नगरच्या कोरोनाचे नाशिकवर विघ्न, चाचण्या वाढवण्याचे आदेश; सिन्नरमध्ये पुन्हा 296 रुग्ण
अहमदनगरमधील (Ahmednagar) वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांची चिंता नाशिककरांना (Nashik) भेडसावते आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत.
नाशिकः अहमदनगरमधील (Ahmednagar) वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांची चिंता नाशिककरांना (Nashik) भेडसावते आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत. (Corona patients in Ahmednagar fear Nashik, orders to increase tests, 296 corona patients again in Sinnar)
कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सध्या रुग्णवाढीमुळे हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. ही सारी परिस्थिती लक्षा घेता नाशिक जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये 980 रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या 980 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात आली. जिल्ह्यातील 3 लाख 97 हजार 612 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 38, बागलाण 11, चांदवड 37, देवळा 22, दिंडोरी 21, इगतपुरी 08, कळवण 04, मालेगाव 12, नांदगाव 11, निफाड 142, सिन्नर 296, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 अशा एकूण 675 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 283, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 14 तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्ण असून अशा एकूण 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 7 हजार 107 रुग्ण आढळून आले आहेत.
नियमांचे पालन नाही
सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पंचवटी, रामकुंड, शालीमार, अशोकस्तंभ, मुंबई नाका, नाशिकरोड, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह सर्वच भागात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषतः बहुतांश जण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली, तर आटोक्यात आणणे मोठे आव्हान असणार आहे. (Corona patients in Ahmednagar fear Nashik, orders to increase tests, 296 corona patients again in Sinnar)
इतर बातम्याः
सोने-चांदी स्वस्त, खरा खरेदी मस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
पुन्हा पाऊस ओला ओला: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
शिक्षण विभागाची करामतः परीक्षा फॉर्म भरला गणिताचा अन् गुण मिळाले जीवशास्त्राचे, नाशिकमधला प्रकार