Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात कुठे काय नियम लागू? काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे.
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. राज्यात 4 जानेवारीला ओमिक्रॉनचे 70 रुग्ण आढळले आहेत.