे. लॉकडाऊनमुळे साखळी तोडता येईल. तसेच इतर सुविधाही योग्य प्रमाणे देता येतील, असं मत त्यांनी मांडलं.

    राज्यातील बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं.

  • 11 Apr 2021 05:34 PM (IST)

    राज्यात आठ दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट झालंय. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 11 Apr 2021 05:26 PM (IST)

    मोठी बातमी ! केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवली

    भारत सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवली. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज लागते. पण बाधितांची संख्या जास्त असल्याने या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा जाणवत होता. अखेर याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ही बंदी असेल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • 11 Apr 2021 05:21 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरु

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू झाली आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीत केली जाणार आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.

     टास्क फोर्सच्या बैठकीत कोणकोण हजर?

    डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.संजय ओक

    झहीर उडवाडिया लिलावती रुग्णालय

    डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे

    केदार तोरस्कर , फोर्टीस  रुग्णालयाचे

    डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक

    शिव रुग्णालयाचे डॉ . एन.डी. कर्णिक, पी . ए .के. रुग्णालयाचे डॉ . झहिर विरानी , केईएम रुग्णालयाचे डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्समध्ये आहेत.

  • 11 Apr 2021 04:38 PM (IST)

    कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ : अस्लम शेख

    मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली.

    अस्लम शेख नेमकं काय म्हणाले?

    राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. महाराष्ट्रात संख्या जास्त असूनही व्यापारी, गरिबांचा विचार करत आहोत. त्यामुळे सगळ्यांचं एकमत घेऊन पुढची दिशा निश्चित करायची आहे.

    गरिबांसाठी विरोधी पक्षाची जी मागणी आहे ती योग्य आहे. आमचीही याबाबत मागणी आहे. केंद्र सरकारने चांगले पॅकेज द्यावे. त्यापाठोपाठ आम्हीही देऊ. मुंबई आणि महाराष्ट्रातच का रुग्ण आढळत आहेत? याबाबतही शोध घ्या. काहीच्या राज्यांमध्ये निवडणुका होताहेत. लाखो लोक जमत आहेत. पंतप्रधान मोदी लाखोंना संबोधित करत आहेत. मग मुंबई आणि महाराष्ट्रात कसे रुग्ण वाढत आहेत. मराठी माणसाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की आणखी दुसरं कारण आहे? ते शोधण्याबाबत टास्क फोर्सला सांगितलं आहे.

    आम्ही अनेक दिवसांपासून गर्दी टाळा, निर्बंध पाळा, असं आवाहन केलं. शेवटी आम्ही नाईट कर्फ्यू लावला. त्यानंतर दिवसाही प्रतिबंध केले. त्यानंतर वीकेंड लॉकडाऊन लागू केला. लोकांसमोर अचानक परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा भीती वाटू नये, म्हणून आम्ही वारंवार समोर येतोय.

    केंद्र सरकारला लसीबाबत प्रश्न विचारायचा आहे. लसच नाही तर लसीकरणाचा महोत्सव कसा करणार? लसींचा साठा केंद्र सरकारकडे आहे. तेच पाठवतात. महाराष्ट्रात जिथे कोरोनाबाधित वाढत आहे तिथे लसीकरणासाठी परवानगी द्या. मुंबईत फक्त दोन ते तीन दिवसांचा लसींचा साठा आहे.

  • 11 Apr 2021 03:42 PM (IST)

    राज्यात लॉकडाऊन लागेल का? आरोग्यमंत्री म्हणतात….

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सध्याची कोरोना परिस्थिती, त्यावर सरकारकडून करण्यात येणारी उपाययोजना आणि लॉकडाऊन या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

    राज्यात लॉकडाऊन लागणार का?

    मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. काल 55 हजार रुग्ण वाढले. त्यामुळे या दृष्टीने आपल्याला आरोग्य सुविधा उभी करायची आहे. रेमडेसिव्हीर हे अमृत नाही की, लाईन लाऊन घ्यावे. त्या इंजेक्शनबाबत खऱ्या अर्थाने बऱ्याच डॉक्टरांना माहिती नाही. या औषधांचा योग्यपणे वापर होत नाही. तसेच त्यांचा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती नाही. सध्या ऑक्सिजनचाही तुटवडा नाही. सर्व ऑक्सिजन मेडिकलसाठी उपलब्ध आहेत. सर्व संसाधने योग्यपणे मिळवण्यासाठी आपण पूरेपर प्रयत्न करतोय. पण राज्यात ज्याप्रमाणे दररोज रुग्णांचा आकडा वाढतो आहे. अशीच रुग्णवाढ कायम असली तर लॉकडाऊन लावा लागू शकतो, अशी मनस्थितीत काल जवळपास सगळ्यांची तयार झाली आहे.

    गरीब घटकांना काही आधार देता येईल का अशा गोष्टींचा विचार करुन लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय होईल. येत्या दोन-तीन दिवसात मंत्रीमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील. लॉकडाऊन करावा, असे संकेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि सरकारच्या काही मंत्र्यांनी दिले आहेत. आपल्याला सध्या जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तिजोरीचा विचार करुन प्लॅन तयार करावा.

    केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष नाही

    केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात कोणताही संघर्ष नाही. आम्ही एकत्र आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी सर्वपक्षीय नेत्यांची भावना आहे. लसीकरणासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करावेत. सगळ्या उपकेंद्रांमध्ये वॅक्सिनेशन सुरु करण्याचे संदेश दिले आहेत.

  • 11 Apr 2021 02:10 PM (IST)

    पुणे शहरात एकही आयसीयु व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

    पुणे

    पुणे शहरात एकही आयसीयु व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

    तर ऑक्सिजनचे केवळ 53 बेड उपलब्ध

    ऑक्सिजन विरहित 706 बेड शिल्लक

  • 11 Apr 2021 01:39 PM (IST)

    लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

    देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

  • 11 Apr 2021 01:34 PM (IST)

    लॉकडाऊनचा फायदा घेण्यास व्यापाऱ्यांकडून सुरुवात, चिकनचे दर वाढवले

    रत्नागिरी – लॉकडाऊनचा फायदा घेण्यास व्यापाऱ्यांकडून सुरुवात.

    पूर्ण लॉकडाऊन होण्याआधीच पोल्ट्री व्यवसायिकांनी चिकन चे दर वाढवले.

    170 रू किलो चिकन वरून डायरेक्ट 250 रू किलो येवढे दर.

    सर्व सामान्यांची लूट करण्यास आतापासूनच सुरुवात.

    लॉकडाऊन करत असताना प्रशासनाने यांच्यावर पण नियंत्रण ठेवावं

  • 11 Apr 2021 01:32 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात 12 हजार लसीचे डोस दाखल

    यवतमाळ जिल्ह्यात 12 हजार लसीचे डोस दाखल अमरावती विभागातून फक्त यवतमाळला मिळाला 12 हजार डोस

    2 दिवस पुरेल एवढा लस साठा प्राप्त उद्या पुन्हा 50 हजार डोझ मिळणार असल्याची माहिती काल आज लस नसल्याने लसीकरण झालं आहे ठप्प जिल्हा लस भांडार मधून आज लस वितरित करण्यात येणार

  • 11 Apr 2021 12:50 PM (IST)

    केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल, कोरोना नियोजनाचा आढावा घेणार

    चंद्रपूर:- कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल,  प्रशासनाच्या एकूण सुविधा उभारणीवर व्यक्त केली नाराजी, जिल्ह्यात काल 24 तासात 640 रुग्ण संख्या तर धक्कादायक 16 मृत्यू, आरटीपीसीआर तपासण्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश, पथकाने केली लसीकरण केंद्राची पाहणी, प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना

  • 11 Apr 2021 12:50 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांशिवाय ओस

    रत्नागिरी- विकेंड लाॅकडाऊनचा दुसरा दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांशिवाय ओस किनाऱ्यांवर चिटपाखरू देखील नाही, रविराव असून सुद्धा कोकणातले किनारे लाॅक डाऊनमुळे ओस

  • 11 Apr 2021 12:24 PM (IST)

    मालेगावमध्ये कोरोनाचा उद्रेक, दोन दिवसात 18 जणांचा मृत्यू

    मालेगाव :- मालेगाव मध्ये कोरोना चा उद्रेक वाढला

    गेल्या दोन दिवसात कोरोनाने घेतले तब्बल 18 बळी

    तर 167 नवीन रुग्ण

    वाढती रुग्ण संख्या आणि वाढती मृत्यू संख्येने प्रशासन चिंतेत

    नागरिकांनी आत्ता तरी गंभीर होऊन नियमांचे पालन करावे असे केले आवाहन

    एकूण रुग्ण – 9686 डिस्चार्ज – 6733 मृत्यू। – 218

    एकटीव्ह – 1835

  • 11 Apr 2021 11:55 AM (IST)

    कल्याण पूर्वेत चिकन मटण साठी नागरिकांची एकच गर्दी…

    कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरू आहे.. दररोज जवळपास 2000 रुग्ण आढळून येत आहेत.. विकेंड लोकडाऊन च्या पहिल्या दिवशी कल्याण डोंबिवली कारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज कल्याण पूर्वेत चिकन मटण साठी दुकानांवर नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा फज्जाच उडाला होता…

  • 11 Apr 2021 11:52 AM (IST)

    केंद्रीय आरोग्य पथक मीरा भाईंदर मनपा क्षेत्रामध्ये दाखल, क्वारंटाईन सेंटर, हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनची पाहणी

    मीरा भाईंदर : केंद्रीय आरोग्य पथक मीरा भाईंदर मनपा क्षेत्रामध्ये दाखल..पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयाचा केली पाहणी..क्वारंटाईन सेंटर, हॉटस्पॉट आणि कंटेंनमेंट झोनची पाहणी..मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महानगरपालिका क्षेत्रा मध्ये शनिवार रोजी 461 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 34हजार 635 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 29 हजार 794 रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 983 रुग्णावर उपचार सुरु आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 858 रुग्णांणचा मृत्यू झाला आहे..

  • 11 Apr 2021 11:44 AM (IST)

    विकेंड लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळ पोलीस अॅक्शन मोडमध्ये

    यवतमाळ- विकेंड लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरात पोलीस ऍक्शन मोडमध्ये

    अनावश्यक फिरणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनावर पोलिसांची दंडात्मक कारवाई शहरातील बस स्थानक चौकात पोलिसांनी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली सुरू आता पर्यंत 70 हून अधिक गाड्यांवर दंडात्मक कारवाई

  • 11 Apr 2021 11:35 AM (IST)

    बीड जिल्हा कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

    बीड: जिल्हा कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

    28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

    जेल प्रशासनाची उडाली तारांबळ

    161 मंजुरी असलेल्या कारागृहात 297 कैदी बंदिस्त

    कारागृहात कैद्यांसाठी जागा अपुरी

    जेल प्रशासनाची डोके दुःखी वाढली

  • 11 Apr 2021 11:34 AM (IST)

    नागपुरातील मेडीकल आणि मेयो रुग्णालयात कोवीड बेड फुल्ल

    – नागपुरातील मेडीकल आणि मेयो रुग्णालयात कोवीड बेड फुल्ल

    – मेडीकलच्या कोवीड रुग्णालयाबाहेर ॲडमीशनसाठी लोकांची गर्दी

    – कालपासून रुग्ण उपचाराच्या प्रतिक्षेत बाहेर

  • 11 Apr 2021 10:41 AM (IST)

    मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात कोरोनाचा विळखा, अधिकारी जितेंद्र भावर यांचे कोरोनामुळे निधन

    एस. टी. महामंडळातील मध्यवर्ती कार्यालय मुंबई सेंट्रल येथील सहाय्यक कर्मचारी वर्ग अधिकारी जितेंद्र भावर यांचे कोरोनामुळे निधन

    मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात कोरोनाचा विळखा

  • 11 Apr 2021 09:57 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर कोरोना लसीकरण पूर्णतः बंद

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर कोरोना लसीकरण पूर्णतः बंद, कालपर्यंत लस मिळालीच नाही जिल्ह्यातील 178 केंद्रापैकी अॅक्टिव्ह 137 केंद्र पडले बंद

  • 11 Apr 2021 09:48 AM (IST)

    सोलापुरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले, गेल्या सहा दिवसात 125 पेक्षा जास्त मृत्यू

    सोलापूर –सोलापुरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले

    विद्युत दहिनीची क्षमता आणि होणारे मृत्यूचे प्रमाण पाहता अंत्यविधी करण्यास वेटिंग

    गेल्या सहा दिवसात 125 पेक्षा जास्त मृत्यू

    सोमवारी शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 3 जणांचा अंत्यविधी

    मंगळवारी जणांना शहरातील 23 जणांची अंत्यविधी तर ग्रामीण भागातील पाच जणांची अंत्यविधी

    बुधवारी शहरातील 18 जणांची तर ग्रामीण भागातील सात जणांची अंत्यविधी

    गुरुवारी शहरातील 26 जणांची तर ग्रामीण भागातील बारा जणांची अंतिम विधी

    शुक्रवारी शहरातील 23 जणांची तर ग्रामीण भागातील 8 जणांची अंत्यविधी

    शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत 21 जणांची अंत्यविधी

  • 11 Apr 2021 09:46 AM (IST)

    रत्नागिरीत कोरोनाचा विस्फोट होत असताना डाॅक्टरांसोबत जोरदार राडा

    रत्नागिरी- कोरोनाचा विस्फोट होत असताना डाॅक्टरांना धरलं जातंय धारेवर कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा डाॅक्टरांसोबत जोरदार राडा

    रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील व्हेल गावातील धक्कादायक घटना आरोग्य यंत्रणा घरातील सात सदस्य पाॅझिटिव्ह सांगायला गेल्यानंतर सदस्य आक्रमक कोरोनाचा विस्फोट होत असताना आरोग्य यंत्रणेवर पडतोय प्रचंड ताण कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलाच कसा डाॅक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती आरोग्य यंत्रणेला सहकार्य केलं जाणार नाही,  पाॅझिटिव्ह आलेल्या कुटुंबाची भुमिका चार दिवसापुर्वीचा व्हेल गावातील हा व्हिडिओ टिव्ही ९ च्या हाती

  • 11 Apr 2021 09:45 AM (IST)

    सोलापूर शहरातील 39 खाजगी हॉस्पिटलमधील 1567 बेड ताब्यात

    सोलापूर बेडची स्थिती

    शहरातील 39 खाजगी हॉस्पिटलमधील 1567 बेड ताब्यात

    त्यापैकी 1273 बेड कार्यरत असून 294 बेड रिक्त

    मात्र प्रत्यक्षात हॉस्पिटलकडे बोलणारे चौकशी केली असता बेड रिक्त नसल्याचे चित्र

    सिविल हॉस्पिटलमध्ये सी आणि ए ब्लॉक मध्ये जवळपास 190 बेड असताना 241 रुग्ण दाखल,एक ही बेड रिक्त नाही

    खासगी दवाखान्यांमध्ये ओटूचे 547 बेड असून त्यापैकी 117 बेड रिक्त

    आयसीयूचे 240 बेड असून 23 बेड रिक्त

    व्हेंटिलेटरचे शहरात 108 वेळा असून त्यातील 23 रिक्त

    रेमडिसिव्हर इंजेक्शचा पुरवठा जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या नियंत्रणात ठेवल्याने सुरळीत पुरवठा सुरू

  • 11 Apr 2021 09:44 AM (IST)

    सोलापुरात कडकडीत बंद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद

    सोलापूर – विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी सोलापुरात कडकडीत बंद

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद

    विनाकारण फिरणाऱ्यावर नागरिकांवर कारवाईचा सत्र सुरू

  • 11 Apr 2021 08:58 AM (IST)

    वाशिममध्ये कोरोना लसीचा तुटवडा, अवघ्या 180 लस बाकी

    वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत लसीचा प्रचंड तुटवडा

    127 पैकी 122 केंद्रांतील लसीकरण ठप्प

    खासगी हॉस्पिटल अवघ्या 180 लस बाकी..

    रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन चा पण मुबलक साठा असल्याचं जिल्हा आरोग्य विभागाने सांगत असून मात्र जिल्ह्यात प्रशासनाने नेमून दिलेल्या मेडिकल स्टोअर्स मध्ये रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन तुटवडा जाणवत आहे..जिल्ह्यात 20 इंजेक्शन उपलब्ध असून उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्येनुसार तुटवडा आहे…..

    वाशिम जिल्ह्यात ऑक्सिजन मुबलक साठा असल्याची आरोग्य विभागाची माहिती…

    जिल्ह्यातील ऐकून बेड सद्यस्थिती….

    बेड           एकूण   भरलेली  शिल्लक

    सर्वसाधारण- 1145     401      744

    ऑक्सिजन-    456     131       325

    व्हेंटिलेटर-       53        17          36

    एकूण बेड-    1654     549     1205

    वाशिम कोरोना बेडस स्थिती

    बेड          शासकीय   खासगी   शिल्लक

    ऑक्सिजन -200         171      277

    Icu        – 31            10        27

    व्हेंटिलेटर-    24            20         39

    एकूण बेड-  255          201       343

    वाशिम जिल्ह्यात ऐकून 42 ठिकाणी हॉटस्पॉट आहेत..नवीन नियमावली हॉटस्पॉट ठरविण्यात आले आहे…..तर 321 कंटमेंट झोन आहेत…

  • 11 Apr 2021 08:57 AM (IST)

    वसई, विरार, नालासोपारा परिसरात नाकानाक्यावर पोलीस बंदोबस्त

    विकेंड लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवसी सकाळपासूनच पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे.

    – वसई विरार नालासोपारा परिसरातील नाकानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे..

    – अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडणा-या नागरिक, वाहनधारक यांची चौकशी करून, त्यांच्यावर कारवाईचा बडगा ही उगारल्या जात आहे..

    – नेहमी वर्दळीने गजबजलेल्या रस्त्यावर दोन दिवसांपासून मात्र तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे..

  • 11 Apr 2021 08:51 AM (IST)

    मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट, विकेंड लॉकडाऊनमुळे नागरिकांची गर्दी ओसरली

  • 11 Apr 2021 08:48 AM (IST)

    आम्ही यापुढे लॉकडाऊनचे अनुसरन करणार नाही, इम्तियाज जलील यांचा लॉकडाऊनला विरोध

    राज्य सरकारच्या लॉकडाऊनला इम्तियाज जलील यांचा विरोध

    राज्यातील लॉकडाऊनसह पुण्यातील लॉकडाऊनच्या निर्णयावर – जलील आक्रमक

    आम्ही यापुढे लॉकडाऊनचे अनुसरन करणार नाही,आता बस म्हणजे बस – जलील यांचे ट्विट

    आता लॉकडाऊन पाळणार नसल्याचे इम्तियाज जलील यांचे ट्विट

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पोट भरलेले असल्याचे वक्तव्य..

    लॉकडाऊनचा निर्णय गरिबांच्या भल्याचा नसून आपला निर्णय आपणच घ्यावा – जलील यांचे जनतेला आवाहन

  • 11 Apr 2021 08:39 AM (IST)

    नाशिक महापालिका रुग्णालयात सगळेच ऑक्सिजन बेड करा, शिवसेनेची मागणी

    नाशिक – महापालिका रुग्णालयात सगळेच ऑक्सिजन बेड करा

    शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची मागणी

    शहरातील ऑक्सिजन पुरवठ्यावर सेनेने सुचवला आयुक्तांना उपाय

    कोव्हिडं सेंटर मध्ये देखील ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी

  • 11 Apr 2021 08:38 AM (IST)

    कोल्हापुरात संपूर्ण लॉकडाऊन असेल तरच दुकाने बंद ठेवणार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

    कोल्हापूर

    संपूर्ण लॉकडाऊन असेल तरच दुकाने बंद ठेवणार

    अन्यथा उद्यापासून दुकाना पूर्ववत उघडणार

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चा इशारा

    ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट दुकाने बंद केली जात असल्याने व्यापारी आक्रमक

  • 11 Apr 2021 08:15 AM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळे निधन

    नाशिक – शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळे निधन

    गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार

    पहाटेच्या सुमारास झालं निधन

    कल्पना पांडे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ

  • 11 Apr 2021 08:14 AM (IST)

    पुण्यात पीएम केअरमधून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब

    पुणे : शहराला कोरोनाच्या साथीत मिळालेले पीएम केअरचे जवळपास ससून रुग्णालयातील 58 व्हेंटिलेटर खराब

    पुण्यामध्ये मुळातच व्हेंटिलेटरची कमतरता

    सध्या ससून मध्ये 87 व्हेंटिलेटर, यातील एकही सध्या शिल्लक नाही

    केंद्र सरकारकडून शहरासाठी 165 नवे व्हेंटिलेटर देण्याची घोषणा

  • 11 Apr 2021 08:13 AM (IST)

    पुण्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांना ‘रेमडेसिव्हीर’ हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार

    पुणे : उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांना ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्‍शन हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार

    रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन दु-सूत्री कार्यक्रम राबवणार

    त्यामध्ये थेट हॉस्पिटलला ”रेमडेसिव्हीर’ पुरवठा करण्यात येणार

    त्यामुळे औषध दुकानांसमोर होणारी गर्दी थांबणार

    शिवाय, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर हॉस्पिटलला आकारता येणार नाही

  • 11 Apr 2021 08:11 AM (IST)

    रायगड जिल्ह्यात नवीन लससाठा उपलब्ध

    रायगड  जिल्ह्याला नवीन लस साठा उपलब्ध.

    यामध्ये कोव्हीशिल्ड 16700 तर कॉव्हक्सीन 7200 उपलब्ध झालेला आहे.

    आत्ता पर्यंत एकुण झालेले लसीकरण 145079.

  • 11 Apr 2021 08:10 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरेसा साठा

    कोल्हापूर : जिल्ह्यात  रेमडेसिव्हीर  इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध

    जिल्ह्यात दिवसाला 300 ते 400 इंजेक्शनची मागणी

    अत्यंत गंभीर रुग्णांनाच दिल जातेय प्राधान्याने इंजेक्शन

    जिल्ह्यात उद्या पर्यंत इंजेक्शनच्या आणखी 3 हजार व्हाईल उपलब्ध होणार

  • 11 Apr 2021 08:07 AM (IST)

    रेमडेसिव्हीर पाठोपाठ नागपुरात ॲाक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची फरफट

    रेमडेसिव्हीर नंतर नागपुरात जाणवू लागला ॲाक्सीजनचा तुटवडा

    – जिल्ह्यात पाच ते सहाच ॲाक्सीजन पुरवठादार

    – ॲाक्सीजनची हमी मिळाल्यास हॅास्पीटल कोरोनाचे बेड वाढवायला तयार

    – नागपूरात व्हेटीलेटर्स बेडच संपले, रुग्णांची फरफट

    – नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ॲाक्सीजनवर

    – जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ५० हजारच्या पुढे

  • 11 Apr 2021 08:05 AM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णांची काही खाजगी हॅास्पीटलकडून लूट, रुग्णांकडून अनेक तक्रारी

    – नागपुरात कोरोना रुग्णांची काही खाजगी हॅास्पीटलकडून लूट

    – खाजगी रुग्णालयाच्या लूटीबाबत मनपाकडे अनेक तक्रारी

    – खाजगी रुग्णालयातील बिलांबाबत महानगरपालिका दक्ष

    – मनपाच्या ७० अधिकाऱ्यांची टीम तपासणार बिलं

    – प्रत्येक खाजगी हॅास्पीटलला मनपा अधिकाऱ्यांचे नंबर लावणं अनिवार्य

  • 11 Apr 2021 08:04 AM (IST)

    औरंगाबादेत संपूर्ण लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांची महत्वाची बैठक

    औरंगाबाद :-

    संपूर्ण लॉकडाऊन संदर्भात व्यापाऱ्यांची महत्वाची बैठक..

    जिल्हा व्यापारी महासंघ तथा 72 व्यापारी संघटना घेणार ऑनलाइन बैठक..

    राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात करणार चर्चा..

    लॉकडाऊनला पाठिंबा द्यायचा की नाही ? यावर होणार चर्चा..

  • 11 Apr 2021 07:14 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 5131 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 5131 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – 24 तासांत जिल्ह्यात 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    – एका दिवसांत २८३१ रुग्ण झाले कोरोना मुक्त

    – जिल्ह्यात एका दिवसांत २०६६६ कोरोना चाचण्या

    – जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली ५१५७६ वर

  • 11 Apr 2021 07:13 AM (IST)

    नांदेडमध्ये कोरोनाचे 1759 नवीन रुग्ण, गेल्या पाच दिवसात 7176 रुग्णांची भर

    नांदेड: गेल्या 24 तासात कोरोनाचे 1759 नवीन रुग्ण

    तर 27 जणांचा मृत्यू

    आता पर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक आकडा

    एकूण टेस्ट 6036 त्यापैकी 1759 पॉझिटीव्ह

    24 तासात 1314 जणांना सुट्टी

    आता पर्यंत 55751 पॉझिटीव्ह

    बरे झाले – 42762

    एकूण मृत्यू – 1050

    गेल्या पाच दिवसात

    6 एप्रिल – 1062 – 23 7 एप्रिल – 1255- 26 8 एप्रिल – 1450 – 26 9 एप्रिल – 1650- 27 10 एप्रिल – 1759 – 27

    पाच दिवसात 7176 / 129 मृत्यू

  • 11 Apr 2021 07:02 AM (IST)

    नागपूरच्या कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, जिवंत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे डेथ सर्टिफिकेट

    – नागपूर जिवंत कोरोना पॅाझीटीव्ह महिलेचं दिलं डेथ सर्टीफेकट

    – गायकवाड पाटील रिसर्च सेंटर कोवीडालयमधील धक्कादायक प्रकार

    – नागपूर शेजारी डोंगरगाव येथील कोवीडालयात घडला संतापजनक प्रकार

    – दुसऱ्याचा मृतदेह कुटुंबियांना देण्याचा झाला प्रयत्न

    – महिला आपल्या बेड वर बसून असल्याचं कळलं

    – आशा मुन यांच्या नातेवाईकांची हिंगणा पोलिसांत तक्रार

  • 11 Apr 2021 06:36 AM (IST)

    राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होण्याची शक्यता

    राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले. येत्या दोन दिवसात याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

  • 11 Apr 2021 06:33 AM (IST)

    नागपुरातील कोरोना स्थिती

    नागपूर जिल्ह्यात काल 5 हजार 131 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 831 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. काल नागपूर जिल्ह्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 51 हजार 576 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • 11 Apr 2021 06:31 AM (IST)

    पुण्यातील कोरोना स्थिती

    पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 953 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 389 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 50 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

    नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 22 हजार 982 वर जाऊन पोहोचलीय. त्यातील 2 लाख 66 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 11 Apr 2021 06:29 AM (IST)

    मुंबईतील कोरोना स्थिती

    मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 327 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या मात्र वाढली आहे. दिवसभरात 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील 30 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.

    मुंबईत सध्या 91 हजार 108 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झालाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपला आहे.

  • 11 Apr 2021 06:28 AM (IST)

    राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 लाखांच्या पार

    राज्यात सध्या 5 लाख 36 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. त्यातील 27 लाख 48 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त होऊल घरी परतले आहेत.

  • 11 Apr 2021 06:26 AM (IST)

    राज्यात काल दिवसभरात 55 हजार 411 नवे कोरोना रुग्ण

    राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पण काल कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. काल दिवसभरात 53 हजार 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 55 हजार 411 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 82.18 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Published On - Apr 11,2021 11:12 PM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.