Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलमडली, वर्ध्यात महिलेने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच श्वास सोडला

कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच तिचा मृत्यू झाला (corona positive woman death in wardha due to not getting stretcher and wheelchair).

स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलमडली, वर्ध्यात महिलेने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच श्वास सोडला
मन पिळवटून टाकणारं वास्तव ! स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने महिलेचा दम लागून मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 8:08 PM

वर्धा : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) या भयानक संकटात आता दररोज काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. कुठे रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होतोय, तर कुठे रुग्णालयाला आग लागल्याने रुग्णांचा होरपळून मृत्यू होतोय. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीय. आरोग्य यंत्रणेचं अक्षरक्ष: कंबरडं मोडलं आहे. वर्ध्यात देखील अशीच काहीसी घटना आज घडली आहे. कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच तिचा मृत्यू झाला. मन अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलडली आहे. यापेक्षा आणखी भयानक परिस्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय (corona positive woman death in wardha due to not getting stretcher and wheelchair).

नेमकं प्रकरण काय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच धडकी भरली आहे. एकीकडे आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सामान्य रुग्णालयात मात्र सुविधांच्या अभावाने रुग्णांसह नातलगांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. वर्ध्यात एका रुग्णाला स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेला पायी आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याची वेळ आली. पण आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच त्या महिलेचा दम लागून मृत्यू झाला. त्यामुळे ही परिस्थिती कधी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिलेला दमाचादेखील त्रास

जिल्हा सामान्य रुग्णालयात आज (25 एप्रिल) एका महिलेला उपचारासाठी आणले होते. त्या महिलेला कंबरेचे दुखणे असल्याने त्यांना रुग्णालयात आणले होते. दरम्यान, रुग्ण कोविड पॉझिटीव्ह असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबिय तिला आयसोलेशन कक्षाकडे नेत होते. महिलेला दमाचादेखील त्रास होता. रुग्णाला व्हिलचेअर, स्ट्रेचर उपलब्ध करणे गरजेचे होते. पण, ही सुविधा न मिळाल्याने रुग्णाला पायीच आयसोलेशन कक्षाकडे नेले जात होते.

महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश

दरम्यान, श्वास घेण्यास अडथळा येत असल्याने महिला रुग्णाने आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच प्राण सोडले. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णांकरीता साधी व्हिलचेअरदेखील या रुग्णालयात उपलब्ध नाही? असा प्रश्न रुग्णाच्या नातलगांकडून उपस्थित करण्यात आला. रुग्णांच्या नातेवाईकांचं आक्रोश करत रडणं या भयानक वस्तुस्थितीची गडदपणे जाणीव करुन देतेय. या महिला रुग्णाच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात उपस्थित नाही, दूरध्वनीवरही प्रतिसाद नाही

विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ही एकच घटना नाही. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत आहे. सध्याच्या या भयावह काळात जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे. याप्रकरणी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही (corona positive woman death in wardha due to not getting stretcher and wheelchair).

हेही वाचा : ज्या बागेने प्रेम, शांतता, प्रसन्नता दिली, त्याच बागेच्या कुशीत आता अंत्यविधी, राजधानी दिल्लीतील भयान वास्तव

आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.