प्रशासनाकडून मान्यता नसताना कोरोना हॉस्पिटल सुरु, काही रुग्णांचा मृत्यू, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Hospital opened without approval in Chandrapur).

प्रशासनाकडून मान्यता नसताना कोरोना हॉस्पिटल सुरु, काही रुग्णांचा मृत्यू, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 11:03 PM

चंद्रपूर : कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोणतीही प्रशासकीय मान्यता नसताना शहरात मोठ्या धडाक्यात एक कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहरालगत वांढरी गावात खाजगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये हा खेळ सुरु आहे. श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालय असे या रुग्णालयाचे नाव आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. विश्वास झाडे या रुग्णालयाचे प्रमुख आहेत (Corona Hospital opened without approval in Chandrapur).

रुग्णालयाला कोणतीही मान्यता नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट

संबंधित रुग्णालयाला अद्याप कुठलीही मान्यता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्यता प्रस्ताव सादर केल्यावर पहिल्या निरीक्षण दौऱ्यात शासकीय पथकाने रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्याचा शेरा दिला होता. मात्र याविषयी ठोस सुधारणा होण्याआधीच रुग्णालयाने 25 ऑक्सिजन बेडसाठी रुग्णभरती सुरू केली. त्याहून संतापजनक म्हणजे या रुग्णालयात मृत्यूची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी डॉ. झाडे रुग्णालयात फिरकत नसल्याचा आरोप केलाय. प्रशासनाने या रुग्णालयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. चंद्रपुरात सोमवारी (19 एप्रिल) दिवसभरात तब्बल 1213 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चंद्रपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 43 हजार 444 वर पोहोचला आहे. यापैकी 31 हजार 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चंद्रपुरात सध्या 11 हजार 541 सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 622 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे (Corona Hospital opened without approval in Chandrapur).

राज्यात दिवसभरात 58 हजारापेक्षाही जास्त रुग्ण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी राज्यात आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 52 हजार 412 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 10 हजारांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात काल दिवसभरात तब्बल 68 हजार 631 रुग्ण आढळून आले होते.

हेही वाचा : रुग्णसंख्येत घट, चिंता मात्र कायम! दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.