Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्यातील ससूनमध्ये डॉक्टर्स, नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह, आतापर्यंत 26 जणांना कोरोनाची लागण
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. महाराष्ट्रात अजूनही रोज 40 आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात 39207 नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर एकूण 53 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 12810 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत मंगळवारी 6149 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर सात जणांचा मृत्यू झाला. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी-जास्त होत आहे. असे असले तरी सध्या मुंबईत संसर्ग कमी झालेल नाही. म्हणूनच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातील ससूनमध्ये डॉक्टर्स, नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह, आतापर्यंत 26 जणांना कोरोनाची लागण
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ससून रुग्णालयाला मोठा फटका
ससूनमध्ये डॉक्टर्स, नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह
गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोनाची लागण
संसर्गामुळे रुग्णालय प्रशासनावर ताण
-
हर घर दस्तक योजनेत पुणे जिल्ह्यात 10 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण
पुणे : हर घर दस्तक योजनेत पुणे जिल्ह्यात 10 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण
3 नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन केलेल्या लसीकरणात 13 लाख 60 हजार जणांना दिली लस
4 लाख जणांनी घेतला लसीचा पहिला डोस
तर 9 लाख जणांना दिला लसीचा दूसरा डोस
पुणे महापालिका कार्यक्षेत्रात 3 लाख 68 हजार जणांना घरी जाऊन दिली लस
जिल्ह्यात दररोज 60 हजार लसीकरणाचं या मोहितून उद्दिष्ट
-
-
नागपुरात कोरोनाचा प्रकोप, 14 हजारच्या पार पोहोचला सक्रिय रुग्णांचा आकडा
नागपूर -नागपुरात वाढत आहे कोरोनाचा प्रकोप
14 हजारच्या पार पोहोचला सक्रिय रुग्णांचा आकडा
गृह विलगिकरणमध्ये असलेल्यांची संख्या जास्त असली तरी आता रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढायला लागली
3 हजारच्या वर रुग्ण घेत आहेत रुग्णालयात उपचार
24 तासात 2407 नवीन रुग्ण, मृत्यू शून्य असल्याने काहीसा दिलासा
चाचण्यांनमध्ये करण्यात आली वाढ
-
नागपूर महापालिकेत कोरोनाचा शिरकाव, कामकाज प्रभावित
नागपूर -नागपूर महापालिकेत कोरोनाचा शिरकाव
डझनभर अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
कामकाज प्रभावित, संपर्कात आलेल्यांच्या मनात भीतीचं वातावरण
कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करणारे अधिकारीच बाधित झाल्याने वाढली चिंता
-
मंगळवेढा सब जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण, 8 कैदी कोरोना पॉझिटिव्ह
पंढरपूर – मंगळवेढा सब जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण
सबजेल मधील 8 कैदी कोरोना पॉझिटिव्ह 39 कैद्यांची रॅपिड टेस्ट केल्यानंतर कैद्यांना कोरोना झाल्याचे झाले स्पष्ट
या अधी काही पोलिसांना झाला होता संसर्ग
कैद्यांचा आणि पोलिसांचा संपर्क आला असेल तर मंगळवेढा सब जेल बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करावी लागणार
-
Published On - Jan 19,2022 6:15 AM