मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये (School And College) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता मास्क वापरण्याच्या सक्तीबाबात राज्य सरकारच्या कृती गटातर्फे अभ्यास करण्यात येत आहे. जगात काही देशांनी मास्क वापरण्याची सक्ती मागे घेतली आहे. या निर्णयामागे एखादा वैज्ञानिक आधार आहे का, याची तपासणी कृतीगटाद्वारे केली जाईल. राज्यात सध्या कोरोना मुक्त होण्याचा दर 94 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.93 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 2074 लोकांना ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झाला आहे. यासह कोरोना संदर्भातील सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
पुणे
ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत पुण्यानं मुंबईला टाकलं मागे
राज्यात आज ओमिक्रॉनचे 110रुग्ण
सगळेच रुग्ण एकट्या पुणे महापालिका हद्दीतील
आतापर्यंत राज्यात 3 हजार 40 रुग्णांची नोंद त्यापैकी 1603 जणांना मिळाला डिस्चार्ज
राज्यात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण पुण्यात,
आतापर्यंत 1185 रुग्णांची नोंद तर मुंबईत 1015 रुग्णांची नोंद
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात गेल्या 24 तासात 3310 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
9 जणांचे मृत्यू , तर 4583 जणांनी केली कोरोना वर मात
आज च्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त
ऍक्टिव्ह रुग्ण – 27120
चाचण्या – 11253
पुणे
दिवसभरात 3374 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 8200 डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03. एकूण 10 मृत्यू
– 358 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 54
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 34
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 628058
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 36340
– एकूण मृत्यू – 9221
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 582496
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10980
चंद्रपूर कोरोना अपडेट
आजचे कोरोना बाधित -416
कालचे कोरोना बाधित – 438
आजचे कोरोनामुक्त -607
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 3684
आजचे बाधित मृत्यू – 1
वुहानमधील संशोधकांनी केलेल्या दाव्यादुसार तीनपैकी एका व्यक्तीचा निओकोव्हमुळे मृत्यू होण्याची भीती आहे. हा मृत्यूदर चिंता वाढवणारा असल्याचं जाणकारांचं मत असून यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं आणि वेळीच धोका ओळखणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातंय. सध्या होत असलेला सार्सचा वेगवान संसर्ग हा भविष्यात निओकोव्हचा धोका वाढवण्याचं एक प्रमुख लक्षण आहे, असाही संशय व्यक्त केला जातोय. वाचा सविस्तर वृत्त
मास्कसंदर्भात आकडेवारी पाहून निर्णय घेतला जाणार – राजेश टोपे
अनेक देश मास्कमुक्त होत आहेत, परदेशातील अनेक देशांनी नियम शिथिल केले आहेत. काही देश मास्कमुक्तही झाले आहेत.
केंद्र आणि राज्यांचं टास्क फोर्स एकत्र काम करणार
आयसीएमआरला अभ्यास करुन मार्गदर्शन करण्याबाबत महाराष्ट्र कॅबिनेटनं आयसीएमआरला सूचना दिल्यात
बरं होण्याचं प्रमाण बाधित होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त
आपल्याला कोरोनासोबत जगायचं, अशाप्रकारे स्वीकारुन पुढे जावं लागेल
कोरोनासोबत कसं जगायचं, याचं मार्गदर्शन लोकांना होण्याची गरज
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं TV9 मराठीसोबत बोलताना वक्तव्य
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला दिलासा दिलाय मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मालमत्ता हस्तांतरित करताना लागणार हस्तांतर कर रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.या निर्णयाचा शहरातील अनेक नागरिकांना लाभ होणार आहे.महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ही माहिती दिली.
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या सितारामपेठ परिसरात मद्यपींचा धिंगाणा
वनविभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि अश्लिल शिवीगाळ
काल दुपारी सितारामपेठ येथील तलावातील वनविभागाच्या बोटीमध्ये बसून 5 जण पीत होते दारू
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनाई केली असता या पैकी एकाने वनविभागाचे कर्मचारी सुरेंद्र मंगाम यांना केली धक्काबुक्की आणि शिवीगाळ
भद्रावती पोलिसांनी आरोपी मोहम्मद अली अन्सारी (20) याला केली अटक
आरोपी चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील रहिवासी
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांची किलबीलाट पुन्हा सुरु होणार आहे.जिल्ह्यातील 3151 शाळांचे अध्यापन पुन्हा 1 फ्रेबुवारीपासून सुरु होणार आहे. 6 जानेवारीपासून कोरोनाची परिस्थिती पहाता शाळा बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला होता. पण आता रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा मुहुर्त अखेर मिळालाय. 1 फ्रेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी शाळा सुरु करायाला दिला हिरवा कंदिल दिलाय.
रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी.
कोरोना रुग्ण संख्येत घट
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 200च्या पार येत होती, तीच आता बाधितामध्ये घट.
गेल्या 24 तासात 103 जणांना कोरोनाची लागण झाली.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे अँक्टिव्ह रुग्ण 1097 एवढे आहेत.
जामनेर इथं भाजपतर्फे मोठ्या संख्येने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गिरीश महाजनांसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन, भाजपाचे नेते तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.