साताऱ्यातील कोरानाबाधितांचा आकडा दोनशेपार, निम्म्याहून अधिक कोरोनामुक्त
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या वर पोहोचली (Corona Patient increase Satara) आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या वर पोहोचली (Corona Patient increase Satara) आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही 100 च्या वर गेली आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. पण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. साताऱ्यात काल (21 मे) 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील सारी आजाराचा एक रुग्ण (Corona Patient increase Satara) आहे.
जिल्ह्यात काल सापडलेल्या रुग्णांमध्ये काही रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. एकूण 9 कोरोना रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील आसरेमधील 1, कोरेगाव तालुक्यातील भीमनगरमधील 1, सातारा तालुक्यातील आसनगावमधील 1, रायघरमधील 1, कास खुर्दमधील 1, जावली तालुक्यातील वरोशी येथील 1, गावडी येथील 1, फलटण येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
त्याशिवाय खटाव तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील मायणीमधील एक, निमसोडमधली दोन आणि गारेवाडी येथील एक रुग्ण आहेत. तसेच खटावमध्ये सारीची लागण झालेला एक रुग्ण आहे.
जिल्ह्यात पाटण तालुक्यातील धामणी गावच्या एकाला आणि कराड तालुक्यातील शामगाव येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 201 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 106 जण कोरोनातून बरे झालेले आहेत.
संबंधित बातम्या :
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?
Pune Corona | पुण्यात सात रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीला कोरोनाचा विळखा
Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 41 हजार 642 वर